नवी दिल्ली : देशात गेल्या काही आठवड्यात कोरोना रूग्णांची संख्या घटताना दिसत आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण कमी होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी आता देशात १ हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दि. १५ मे रोजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ८०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
तर आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन १५५१५वर आली आहे. आरोग्य यंत्रणादेखील अलर्ट असल्याचे पहायला मिळाले होते. परंतु, केंद्रीय आरोग्य विभागाकडून कोरोना परिस्थितीविषयी विश्लेषण केले गेले होते. कोरोना विषाणू घातक नसल्याने काळजी करण्याची काही गरज नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते.