वेध

पुढे प्रचार, मागे कचरा

कार्यकर्ते उत्साही असतात मात्र, नेता हा प्रगल्भ असावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे आपण पुढे प्रचार करत असताना आपल्यामागे काय सुरू आहे, यावर उमेदवारांनी लक्ष ठेवणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे...

...तर मग हेही कराच!

'सुन्नी वक्फ बोर्डा'ने हिंदू-मुस्लीम बंधुभावाप्रीत्यर्थ अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरील आपला दावा सोडण्याची तयारी केल्याचे वृत्त बुधवारपासूनच माध्यमांनी दाखवण्यास सुरुवात केली. प्रथम आपण 'सुन्नी वक्फ बोर्डा'च्या निर्णयाचे स्वागत करायला हवे, पण 'सुन्नी वक्फ बोर्डा'ने नेमके हे पाऊल आताच का उचलले?..

'दादा' योग्यच!

सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाच्या (बीसीसीआय) निवडणुकीत उतरल्यानंतर त्याला देशभरातील अनेक क्रिकेट संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात पार पडलेल्या बैठकीत विविध क्रिकेट संघटनांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीसाठी गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब केले...

मंदावलेली प्लास्टिकबंदी

प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला जूनमध्ये वर्ष पूर्ण झाले. मात्र, अपुर्‍या उपाययोजनांमुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली नाही. सुरुवातीला नागरिकांवर, दुकानदारांवर वचक निर्माण झाला, पण नंतर प्रशासनाकडूनच कारवाई मंदावत गेली...

..तरीही पाणीटंचाई

पुढचा पावसाळा येईपर्यंत मुंबईकरांना पाण्याची चिंता राहणार नाही, हे नक्की. तरीही काही ठिकाणी आजही पाण्याची चिंता भेडसावतेय. या पाणीटंचाईमागे नैसर्गिक कारण निश्चितच नाही...

कृषीचा नवा अर्थसुगंध

बहुतांश दुष्काळी भागात शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर झेंडूची लागवड यशस्वी करत आर्थिक उत्पादनाचा नवा मार्ग विकसित केला आहे. कांदा उत्पादन केल्यावर त्यात दरांची असणारी स्थिती लक्षात घेता शेतकर्‍यांनी या संघर्षात न पडता झेंडू पिकाला दिलेली पसंती हे कृषी साक्षरतेचे लक्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...

सलमान खुर्शीदांची खंत

युवराज परदेशी असताना शिदेंपाठोपाठ काँग्रेसचेच आणखी एक ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. खुर्शीद म्हणतात, “आज काँग्रेस ज्या परिस्थितीत आहे, ती नेमकी कशामुळे आहे, ते कळले पाहिजे. ..

व्याघ्र संख्येत वाढ ; समस्या आणि उपाय

२०१४च्या तुलनेत यंदा राज्यात वाघांची संख्या ६४ टक्क्यांनी वाढली. २०१४ साली राज्यात १९० वाघांचे अस्तित्व होते, आता ही संख्या ३१२ झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये १२२ नव्या वाघांची भर पडली. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्य शासन तथा वनविभागाने व्याघ्र संवर्धनासाठी बरेच उपक्रम राबविले...

'हीच ती वेळ...'

'हीच ती वेळ...' हे ओळखूनच केवळ मूठभर शिवसेनेचे नेते आंदोलनकर्त्यांच्या मदतीसाठी उपस्थित राहिले. युवराज मात्र यापासून प्रत्यक्षात दूरच होते. वृक्षतोड रोखण्यासाठी काही आंदोलनकर्ते तेथे उपस्थित राहिले. मात्र, या मुद्द्यावर सुरुवातीपासून विरोध करणारे 'आरे बचाव'चे नेते यावेळी नेमके कोठे होते, हे गुलदस्त्यातच होते...

बँकॉकहून परत या... परत या...

काही बाही अजिबात न विचारता बोलायचे आणि चालू लागायचे बँकॉक वगैरे पट्ट्यांमध्ये. यावर काही लोकांची मत घेतली, तर त्यात सरळसरळ गट होते. एक गट देशाची आर्थिक चिंता वाहणारा होता. तो गट म्हणाला, त्याचे काय आहे की, ते बँकॉकला गेले तर याबाबत काही आक्षेप नाही...

महासत्तेच्या दिशेने...!

तांत्रिक ज्ञानवृद्धीचे हे द्योतक आहे. तांत्रिक ज्ञान आणि वैचारिक ज्ञानात वृद्धी झाली तरच महासत्ता म्हणून भारताचे नाव सर्वतोमुखी होईल...

निकड विवेकाची

नाशिक महानगरपालिकेने नुकताच आपला दीड वर्षातील प्लास्टिक जप्तीचा अहवाल तयार केला. यात दीड वर्षात तब्बल १३ हजार, २१५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले तर, ९२९ नागरिकांकडून ४३ लाख, ३९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला...

या ‘गांधीं’ना कोण समजावणार?

आज दुर्देवाने याच राष्ट्रपिता ‘गांधी’ यांचे आडनाव लावून मिरवणार्‍यांमध्ये या मूल्यांचा साधा लवलेशही दिसत नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधींप्रमाणेच सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधीही त्याला अपवाद नाहीत...

उभयसृपशास्त्र : एक गरज

'द रेप्टाईल डाटाबेस' यांच्या हवाल्यानुसार सरीसृपांच्या जैवविविधतेत भारत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. देशात सरपटणाऱ्या प्रजातींची संख्या ६८९ एवढी आहे...

घराणेशाही सुटता सुटेना...

१३४ वर्षांचा इतिहास असणाऱ्या आणि देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेस पक्षाचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षाविनाच सुरू होता. काँग्रेसच्या इतिहासात कदाचित ही वेळ बहुधा पहिल्यांदाच आली असावी. काँग्रेस कार्यकारिणी समितीत अध्यक्षपदासाठी कुणाच्याच नावावर एकमत होत नसल्याने अखेर सोनिया गांधी यांच्याच गळ्यात पुन्हा एकदा अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली...

मतपेटीतून देवाची काठी

जे. पी. नड्डा यांनीही प. बंगालमध्ये हत्या करण्यात आलेल्या ८० भाजप कार्यकर्त्यांना पितृपक्षात श्रद्धांजली वाहिली. राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या ८० कार्यकर्त्यांची हत्या हा विषय खरेच दुःखद. प. बंगालमधील दुर्गम भागामध्ये असेही काही कार्यकर्ते असतील की, ज्यांचा मृत्यूपेक्षाही भयंकर छळ झाला असेल, पण या गोष्टी उघडकीस आल्या नसतील. या हत्या कोणी केल्या? हिंसेच्या जोरावर सत्ता उलथविण्यावर विश्वास ठेवणार्‍या भंपक कम्युनिस्टांनी की धड इकडेही नाही अन् धड तिकडेही नाही, अशा तृणमूल काँग्रेसच्या पुरस्कर्त्यांनी, ..

रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबई महानगरपालिकेत राज्याचे अप्पर सचिव प्रवीणसिंह परदेशी यांना राज्याच्या कामकाजाचा अनुभव असल्याने मोकळे रस्ते हे त्या त्या भागाच्या विकासाला चालना देणारे असतात, हे त्यांना पक्के ठाऊक असल्याने परदेशी यांनी मुंबईतील रस्ते मोकळे करण्याला प्राधान्य दिले. त्यासाठी २६ ठिकाणी पार्किंग सेंटर सुरू करून त्या भागातील रस्ते ‘नो पार्किंग’ जाहीर केले...

ज्ञानगंगेचा झरा प्रवाही हवा

आजवर अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना ‘मुक्त’च्या अभ्यासक्रमामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणे सोयीचे झाले आहे. मात्र, आता ‘युजीसी’च्या जाचक अटींमुळे मागील वर्षभरात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील जवळपास दहा अभ्यासक्रमांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ..

‘आप’मतलबी केजरीवाल

दिल्लीकर ‘आप’ला पुन्हा एकदा संधी देणार नाहीत, याची कुणकुण केजरीवालांनीही लागली आहेच. म्हणूनच जाहिरातबाजी करून केजरीवाल आपल्या कामांचा पाढा दिल्लीतील जनतेसमोर वाचत सुटले आहेत. एकूणच या ना त्या कारणाने जनतेला सुखावणार्‍या फुकट्या योजना जाहीर करण्यात केजरीवालांनी धन्यता मानलेली दिसते...

परदेशी पशुपक्ष्यांचा व्यापार मोकाट

एखादा परदेशी जीव आपल्याकडील स्थानिक जैवसाखळीचा भाग झाल्यास तो ती उद्ध्वस्त करून तिचे अनुवांशिक चक्र बिघडविण्याचे काम करतो. त्यामुळे परदेशी प्राण्यांच्या खरेदी-विक्रीपासून त्यांना पाळण्यासंदर्भात कायद्याची चौकट निर्माण होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे...

'वह घडी आ गई...?'

माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि राहुल द्रविड यांचा अपवाद वगळता अन्य ज्येष्ठ खेळाडूंना निवृत्तीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यामुळे धोनीने वेळीच शहाणे व्हावे, अशी अपेक्षा आहे...

‘चले जाव’ करताना दुकान बंद

माझा हात धरून त्यांनी महाराष्ट्राच्या भ्रष्टदुष्ट राजकारणाचा अभ्यास केला आहे. आता त्यांच्यात तो अभ्यास किती मुरला माहिती नाही. पण विकास किंवा लोकांचे कल्याण करण्यासाठी ते नेमक्या त्याच पक्षात गेले, ज्या पक्षाला मला ‘चले जाव’ करायचे आहे. इंग्रजांना चले जाव करून हाकलले, तसे मला यांना हाकलायचे आहे...

नेते येती शहरा...

सर्वोत्तम प्रशासकीय कार्याचा आणि समन्वयात्मक कार्याच्या फलनिष्पत्तीचे उदाहरण या दरम्यान नाशिकमध्ये दिसून आले. त्यामुळे शहराने कात टाकण्यासाठी शहरात नेते येणे आवश्यक असते का, असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे...

दीदी, 'हे' आम्ही नाही विसरलो!

देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत यांचा परस्पर संबंध अपरिहार्यच. राज्याच्या समस्या, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक मदत आणि अन्य महत्त्वपूर्ण बाबींसाठीही मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांची तसेच इतर केंद्रीय मंत्र्यांची अधूनमधून भेट ही घ्यावी लागतेच...

काँग्रेसची 'पॉवर' डाऊन

राष्ट्रवादी काँग्रेस १२५, काँग्रेस १२५ व इतर छोटे मित्रपक्ष ३८ असे जागावाटप स्वतः जाणत्या नेत्यांनी माध्यमांसमोर जाहीर केले. पण, हे करताना काँग्रेसने प्रथमच कमालीचा नमतेपणा घेतला असून आजवरच्या सर्वात कमी जागा आघाडीतून काँग्रेस लढवणार आहे...

यांच्या पितरांचे वाईट झाले...

काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचे त्या महात्म्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘कमळवाले’ कामाला लागले. मात्र, हे पाहून यांना वेड लागले आहे. काही लोक धर्मासाठी साधुसंत होतात, तर काही धर्माविरुद्ध द्वेषाने विदूषक होतात. यांना साधुसंत होणे जमले नाही, त्यामुळे ते विदूषकच झाले...

आधी जाणोनि घ्यावे!

'बीएस-६' इंजिनच्या गाड्यांचा नियम लागू करणारा भारत हा जगातील प्रथम देश ठरणार आहे...

भगव्या कपड्याआडचे क्रूसेड

बेळगावच्या डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांनी धारण केलेली हिंदू संतसादृश्य वेशभूषा. हिंदू वेशभूषा, राहणीमान धारण करून डेरेक यांना काय साध्य करायचे होते? अर्थात, त्यांच्या बचावाला नेहमीप्रमाणे त्यांचा गोतावळा आलाच. त्यांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोकांनुसार डेरेक यांनी वेशभूषा केली. त्यात काय झाले? उलट, स्थानिक लोकांच्या धर्मभावनेचा आदरच केला. आता यातले सत्य आणि तथ्य काय असेल हे उघड गुपित आहे...

ग्राहकदेवो भव:।

ग्राहकांसाठी कायदे अस्तित्वात आहेत. मात्र, त्याचा कोणताही वापर न करता केवळ व्यवस्थेच्या नावाने शिमगा करणार्‍या बहाद्दरांसाठी श्रावणीचा लढा हे एक आदर्श उदाहरण आहे. ग्राहकांचे हक्क आणि कर्तव्ये याबाबत शाळेत शिकविलेले धडे श्रावणीने प्रत्यक्षात आणत ‘ग्राहकदेवो भव:।’ या ब्रीदाची सत्यता प्रत्यक्षात साकारली आहे...

शिवसेनेतील 'जादूटोणा'

कोकणातील दोन्ही जिल्ह्यांमधील या 'जादुई' राज्यकर्त्यांकडे आता शिवसेना नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून त्यांना वेळीच आवरणे आवश्यक झाले आहे...

रविश ते रबिश...

जेएनयुमध्ये कन्हैया आणि त्याच्या फुटीरतावाद्यांवर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी रविश यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये दूरदर्शनवर काळा पट्टा दाखवला. त्यांचे म्हणणे जेएनयुमधील कन्हैयाकुमार वगैरेंवर गुन्हा दाखल होणे म्हणजे देशासमोर अंधार आहे...

दोष नेमका कुणाचा?

शिवरायांचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गड-किल्ल्यांच्या पुरातत्त्व वास्तूंची हेळसांड होणार, या भीतीने शिवप्रेमींनी रोष व्यक्त करणे स्वाभाविक होते. त्यांचे हे वागणे चुकीचे ठरवता येणार नाही. परंतु, राज्य सरकारने याबाबत त्वरित खुलासा केल्यानंतर शिवप्रेमींनी आपल्या रागाची तलवार म्यान केली...

चिदंबरम यांची गहन चिंता

मला केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता आहे. किती चिंता आहे काही सांगूच शकत नाही. ती चिंता करत चिंतन करण्यासाठी मला वेगळी स्वतंत्र खोली हवी आहे, त्या खोलीत टीव्ही आहे, टीव्ही पाहायला चष्मा हवा आहे. टीव्हीवर दाखवणार्‍या बातम्या पाहून माझ्याबाबत देशभर काय चिंतन केले जाते, हे पाहून माझा बीपी हाय किंवा लो होणारच. त्यामुळे मग मला औषधेही हवीत. ..

आधी वंदू तुज मोरया।

धार्मिक उत्सव असणार्‍या गणेशोत्सवातील सांस्कृतिक रीत नाशिकच्या गणेशोत्सवाची खासियत आहे. तसेच, अत्यंत शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिकता यांचा संगम येथील उत्सवात दिसून येतो. येथील गुलालवाडी व्यायामशाळा यांचे लहानथोर असे सर्वच वयोगटातील शिस्तबद्ध लेझीम पथक हे नाशिकमधील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. गणेशोत्सव काळात नाशिकनगरीत घुमणारे नाशिक ढोलचे आवाज हे येथील गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल...

दिग्गी नावाचे पात्र

तर ते पात्र कसले? 2019 ला पुन्हा कमळच आल्याने या पात्राला आगच लागली आहे. त्या आगीचे स्वरूप धूर आणि जाळ सोबतच असे. त्यामुळे वाट्टेल ते बरळत हे पात्र जनतेसमोर बिनपैशाचे मनोरंजन करत आहे. पात्र तसे चलाख आहे. आपली किंमत शून्य आहे. मात्र, रा. स्व. संघाबाबत काहीही बोललो तर लोक दखल घेतात, हे त्याने हेरले आहे. त्यानुसार हे पात्र रा. स्व. संघाच्या नावाचा मंत्र जपत आहे. शेवटी काय पात्रांनाही द्वेषाने का होईना, रा. स्व. संघाचे नाव घ्यावेच लागते..

संभ्रम पसरवण्याचे उद्योग

कारशेडच्या निमित्ताने आरेमध्ये इमारती उभारण्याचा प्रशासनाचा कट असल्याची वार्ताही पसरवली जात आहे. यासाठी कारशेडच्या प्रस्तावित जागेसमोरील आरक्षित करण्यात आलेल्या ९० एकरची जागा अधोरेखित करण्यात येत आहे...

झापडबंद पूर्वग्रह : रोमिला थापर

कोरेगाव-भिमाच्या दंगलीनंतर, विघातक प्रवृत्तीच्या लोकांना अटक झाली. त्यावेळी अटक झालेल्यांची सुटका व्हावी म्हणून रोमिला थापर यांनी जंग जंग पछाडले. मागेही, जेएनयुमध्ये कन्हैया कुमार आणि त्याच्यासारख्या समस्त फुटीरतावाद्यांनी भारताचे तुकडे होण्याच्या वल्गना केल्या...

ओवैसी आणि एनआरसी

आसाममध्ये बांगलादेशमधून आलेल्या मुस्लिमांवर कारवाई होत आहे, हे या मुस्लीम समाजाच्या स्वयंघोषित बादशहाला पाहवत नाही पण, केंद्र सरकारच्या धडक आणि कडक कारवाईमध्ये असदुद्दीनसारख्या नेत्यांचे जगणे वागणे म्हणजे आता सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, असेच झाले आहे...

म्हणजे आपला माल खराब आहे का?

व्यक्तीला 'माल' म्हणण्याची किंवा तशी उपमा देण्याची रीत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्माण केली...

अरुंधतीची दुखरी नस

अरुंधती रॉय यांच्यावर चौफेर टीका झाली, केवळ भारतीयांनीच नव्हे तर बांगलादेशी व बलुची नागरिकांनी त्यांना लक्ष्य केले. ..

यांची ‘चाक’च मुळी वाकडी!

मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार काढले, याहीपेक्षा पोलिओग्रस्तांसाठी विकृत विधान केले, याबद्दल रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध!..

काँग्रेसी 'कॉकटेल'

चारच दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेसच्या छाननी समितीत स्थान न मिळाल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कमालीचे नाराज झाले होते...

अब की बार 'प्लास्टिक प्रहार'

येत्या २ ऑक्टोबर रोजी देशभरात प्लास्टिकमुक्त अभियानास सुरुवात होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश असेल. ..

काँग्रेसची रायझिंग नेता, शिल्पा

शिल्पाला आणि तिच्यासारख्या लोकांना सांगायलाच हवे की, या देशाला, भारतमातेला त्रास देणार्‍यांना मुर्दाबाद म्हणा रे, असे खर्‍या देशभक्ताला सांगावे लागत नाही. ते आपसूक ओठावर आणि मनात येते. पाकिस्तानच्या पंतप्रधानाला स्नेहमयी गळामिठी मारणार्‍या नवज्योत सिंग सिद्धूची आणि शिल्पाची जातकुळी एकच आहे. कोणती म्हणजे? शिल्पा शिंदे हीसुद्धा काँग्रेस पक्षाची रायझिंग स्टार आहे. त्यामुळे देशप्रेम, समाजभान, वास्तव याबद्दलची शिल्पाची अनुभूती या पक्षाच्या नेत्यांइतकीच असणार. ..

नाशिकची सुरक्षा आता रामभरोसे

केवळ दोन दिवसांत नाशिकमधून ४० लाखांपेक्षा जास्त रक्कम लंपास..

दमडी, दम आणि दीदी...

सध्या ममतादीदी बंगालमध्ये 'रिस्क' घेण्याच्या अजिबात मूडमध्ये नाहीत. भाजपशी पंगा घेतल्याचा फटका लोकसभेत त्यांना बसलाच. तीच चूक विधानसभा निवडणुकीपूर्वी दीदी करायच्या मनस्थितीत नाही...

गंमतबाज बाई शेहला

शेहलासारख्या फुटीरतावाद्यांना 'कयामत'च्या दिनी अल्ला अक्कल देईलच, पण तोपर्यंत भारत शासन अशांना नक्कीच ताळ्यावर आणेल, अशी आशा.. आमेन..!..

राण्यांचे बंड

नारायण राणे हे त्यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत कधीच निवांत राहिले नाहीत. ते कायम अस्वस्थच. या अस्वस्थपणामुळेच त्यांची प्रगतीही झाली. पण, काहीवेळा हाच अस्वस्थपणा त्यांचे वैगुण्यही ठरला. ..

का रे 'दिखावा'?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये एका देशाच्या राजदूताने संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेची ही सर्वात खालच्या स्तरावरची चर्चा असल्याचे म्हटले, ज्यात एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलेले नाही...

त्यांना तुरुंगात टाकायचे स्वप्न

सत्तास्वप्न पडत आहेत. सत्ता तर मिळत नाही, पण मनाला काय सांगायचे? जळगावच्या बहिणाबाईने तर म्हटलेच ना की, मन उभ्या पिकातले ढोर आहे. मी तर म्हणेन चोरपण आहे. चोरच काय? चोरावर मोरपण आहे. कसे म्हणता? त्याचे काय? माझा वंचित शोषितांचा पक्ष, मला खासदार निवडून आणायचे होते. सत्तेत रिपब्लिकन पक्षाला आम्ही त्यांचे मतदार चोरणारे वाटलो. पण आम्हा चोरावरही मोर झाला तो ओवैसींचा पक्ष. मी खुद्द माझ्या घरात हरलो, सोलापूरच्या दारातही हरलो...

मदत की वसुली?

भारतात नैसर्गिक आपत्ती आली की, 'सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हा भाव अनेकांच्या मनात जागृत होत असतो. 'मानवता' नावाचा धर्म यावेळी समाजात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. तसेच, जागतिक स्तरावरदेखील कोणत्याही देशातील नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची घटना घडली असता देखील आपली 'वसुधैव कुटुंबकम्' ही धारणा आपण जागृत करत असतो. ..

राणेंचा 'झंझावात'

येत्या शुक्रवारी नारायण राणेंच्या 'झंझावात'या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून 'झंझावात' हे नाव राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाला तसे अगदी साजेसेच म्हणावे लागेल...

पणतूगिरीची अंधश्रद्धा

एखाद्याला काय जगवते? कुणी म्हणेल ‘ढाई अक्षर प्रेम के.’ पण, छे, काही काही माणसे दोन अक्षरांवरच अख्खी हयात घालवत आहेत. ती दोन अक्षरे आहेत ‘हत्या’ आणि ही अक्षरं उच्चारणारी आणि त्यावर जगणारी व्यक्ती आहे तुषार गांधी. तुषार गांधी कायमच ‘गांधी हत्या’ या विषयावर भाषण करतात..

चिंतातूर जंतू महाराष्ट्रातही

काही नतद्रष्टांच्या मते त्यांचे हे नाटक आहे. कारण कोणे एकेकाळी परप्रांतीयांना क्रूरपणे मारहाण करणारे त्यांचे अनुयायी होते. पण कालांतराने काही महिन्यांपूर्वीच हे महाशय गंगाकिनारी मुलुख असणाऱ्यांच्या संमेलनाला गेले होते. ..

हरपलेले सामाजिक भान...

होळकर पुलाला १०० वर्ष लोटली आहेत. त्यावर मार्गस्थ होणारी वाहने, उभी असणारी वाहने, असंख्य नागरिक यांचा भार आणि खालून वेगवान पाण्याचा प्रवाह यांचा मारा अशा स्थितीत होळकर पूल असताना त्यावर गर्दी करणे, हे एखाद्या दुर्घटनेला आमंत्रण ठरले असते, याचे भान राखणे आवश्यक होते...

हे 'महापौर' की 'महापोर'?

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा एका महिलेचे हात पिरगळतानाचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल्याने 'हे महापौर की महा'पोर' असाच प्रश्न उपस्थित होतो...

पराभूतांना आमदारकीची स्वप्ने

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यास साधारण एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांची धामधूम जोराने सुरू झाली आहे...

सुळेबाई, तुम्ही आहात कुठे?

काश्मीरमध्ये दहशतवाद, फुटीरतेचा नंगानाच चालू असताना फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती आणि गिलानी वगैरेंनी काय दिवे लावले हे तमाम भारतीयांना माहिती आहे. पण, सुळेबाईंना लोकभावनेशी काय देणेघेणे...

पुन्हा 'रिमोट कंट्रोल'?

पंतप्रधानपद इतर नेत्यांना दिल्यानंतरही अनेक महत्त्वाचे निर्णय गांधी घराण्यातील व्यक्तींना विश्वासात घेतल्याशिवाय होत नसल्याने काँग्रेसचे सरकार 'रिमोट कंट्रोल'द्वारे चालत असल्याची टीका व्हायची. ..

वाचव रे देवा, अल्ला, येशू

काही वर्षांपूर्वी नव्हे, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचा 'यंग,' 'चार्मिंग,' 'डॅशिंग' वगैरे अध्यक्ष होऊ घातलेला नेता मीच होतो. 'तसे आमचे ठरले होते.' माझ्यासमोर कुणी उभे राहू शकत होते का?..

संवर्धन आवश्यकच

राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू दिमाखाने उभ्या राहत आपला गौरवशाली इतिहास आजमितीस सांगत आहेत. तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्येदेखील अनेक पुरातन मंदिरे असून त्यांनादेखील ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे...

विमानभेदी ‘आर-27’

भारताने रशियाकडून ‘एस-400’ ही विमानभेदी क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यावर अमेरिकेने आक्षेप घेतला होता. अमेरिकेला वाटत होते की, भारताने रशियाच्या ‘एस-400’ प्रणालीऐवजी आपली थाड ही प्रणाली घ्यावी..

शुभेच्छा आणि मौन

सर्व विरोधी पक्ष संपून जातात की काय, अशी राजकीय शक्यता महाराष्ट्रात सध्या वर्तवली जात आहे. भाजप-शिवसेनेच्या सरकारचा कारभार जरी चांगला असला तरी विरोधी पक्षांची एवढी वाताहत होईल, असे कोणालाही वाटले नव्हते...

...अहो राव, यात नवे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली...

नक्षल्यांचा शहीद आठवडा

गडचिरोलीमधील गोकुळ उर्फ संजू सन्नू मडावी, रतन उर्फ मुन्ना, शैला उर्फ राजे मंगळू हेडो, जरिना उर्फ शांती दानू होयामी, मीना धूर्वा, भिकारी कुंजामीसरिता उर्फ मुक्ती मासा कल्लो या सहा नक्षल्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. सर्वांना पकडण्यासाठी सरकारने लाखोंची बक्षिसे लावली होती. ..

दंडाबरोबर दंडकही हवा!

शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे तर ते शहर आपलेसे असते. तसेच, पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकानेदेखील हे शहरदेखील आपलेच आहे, असा विचार केला तर अस्वच्छतेचा लवलेशही भारतातील कोणत्याही शहरात दिसणार नाही. ..

त्या २५ करोडमध्ये येतात का?

‘हवे तेव्हा हवे तसे पत्नीला तलाक देणार्‍या लोकांना पाहून इतरांना वाटायचे की काय हे? अल्लातालाच्या साक्षीने काझीने लग्न लावले, वर कबुल कबूल म्हणून संमतीही विचारली तरी या माणसाने त्याच्या पत्नीला केवळ त्याला तसे वाटले म्हणून वार्‍यावर सोडून दिले...

आंध्रतील आरक्षणाची संकल्पपूर्ती

आंध्र प्रदेशचे लोकप्रिय, तरुण मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी नुकतेच राज्यातील खाजगी नोकर्‍यांमध्येही ७५ टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला...

अभिनंदनातून अहंकाराचा दर्प

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. स्थापनेपासूनच स्वतःच्या हिमतीच्या जोरावर पृथ्वीच्या कक्षेबाहेरील विश्वाचा वेध घेण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने चंद्राच्या दिशेने अंतराळयान प्रक्षेपित केले...

'एनआयए'ने 'करून दाखवले'

'एनआयए'ने 'करून दाखवले'..