विविध

‘प्राची’च्या गणेशमूर्ती

जिथे ‘कला’ म्हणण्यापेक्षा कलेच्या प्रत्येक प्रांगणात सर जेजेचे विद्यार्थी नसतील तरच नवल! सध्या सर जे. जे. उपयोजित कलेच्या तिसर्‍या वर्गात कलाध्ययन करणार्‍या प्राची अंकुश मेस्त्री हिने श्रीगणेशमूर्ती बनविल्या जाणार्‍या सिंधुदुर्गातील आपल्या वडिलोपार्जित तीन पिढ्यांच्या कारखान्यात लक्ष घातले आहे. जेजेत कलाध्ययन करताना रंग-रंगाच्या भावव्यक्ती, रंगांच्या प्रकृती वगैरे बाबींचा अभ्यास होतो. त्याच ज्ञानाद्वारे प्राचीने तिच्या वडिलोपार्जित व्यवसायाला ‘कॉर्पोरेट’स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत...

विविध धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत ; रांगोळी संस्कृती

आपला विशाल देश आणि अनेक प्रादेशिक संस्कृती यामुळे चित्र, शिल्प, मूर्ती अशा प्रत्येक कलेत आपल्याला प्रतीके आणि चिह्ने यांचे वैविध्य पाहायला मिळते. भारतीय रांगोळी कलेचे वैविध्य जसे शैलीमध्ये आहे, तसेच ते वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये आणि अर्थातच त्यातील प्रतीके आणि चिह्नांमध्येसुद्धा आहे. रांगोळी रेखाटनात प्रदेशागणिक वापरल्या जाणाऱ्या प्रतीके-चिह्नांचा अभ्यास खूपच वैविध्यपूर्ण आणि रंजक आहे. अशा प्रत्येक शैलीतून आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्यातून मिळणारे नि:शब्द अर्थसंकेत, आपल्या पूर्वजांच्या प्रगत ..

राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-३

दि. ६ डिसेंबर, १८८१चा ‘केसरी’ म्हणतो, “कोल्हापूरच्या संबंधाने जे कागदपत्र आमच्या पाहण्यात आले, त्यावरून रा. रा. माधवराव बर्वे यांच्या राक्षसी अंतःकरणाविषयी आमची बालंबाल खात्री झाली आहे. आजरोजी त्यांची काळी कृत्ये उजेडात आणता येत नाहीत, यास आमचा नाईलाज आहे. पण ती इतकी घोर आहेत की, ती ऐकून सहृदय पुरुषांच्या अंत:करणास घरे पडतील व आकाशपाताळ एक होऊन जाईल.” ‘केसरी’कारांनी उल्लेख केलेली कागदपत्रे ‘केसरी’ व ‘मराठ्या’त छापल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि कोल्हापूर प्रकरणाला विशेष महत्व आले. या प्रकरणात टिळक-आगरकरां..

राजकारणाचा ‘जेटली मार्ग’

राजकारणात येऊ इच्छिणार्या तरुणाईसमोर एक ‘जेटली मार्ग’ आहे आणि दुसरा ‘चिदंबरम मार्ग’ आहे. जेटली मार्ग व्यवस्था, कायदा, संविधान यांचा आदर बाळगणारा आहे. ‘चिदंबरम मार्ग’ सत्तेचा गैरवापर करणारा, देशाच्या व्यवस्थेशी खेळणारा, कायदा वाकविणार आणि अखेर चौकशीला सामोरे जावे लागणारा आहे. जनहिताचे, भ्रष्टाचारमुक्त राजकारण करणे ही अरुण जेटली यांना योग्य श्रद्धांजली ठरेल. ..

कर्तबगार आणि धाडसी अर्थमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आर्थिकदृष्ट्या विकसित देश होईलच. त्यावेळी आर्थिक भरभराटीचा इतिहास लिहिताना मोदींच्या पहिल्या पाच वर्षांच्या राजवटीतील अर्थमंत्री अरुण जेटली यांचा उल्लेख सुवर्णाक्षरांनी केला जाईल. भारत ही आर्थिक महासत्ता होण्यासाठी महत्त्वाची पायाभरणी करण्याची कामगिरी अरुण जेटली यांनी केली आहे...

पंचगंगेतीरी संघशक्ती, जीवनशक्ती

सगळ्या महाराष्ट्रातून संघ स्वयंसेवक इथे पोहोचले होते. कसलीही अपेक्षा नाही, कसलाही लोभ नाही. मदतीबाबत कुणी साधे आभार व्यक्त करायला आले, तरी त्या आभाराचेही धनी होणे टाळणारे हे संघ स्वयंसेवक, राष्ट्र सेविका समितीची ती मातृशक्ती. या सर्वांना समाजासाठी पडेल ते दिव्य करण्याची आंतरिक शक्ती देणारे कोण होते? सगळ्यांशी बोलल्यावर सगळ्यांचे उत्तर होते, आम्ही काय विशेष केले? आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी आपण नाही करणार, तर कोण करणार? त्यात काय विशेष!!!..

चर्चा विधानसभेची

केंद्रात आणि राज्यात बदललेले सरकार, भुजबळ यांची 'जेल वारी' या काळात आ. पंकज भुजबळ यांची मतदारसंघाशी नाळ तुटली. आगामी विधानसभा निवडणुकीत पंकज हॅटट्रीक साधतात की, राष्ट्रवादीच्या हातातून हाही मतदार संघ निसटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ..

सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करावी का?

जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात गेल्या एका वर्षात २० टक्के वाढ झाली आहे, तर गेल्या तीन महिन्यांत १४ टक्के वाढ झाली. आपल्या देशात गेल्या एका वर्षात सोन्याचे दर ३३ टक्क्यांनी वधारले, तर गेल्या तीन महिन्यांत सोन्याचे दर १५ टक्क्यांनी वधारले. अशा परिस्थितीत सोन्यामध्ये गुंतवणूक करावी का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना भेडसावत असतो. तेव्हा, त्याविषयी या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...

प्रभादेवीची ओळख 'आकार'

'आकार'चे देव्हारे आणि मूर्ती निव्वळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. एका विशिष्ट संगमरवरी दगडापासून घडवलेलं मंदिर, देव्हारे आणि मूर्ती ही 'आकार'ची वैशिष्ट्ये. त्याचप्रमाणे लाकडापासूनदेखील मंदिरे तयार केली जातात. या मंदिरावरचे कोरीव काम प्रेक्षणीय असते. 'आकार'चे वरळी, राजस्थान येथे कारखाने आहेत, तर प्रभादेवी येथे शोरूम आहे...

राधेयचा मृत्यू भाग-२

अर्जुनाच्या बाणांपेक्षाही श्रीकृष्णाच्या वाग्बाणांनी राधेय अधिक घायाळ झाला. श्रीकृष्ण बोलतो आहे यात सत्य आहे, याची त्याला जाणीव होती. त्याने शरमेने मान खाली घातली व तो आपल्या रथाचे चाक जमिनीतून वर काढू लागला...

लोकसंग्रह

समर्थांचा 'महंत' हा आध्यात्मिक पुढारी असला तरी त्याला समाज एकत्र आणण्यासाठी सामाजिक पुढाऱ्याची भूमिका बजवावी लागे. समर्थांच्या मते, नेत्यावर त्याच्या समुदायातील लोकांचा विश्वास तर हवाच, पण त्या समुदायाबाहेरील लोकांचाही त्याच्यावर विश्वास हवा...

वाचू... ऐकू श्रुतिवाणी!

श्रावण महिना हा वेदादी शास्त्राच्या श्रवणावर आणि स्वाध्यायावर भर देतो. श्रवण नक्षत्र याच भावनेशी अनुसरून आहे. या महिन्यात प्रत्येकाने धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. विशेषत: वैदिक साहित्यात दडलेल्या कल्याणकारी विचारांचे अध्ययन आणि श्रवण करणे आवश्यक आहे. कारण, वेदवाणी ही 'पावमानी' म्हणजेच सर्वांना पवित्र करणारी आहे. तिचे अध्ययन करणारा सदैव आनंदी राहतो...

पूरग्रस्त भागात पसरली 'हॅप्पीवाली फिलिंग'

अगदी बरोबर वाचलतं. मुंबईतील 'हॅप्पीवाली फिलिंग' नावाचा १४ जणांचा समूह पूरग्रस्त भागात मदत करणे, हे आपले कर्तव्य समजून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज या भागात जीवनावश्यक वस्तूंच्या ७५० पाकिटांचे वाटप करत शुक्रवार ते रविवार दिवसभर घरोघरी किटरुपी 'हॅप्पीवाली फिलिंग' पसरवत होता...

होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २८

पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणू (Atom) जर आपण अणूचे निरीक्षण केले असता असे दिसते की, अणूमध्ये 'गाभा' किंवा 'Nuclear' ज्याला 'केंद्रक' असेही म्हणतात. ते स्थिर असते व त्याच्या आत प्रोटॉन व न्युट्रॉन असतात व हे केंद्रक पॉझिटीव्ह भारीत असते व त्यांच्या आजूबाजूला एका ठराविक परिघात इलेक्ट्रॉन परिक्रमा करत असतात...

मान्सूनमध्ये घ्या त्वचेची काळजी

मान्सून हा तसा गुंतागुंतीचा मोसम. या दिवसांत हवा कोरडीही असते आणि दमटही. वातावरण ढगाळ असले तरीही सूर्याची हानिकारक UV-A आणि B किरणे त्वचेवर आघात करतच असतात. या मोसमात घाम तसेच सर्वसाधारण तेलकटपणाही वाढतो. म्हणूनच मान्सूनशी संबंधित त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी त्वचेच्या देखभालीसाठी सांगितलेली नित्यकर्मे करणे चांगले. हा विषय थोड्या अधिक तपशीलाने समजून घेऊया...

सुप्रजा भाग-१६

बाळ जन्मल्यावर त्याच्या शारीरिक विकासामध्ये काही विशिष्ट टप्पे आहेत. जसे मान सावरणे, पालथे पडणे, पोटावर सरकण्याचा प्रयत्न करणे, रांगणे, बसणे इत्यादी. या सगळ्या हालचालींसाठी स्नायूंची वाढ होणे महत्त्वाचे आहे. मांसपेशी जशा बलवान होतील, त्यांची क्षमता वाढेल, बाळ तशा वरील हालचाली करू शकते...

काम होवूक व्हया!

अहो, आधीच आपल्या कोकणात लांब लांबपर्यंत माणूस माणसा दिसणा नाय आणि त्यात याची भर. नाय मी काय म्हणतंय, सुधारणा हवीच. नको कशी. पण माणसासारखं जगायला पण शिकूक हवं की नाय सांगा तुमी.....

विविध धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत : रांगोळी संस्कृती

माझ्या लिखाणात मी नेहमीच 'प्राचीन भारतीय संस्कृती' असा उल्लेख करत असतो. मूर्ती, शिल्प, चित्र, शब्द, लिखित साहित्य अशा अनेक माध्यमांतून अशी संस्कृती स्पष्ट होत जाते. वेगवेगळ्या प्रदेशातील प्रथा, परंपरा, भाषा, परिधान, कुटुंब पद्धती, इतिहास, भूगोल, रसना संस्कृती, अलंकार पद्धती अशा समाजशास्त्राच्या विविध पैलूंच्या अभ्यासातून त्या त्या समाजाच्या संस्कृतीचा परिचय मिळत असतो. त्या समाजाची आध्यात्मिक मूल्ये, धार्मिक मूल्ये, नैतिक मूल्ये काय आहेत आणि ती तशी का आहेत, याचा व्यापक संदर्भ मिळतो. वर उल्लेख केलेल्या ..

विश्वआदराचे स्थान भारत आणि रा. स्व. संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क मंडळाचे सदस्य, ‘विश्व अध्ययन केंद्र फॉर ग्लोबल स्टडिज’ (चेन्नई सेंटर)चे मार्गदर्शक, भारताबाहेर कार्य करणार्‍या हिंदू स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले आणि ज्यांनी मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिजी, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग आणि इतर युरोपियन राष्ट्रांमध्ये काम केले आहे, असे रवीजी अय्यर यांच्याशी जागतिक स्तरावरील भारताची स्थिती आणि रा. स्व. संघाबाबत जगातील लोकांचे मत, याबाबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा खास संवाद.....

राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी : भाग-२

राष्ट्राची परतंत्र आणि अवनत अवस्था टिळकांना शल्याप्रमाणे बोचत होती. राष्ट्राच्या अभिवृद्धीचा हा अनोखा प्रयत्न होता. अनेक आव्हानांचा सामना करताना वेगवेगळ्या स्वभावाची माणसे त्यांनी अनुभवली, आजमावली, स्वतःचे विचार आणि धोरणे प्रत्यक्षात उतरवताना अडचणीतून मार्ग काढला. शाळा, कॉलेज आणि वृत्तपत्रे अशा तिहेरी भूमिकांतून लोकजागरण करताना थेट तुरुंगापर्यंत जाण्याची मजल त्यांनी मारली. भोवतालच्या लोकांचे बरेवाईट अनुभव घेताना, आपला विवेक सदैव जागृत ठेवला. या अनुभवातून ‘विवेके क्रिया आपुली पालटावी’ या समर्थवचनाप्रमाणे ..

कारागृह नव्हे, परिवर्तनगृह !

नाशिक मध्यवर्ती कारागृह हे एक कारागृह म्हणून ओळखले जात नसून ते एक परिवर्तन आणि सुधारगृह म्हणून ओळखले जाते. याचे सर्व श्रेय जाते येथील कारागृह प्रशासन आणि बंदी यांना. ..

कानडा वो रंग

जहांगीर कलादालन, मुंबई येथे कर्नाटकातील चार प्रथितयश कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू आहे. हे चारही कलाकार कर्नाटकातील चार वेगवेगळ्या कलासंस्कृतींची स्वतंत्रपणे ओळख असलेल्या ठिकाणांहून एकत्र आलेले आहेत. कदाचित त्यांनी प्रदर्शित केलेल्या कलाकृतींबद्दलचे हेच वैशिष्ट्य असावे. या चारही कलाकारांच्या कलाकृती निर्माणाची शैली आणि तंत्र जरी भिन्न भिन्न असले, तरी या चारही कलाकृती प्रकारांची नाळही निसर्गाशीच जुळलेली दिसते. निसर्गातील वैविध्यपूर्ण आकारांचे 'क्रिएटिव्ह एक्सप्रेशन' म्हणजे या कलाकारांच्या कलाकृती ..

घरीच उपचार घेणार्‍यांसाठी आरोग्य विम्याचे संरक्षण

कित्येक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही घरीच उपचार घेत असलो तरी आरोग्य विम्याचे संरक्षण उपलब्ध असते, याची फार कमी माहिती असते. त्या अनुषंगाने अशा रुग्णांसाठीही विम्याचे कवच उपलब्ध असून आजच्या लेखातून यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया.....

भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा...

केंद्र सरकारने १९६९ साली संस्कृत दिन किंवा संस्कृत महोत्सवाची घोषणा केली. तद्नुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील (इंग्रजी-ऑगस्ट महिना) पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. योगायोगाने याच दिवशी बहीण-भावातील अतूट नाते सांगणारा 'रक्षाबंधन' हा सणही असतो. सोबतच याच शुभदिनापासून विद्यार्थी गुरुकुलात राहून वेदाध्ययनाची सुरुवात करतात. परिणामी, संस्कृत विद्वान, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि हितचिंतक मोठ्या उत्साहाने राखी पौर्णिमेसह 'संस्कृत दिन'ही साजरा करतात...

आयुष्याचे सार्थक

आयुष्याचे सार्थक कशात आहे? नुसते दिर्घायुषी जगण्यात आहे का? तर तसे नाही. आपले आयुष्य दिर्घ नव्हे तर कसे जगलो याला महत्व आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही समाजभान जपत समाजासाठी कार्य करत राहणे यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय हे सांगणारी सार्थक संस्था. ..

टँकरमुक्त मराठावाडा ते जलयुक्त मराठावाडा

दीपक मोरताळे, रा. स्व. संघ ग्रामविकास विभाग प्रमुख, नांदेड विभाग, बाबुरावजी केंद्रे, उदय संगारेड्डीकर यांनी ‘टँकरमुक्त मराठवाडा ते जलयुक्त मराठवाडा’ ही संकल्पना राबवण्यासाठी नियोजन केले. रा. स्व. संघाच्या विचारांनी आणि सहकार्याने ती संकल्पना यशस्वीही झाली. या नियोजित जलसंवर्धन कामाचे यश म्हणजे या कामातून १५० कोटी लिटर जलसंवर्धन होणार आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने या सर्व कामांना आर्थिक सहकार्य केले. त्यातूनच टँकरमुक्त ते जलयुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकारले जाणार आहे...

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी सावत्र होमियोपॅथी भाग-२

मिश्रचिकित्सा पद्धतीचा योग्य वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने उशिरा जरी घेतला असला तरी तो सामाजिक हिताचा आहे. परंतु, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या भरतीपासून होमिओपॅथी डॉक्टरांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे...

होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २७

रुग्णाच्या रोगाचा 'गाभा' जाणून घेत असताना, त्या आजाराची प्रदर्शित होण्याची प्रवृत्ती जाणून घेण्याचा मुख्य प्रयत्न असतो. जसा शारीरिक बांधा हासुद्धा माणसाची प्रकृती दर्शवत असतो, तसेच अजून काही महत्त्वाचे घटकही असतात...

मनचक्षूंच्या चष्म्यातून...

ऐहिक जगात जीवन जगताना आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. वर्षानुवर्षे त्या जशा या जगात स्थिर असतात, तशाच त्या नव्या नवलाईने घडतही असतात. या नव्या-जुन्या गोष्टींप्रमाणेच अनेक घटना-प्रसंगही असतात. या गोष्टीत शहरं व शहरातील राहणीमान असतं. या गोष्टी गावाकडच्या नैसर्गिक जीवनाचा अशा रोजच्या जगण्याशी व माणसाच्या ‘असण्याशी’ जोडलेल्या असतात, त्या कधी श्रीमंती थाटाच्या, आर्थिक भरभराटीच्या असतात, कधी त्या झोपडपट्टीच्या स्वरूपात, गरिबीच्या अंधाराच्या असतात, कधी बजबजाटाच्या असतात, तर त्यात कधी स्मशान शांतता असते...

प्राचीन भारतीय संस्कृतीतील, धर्मप्रणालीतील चिह्नसंकेत

प्रतीकशास्त्र आणि चिह्नसंकेतांच्या अभ्यासाच्या अंतिम टप्प्यावर आपण प्राचीन भारतीय संस्कृतीतील चिह्ने आणि त्यांच्या संकेतांचा परिचय करून घेऊया. 'प्राचीन भारतीय संस्कृती' या संबोधनाचा संदर्भ खूपच व्यापक आहे. आपल्या या संस्कृतीत, मानवी इतिहासातील प्रतीके आणि चिह्नांचा वापर सर्वप्रथम सुरू झाला. लिखित साहित्य, शिल्पकला, मूर्तिकला, चित्रकला, रंग, बुद्धिबळ-सारीपाट यांसारखे मनोरंजक आणि उद्बोधक बैठे खेळ, अध्ययन, अध्यापन, दैवत संकल्पना, उपासना पद्धती, शब्द-नाद-ध्वनी इतक्या व्यापक व्यवस्थेत अशी प्रतीके आणि चिह्ने ..

राष्ट्रसेवेची अपूर्व पूर्वतयारी भाग-१

संस्कृत शब्दांचा अनोखा विलास असलेली एक नक्षी टिळकांच्या नोंदवहीत सापडते. पोरवयातून तारुण्याकडे झेपावताना संस्कृतच्या वाचनाने टिळक 'सु-संस्कृत' होत होते. प्राचीन भाषेबद्दलच्या व्यासंगातून, ग्रंथांच्या अभ्यासातून स्वधर्म, संस्कृती आणि स्वराष्ट्र याबद्दलच्या ठाम निष्ठा टिळकांच्या मनात निर्माण झाल्या. त्याला इतिहासाच्या अभ्यासाची योग्य जोड मिळाली. गतकाळातील पूर्वजांचा पराक्रम आणि वर्तमानातील समाजाला आलेले शैथिल्य यांच्या तुलनेतून टिळकांच्या जाणिवा जागृत झाल्या. यातून त्यांना कार्यप्रवण होण्याची प्रेरणा ..

नमस्ते शारदेदेवी काश्मीरपुरवासिनी...

अशा राष्ट्रपुरुषाचा मुकुट म्हणजे काश्मीर! काश्मीर म्हणजे शारदापीठ. माता सरस्वतीचे स्थान. शारदादेश म्हणजेच काश्मीर म्हणजे ज्ञान आणि बुद्धीचे माहेरघर आहे. म्हणूनच म्हणतात....

आप्पा पाटणकर

आठवड्याच्या मधल्या वारी सकाळी जरा लवकरच आमच्या कोपर्‍यावरच्या इराण्याकडे चहा घेत बसणं हा माझा तरुण वयातला छंद... छंद कारण ते करताना मला एक छान ‘फिलिंग’ येतं. हातात शोभेला एक वर्तमानपत्र घेऊन चांगलं तास-दीड तास बसता येतं...

अस्मानी संकटात गोदाकाठ

गोदावरी नदीच्या किनारी वसलेले तीर्थक्षेत्र नाशिक. या आठवड्यात गोदाकाठ सर्वात जास्त चर्चिला गेला, तो गोदावरीला आलेल्या पुरामुळे. नाशिकमधील काही जाणकारांच्या मते अनेक वर्षानंतर गोदावरी नदीने हे रौद्ररूप धारण केले होते...

१७९ रुपये पगार ते ३० कोटींचा व्यवसाय

फक्त प्राण्यांचं औषध मिळणारं हे मुंबईतील एकमेव औषध दुकान. आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा कळतं 'हे' दुकान एका मराठमोळ्या माणसाचं आहे. त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ पाटील...

अटलजींच्या प्रभावळीतील तेजपुंज तारा निखळला!

सुषमाजींच्या जाण्याने प्रत्येकाला आपले जवळचे कुणीतरी गेल्यासारखे का वाटतंय, त्याचं उत्तर अनेक प्रसंगांमध्ये दडलंय. विलक्षण तेजस्वी डोळे आणि तसेच मनाला भिडणारे धारदार शब्द... लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदावर असतानाची त्यांची कामगिरी आणि योगदान कोण विसरेल? त्यांच्या जाण्याने अटलजींच्या प्रभावळीतील आणखी एक तेजपुंज तारा निखळला आहे.....

कार्यकौशल्याचा ठसा कायम

आमच्या पक्षात सुषमाजींचा सर्वांशी उत्तम संवाद होता. विरोधकांशी सौहार्दाचे संबंध होते. पक्षात कितीही कठीण प्रसंग आला तरी कठोरपणा कायम राहत असे. मतभेदांच्या क्षणी योग्य बाजू ठामपणे मांडत. समोर आलेल्या प्रत्येक प्रसंगाला धोरादात्तपणे त्या सामोऱ्या गेल्या. विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांशी त्यांचा नियमित संवाद होता. नकारात्मक गोष्ट सांगण्याची एक शैली होती...

जिहाद आणि देवबंद

माजी केंद्रीय मंत्री आणि तलाकच्या संदर्भात राजीव गांधी मंत्रिमंडळातून बाणेदारपणे राजीनामा देणारे अरिफ म. खान यांच्या मुलाखतीचे वृत्त दै. 'मुंबई तरुण भारत'च्या दि २६ जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यांनी 'देवबंद' या इस्लामी जगात नावाजलेल्या 'दारूल उलूम देवबंद' या संस्थेत अभ्यासले जाणारे 'अश्रफ अल हिदाया' हे पुस्तक, त्यातून कशाप्रकारे 'जिहाद'विषयक शिकवणूक तेथे शिकणाऱ्या व पुढे जाऊन मौलवी होऊन धार्मिक प्रवचने देणाऱ्या विद्यार्थ्यांवर ठसविली जाते, याची माहिती दिली होती. त्या 'देवबंद' संस्थेत पसरविल्या ..

जिनके सपनों मे जान होती हैं...

स्वत:पासून सुरू झालेल्या विकासाची प्रेरणा ही समाजोत्थानाचा केंद्रबिंदू झाली. नि:स्वार्थी प्रेरणेने केलेले काम समाजात पोचपावती मिळवतेच आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे सांताक्रुझच्या 'त्रिरत्न प्रेरणा मंडळा'चे काम. वस्तीतील लोकांसाठी शौचालय असावे, या जिद्दीने वस्तीतील काही युवक एकत्र आले आणि त्यांच्या समाजकार्याची महती वैश्विक स्तरावर पोहोचली...

गहिरे पाणी...

'वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट'ने (डब्ल्यूआरआय) नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, भारतासह एकूण १७ देश म्हणजेच जगाची तब्बल एक चतुर्थांश लोकसंख्या तीव्र जलसंकटाच्या गर्तेत सापडली आहे...

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी..

चीनभेदी 'ट्रम्प'कार्ड

१९८७ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रिगन व रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी आयएनएफ करारावर हस्ताक्षर केले होते. सदर करारानुसार दोन्ही देश पारंपरिक आणि अण्वस्त्रसज्ज मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालतील, असे म्हटले होते. परंतु, अमेरिका व रशियातील कटुतेमुळे आता हा करार तुटला...

कापूसशिल्पाचा अनंत शिल्पकार!

कापसाची ओळख म्हणजे समईच्या वातीचा धागा, तुपाच्या निरांजनातील ज्योत ते रुग्णांच्या चिकित्सेसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा बोळा, अशीच आपल्याला माहिती आहे. मात्र, याच कापसाच्या माध्यमातून कोणी जर आकर्षक शिल्प तयार करत असेल तर... होय, कापसाचे शिल्प आणि तेही मजबूत आणि टिकाऊ असे. ही किमया गेल्या ३२ वर्षांपासून नाशिकमध्ये स्थित असलेले आणि मूळचे पालघर जिल्ह्यातील जव्हारचे रहिवासी अनंत नारायण खैरनार साधत आहेत...

पेरावे तसे उगवते

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) मदतीसाठी याचना केल्याचे वृत्त आहे. यावेळी मात्र, आयएमएफने पाकबाबत कठोर भूमिका घेत आधीच आर्थिकदृष्ट्या विविध समस्यांचा सामना करत असलेल्या पाकला यापुढील काळात आर्थिक मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त आहे...

सिंहावलोकनाची गरज का?

स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळकांनी केलेले वैचारिक प्रबोधन हा एका भारतीय लोकयुगाचा प्रारंभ ठरला. भारताचे 'राष्ट्र' म्हणून पुनरुत्थान व्हावे, असा टिळकांचा ध्यास होता. अखिल भारतीय पातळीवर स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे टिळक हे पहिले नेते! अशा एका बहुआयामी लोकनेत्याच्या विचारांचा आणि जीवनशैलीचा जागर करण्याचा आजपासून सुरू झालेल्या या लेखमालेतून आमचा हा प्रयत्न. दुर्मिळ ऐतिहासिक साधनांतून केलेली टिळकांच्या व्यक्तिमत्वाची ही मांडणी नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन प्रदान करेल, तसेच आक्षेपाचे निराकरणही करेल. ..

बदलापुरातील जलप्रलय आणि रा. स्व. संघाचे मदतकार्य

आपत्ती नैसर्गिक असो वा मानवी, रा. स्व. संघाचे स्वयंसेवक सदैव मदतीसाठी तत्पर असतात. याचाच प्रत्यय दि. २६-२७ जुलै रोजी झालेल्या बदलापूरमधील मुसळधार पावसादरम्यानही आला. त्यावेळी स्वयंसेवकांनी राबविलेल्या मदतकार्याची माहिती देणारा हा लेख.....

विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

बोलताना आपल्या तोंडातून निर्माण होणारा आवाज- उद्गार, शब्द या संबोधनाने ओळखला जातो. अशा असंख्य उद्गारांचे म्हणजे शब्दांचे एक वाक्य तयार होते आणि ते वाक्य आपल्याला काही निश्चित संकेत देत असते आणि अर्थ सूचित करत असते. असे शब्दसुद्धा प्रतीकशास्त्र म्हणजेच चिह्न संस्कृतीचा एक भाग आहेत...

नेदरलँड्समधील छुपा दहशतवाद

नुकतेच नेदरलँड्स मध्येही सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्याला अर्थात बुरखा घालण्याला प्रतिबंध केला आहे. बुरखा घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी केली आहे. इतकेच नव्हे तर तसे केले तर १५० युरोंचा दंडही ठोठावण्यात येणार आहे...

होय, इस्लाम खतरे में है...

नुकताच चीनने राजधानी बीजिंगमधील इस्लामी प्रतीकांना हटविण्याचा निर्णय घेतला व आपला राष्ट्रवादी बाणा दाखवून दिला. मुळात कम्युनिस्ट हुकूमशाही अस्तित्वात असली तरी चीन 'राष्ट्र' ही संकल्पना मानतो आणि देशाच्या सुरक्षेला महत्त्वही देतो...

मंगळसूत्र गहाण ठेवून आज कोटींची उलाढाल करणारी 'भैरीभवानी इंटरप्रायजेस'

'भैरीभवानी' हे गंगाराम सनगले यांच्या कुलदैवतेचे नाव. देवीचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे, अशी श्रद्धा गंगाराम यांची असल्याने त्या कृतज्ञतेपोटी त्यांनी कुलदैवतेच्या नावाने कंपनीचे नामकरण केले. कंपनी छोटी मोठी कामे करू लागली. पुढे मोबाईल कंपन्या टॉवर उभारण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊ लागल्या...

जमाना ई-वाहनांचा

देशभरात ई-वाहनांना प्रोत्साहन देणारे धोरण केंद्र सरकारने आखले असून हे शासनाने उचललेले हे एक योग्य पाऊल म्हणावे लागेल. केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही २०१९-२०२० या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना ई-वाहनांच्या उद्योगांसाठी, खरेदीसाठीच्या काही सवलतीही जाहीर केल्या. तेव्हा, एकूणच ई-वाहनांची उपयोगिता विशद करणारा हा लेख.....

राधेयचा मृत्यू- भाग १

विजेप्रमाणे लखलखत आणि आगीचे लोळ ओकत ते अस्त्र अर्जुनाकडे झेपावले. सारेजण श्वास रोखून पाहत होते. पांडवांनाही क्षणभर वाटले की, आता अर्जुन काही वाचत नाही...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊंच्या शाहिरीचा बाज हा माणसाच्या जगण्याचा विषय होता. हा विषय धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणिवेचा जागर होता. त्यामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या नावापुढे आपोआपच ‘लोकशाहीर’ ही उपाधी लागली...

समाज संघटन

दासबोधाच्या सुरुवातीस जरी समर्थ रामदास स्वामी म्हणाले की, ‘बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले।’ तरी त्यांच्या मनात लोकांना केवळ अध्यात्मज्ञान सांगावे, असा उद्देश नव्हता. त्यांना लोकांना ‘शहाणे’ करायचे होते. ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका।’ असे स्वामींनी म्हटले आहे. ..

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ या दोघांना एकमेकांपासून वगळताच येणार नाही. अण्णा भाऊंच्या कर्तृत्वाचा, वैचारिकतेचा आणि साहित्यिकतेचाही कस शाहिरी रूपात पुढे आला, तो संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये...

पहा, जवळी तो त्र्यंबक !

‘त्रि+अम्बक’ म्हणजेच तीन कामे करणारी ती महान अंबा म्हणजे आई. ही जगदंबा आपल्या महनीय प्रसवशक्तीने संपूर्ण ब्रह्मांडाला जन्माला घालते. म्हणूनच ती ‘ब्रह्मा’ आहे. केवळ जन्म देऊन ती आपल्या बाळांना वार्‍यावर सोडत नाही, तर सर्वांचे पालन करणारी ती ‘विष्णू’ आहे आणि शेवटी सर्वांना आपल्या कुशीत घेणारी म्हणजेच प्रलय करणारी ती ‘महेश’ पण आहे...

‘फकिरा’ कादंबरीतील सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय विचार संपदा!

अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली ‘फकिरा’ (१९५९) ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी समजली जाते. अण्णा भाऊ लिखीत ही ‘मास्टरपीस’ कादंबरी ऐतिहासिक व समकालीन आहे. ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे सामाजिक एकीकरण, संस्कार, राष्ट्रधर्म, राष्ट्र, राजकीय व्यवस्था, प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करताना दिसतात. याचबरोबर दिनदलितांचे हीन जीवन, सहिष्णुता, लढवय्येपणा, राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देतात म्हणून ‘फकिरा’ सामाजिक व राष्ट्रीय उदात्त व उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला दस्तऐवज ठरतो...

अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका

स्त्रीने कसे असावे, याचे ठोकताळे समाजमनाने त्याचे त्यानेच ठरवलेले असतात. ते कालही ठरवलेले होते, आजही आहे. मात्र, अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायिका या 'ठरवलेपणाला' या 'साचेबद्धपणा'ला अलगद नाकारत स्वत:चे अवकाश निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणार्‍या आहेत. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. ..

शिवराय आणि अण्णा भाऊ

महाराष्ट्रही वीरांची, थोरांची भूमी... छत्रपती शिवाजी महाराज ते अगदी अण्णा भाऊ साठेंपर्यंत ही नामावली आहे. अण्णा भाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांची महती अगदी परेदशात गायली. त्याचा संदर्भ.....

समाज घडविणारे महापुरुष : अण्णा भाऊ

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त माझे अल्प विचार मांडत असताना मला अतिशय आनंद होत आहे. अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी अनेक साहित्यिकांनी, समीक्षकांनी आपले विचार मांडले आहेत. त्यांना अण्णा भाऊ जसे दिसले तसे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

अण्णा भाऊ कम्युनिस्ट नव्हते!

‘अण्णा भाऊ कम्युनिस्टच होते,’ असे सांगण्याची धडपड काही लोक सातत्याने करताना दिसतात. हेतू हाच की, अण्णा भाऊंना मानणाऱ्या समाजाने ‘लाल बावटा’ हातात घ्यावा. अण्णा खरोखरच कम्युनिस्ट होते का? त्यांच्या जीवनाचा आढावा घेतला तर उत्तर स्पष्ट येते की, ते कम्युनिस्टांसोबत होते, पण ते कधीही कम्युनिस्ट नव्हते...

अण्णा भाऊंच्या साहित्यातील समाजदर्शन

माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय, समूहाशिवाय त्याचे अस्तित्व शून्य आहे.हे अण्णा भाऊ जाणतात आणि माणसाला केंद्रस्थानी लिखाण करताना त्यांच्या आसपासच्या सर्व गोष्टींची नोंद अण्णा भाऊ घेताना दिसतात. त्यामुळे विविध समाजगटाचे दर्शन अण्णा भाऊंच्या ..

समाजपुरुषाला विनम्र अभिवादन

समाजपुरुष लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला वंदन. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आज अभिमानाने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. महामंडळावर अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना अण्णा भाऊंच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाचे हित साधायचे आहे. आज महामंडळापुढे अनेक प्रश्न असले तरी त्या प्रश्नांचा मागोवा घेताना मला एकटे वाटत नाही. कारण, महामंडळासोबत माझ्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अपूर्व नेतृत्व आहे. तसेच मंत्री चंद्रकांतदादा ..

समाज उत्थानाचा शिवगोरक्ष आदेश

राईनपाडा येथे लोकांचा गैरसमज झाला आणि डवरी गोसावी समाजाच्या पाच भिक्षेकरी तरुणांना नाहक जीवाला मुकावे लागले. समाज भिक्षेकरी आहे. पालात राहतो. त्याचे पालातले वास्तव्य संपून त्याच्या हातातील भिक्षेकऱ्यांची झोळी जाऊन ते खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न, स्वावलंबी बनावे यासाठीचे विचारमंथन समाजातील मान्यवरांनी केले. त्यातूनच मग भटक्या जमाती संघाची स्थापना करण्यात आली...

त्यांच्याकरिताच 'सूर्योदय'!

सकलांचा आदित्य देव तर केव्हाच उगवलेला आहे. त्याची सर्वव्यापी प्रकाशकिरणे अंतर्बाह्य विश्वाला उजळवणारी आणि स्थूलातिस्थूल व सूक्ष्मातिसूक्ष्म जड-चेतनांना बल व शक्ती प्रदान करणारी आहेत...

अश्वत्थाम्यास उपरती

अर्जुन आणि राधेय युद्धास तयार होत आहेत, हे अश्वत्थामा पाहत होता. त्याने दोघांकडे पाहिले व त्याचे हदय रणांगणावरील प्रत्येक योद्ध्यासाठी करुणेने भरून आले. अश्वत्थाम्याने दुर्योधनाचाहात आपल्या हातात घेतला व घट्ट दाबला. दु:शासनाचा आपल्या डोळ्यांसमोर भीषण वध झालेला दुर्योधनाने नुकताच पहिला होता म्हणून तो अजूनही दु:खाने हुंदके देत होता...

छोट्या पार्टीतील मोठा आनंद

एकीकडे रुपाली अन तिच्या कुटुंबाला हवी होती तशी बर्थडेपार्टी झाली. दुसरीकडे लक्ष्मी अन तिच्या कुटुंबाला आमच्या गोड कंपनीसोबत खाऊ आणि मच्छरदाणी मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांनाच ‘रिटर्न गिफ्ट’रुपी मिळाली ‘हॅप्पीवाली फिलिंग.’..

जगा आणि जागा

भारताचा विकास साधायचा असेल, तर खेडी विकसित व्हायला हवीत. 'शिक्षण' हा विकासाचा पाया मानला गेला आहे. विकासाच्या सर्व संकल्पना या प्रभावी शिक्षणाभोवती गुंफल्या गेल्या आहेत म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल, तर खेड्यात सोयी-सुविधा उपलब्ध करणे व त्या सक्षम करणे गरजेचे आहे. ग्रामविकास हेच ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून 'साद माणुसकीची' या संस्थेची स्थापना २०१६ साली करण्यात आली...

आयबॅकोचे नवी मुंबईत पहिले स्टोअर सुरु

आयबॅको या लोकप्रिय आईस्क्रीम चेन ने मुले आणि युवकांना आवडऱ्या ब्रँड चे पहिले स्टोअर नवी मुंबईत सुरु केले. देशभरात १५० रिटेल स्टोअरच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या हॅट्सन ऍग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे आयबॅको हे ब्रँड आहे...

विविध धर्म प्रणालीतिल चिन्ह संकेत - ज्युडाइझम अर्थात ज्यू धर्म आणि संस्कृती

ज्युईश आस्था-श्रद्धा-निष्ठेनुसार एकूण 13 तत्त्वं आणि सूत्रांचा स्वीकार आणि त्याचे दैनंदिन जीवनात पालन करणे आवश्यक आहे. गंमत म्हणजे ‘धर्म’ या विषयावर आपल्या देशात डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या समाजात जशी मत-मतांतरे असतात, अगदी तसेच इस्रायल या देशांतील ज्यूधर्मीय समाजात होत असते. या धर्मप्रणालीत ‘देव’ म्हणजे या ‘जगाचा निर्माता’ ही प्राथमिक संकल्पना आहे. ..