महाराष्ट्र

चौकशीची मागणी शरद पवारांच्या अंगलट

कोरेगाव भीमा-प्रकरणी शरद पवारांना साक्षीसाठी हजर रहावे लागणार.सोमवारी याप्रकरणी पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी शरद पवार यांनाही साक्षीसाठी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे...

कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १५ हजार लाभार्थी

गेल्या काही काळापासून शेतकरी डोळे लावून बसलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड केली होती. त्यानुसार, आता १५ हजार लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आदी मंत्री महोदयांची उपस्थिती होती...

शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांचा निषेध : देवेंद्र फडणवीस

'कर्जमुक्ती नाही, चिंतामुक्ती नाही, 7/12 कोरा नाही, अवकाळीची मदत नाही', असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. तसेच महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराबद्दल सरकारने कुठली भूमीका घेतली नाही, याच आम्ही निषेध करतो, असे फडणवीस यांनी अधिवेशनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. ..

असमर्थ सरकारचा पर्दाफाश करणार : प्रवीण दरेकर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दरेकर आणि भाजपच्या इतर सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा जाहीर निषेध दर्शविला..

महाविकास आघाडीचे आव्हान नाही : भाजप नेते नरेंद्र पवार यांची स्पष्टोक्ती

सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून भाजप नेते नरेंद्र पवार यांची सर्वत्र ओळख आहे. कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार म्हणून नरेंद्र पवार यांनी २०१४ ते २०१९ या काळात उत्तम काम केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्मानुसार कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला सोडल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी या मतदारसंघात ४४ हजारांपेक्षा जास्त मते घेतली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विविध कार्यक्रमांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चांगले काम केले आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षवाढीचे कामही ..

डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक

नागरिकांनी घाबरू नये; 'कामा' संघटनेचे आवाहन..

शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार!

प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांची प्रारंभी केली निवड; आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन ..

समाज कल्याण केंद्रांवर आता पालिकेचा ‘वॉच’

लोकप्रतिनिधींकडून उभारण्यात आलेल्या समाज कल्याण केंद्रांचा गैरवापर करणाऱ्यांना चाप लावण्याच्या दृष्टीने पालिका आता दक्ष राहणार आहे. समाज कल्याण केंद्र सामाजिक संस्थांना वाटप करण्यासाठी पालिकेने नवे धोरण मंजूर केले आहे. त्यानुसार आता पालिका अधिकारी आणि नगरसेवकांचा या केंद्रांवर ‘वॉच’ राहणार आहे. या नव्या धोरणामुळे सामाजिक संस्थांच्या गैरकारभाराला आळा बसणार आहे...

मुंबईकरांनो यंदा पुन्हा 'तुंबई' पाहण्यासाठी सज्ज व्हा !

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार असली, तरी २४ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता कायम आहे. अतिवृष्टीत मुंबईला पूरमुक्त करण्याच्यादृष्टीने पालिकेने नियोजन करून कामे हाती घेतली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये २७३ ठिकाणांमधील २०४ ठिकाणे पूरमुक्त केली आहेत. त्यात यंदाच्या पावसाळ्यापूर्वी अधिक ४५ ठिकाणे पूरमुक्त केली जाणार आहे. मात्र, उर्वरित २४ ठिकाणांची कामे पुढील एक - दीड वर्षांत पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. ..

महापालिका इमारतींच्या अग्निसुरक्षा पुन्हा तपासा !

मुंबई महापालिकेच्या सर्व इमारतींची, रुग्णालयांची, शाळांची नियमानुसार अग्निसुरक्षा असावी, यासाठी पुन्हा एकदा तपासण्या करून घ्याव्यात, असे निर्देश आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकार्यां ना दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ अधिकार्यां्ची एक विशेष आढावा बैठक झाली. त्या बैठकीत आयुक्तांनी हे निर्देशदिले. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे, महापालिकेच्या चारही मुख्य रुग्णालयांचे अधिष्ठाता, यांत्रिकी व विद्युत खात्याचे प्रमुख अभियंता, ..

मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न अधिवेशनात गाजणार

मराठा समाजाच्या तरुणांना न्याय देण्यात आलेले अपयश ही सरकारची उदासीनता आहे. हे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळवून देण्याकरीता आम्ही विधीमंडळाच्या सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे स्पष्ट प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. ..

कल्याण-कसारा मार्गिका वर्षअखेरपर्यंत होणार पूर्ण

मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा स्थानकादरम्यान तिसरे आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. परंतु, भूसंपादनातील अडचणीमुळे हे काम चार वर्षापासून रखडले आहे. आता तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे...

अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधपक्ष तयार

"शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये संवादाचा अभाव आहे, त्यांनी संवाद करावा मग विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण द्यावे," अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ..

लोकमान्यांच्या सेवेची पोचपावती मिळाली : डॉ. सदानंद मोरे

तत्त्वज्ञ, भाष्यकार, संशोधक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन..

वारीस पठाणांचे ‘त्या’ हिंदुविरोधी वक्तव्यावरून घुमजाव

माझे वक्तव्य हिंदुविरोधी नसून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जातो आहे. यातून मला आणि माझ्या पक्षाला बदनाम केले जात आहे, असे म्हणत हिंदुविरोधी भूमिकेतून घेतली माघार...

मुंबईनंतर मनसेचा बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोर्चा पुण्याकडे

मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत काही पोलिसदेखील होते...

संत गाडगेबाबा जयंती विशेष

भारतभूमीला लाभलेल्या संतमहंतांपैकी एक थोर संत 'गाडगेबाबा'. अंधश्रद्धा निर्मूलन, साधी राहणी, परोपकार आदी विचारांचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगी, बुद्धिवान, परोपकारी संताला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!..

फडणवीसांचे 'माजी मुख्यमंत्रीपद' अल्पकाळ : सरकार्यवाह भैय्याजी जोशी

रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशींच्या सुचक वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा..

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ कुडाळवासीयांची भव्य रॅली!

विशाल तिरंग्यासह लक्षवेधी ठरली कुडाळवासीयांची रॅली; ढोलताशांच्या गजरात पालखीतून संविधानाची मिरवणूक ..

लासलगाव जळीतकांडातील महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी

उपचारादरम्यान झाला मृत्यू ..

दुग्धाभिषेकावेळी जमा केलेले दूध मिळणार मुक्या जनावरांना

सांस्कृतिक डोंबिवली शहरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. ते दूध वाया जाऊ नये, याकरिता डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील शिवमंदिरात जाऊन 'पॉज प्लान्ट अॅंण्ड अॅयनिमल वेल्फेअर' सोसायटी या संस्थेच्यावतीने दूध जमा करण्याचे काम केले जाते...

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देणारी अमुल्या नक्षलवाद्यांशी संबंधित : येडीयुरप्पा

‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषण देणारी नक्षलवाद्यांशी संबंधित : येडीयुरप्पा..

महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची आत्महत्या

महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रणवच्या आत्महत्येमुळे अकोला आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे...

वारिस पठाण विरोधात अंधेरीत तक्रार

एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अंधेरी पोलीस ठाण्यात वारिस पठाण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संघर्ष संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज म्हस्के यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या तक्रारीची प्रत पोलीसांकडे सुपूर्द केली आहे. याबद्दल आता पोलीस काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष आहे...

राज्यपालांचा महाविकास आघडीला पुन्हा एकदा दणका!

सरपंच निवडीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार ..

हिंसाचारात गुंतलेल्यांची पाठराखण शरद पवारांना भोवणार ? [वाचा सविस्तर]

पवारांच्या नावाने समन्स काढण्याची न्यायालयीन आयोगाला विनंती..

डोंबिवलीतील आगीत दीड लाख लीटर पाण्याचा वापर

डोंबिवली आग - डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीत ‘मेट्रोपोलिटीन’ कंपनीला मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड लाख लीटर पाणी वापरण्यात गेले...

'शिवाजीचे उदात्तीकरण' पुस्तकावर बंदी घालावी : निरंजन डावखरे

समाजमाध्यमांवर पुस्तकातील उतारे पाठविणाऱ्यांवरही कारवाईचा आग्रह..

वालधुनी नदीच्या पात्रात नारंगी रंगाचा तवंग

अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे...

माझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण ते योग्यवेळी बाहेर येईल : फडणवीस

माझ्या मागच्या षडयंत्रामागे कोण आहे ते योग्यवेळी बाहेर येईल, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूरच्या दिवाणी न्यायालयाने निवडणूक शपथपत्रातील माहिती लपवल्या प्रकरणी त्यांना दिलासा दिला आहे. यानंतर प्रतिक्रीया देताना ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. न्यायालयाने फडणवीस यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ..

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बारकाईने वाचा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपल्या भाग्याचा हेवा वाटावा असा क्षण मी आज अनुभवत आहे. अशा ऐश्वर्य संपन्न व्यासपीठावर मी आहे हे माझे भाग्य आहे असे म्हणत या कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ते प्रमोद बापट यांनी शिवप्रेरणेचा प्रभाव व त्याचे आजच्या काळातील महत्व सांगितले...

दादर, प्रभादेवी चौपाट्या चकाचक

रा. स्व. संघ आणि बजरंग दलाचे संयुक्त स्वच्छता अभियान..

हडसर किल्ल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू ; शिवजयंतीनिमित्त आली होती किल्ल्यावर

मुंबईतील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता...

२६ /११ मुंबई हल्ल्याची फेरचौकशी करा : अतुल भातखळकर

आमदार अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे २६ /११ मुंबई हल्ल्याच्या फेरचौकशीची मागणी..

'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्यांचे सोईस्कर मौन' : अतुल भातखळकर

भाजप आमदार अतुल भातखळकरांचे शिवसेनेवर टीकास्त्र..

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांना धमकी

सोशल मिडीयावर पोस्ट केला धमकीचा व्हिडीओ..

शरद पवार साहेब या १२ प्रश्नांची उत्तरे द्या !

एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रश्नी तपासावर भूमिका घेणाऱ्या शरद पवार यांना थेट प्रश्न..

राज्यात महिला सुरक्षित नाहीत ?, संतप्त नागरिकांची मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

सिल्लोडमधील अमानवी प्रकार , अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी..

‘सरकार पाडायचं तेव्हा भाजप पाडेल उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची गरज नाही’ : नारायण राणे

सिंधुदुर्ग इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला...

मुख्यमंत्र्यांची भूमिका राजकीय दबावापोटी : केशव उपाध्ये

एल्गार परिषद, भीमा कोरेगाव यांची चौकशी एनआयएकडे देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद ..

कर्तव्यदक्ष पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा पवारांचा प्रयत्न : माधव भंडारी

शरद पवार यांनी भीमा कोरेगाव व एल्गार परिषद प्रकरणात तपास करणाऱ्या पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. यावरूनच भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले...

महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

महाविकास आघाडीने समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली : चंद्रकांत पाटील..

माझगावमध्ये जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर आग

अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना..

इंदुरीकर महाराजांचे किर्तन म्हणजे सामाजिक प्रबोधनच : चंद्रकांतदादा

सुप्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर वादंग उठला असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. इंदुरीकर यांनी केलेले 'ते' वक्तव्य करायला नकोच होते. मात्र, एका वाक्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे हे कितपत योग्य आहे. खासकरून प्रसिद्धी माध्यमांनी याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. ..

मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला राष्ट्रवादीची अनुपस्थिती

महाविकास आघाडी केवळ दिखावा; राष्ट्रवादी तालुकाध्याक्षांचा आरोप..

नाणार प्रकरणावर मुख्यमंत्री भूमिका घेणार का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पासून कोकण दौऱ्यावर..

हिम्मत असेल तर जनादेशाला पुन्हा सामोरे जाऊन दाखवा : देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घणाघात..

माजी आमदार नरेंद्र पवार यांचा भाजपा सदस्यत्व राजीनामा नामंजूर

भाजपा प्रदेश बैठकीत नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नरेंद्र पवार भाजपातच असल्याचे केले जाहीर..

भारतीय जनता पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा निर्धार..

उदयनराजे भोसले यांना भाजपतर्फे राज्यसभेवर संधी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते...

राज्यपालांनी केले पोर्तुगाल राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डिसूसा यांच्या सन्मानार्थ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी राज भवन मुंबई येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. भारत व पोर्तुगाल देशांमधील संबंध दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ..

'जेएनयु'तील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे रा. स्व. संघ कार्यक्रमांबद्दल प्रश्न विचारतात !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर प्रश्न विचारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी टीकास्त्र सोडले आहे...

ठाण्यातील लेक सिटी मॉलला आग

ग्राहकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरु..

महाराष्ट्रात १ मे पासून एनपीआरची प्रक्रिया सुरु होणार

उद्धव ठाकरे सरकारमध्ये संघर्ष होण्याची शक्यता..

अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा

खासदार अरविंद सावंत यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ठाकरे सरकार स्थापनेवेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ..

सुरेश हावरे यांचा अभिमान वाटतो : नितीन गडकरी

"सुरेश हावरे यांचा व्यक्ती म्हणून अत्यंत अभिमान वाटतो," असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. सुरेश हावरे यांनी लिहिलेल्या 'नॅनो हाऊसिंग' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. "अत्यंत खडतर अशा प्रकारचा प्रवास करून आलेल्या घरातून सुरेश हावरे आले आहेत आणि नागपूर येथे असताना आपण त्यांचा प्रवास जवळून पाहिला," असेही गडकरी म्हणाले. 'नॅनो हाऊसिंग' या पुस्तकाच्या निमित्ताने देशभरातील बांधकाम व्यवसायाचा ऊहापोहदेखील गडकरी यांनी केला...

पुणे मेट्रोचा इतका कि.मीचा मार्ग मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार : प्रकाश जावडेकर

पुणे मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या १२ कि.मी. लांबीचा मार्ग मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार..

'शिदोरी'च्या संपादकांना अटक करा : राम कदम

काँग्रेसप्रणित राज्य मध्यप्रदेशमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि काँग्रेसच्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल छापण्वयात आलेल्माया मजकूराबद्दल गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर भाजपतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राम कदम आणि भाजप नेते किरीट सौमय्या यांनी या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमीका राम कदम यांनी घेतली आहे...

मुंबईकरांनो १७ फेब्रुवारीपर्यंत सायन उड्डाणपुल राहणार बंद

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार असून हा पूल बंद राहणार असल्याची माहिती..

काचेच्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर

नियम धुडकवणाऱ्या इमारती ; कारवाईविना बंदीच्या निर्णयाचा पालिकेलाही विसर..

खासदार सुप्रिया सुळेंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा सवाल

खासदार सुप्रिया सुळेंना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सवाल विचारला आहे. जेएनयूत अफझल गुरुच्या फाशीच्या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाची परवानगी कुलगुरुंनी दिली होती का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ..

भाजपनेच व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली : माधव भंडारी

शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा टोला..

अंधेरीतील एमआयडीसीमध्ये भीषण आग

रोल्टा कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर सर्वररूमला लागली आग..

'छत्रपतींचा वंशज म्हणून मध्यप्रदेश सरकारचे कृत्य कदापि सहन होणारे नाही'

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारने आणि काँग्रेस अध्यक्षांनी खुलासा करण्याची छत्रपती संभाजी राजेंची मागणी..

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील तर मुंबई अध्यक्षपद लोढांकडे कायम

भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा कायम..

मनसेचा झेंडा वादात; निवडणूक आयोगाची नोटीस

संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा अशी निवडणूक आयोगाची मागणी..

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींनी सांगितलेल्या मार्गावर देश चालला असता तर देशातले आर्थिक व वैचारिक चित्र वेगळे दिसले असते : आ. अतुल भातखळकर

सुप्रसिध्द लेखक डॉ. गिरीश दाबके यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आधारित पहिले मराठी भाषेतील “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी- एका वादळात हरवलेले महावादळ” या पुस्तकाचे काल बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आ. अतुल भातखळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले...

‘शिवसेनेत हिम्मत असल्यास महाराष्ट्र विधानसभा एकट्याने लढवावी’

सोलापूर येथे आयोजित पत्रकारपरिषदेत चंद्रकांत दादा पाटील यांचे शिवसेनेला आव्हान..

मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड : ठाकरे सरकारच्या भूमीकेकडे लक्ष

आरेतील मेट्रो कारशेडसाठी झाडांची तोड केल्यानंतर आता मेट्रो स्थानक आणि मार्गात येणारी तब्बल ५०८ झाडे हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. यात १६२ झाडे मुळापासून कापण्यात येणार असून ३४६ झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. याचा प्रस्ताव शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते याकडे वृक्षप्रेमी आणि मुंबईकरांचे लक्ष लागले आहे...

भाजपची 'दीनदयाळ थाळी' सुरु ; पंढरपूरातून सुरुवात

भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्या पुढाकाराने ही थाळी सुरू करण्यात आली आहे..