दासनवमी अर्थात माघ वद्य नवमी विशेष
जातीभेदास तीव्र विरोध करणाऱ्या समर्थ गुरु रामदासांनी हिंदू समाजाला आवश्यक असणारे विषय लक्षात घेऊन त्यांनी दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, करुणाष्टके, शेकडो अभंग, स्तोत्रे, स्फुट रचना, रुबाया, सवाया, भारुडे, कविता, अनेक ओवीबद्ध पत्रे तसेच आरत्या रचल्या. जीवनाच्या अंतिम पाच दिवसांमध्ये समर्थांनी अन्नपाणी वर्ज्य केले. तीन वेळा 'जय जय रघुवीर समर्थ ' हा घोष करून त्यांचा आत्मा पंचत्वात विलीन केला. समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. याच दिवसाला दासनवमी म्हंटले जाते..