मुंबई अग्रलेख

पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

देशविरोधी, हिंदूविरोधी व विकासविरोधी एनजीओंवर लगाम कसण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एफसीआरए’ विधेयकातील दुरुस्त्यांच्या माध्यमातून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. परिणामी, आपले काळे धंदे बंद पडण्याच्या भीतीने अनेक एनजीओंनी केंद्र सरकारविरोधात कावकाव सुरु केली. यावरुनच अमित शाह यांनी राष्ट्रविरोधकांवर नेमका घाव घातल्याचे स्पष्ट होते...

हेच नाही आणखीही हवे!

आपल्याला विनासायास मिळणारा पैसा बंद होईल, याचेच दुःख आडत्यांना झाले असून त्यांची दलाली काँग्रेसने सुरु केली आहे. काँग्रेसला शेतकर्‍यांची नव्हे, तर बाजार समित्यांतल्या आडत्यांची, दलालांची पर्वा आहे, शेतकर्‍यांना त्यांनी लुटले तरी चालेल, आम्हीही त्या लुटमारीत सामील होऊ, पण शेतकर्‍याचा फायदा होऊ देणार नाही, असा काँग्रेसचा पवित्रा आहे...

चीनला रोखण्यासाठी तिघे एकत्र

भारत आणि जपानने एकत्रितरित्या रशियाच्या सुदूर पूर्व भागात गुंतवणूक केल्यास रशियाला त्याचा फायदा होईलच, पण चीनच्या मनसुब्यांनाही झटका बसेल. कारण चीन या भागावर प्रभुत्व स्थापित करुन आर्क्टिक महासागरातही रशियासमोर आव्हान उभे करु इच्छितो. पण आता भारत व जपान रशियाबरोबर येत चिनी महत्त्वाकांक्षेआड उभे ठाकले आहेत...

रावांचा तुष्टीकरण उद्योग

मुस्लीम तुष्टीकरणापायी वीरांचा, हुतात्म्यांचा इतिहास पुसून टाकण्याचे काम के. चंद्रशेखर राव करत आहेत. कारण, ‘हैदराबाद मुक्ती संग्रामा’त भारतमातेच्या अनेक सुपुत्रांचे रक्त सांडले, अनेकांनी आपले आयुष्य अर्पण केले. पण, त्या बलिदानींना कृतज्ञतेने आठवून त्यांचा सन्मान करण्यापेक्षा के. चंद्रशेखर राव खुर्चीसाठी मुस्लीम मतांची काळजी करताना दिसतात...

काश्मीरच्या वाटेवर बंगाल

बांगलादेशी, रोहिंग्या मुस्लिमांनी जागोजागी कब्जा केल्याने संबंधित परिसरातील हिंदूंनी अन्यत्र पलायन केले. परिणामी, लोकसंख्येचे संतुलन बिघडल्याने बंगालमधील कित्येक जिल्हे मुस्लीमबहुल झाले. कट्टर मुस्लिमांनी वाटेल तेव्हा छोट्या-छोट्या कारणांवरून वा कारणाशिवाय दंगल केल्याचे आढळले. लॉकेट चॅटर्जी यांनी या पार्श्वभूमीवरच बंगाल काश्मीरच्या वाटेवर असल्याचे म्हटले...

खासगीकरणाचा फायदा

‘एअर इंडिया’चे खासगीकरण झाल्यास कंपनी जीवंत ठेवण्यासाठी सरकार जो पैसा ओतते, त्या पैशाचा वापर आरोग्य, शिक्षण, बांधकाम यांसारख्या इतर महत्त्वाच्या व सरकारचे कर्तव्य असलेल्या विषयांसाठी करू शकते. हा मुद्दा ऊठसूट खासगीकरणाला विरोध करणार्‍यांनीदेखील समजून घेतला पाहिजे. कारण, ही देश विकण्याची नव्हे तर देश-जनतेला वाचवण्याची मोहीम आहे. ..

विश्वासार्हता वाढेल

जगभरातील गुंतवणूकदार, व्यापारी, व्यावसायिक, कंपन्या भारताकडे आशेने पाहत असून भारतात उद्योग सुरू करत आहेत किंवा त्यासाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर सिंगापूर आंतरराष्ट्रीय मध्यस्थता कराराचा भाग झाल्यास भारताची जागतिक पातळीवरील विश्वासार्हता अनेक पटींनी वाढते. ..

उत्स्फूर्त प्रतिक्रिया कधी?

माजी नौैदल अधिकार्‍याला झालेल्या मारहाणीमुळे बादशहावरील टीकेनंतर डोक्यात राख घालून उधळलेल्यांची भूमिका त्याने पोसलेली शिव‘सेना’ वठवताना दिसते! किंवा २०१५ साली पॅरिसस्थित ‘शार्ली हेब्दो’ साप्ताहिकाने मोहम्मद पैगंबरावर व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याने धर्मांध मुस्लिमांनी त्यावर हल्ला केला, तसाच प्रकार शिवसैनिकांनीही आपल्या मालकाच्या व्यंगचित्रावरून केला...

ठाकरे सरकारचेच अपयश

कमालीचा संघर्ष करून समाजोन्नतीसाठी मिळवलेल्या आरक्षणाला सर्वप्रकारे स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. मात्र, त्याला कारणीभूत ठरली ती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील राज्यातील विद्यमान महाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षणाबद्दलची उदासीन आणि असंवेदनशील भूमिका, बेपर्वा वृत्ती!..

सीबीआय का नको?

पालघर साधू हत्याकांडाचे सत्य आणि तथ्य निराळेच असल्याचे जाणवते. ते उघड होऊ नये, म्हणून तर ठाकरे सरकार सीबीआय चौकशीला विरोध करत नाहीये ना? हा रास्त प्रश्न उपस्थित होतो. कारण, ठाकरे सरकारचे कर्तृत्वच असे की, त्यांनी जे जे दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचे जसजसे उत्खनन झाले, तसतसे भीषण वास्तव समोर येत गेले...

शिवसेना कोणापुढे लोळतेय?

मुंबई-महाराष्ट्राची कैवारी असती तर शिवसेनेने १०६ मराठीजनांच्या रक्ताचा सडा शिंपणार्‍या काँग्रेससोबत जाण्याची बेइमानी की हरामखोरी, कधी केलीच नसती. पण, सत्तेसाठी काँग्रेसच्या गळ्यात गळे घालत तिने तोंड काळे केले. त्यामुळे कंगनाला पाठिंबा देणार्‍यांची नावे डांबराने लिहिण्याआधी शिवसेनेने आपणही कोणापुढे, का आणि कोणासोबत लोळतोय, हे पाहावे...

तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढण्याचा संकेत

पँगाँग त्सो सरोवर कारवाईत भारताने चीनविरोधात तिबेटी शरणार्थ्यांचा समावेश असलेल्या एसएफएफ सैनिकांना मैदानात उतरवले व यावेळी एक सैनिक हुतात्मा झाला. हुतात्मा सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिबेटी शरणार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘तिबेट देशाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. हा भारताचा तिबेटी स्वातंत्र्यासाठी प्रखरतेने लढण्याचा संकेत ठरु शकतो...

दाऊद उडवणार ‘मातोश्री’?

मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार असताना कोण्या दाऊदने ‘मातोश्री’ किंवा ‘सिल्व्हर ओक’ वगैरे उडवण्याची कितीही धमकी दिली तरी तो ती प्रत्यक्षात आणू शकत नाही. तेव्हा उद्धव ठाकरे वा शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेसने काळजी करु नये. कारण, मोदीराज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख आणि देशातील १३० कोटी सर्वसामान्य भारतीयदेखील सुरक्षित आहेत...

तेव्हा कुठे होते तुमचे हिंदुत्व ?

वृत्तवाहिनीच्या कॅमेर्‍यासमोर एखाद्या मुलीला ‘हरामखोर’ म्हणण्यापर्यंत मजल मारणार्‍या संजय राऊत यांची शब्दांतला अर्थ समजून घेण्याइतकी बौद्धिक पात्रता असेल, असे वाटत नाही. मानसिक संतुलन ढासळल्याने कोणाला शिव्या देणे किंवा अर्थाचा अनर्थ करण्याचे प्रकार होत असतात आणि तेच आता संजय राऊत यांच्यासारख्याने ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’बाबतही केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही...

शर्यत बेतालपणाची...

दुसरीकडे चित्रपटात काम करणार्‍या एका अभिनेत्रीच्या विधानांवर आज महाराष्ट्राचे गृहमंत्री, शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार, महिला कार्यकर्त्या वगैरे तुटून पडताना दिसतात. पण, सत्ताधार्‍यांना काय सध्या एवढे एकच काम उरले आहे? महाराष्ट्र सरकारसमोर फक्त कंगना राणावतशी सामना कसा करायचा हाच प्रश्न शिल्लक आहे? ..

आसामची मदरसाबंदी

देशावर ७० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसने मुस्लीम मतपेटीकडे अधिक लक्ष दिले. आसाममध्येही काँग्रेसने प्रदीर्घकाळ सत्ता गाजवली आणि तिथेही मुस्लिमांना खुश करण्याचेच काम केले. सरकारी खर्चाने चालवले जाणारे मदरसे त्याचेच उदाहरण असून आताचे भाजप सरकार मात्र तुष्टीकरणाचे धोरण व सरकारी मदरसे दोन्हीही बंद करण्याच्या तयारीत आहे. ..

अभिनंदन आणि अपेक्षा!

प्रकाश आंबेडकर स्वतःहून पुढाकार घेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर खुले करण्यासाठी उभे ठाकले व यामुळे समाजकंटकांनी जाती-धर्मात तेढ माजवून आपला-परका असा कृत्रिम भेद निर्माण केल्याने उद्भवलेली कोंडी फुटण्यास नक्कीच मदत झाल्याचे म्हणता येते. मात्र, प्रकाश आंबेडकरांची ही भूमिका भावी काळातही राहायला हवी, जेणेकरुन भारतीय समाज एकरस, समरस होण्यात हातभार लागेल. ..

घराण्याचीच चाकरी हवी!

नाकर्त्या राहुल गांधींकडे पाहिले की, पक्षाच्या चिंधड्या उडण्याचीच जरा जास्त खात्री वाटते आणि यातून काँग्रेसचा उरला सुरला सांगाडाही लवकरच नष्ट होऊन जाईल, हेही समजते. तथापि, संजय राऊत यांना हे कसे कळणार आणि कळले तरी ते कसे वळेल? ते वास्तवाकडे डोळेझाक करुन घराण्याच्या वारसालाच मसिहा ठरवणार. ..

होरपळीचे सेक्युलर गुन्हेगार

स्वीडनमध्ये सीरिया, लिबियासारख्या देशांतून आश्रयाला आलेल्या स्थलांतरित परंतु, धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या जाळपोळ, दगडफेक आणि हिंसाचारातून भारतासह युरोपीय जनतेनेही आपले हित कशात हे ओळखले पाहिजे व ते हित जपणार्‍या राज्यकर्त्यांना सत्तेवर आणले पाहिजे. जेणेकरुन देशात कट्टर, धर्मांध कीड फोफावणार नाही. ..

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका!

आपल्या धन्यापुढे आणि पेंग्विन, ‘नाईट लाईफ’पुरते मर्यादित ज्ञान असलेल्या, वाडवडिलांच्या पुण्याईवर सत्तेचा उपभोग घेणार्‍या युवामंत्र्यांपुढे मान डोलावत उदय सामंत यांनी पदवी परीक्षा रद्दचा निर्णय घेतला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घ्याच, असा आदेश देत विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचवण्याचे आणि ठाकरे सरकारच्या अहंकाराची नांगी ठेचण्याचे काम केले...

इजाजत मागणारा ‘रडवय्या’

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपद बळकावण्यासाठी उद्धव ठाकरेंनी लाचारीच्या सर्व सीमा ओलांडल्या. अशा व्यक्तीने स्वतःला ‘लढवय्या’ म्हणवून घेणे, अजिबात शोभत नाही, उलट त्यांनी आपल्याला ‘रडवय्या’ म्हणवून घ्यावे नि त्याचे बॅनर-पोस्टर राज्यभर लावावे, तेच त्यांना शोभून दिसेल...

आता श्रीलंकेचे ‘इंडिया फर्स्ट’

मोदी सरकारच्या कार्यशैलीमुळे नेपाळ, बांगलादेश आदी शेजारी भारतापासून दुरावत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले गेले. मात्र, अशा परिस्थितीत श्रीलंकेने ‘इंडिया फर्स्ट’ नीती अवलंबण्यातून शेजारी देशांचे उदाहरण देऊन मोदी सरकारवर टीका करणार्‍यांना सणसणती चपराक बसल्याचेच स्पष्ट होते. ..

काँग्रेसचे वर्तमान आणि शिवसेनेचे भविष्य

आज जे काँग्रेसचे वर्तमान आहे, तेच शिवसेनेचे भविष्य आहे. 2014 साली या देशात एका नव्या राजकारणाची सुरुवात झाली. कर्तृत्व आणि नेतृत्वाचा कस लागणार्‍या या राजकारणाचे धुरंधर नेते म्हणून नरेंद्र मोदी समोर आले. आता त्यांनी खेचलेल्या निकषांच्या रेषा इतक्या ठळक आहेत की घराण्यांचे कितीही कौरव एकत्र आले त्या पुसता येणार नाहीत...

काँग्रेसमधला नेतृत्वपेच

गांधी घराण्याला केंद्रस्थानी ठेवूनच काँग्रेसमध्ये सर्व घडामोडी होताना दिसतात व त्यामुळे पक्ष मात्र गलितगात्र झाल्याचे दिसते. तथापि, ही फक्त सुरुवात आहे, हा काँग्रेसचा वर्तमान नसून एका घराण्याचे तळवे चाटणार्‍या पक्षाचे काय होते, हे दाखवणारा ट्रेलर आहे. कारण, घराण्याच्या पुण्याईवर विसंबल्याने काय होते, हे दाखवणारा संपूर्ण पिक्चर तर अजून बाकी आहे...

डाव्यांनी केलेली पुस्तकहत्या !

खुद्द ताहिर हुसैन याने हिंदूंना धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील दंगल घडवल्याची कबुली दिली. डाव्या उदारमतवादी-बुद्धिजीवी कळपाला मात्र त्यावरच पांघरुण घालायचे असून इस्लामी धर्मांधांनी केलेल्या दंगलीचे वास्तव समोर येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठीच त्यांनी Delhi Riots 2020 : The Untold Story पुस्तकाला विरोध केला. ..

दाभोलकर ते करमुसे...

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खरे गुन्हेगार कोण हे शोधलेच गेले नाही आणि अखेर सीबीआयकडे ते प्रकरण द्यावे लागले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तेच झाले आणि आता करमुसे प्रकरणातही तेच होऊ घातले आहे. म्हणजेच गुन्हेगारांना सोडून साव पकडण्याचे काम पवारांच्या ताब्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी इमानदारीने करुन दाखवले...

सौदीने लाथाडलेला पाकिस्तान

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा रियाधला जाऊन पोहोचले. मात्र, अपवाद वगळता जगभरात कोणत्याही देशापुढे उभे राहिले तरी अपमानच पदरी पडणार्‍या पाकिस्तानला सौदी अरेबियानेही लाथाडले. त्याचे कारण जगाचा बदलता सारीपाट आणि नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळातील भारताचे वाढते जागतिक महत्त्व! ..

ठाकरे सरकारची मस्ती उतरली!

मुंबई आपल्याच वाडवडिलांची जहांगिरी असल्याच्या थाटात वावरणार्‍या आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात बिहार पोलिसांना आडकाठी करणार्‍या व सीबीआयलाही ‘क्वारंटाईन’ करु पाहणार्‍या शिवसेनेची मस्ती सर्वोच्च न्यायालयाने उतरवली. तसेच आता सीबीआयच्या अखत्यारित हे प्रकरण गेल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सत्य लपवण्याचा डाव उधळला जाईल, याची खात्री वाटते...

मुस्लीम तुष्टीकरणाचा खेळ

पोलिसांत अल्पसंख्याक तरुणांच्या निवडीसाठी भरतीपूर्व मोफत प्रशिक्षणाची नवाब मलिक यांनी घोषणा केली. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रिपदी असूनही त्यांच्याच नाकाखाली खुलेआम मुस्लीम तुष्टीकरणाचा हा प्रकार असून शिवसेना शांतच आहे. अर्थातच घड्याळकाकांनी सत्तेचा तुकडा टाकून डरकाळ्या फोडणार्‍या वाघाच्या चारहीबाजूंनी मुसक्या आवळल्याचाच दाखला...

भगव्याकडे स्वागतच!

सत्तेसाठीच्या काकांच्या करामती आपल्याला जमतील का, हा अजित पवार तसेच पार्थ व रोहित पवारांपुढील प्रश्न आहे. त्यामुळे आता हिंदुत्वाचा जोर आहे, तर आपणही त्याच बाजूने गेलेले बरे, असा विचार त्यांनी केला असावा. अर्थात, ते शरद पवारांविरोधात हिंदुत्वाकडे वळत असतील तर हरकत नाहीच, फक्त ते राहुल गांधींच्या जनेयुधारी नकली हिंदुत्वासारखे असू नये...

शिवसेनेचा कम्पाऊंडर

मुख्यमंत्रीपदी बसलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे डॉक्टर व मी शिवसेनेचा कम्पाऊंडर असे तर संजय राऊत सुचवत नसतील ना? ठाकरे केवळ खुर्चीत बसलेत, पण अधिकार माझ्यासारख्या कम्पाऊंडरचाच चालतो, हा तर त्यांच्या बोलण्याचा आशय नसेल ना? तसे असले तरी काही हरकत नाही. मात्र, यामुळे महाराष्ट्राची जी वाट लागली त्याचे काय? महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे मातेरे झाले त्याचे काय?..

प्रामाणिकतेच्या सन्मानासाठी धोरणबदल

प्रामाणिक करदात्यांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहन देणारी, भीती दूर करणारी आणि भ्रष्टाचार, लाचखोरीला चाप लावणारी नवी व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सुरु केली. नव्या व्यवस्थेमध्ये करभरण्याबरोबरच करदात्याच्या सन्मान, आदर व कौतुकालाही महत्त्वाचे मानले आहे, कारण, राष्ट्रउभारणी व राष्ट्रविकासात करदात्यांचे स्थान अनन्यसाधारण असते...

फसलेली धर्मनिरपेक्षता

बंगळुरुमधील काँग्रेस आमदाराच्या बंगल्यावर हल्ला करुन उसळलेली दंगल फसलेल्या धर्मनिरपेक्षतेचा नमुना असून वर्षानुवर्षे दाढ्या कुरवाळण्याचा उद्योग आज एका काँग्रेस आमदारावर उलटल्याचे दिसते. तसा तो उद्या मुस्लिमांचे लांगुलचालन करणार्याउ देशातल्या प्रत्येक टोळक्यावरही उलटू शकतो आणि तेव्हा मात्र त्यांनाही आमदार मूर्तीप्रमाणे कुठेतरी दडूनच बसावे लागेल, कारण फसवी धर्मनिरपेक्षता तेव्हा त्यांना वाचवायला येणार नाही...

हलगर्जीपणा झाला की केला?

पालघरमधील साधू हत्याकांडातील २८ आरोपींना न्यायालयाने उलटतपासणी करुन नव्हे, तर तपास यंत्रणांनी वेळीच आरोपपत्र दाखल न केल्याने जामिनावर सोडले. मात्र, या आरोपींवर आरोपपत्र दाखल न करण्याचा हलगर्जीपणा तपास यंत्रणांनी स्वतःहून केला की गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचा त्यांच्यावर काही दबाव होता?..

खालच्या दर्जाचे राजकारण

अरविंद सावंत यांचा सर्वात मोठा प्रमाद म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या स्वयंभू व कर्तृत्ववान व्यक्तीच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा त्यांनी केलेला अश्लाघ्य प्रकार. आपल्या सर्वांना माहिती आहेच की, गोपीनाथजींच्या जीवनाचा अंत एका दुर्दैवी अपघातात झाला. मात्र, आता त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत अरविंद सावंत यांनी अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करुन दाखवले आहे...

नाकर्त्या श्रेष्ठींमुळे दिशाहीन

कार्यकर्त्यांना कोणताही ठोस कार्यक्रम देऊ न शकणार्‍या नाकर्त्या काँग्रेस श्रेष्ठींमुळे संपूर्ण पक्षच भरकटला असून कोणाचा पायपोस कोणात नाही, असा प्रकार झाल्याचे दिसते. शशी थरुर यांनी पक्षश्रेष्ठींच्या याच कामगिरीवर बोट ठेवले व काँग्रेस पक्ष दिशाहीन झाल्याचे म्हटले...

देशात ‘योगी’च सर्वोत्कृष्ट !

उत्तर प्रदेशसारख्या अफाट लोकसंख्येच्या आणि तुलनात्मकदृष्ट्या विकासाचा वारसा नसलेल्या राज्याचे योगी आदित्यनाथ २४ टक्के मतांसह देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले, तर प्रगतीचा वारसा असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात टक्के मतांसह सातव्या क्रमांकावर राहिले आणि ठाकरे सरकारच्या अपयशी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली...

‘तुंबई’ची मानकरी शिवसेनाच!

दरवर्षी पावसाळा आला रे आला की, नालेसफाईच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी पालिकेची तिजोरी रिकामी करायची, नालेसफाईचा दिखावा करायचा आणि मुंबईकरांनी दिलेल्या कराच्या पैशातून मेवा खायचा, हा शिवसेनेचा नेहमीचा शिरस्ता झाला. म्हणूनच ‘आमची मुंबई’ करत कित्येक वर्षांपासून घसा ताणणार्‍या शिवसेनेशिवाय मुंबईच्या तुंबईचे मानकरी कोणीच नाही...

‘त्यां’ना झोंबलेल्या मिरच्या!

श्रीराम मंदिराचा पायाभरणी सोहळा होतानाच असदुद्दीन ओवेसी यांचा तीळपापड झाला. बाबराचा वंशज किंवा सेनापती मीर बाकी शोभावा, अशा पद्धतीने ओवेसींनी इथे साडेचारशे वर्षांपासून बाबरी मशीद होती, आहे आणि राहणारच, अशी दर्पोक्ती केली. तसेच श्रीराम मंदिरनिर्मितीने मिरच्या झोंबल्याने हा सेक्युलरिझम आणि लोकशाहीचा पराभव तर हिंदुत्वाचा विजय असल्याचे ते म्हणाले...

आतातरी पोटदुखी थांबेल का?

श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसमयी सर्वाधिक दिवाळे वाजले ते शिवसेनेचे. कारण, श्रीराम मंदिराच्या पायाभरणीची तारीख निश्चित झाली. पायाभरणीचा सोहळा झाला. तरी शिवसेना जल्लोष साजरा करताना कुठेच दिसली नाही. कदाचित बेईमानीच्या पायावर उभ्या ठाकलेल्या सत्तास्थानावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी, राहुल गांधी आणि बारामतीकर काकांची यासाठी परवानगी मिळाली नसेल...

मनी आनंद, भुवनी आनंद!

असंख्य हिंदू जनांच्या हृदयात विराजमान प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्मितीची घटना पिढ्यान् पिढ्यांच्या दडपशाहीवर मात करणार्‍या भारतभूच्या स्वत्त्वाचे किंवा कालजयी श्रद्धेचे प्रकटीकरण असून, हे मंदिर हिंदूंच्या ओळख व अस्मितेला चिरंजीवित्त्व देणारे ठरेल. अशा श्रीराम मंदिरनिर्मितीचा मनी आनंद, भुवनी आनंद झाल्याशिवाय राहणार नाही...

सेक्युलर बुरख्याआडचे भामटे

पैसे आणि राजकारणाच्या जोरावर हिंदूंना धडा शिकवण्यासाठीच दिल्लीत दंगल घडवल्याची कबुली नुकतीच ताहिर हुसैन याने दिल्ली पोलिसांसमोर दिली. मात्र, दादरीमध्ये अखलाखच्या हत्येनंतर छाती पिटणार्‍या काँग्रेसी, डाव्या कम्युनिस्ट पक्षांतील सेक्युलर बुरख्याआडच्या भामट्यांना दिल्ली दंगलीत मारल्या गेलेल्या आयबी अधिकारी अंकित शर्मा नि कित्येक हिंदूंच्या खुनाचा निषेधही करावासा वाटत नाही...

युवा मंत्र्याला वाचवण्यासाठी दबाव?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाशी मुंबईतल्या ‘नाईट लाईफ’ची तरफदारी करणार्‍या, रात्रीच्या पार्ट्यांत रमणार्‍या युवा मंत्र्याच्या सहभागाची शक्यता बळावते आणि सदर युवा मंत्र्याला वाचवण्यासाठीच राज्य सरकार व गृहमंत्री मुंबई पोलिसांना तपासाची निराळी दिशा दाखवत असून बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट होते...

चीनविरोधी जपानी चाल

चीनशी स्पर्धा करायची तर कंपन्यांना कुशल व अकुशल दोन्ही प्रकारचे श्रम उपलब्ध व्हायला हवे. पण, जपानी कंपन्या कार्यरत राहण्यात हीच बाधा होती, कारण जपानची लोकसंख्या आणि त्यातील काम करु शकणार्‍या श्रमशक्तीची कमतरता. म्हणूनच आता जपानने ‘अतिथी देवो भवः’ म्हणत स्थलांतरितांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला...

शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ

केंद्र सरकारने बुधवारी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि देशात नव्या शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. एकविसाव्या शतकाच्या आशाआकांक्षा पूर्ण करतानाच भारतीय परंपरा व मूल्यांशी सुसंगत तसेच ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत कालबाह्य शिक्षणपद्धतीला हद्दपार करणारे हे धोरण आहे...

‘आयर्न ब्रदर’ नव्हे आर्थिक गुलाम!

नेपाळ व अफगाणिस्तानने पाकिस्तानचा आदर्श घेत ‘आयर्न ब्रदर’ व्हावे, असे चीनने सांगितले. तथापि, ‘आयर्न ब्रदर’चा शब्दकोषातील अर्थ इथे अभिप्रेत नसून नेपाळ व अफगाणिस्तानने पाकिस्तानप्रमाणे चीनचे आर्थिक गुलाम व्हावे, हा आहे. कारण, पाकची अवस्था तशीच झाली असून कोणीही पैसा वाडग्यात टाकत नसल्याने तो देश चीनसमोरच हात पसरुन उभा असतो...

मंदिराला ना, कुर्बानीला हा!

कोरोना प्रसार होईल, याचा विचार न करता बकरी ईदला जनावरे कापता यावी म्हणून पवारांनी कुर्बानी विशेष बैठकीचे आयोजन केले. अर्थात यामागेही गरीब, वंचितांचे मसिहा असलेल्या शरद पवारांचा प्रत्येकाच्या ताटात मटण-बिर्याणी पडावी, हाच उदात्त हेतू असेल. जेणेकरुन विषाणू संसर्गाच्या काळात संबंधितांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल नि कोरोनावरच कुर्बानी देण्याची वेळ येईल!..

बांगलादेश कोणाच्या पारड्यात?

बांगलादेशला चीनच्या गटात सामील होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नरत असून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. शेख मुजीबूर रहमान यांच्या हत्येचा एक आरोपी राशिद चौधरीला बांगलादेशच्या ताब्यात सोपवण्याचे पाऊल अमेरिका उचलू शकते, जेणेकरुन चीनच्या मनसुब्यांवर पाणी फेरता येईल व बांगलादेशाशी संबंध आणखी दृढ होतील...

खलिस्तानवाद्यांना दणका

स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ‘सार्वमत-२०२०’चे आयोजन केले होते. मात्र, कॅनडा सरकारने खलिस्तानवाद्यांच्या या मोहिमेला आपला पाठिंबा नसल्याचे ठामपणे सांगितले. अर्थात, गेल्या सहा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने राबवलेल्या परराष्ट्र धोरणामुळेच खलिस्तानवाद्यांना हा दणका बसल्याचे स्पष्ट होते...

झारीतले शंकराचार्य

श्रीराममंदिर निर्मिती कोणत्याही मुहूर्तावर अवलंबून नाही तर मंदिरनिर्मितीला ज्या वेळी सुरुवात होईल, ती वेळच आपोआप शुभ मुहूर्त होऊन जाईल. म्हणूनच स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनीही ‘झारीतले शंकराचार्य’ न होता मुहूर्त, मतभेद, वैयक्तिक लाभ वगैरेच्या बाहेर पडून ५ऑगस्ट रोजी होणार्‍या श्रीराममंदिर निर्मितीच्या पायाभरणी सोहळ्यात मनाने, कायेन, वाचेन सहभागी व्हावे...

आता का विषय संपवा?

उदयनराजेंच्या मान-अपमानाची पर्वा करणार्‍या संजय राऊतांना उदयनराजे भोसलेंकडे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागताना लाज वाटली नव्हती का? तेव्हा आपण आपल्या थोबाडातून काय बरळतो, याची या माणसाला अक्कल नव्हती का? की आपल्या गलिच्छ शब्द आणि संकेताला हा इसम भोसले घराण्याचा सन्मान समजत होता?..

इकडे आड तिकडे विहीर

माजिद मेमनसारखी व्यक्तीही बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला श्रीराममंदिराच्या पायाभरणी सोहळ्याला जाऊ नका, धर्मनिरपेक्षतेची शपथ आहे तुम्हाला, अशी धमकी देऊ लागली. तसे नसते आणि शिवसेनेने आपला करारी बाणा सोडला नसता तर मेमन यांची ही हिंमतच झाली नसती. कोणीही यावे नि टपली मारुन जावे, असा हा प्रकार असून यातून शिवसेनेची आजची दयनीय अवस्थाच दिसून येते...

तापलेले दूध आणि गप्पगार सरकार

‘माझा शेतकरी राजा, सातबारा कोरा, कर्जमुक्त बळीराजा, कापूसदिंडी’ या आणि अशा कितीतरी शब्दफुलोर्‍यांनी बहरलेली भाषणे करणे आणि प्रत्यक्ष शेतकर्‍याचे प्रश्न सोडविणे, यात काय फरक असतो याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्राला येतो आहे. दुधाचे आंदोलन पेटले आहे आणि सरकार गप्पगार पडलेले आहे...

‘बाबरमती’च्या पवारांचा जळफळाट

पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिराची पायाभरणी करणार म्हणजे इतिहास रचला जाणार, मोदींचे नाव अमर होणार! परिणामी, ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कोणतेही ऐतिहासिक कार्य करु न शकलेल्या आणि सदैव भावी पंतप्रधान राहिलेल्या नेत्याचा जळफळाट होणारच. इतकेच नव्हे तर आगामी तीन ते साडेतीन वर्षांत मंदिर पूर्ण बांधून त्याचे उद्घाटनही मोदींच्याच हस्ते होईल आणि या वर्मी बसणार्‍या घावाने तर प्रचंड आशावादी असलेल्यांचा गळू ठसठसणारच!..

ग्रीडफेलमंत्र्याची मस्ती

जनतेने वाढीव वीजदेयकांविरोधात आंदोलन, निदर्शनेही केली पण नितीन राऊत यांना जनतेच्या हातातील कटोरा दिसला नाही. तसेच आपल्याच नाकर्तेपणामुळे जनतेवर हाती कटोरा घेण्याची दुर्दैवी वेळ आल्याची लाज-शरमही त्यांना वाटली नाही आणि असा ग्रीडफेलमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कटोरा घेऊन फिरावे लागेल, असे म्हणत असल्याचे दिसते. ही मस्ती नाहीतर काय?..

इराणप्रकरणी डावी माध्यमे तोंडघशी

‘द हिंदू’च्या दाव्याची इराणनेच पोलखोल केली आणि या लेखातील दावा निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. इराणच्या बंदरे व सागरी संघटनेचे उप प्रभारी फरहाद मुंतसिर यांनी बुधवारीच ‘अल जजिरा’शी बोलताना, भारतीय माध्यमांत प्रसारित झालेले वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले...

रझा अकादमीचा ‘इस्लाम खतरे में?’

‘पैगंबराच्या सन्मानात मरण पत्करेल,’ असे म्हणणारी ‘रझा अकादमी’ आणि ‘जिहाद’साठी ‘फिदायीन’ हल्ले करण्यास प्रवृत्त होणार्‍यांत अजिबात फरक नाही. आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘रझा अकादमी’चाही पैगंबराच्या सन्मानासाठी असेच काही करण्याचा उद्देश किंवा तयारी आहे का? ..

काँग्रेसमधील युवानेत्यांची फरफट

आपण केलेल्या मेहनतीमुळे राज्यात पक्ष सत्तेपर्यंत पोहोचला आणि आता आपल्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडेल, याची खात्री सचिन पायलट यांनाही होती. पण झाले उलटेच, काँग्रेसश्रेष्ठींनी राहुल गांधींना प्रतिस्पर्धी नको म्हणून सचिन पायलट यांचे पंख छाटले व अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आणून बसवले. इथूनच सचिन पायलट यांनी नाराजी वाढत गेली व ती पक्षाविरोधात बंड करण्यापर्यंत गेली...

ममतांच्या सत्ताकाळातले गुंडाराज

ममता बॅनर्जींनी विरोधकांवर टीका करताना अनेक वर्षांपूर्वी ‘चुन चुन कर बदला लुँगी’ असे म्हटले होते. तद्नंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडाराजला सुरुवात झाली आणि पक्षाचे कार्यकर्ते वेचून वेचून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करु लागले. आताच्या भाजप आमदार देवेंद्रनाथ रॉय यांच्या हत्येशी तृणमूल काँग्रेसचा संबंध आहे अथवा नाही, हे तपासानंतर समोर येईलच...

भळभळत्या जखमेचा अस्वस्थ

अपवादाने वा अपघातानेही किंवा पुन्हा एकदा पावसात भिजल्यानेही पवार आता पंतप्रधान होऊ शकत नाहीतच आणि अर्थातच ‘जाणते’ नेते असल्याने याची जाणीव पवारांनाही असणारच, पण पद न मिळाल्याच्या भळभळत्या जखमेचे काय? म्हणूनच ते न मिळालेल्या पवारांनी फडणवीसांवर टीका करण्याऐवजी स्वतःच अस्वस्थतेच्या चिपळ्या वाजवलेल्या बर्‍या! ..

बालिश बहु...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘हेल्थ’ आणि ‘डिझास्टर टुरिझम’साठी फिरत असल्याची टीका केली. मात्र, आदित्य ठाकरेंची विधाने त्यांच्या मागे फिरणार्‍या पेंगूसैनिकांना कदाचित आवडतही असतील, पण यातून मंत्रीपदावर असतानाही त्यांचा बालिशपणा सुरु असल्याचेच स्पष्ट होते...

आत्मघाताकडे...

विवेकाचा त्याग करुन चीनच्या हातची कठपुतळी झालेल्या के. पी. शर्मा ओली यांचा भारतविरोध व चीनच्या नादी लागण्याचा प्रकार नेपाळला आत्मघाताकडेच नेणारा ठरेल. कारण असंगाशी संग केला की, पतन अटळ असते...

योगींचा दणका!

राज्यातील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी योगी सरकारने गांभीर्याने केलेले प्रयत्न माहिती असल्याने अटक टाळण्यासाठी विकास दुबे पळापळ करत होता, कुठेतरी आसरा शोधत होता, पण कितीही धावाधाव केली तरी योगी सरकारच्या गुन्हेगारविरोधी दणक्यामुळे त्याच्या हातात बेड्या पडल्याच...

गुन्हेगार ठाकरे सरकारच असेल!

परीक्षा रद्दसारख्या सवंग आणि लोकानुनयी निर्णयामुळे शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना आनंदाने वेडावतीलही किंवा तसे व्हावे म्हणूनच राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम असावे. पण, यातून सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार असून त्याचे गुन्हेगार ठाकरे सरकारच असेल!..

चीन का झुकला?

गलवान खोर्‍यातील सैन्य माघारीतून चीनने भारतासमोर गुडघे टेकल्याचे सिद्ध झाले. मात्र, ‘ड्रॅगन’ नाव देत उगाचच अतिबलाढ्य, अतिअजस्त्र देश अशी प्रतिमा निर्माण केलेला चीन भारतासमोर झुकला कसा? चीनवर असा कोणता दबाव होता की, दादागिरी, धटिंगणशाही सोडून त्याला नमावे लागले?..

लव्ह जिहाद : बौद्धांच्या मुळावर घाव

लडाखमध्ये मुस्लीम तरुणांकडून बौद्ध मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या धर्मांतराचा प्रकार सुरु असल्याचा दावा ‘लडाख बुद्धिस्ट असोसिएशन’ने केला आहे. लडाखमधील बौद्धांच्या मुळावर उठलेला ‘लव्ह जिहाद’चा प्रकार थांबला नाही, तर इथे बौद्धांचे नामोनिशाण शिल्लक राहणार नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे...

भारताविरोधात चीन एकाकी

कोरोनाच्या प्रसादामुळे संपूर्ण जगाला संकटाच्या खाईत लोटणार्‍या चीनविरोधी लाटेत एका सार्वभौम, लोकशाही देशावरील अतिक्रमणामुळे जबरदस्तवाढ झाली. परिणामी जगभरात चीनची छी-थू झाल्याचे, चीन एकाकी पडल्याचे आणि जपान, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या आर्थिक व सैनिकी महाशक्ती भारताच्या बाजूने उभ्या ठाकल्याचे दिसते...

मैदानावर उतरलेला नेता

नरेंद्र मोदींच्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर येण्याने सैनिकांत संचारलेला जोश आणि स्फूर्ती पाहण्यासारखी होती. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारतमाता की जय’च्या अखंड जयघोषातून समोर उभ्या ठाकलेल्या कोणत्याही शत्रूच्या नरडीचा घोट घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक सैनिकांत निर्माण झाल्याचे यावेळी दिसले...

फुटीरतावाद्यांना तडाखा

भारताच्या ‘कलम ३७०’ रद्द करण्याच्या तडाख्याने पाकिस्तान किंवा ‘आयएसआय’ला कसल्याही कारवाया करण्याची संधीच मिळाली नाही. त्यातूनच सय्यद अली शाह गिलानीसारख्या फुटीरतावाद्यांचा दबदबा नाहीसा झाला आणि त्याची परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाली...

चिनी दलालांचा थयथयाट

भारताने चिनी अ‍ॅप्सवर निर्बंध लादल्याने अन्य देशांनीही यापासून प्रेरणा घेत चीनविरोधात कारवाई केली तर करायचे काय, अशी भीती चीनला वाटते. कारण, चिनी अर्थव्यवस्थेची मदार घरगुती बाजारपेठेपेक्षा निर्यातीवरच सर्वाधिक आहे आणि म्हणूनच बंदीची लाट उसळली तर, या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो, यावरुन चीन बिथरल्याचे दिसते...