अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.
Read More
बाल हक्कासाठी लढा देणाऱ्या 'क्राय' संस्थेकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये इंटरनेट वापर संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लहान मुलांकडून सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी ही परिस्थिती.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याच्या पलायनाची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारभाराइतकी किंवा कदाचित जास्तच चर्चा रुग्णालयाच्या कारभाराचीही झाली. पुण्यातील हे मोठे सार्वजनिक रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी...
पाश्चिमात्य देशांनी भारताकडे आजपर्यंत कायम एक बाजारपेठ म्हणून व्यावसायिक दृष्टीनेच पाहिले. पण, मागच्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप्स इंडिया’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत, भारताला जगातील एक मुख्य उत्पादक देश बनवले. त्याचाच परिणाम आज आपल्याला भारताच्या निर्यातीवाढीतून दिसून येतो. त्याचेच हे आकलन...
दै. ‘मुंबई तरुण भारत’ हे प्रारंभीपासूनच कलाकारांना, त्यांच्या कलाकृतींना व्यासपीठ देणारे एक हक्काचे माध्यम. आमच्या या प्रयत्नांत जेजेच्या प्रा. गजानन शेपाळ यांचे भरीव योगदान. ‘कोविड’पूर्वी विविध कलाप्रदर्शनांचा आढावा घेणारे ‘कलादालन’ हे त्यांचे सदर अगदी अखंडपणे सुरु होते. ‘कोविड’ काळात कलाप्रदर्शनांमध्येही खंड पडला. पण, कलेच्या प्रचार-प्रसाराचे व्रत थांबता कामा नये, म्हणून प्रा. शेपाळ यांनी विविध कलाकार, त्यांच्या कलाशैलीविषयी स्तंभलेखनाची कल्पना मांडली आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’नेही या कल्पनेला मूर्त स्वरुप
मुंबईतील कोविड घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा आवाज उठवला असून यासंदर्भात ते म्हणाले, पालिकेतील खिचडी घोटाळा हा जवळपास १६० कोटी रुपयांचा असल्याचे सोमय्या म्हणाले, यावेळी सोमय्यांनी पुन्हा एकदा खा. संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कोविड काळातील खिचडी घोटाळा संजय राऊत यांनी यांसदर्भातली कंत्राटे मिळवून आपल्या मित्रपरिवाराचा फायदा करून दिल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे (एआय) किंवा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या तंत्रज्ञानामुळे नोकर्यांवर कुर्हाड कोसळणार, ही वस्तुस्थिती असली, तरीही भविष्यात या नव्या तंत्रज्ञानासाठी सुसज्ज होण्याशिवाय कुणालाही पर्याय नाही. मग ते नोकरदार असो वा व्यावसायिक, सर्वांनाच आता यासाठी विद्यार्थ्यांच्याच भूमिकेत शिरणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : देशात गेल्या काही आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या घटताना दिसत आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण कमी होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी आता देशात १ हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दि. १५ मे रोजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ८०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटना अर्थात ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस गॅब्रायसिस यांनीदेखील यासंदर्भात इशारा दिला आहे. कोरोना अजून संपलेला नसून ‘ओमिक्रॉन’नंतर आणखी नवे ‘व्हेरिएंट’येऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. मात्र, कोरोना संपला की न संपला, ‘ओमिक्रॉन’संपला की न संपला आणि नवे ‘व्हेरिएंट’येणार की न येणार, असे प्रश्न समोर असतानाच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मात्र देशातील कोरोनाविषयक निर्बंध हटवण्याची घोषणा केली आहे.
भांडुपच्या डॉ. प्रकाश यशवंत राणे यांचे ‘कोविड’ रुग्णांसाठी अतुलनीय योगदान
चित्रपटांना सध्या १०० टक्के उपस्थितीची परवानगी देऊन एकपडदा चित्रपटगृह मालकांना मागील दीड वर्षांमध्ये आलेले वीजबिल, त्यांचे भाडे राज्य सरकारने माफ करून दिलासा द्यावा, तर आणि तरच येत्या काळामध्ये मराठी चित्रपट टिकणार असल्याचे मत मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी व्यक्त केले.
‘कोविड’पश्चात उद्भवणाऱ्या गंभीर आजारांबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी प्रकाशन केले.
प्रियांका गांधी, राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला नव्हे, तर राज्य सरकारांना धारेवर धरले पाहिजे, अशी कोणतीही आकडेवारी का दिली नाही व केंद्राने निधी देऊनही ‘ऑक्सिजन’निर्मिती केंद्र उभारून त्याची सोय का केली नाही, याचा जाब विचारला पाहिजे. पण, ती गांधी भावंडं असो, वा संजय राऊत यांना जमणार नाही.
गेले सलग २२ दिवस, रोज नोंद होणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या ५०,००० पेक्षा कमी असल्याचे दिसून आले
गेल्या २४ तासांत ४९,००७ जण रोगमुक्त
भारतात गेल्या २४ तासांत ४०,००० पेक्षा(३९,७५६) कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सलग आठ दिवस ५०,००० पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज ४,८२,०७१ इतकी आहे.
भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत.
नव्या धोरणांतर्गत केंद्र सरकारची पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी
बुधवारी १० हजार लसीचे डोस देणार
कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये लसीकरण कोकीलाबेन रुग्णालयातर्फे करण्यात आल्याचेही रहिवाशांना लसीकरणापूर्वी सांगितले गेले. परंतु, लसीकरणानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रावर मात्र कोकीलाबेन रुग्णालयाऐवजी नानावटी तसेच विविध रुग्णालयांची नावे असल्याचा दावा त्या सोसायटीतील रहिवासी असलेल्या नेहा अल्शी यांनी ट्विटरवर केला आहे. नानावटी रुग्णालयाशी याबाबत रहिवाशांनी संपर्क साधल्यानंतर अशाप्रकारचे कुठलेही लसीकरण त्यांनी केले नसल्याचे उघडकीस आले.
जागतिकीकरणापासून पूर्णपणे फारकत घ्यायची असे नाही. पण, देशांतर्गत सक्षमीकरण तेवढंच महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव असणे म्हणजेच ‘ग्लोबलायझेशन’. गेले दीड वर्ष जगाला वेढून राहिलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या सर्वांचे आयुष्य आश्चर्यकारकरीत्या, नाट्यमय पद्धतीने आमूलाग्र बदलून टाकले आहे.
मे आणि जून दरम्यानच्या २३ दिवसांत राज्यात २० हजारांच्या जवळपास मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचा महाराष्ट्रात प्रवेश झाल्यापासून गेल्या सव्वा वर्षातील ही मृतांची सर्वाधिक वाढ आहे. सरकार, आरोग्यमंत्री धडधडीतपणे कोरोना मृत्यूच्या आकड्यांमध्ये लपवाछपवी करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षाकडून वारंवार केला जात आहे.
निमंत्रण नसल्याने जेष्ठ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची नाराज
अमेरिका ते जपान - १५ देशांतील मराठी मान्यवरांची उपस्थिती
डॉ. जयशंकर यांना आपल्या दौर्यामध्ये अमेरिकन प्रशासनाच्या मनाचा ठाव घेण्याचे कामही करावे लागणार आहे. ‘कोविड’संकटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या परदेश दौर्यांना विराम दिला असला, तरी ‘कोविड’ग्रस्तांचा आकडा आटोक्यात आल्यावर लवकरात लवकर त्यांनी अमेरिका दौरा करून अध्यक्ष जो बायडन यांची द्विपक्षीय पातळीवर भेट घेणे आवश्यक आहे.
‘केपीएमजी’च्या या ‘कोविडनंतरचे ‘एचआर’ व्यवस्थापन’ या आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापन सर्वेक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, सर्वेक्षण देशांतर्गत २० प्रमुख व निवडक उद्योगांमधील ३१५ कंपन्यांमधील ‘एचआर’ व्यवस्थापन विषयक प्रतिसादांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या अभ्यास सर्वेक्षणाला प्रासंगिक व्यापकता निश्चितपणे लाभली आहे.
‘ड्राईव्ह इन लसीकरण‘ हा लसीकरणाचा नवा पर्याय मुंबई महापालिकेने नुकताच पुढे आणला. त्यामुळे अॅपमध्ये नोंदणी करण्यात जाणारा वेळ, उन्हाच्या तडाख्यात लसीकरण केंद्रांबाहेर लागणार्या लांबच लांब रांगा आणि गर्दी या मनस्तापातून आता मुंबईकरांची सुटका होऊ शकते. मात्र, पालिकेच्या या मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी काही निर्णय पालिका प्रशासनाला घ्यावे लागतील. पण, त्यासाठी पालिका प्रशासनाची कितपत तयारी आहे, हाच खरा प्रश्न.
‘लस दिली नाहीस, तर चांगले होणार नाही’ असा फोन राज्यांच्या काही मुख्यमंत्री आणि भारतीय नेत्यांनी अदर पुनावाला यांना केला. अदर यांनी त्यांचे नाव काही सांगितले नाही. पण, त्यांना फोन करून धमकावले गेले. हे असे काही होऊ शकते, याची जाणीव केंद्र सरकारला असावी. त्यामुळेच की काय पुनावाला यांना केंद्र सरकारने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली. पण, या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या अदर त्यांच्या कुटुंबीयांसह लंडनमध्ये दाखल झाले. आपल्याला त्या भयंकर परिस्थितीमध्ये पुन्हा लवकर जायचे नाही, असेही त्यांनी सांगितले. यावरुन हाच प्रश्न उ
जनभावना भडकविता येते. पण, प्रत्येक वेळी ती भावना विवेकी असते असे नाही. न्यायसंस्थांनी अशा अविवेकी याचिकांचा किमान विवेकी विचार करावा, ही अपेक्षा अवाजवी ठरावी का?
कोरोना महामारीशी लढताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जसे केंद्र सरकार आणि मोदींकडे बोट दाखवते, तसाच काहीसा प्रकार दिल्लीतही घडताना दिसतो. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ‘दिल्लीचे ठाकरे’ ठरले आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
दि. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणाचे दरवाजे खुले होणार आहेत. सरकारी किंवा खासगी रुग्णालयांत सर्वसामान्यांना ही लस घेता येईल. पण, या लसीकरणासाठी देशातील आणि खासकरून राज्यातील प्रशासकीय यंत्रणा कितपत सज्ज आहेत, असाच प्रश्न उपस्थित होतो.
काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने थेट पवारांचे नाव न घेता, या ‘घरच्या घरी राजकीय लसीकरणा’बाबत सरकारला चांगलेच सुनावले होते. तसेच केंद्र सरकारने लसीकरणासंबंधीची नियमावली स्पष्ट करण्याची सूचनाही न्यायालयानेही केली. त्यामुळे राजकारण्यांना एक न्याय आणि सामान्यांना दुसरा, हा प्रकार यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आला.
२१व्या शतकात भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांच्या असलेल्या मर्यादा उघड झाल्या असल्या तरी त्या चौकटीत राहून संरक्षण, अवकाश, ऊर्जा आणि ‘कोविड-१९’ प्रतिबंधक लसीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकतात. त्यासाठी रशियासोबत संबंधांमध्ये निर्माण झालेल्या चुण्यांवर इस्त्री फिरवून त्याची नीट घडी बसवण्याचे काम भारताला पुतीन यांच्या आगामी दौर्यात करावे लागेल.
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकांना 'को- विन' अॅपच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी इतर कोणतेही बनावट मोबाईल अॅप डाऊनलोड करु नये आणि तुमची वैयक्तिक माहिती कुठेच शेअर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघादरम्यान सध्या सुरु असलेल्या ‘बॉर्डर-गावस्कर’ कसोटी क्रिकेट करंडक मालिकेच्या तिसऱ्या सामन्याला गुरुवार, दि. ७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेत सध्या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला असून मालिकेत आघाडी मिळविण्याच्या दृष्टीने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. मात्र, तिसरी कसोटी सुरु होण्यापूर्वीच वादाला तोंड फुटल्याने क्रिकेट विश्वातील वातावरण चांगलेच तप्त झाले आहे.
'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन'ला 'डीसीजीआय'ची अखेर मंजुरी
बेपत्ता असलेल्या प्रवाशांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांवर
कल्याण-डोंबिवलीकरांची चिंता वाढण्याची शक्यता
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोव्हिड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी महापालिका आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. या पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी अशा कोव्हीड योध्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
नाशिक प्रशासनासमोर कोरोनाचा फैलाव रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान झोपडपट्टी व दाटीवाटीच्या भागांमध्ये होते. अशातच या भागात मोठ्या संख्येने गरीब, मजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने या नागरिकांसमोर आरोग्याबरोबरच रोजच्या जगण्याचेही गंभीर प्रश्न या काळात उभे राहिले. अशावेळी नागरिक व प्रशासनाला मदतीचा हात देणार्या भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांचा कोरोनालढ्यातील योगदानाचा घेतलेला आढावा...
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी खर्या अर्थाने नाशिककरांचे पालकत्व निभावले. कुलकर्णी यांनी नाशिकनगरीतील नागरिकांच्या जागरूकतेसाठी ‘लॉकडाऊन’च्या प्रारंभीच्या काळात समाजमाध्यमांतून जनजागृतीपर व्हिडिओ, ध्वनिफितीद्वारे जनजागृती करण्यावर भर दिला. कुलकर्णी यांनी या काळात घेतलेली भूमिका ही नाशिककर जनतेच्या आरोग्याचे हितरक्षण करणारी ठरली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपत्तीच्या काळात केलेले कार्य ध्यानात घेत मदतकार्याचा आराखडा तयार केला. आ. निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आ. संजय केळकर यांच्यासह ठाण्यातील २४ नगरसेवक, ११ मंडल अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मदतीच्या यज्ञात सहभागी झाले. त्याविषयी...
नवी मुंबई महानगराने साधलेल्या आजवरच्या लखलखीत विकासात मागील ३० वर्षे या शहराचे सत्ताधारी म्हणून आ. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी ध्येय-धोरणांचा निर्विवाद मोठा वाटा आहे. लोकनेता तोच जो खऱ्या अर्थाने संकटकाळी जनसेवेला तत्पर असतो. आ. गणेश नाईक आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते जनसेवेसाठी रस्त्यावर उतरले होते. तेव्हा, नवी मुंबईतील भाजप आमदार गणेश नाईक यांच्या कोरोना लढ्यातील योगदानाबद्दल माहिती देणारा हा लेख...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र आहे. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही ठाकूर यांची प्रतिमा जनमानसावर कोरली गेली. जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...
कोरोना महामारीच्या काळात लोकप्रतिनिधींनी विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. यामध्ये प्रामुख्याने गरजवंतांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यावर प्रामुख्याने भर होता. तेव्हा, अशा जीवघेण्या परिस्थितीतही केवळ जनसेवेसाठी महामुंबईतील प्रत्येक ‘हॉटस्पॉट’वर जात अन्यायग्रस्तांविरोधात सातत्याने आवाज उठविणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
जनतेच्या सेवेसाठी भारतात दोन वर्ग हे कायम कार्यरत असतात. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे शासकीय सेवक. याचीच प्रचिती या काळात आली. स्वतः कोरोनाबाधित होऊनदेखील अविरत सेवाकार्य सुरू ठेवून नागरिकांना मदत करणारे सेवक म्हणून नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.