जळगाव

पूर्ववैमनस्यातून अंदाधुंद गोळीबार: भाजप नगरसेवकासह चार जणांचा मृत्यू

भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना भुसावळमध्ये घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून हत्याकांडातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले...

मॉब लिंचिंगशी विहिंप सहमत नाही; देशात कायद्याचेच राज्य

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांचे प्रतिपादन, विहिंपची प्रांत बैठक जळगावात सुरु असून 'जळगाव तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते...

पेपर तपासणीत घोळ; पुनर्तपासणीनंतर १३७१ विद्यार्थी पास

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रातही असाच घोळ झाला होता. प्रथम तपासणीत १० पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थीदेखील पेपर पुनर्तपासणी झाल्यावर उत्तीर्ण झाले होते...

राष्ट्रवाद-राष्ट्रद्रोह भेद करून काम करा

सैनिक, सरकारच्या समर्थनार्थ मोर्चाप्रसंगी डॉ. संदीपराज महिंद यांचे प्रतिपादनराष्ट्रीय सुरक्षा मंच, स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  जळगाव, २२ फेब्रुवारीदेशात राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह हे दोनच मुख्य घटक आहेत. देशाचे जातीपातींमध्ये तुकडे करण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर प्रत्येकवेळी आमच्या मनात देशप्रेम जागृत होते, परंतु ते काही काळापुरते जागृत असते. दशहतवाद संपवायला तुम्हाला-आम्हाला एकत्र राहण्यावाचून पर्याय नाही. प्रत्येकाने ..

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी :-देवेंद्र फडणवीस

   धरणगाव, 21 फेब्रुवारी : वनवासी समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी राज्य सरकार त्यांच्या सदैव सोबत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वनवासी समाजाचे खूप मोठे योगदान असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिसंस्था, धरणगाव तर्फे आयोजित जनजाती मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी प्रमुख मार्गदर्शक, तर अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. रामेश्वर संस्थांनचे महंत नारायनस्वामी ..

पंतप्रधान मोदींचे जळगावला स्वागत

जळगाव, धुळे येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान यांचे जळगाव विमानतळावर दुपारी आगमन झाले. यावेळी महापौर सीमा भोळे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या हिंदी आवृत्तीचे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन त्यांचे स्वागत केले...

हिंदू धर्माचा वेगाने प्रसार होत देशांत प्रभाव वाढतोय : रवीकुमार अय्यर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात ‘हिंदुत्वाचा जगभरात वाढता प्रभाव’ या विषयावर रवीकुमार अय्यर यांचे बौद्धिक आयोजित केले होते. रवीकुमार यांनी जनजाती समूहांमध्ये सेवाकार्य केले असून रा. स्व. संघाचे केंद्रीय संपर्क मंडळाचे सदस्य अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे...

पुलवामा घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहर बंद

पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात ४४ जवान शहिद झाले. या घटनेच्या निषेधार्थ १६ रोजी शहरात सर्वपक्षीय , संघटना, समाजसेवकांनी एकत्रित रॅली आयोजित केली...

मानवाधिकार कार्यकर्त्यांचा खोटारडेपणा उघड

सर्वांना जीवन जगण्याचा अधिकार आहे. मानवावर अत्याचार झाल्यास तसेच त्याच्या अधिकारांवर गदा आल्यास मानवाधिकार कायद्याचा वापर करून पीडितास दिलासा दिला जातो. मानवाधिकारांना जागतिक मान्यता आहे. भारतात मानवाधिकार कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे...

न्हावीत मोबाईल टॉवर ‘सील’

परिसरातील मोबाईल टॉवर कंपन्यांना ७ दिवसांची वाढीव मुदत देऊनही ७३ हजार ३६० रुपयांची महसूलची बाकी न भरल्याने वोडाफोन, एअरटेल, इंडस टॉवर या मोबाईल कंपन्यांचे टॉवर पुन्हा १३ रोजी महसूल विभागाने सील केले. त्यामुळे परिसरातील मोबाईल नेटवर्क नॉट रिचेबल आहे...

कुणी तरी सांगाल का, प्रेम नक्की काय असते?

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे प्रेमाचा दिवस. जगभरात हा दिवस साजरा केला जात आहे. प्रेमींसाठी हा दिवस खास क्षणच असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन्स डेकडे पाहिलं जाते. ..

जैन इरिगेशनला ९१.५ कोटींचा करपश्चात नफा

भारतातील कृषी व सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या तिसर्‍या तिमाहीचे (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले स्वतंत्र व एकत्रित निकाल मुंबई येथे नुकतेच जाहीर केले. तिसर्‍या तिमाहीचा अर्थात नऊ महिन्यांचा कर, व्याज व घसारापूर्व नफा १३.९७ टक्क्यांनी वाढून ते ८२१.३ कोटी रूपये व तिसर्‍या तिमाहीचा कर, व्याज व घसारापूर्व नफा २७२.२ कोटी रूपये जैन इरिगेशनने साध्य केला. ..

जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई

जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनतळाची व्यवस्था असूनही वाहनतळ सोडून अन्य जागी वाहने उभी करणार्‍या वाहनधारकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. ..

एरंडोलला जमावाकडून पोलिसांना मारहाण

गायींची अवैध वाहतूक प्रकरणी विखरण रिंगणगाव रस्त्यावर मंगवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्यासह अन्य पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून सर्वांना न्यायालय समोर हजर केले असता सर्वाना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला...

यावलला बसमधून गुटखा जप्त

येथील बसस्थानकावर मंगळवारी सकाळी मध्यप्रदेशातून आलेल्या एका एसटीमधून दोन पोती गुटखा जप्त केला आहे गुटखा नेमका कुणाचा हे मात्र समजू शकले नाही...

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने चोरी

दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगत दोघा भामट्यांनी वृद्धेचा विश्वास संपादन करून सुमारे दीड लाख रुपयाचे दागिने लंपास केल्याची घटना नेताजी चौकातील गवळीवाड्यात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली...

‘त्या’ रंगेल अधिकार्‍याला प्रशासकीय की राजकीय अभय ?

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय मानले जाते. त्यासाठी जिल्हाभरातून नागरिकांचा याठिकाणी दिवसभर राबता असतो. मात्र जि. प. च्या एका विभागातील रंगेल अधिकार्‍याच्या कारनाम्याने जिल्हा परिषदेवर बदनामीची नामुष्की ओढविली आहे. जि. प. च्या सीईओसह पदाधिकार्‍यांनी याप्रकरणी कानावर ठेवले आहेत...

जागा मिळविण्यासाठी जीवघेणी कसरत...

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे चाळीसगाव, चोपडा, रावेर, भुसावळ, यावल, जामनेर आदी ठिकाणाहून विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. जळगाव आगार स्थानकात दुपारच्या वेळी शाळा, महाविद्यालयातून जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिंनी गावी परतण्या साठी येतात...

वरखेड येथील शेतकर्‍यांना कापूस व्यापार्‍याकडून लाखोंंचा गंडा

बोदवड तालुक्यातील वरखेड येथील शेतकर्‍यांची कपाशी खरेदी करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघकीस आला. दरम्यान, तो कापूस व्यापारी येथून पळून गेला असल्याचे समजते..

जामनेरात एकाच रात्री तीन घरफोड्या

शहरातील वाकी रोड भागात ११ च्या मध्यरात्री सलग तीन ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करुन चोरट्यांनी पोलिसांसमोर आवाहन उभे केले आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे...

प्रधान मंत्री पीक विमा योजना

नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान केवळ शेतकर्‍यांच्या कुटुंबास हानी पोहोचवून जाते असे नाही तर त्याचा परिणाम राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर होत असतो...

आशियाई चित्रपट महोत्सव जळगाव 17 फेब्रुवारी पासून

समर्पण संस्था, आयोजित १ला आशियाई चित्रपट महोत्सव १७ फेब्रुवारीपासून जळगावात सुरु होत आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील चित्रपटांचे स्क्रिनिंग नियोजन भवन सभागृहात करण्यात आले आहे. ..

गरुड महाविद्यालयात राज्यस्तरीय आय.क्यू.ए.सी.नॅक कार्यशाळा

गरुड महाविद्यालयात राज्यस्तरीय आय.क्यू. ए.सी. व नॅक पुनर्मूल्यांकन कार्यशाळा विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांच्या सहभागात उत्साहात पार पडली...

बीएलओंकडून कर्तव्यात कसूर

मतदार नोंदणी आणि मतदारांना ओळखपत्र पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंकडे देण्यात आलेली आहे...

पत्रकार फाऊंडेशनला २० खुर्च्या भेट

फैजपूर पत्रकार फाऊंडेशन संचलित फैजपूर शहर पत्रकार संघाचा विद्यानगर येथील कार्यालयामध्ये छोटे खानी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला...

सावदा क्रबस्थानसाठी ६० लाख निधी मंजूर

नगर पालिकेला वैशिष्ट्यपुर्ण योजना विशेष अनुदानांतर्गत कब्रस्थान विकासाकरिता ६० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे...

सावदा येथे स्वाईन फ्लूने एकाचा मृत्य

शहरातील रुबीना शेख गुलाम वय ३५ या महिलेचा ३ रोजी स्वाईनफ्लूने मृत्यू झाल आहे. मयत रुबीना हीच्या १० वर्षीय मुलीला सुध्दा स्वाईनफ्लूची लागण झाली असून तीच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उचार सुरु आहेत..

रूपलाल महाराजांना राष्ट्रसंतांचा दर्जा प्राप्त होईल

बारी समाजातील संत रूपलाल महाराज यांना राष्ट्रसंताचा दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिले. ..

जामनेर तहसीलवर विविध मागण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा

सोमवार रोजी तहसीलवर विविध मागण्यांसाठी जेष्ठ नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला.फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ जामनेर तालुका यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ..

यावत तालुक्याचे उतारे देणे काम बाकी असल्याचे जाहिर करा

राज्य शासन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजीटल होत आहे. सर्वत्र संगणीकृत उतारे मिळत आहे परंतु न्हावी येथील शेतकर्‍याला संगणीकृत उतारा मिळत नसल्याने यावल तालुक्याचे उतारे देणे काम बाकीअसल्याचे जाहिर करण्याची मागणी त्यांनी केली आहे...

जामनेरात ५०० लाभार्थ्यांना उज्जवला गॅसजोडणी वाटप

शहरातील सुमारे पाचशेच्या वर लाभार्थ्यांना नगराध्यक्षा साधना महाजनांच्या हस्ते मोफत उज्वला गॅसजोडणीचे महात्मा ज्योतीबा फुले मंगलकार्यालयात आयोजीत कार्यक्रमात वाटप करण्यात आले...

भुसावळ नगरपरिषद हद्दवाढ फेर प्रस्तावाला मंजुरी

येथील नगरपरिषदेची तातडीची विशेष सभा ४ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ..

जल बचतीसाठी नवी दृष्टि देत 'जलसंवाद- २०१९' चा उत्साहात समारोप

कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठात १ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी 'जलसंवाद- २०१९' हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरु व कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.पी. पाटील, रा.स्व. संघ देवगिरी प्रांत संघचालक मधुकर जाधव, डाॅ. एस. एन. पाटील, प्रा. डाॅ. एस. टी. इंगळे, पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख प्रा. डाॅ. उपेंद्र कुलकर्णी व महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज कंक आदी मान्यवर उपस्थित होते...

पाणी मिळणं हा सजिवांचा अधिकार, तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही - भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

भविष्यातला भारत सुजलाम सुफलाम ठेवायचा असेल तर दूरदृष्टी ठेवून उपाययोजना करण्यासाठी आता समाज पुढे आला पाहिजे. लोकांना आपण निवडलेल्या मार्गाविषयी विश्वास निर्माण करुन देता आला पाहिजे. ..

'जलसंवाद- २०१९' ची उत्साहात सुरुवात

कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म. विद्यापीठात आज दि. १ फेब्रुवारी, शुक्रवार रोजी 'जलसंवाद- २०१९' या कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रा. स्व. संघाचे सरकार्यवाह मा. भैय्याजी जोशीं उपस्थित होते...

भुसावळ रेल्वेस्थानकात १०० फूट उंचीवर फडकला ‘तिरंगा’

रेल्वेस्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २५ रोजी १०० फूट उंचीवर सुमारे २० किलो वजनाचा तिरंगा खा. रक्षाताई खडसे यांच्या हस्ते रिमोटचे बटण दाबून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता फडकाविण्यात आला. ..

शिंदखेडा येथे अभाविपतर्फे १,१११ फूट लांबीची ‘तिरंगा’ यात्रा

शहरातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने १,१११ फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेचे आयोजन २५ रोजी करण्यात आले होते. पदयात्रेचा समारोप गांधी चौकात करण्यात आला...

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळगाव-सिंदाड गट-गण प्रमुख जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पिंपळगाव-शिंदाड गटप्रमुखपदी संतोष कुटे (पिंपळगाव हरेश्वर) यांची तर पिंपळगाव गण प्रमुखपदी तुषार तुकाराम पाटील (पिंपळगाव हरेश्वर) यांची निवड माजी आ.दिलीप वाघ यांनी जाहीर केली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले...

महिलांचे शौचालय बांधण्याची मागणी

शहरातील राम मंदिर चौकात महिलांंसाठी नवीन शौचालय बांधण्यात यावे तसेच शौचालयाची दुरवस्था सुधारण्यात यावी, यासाठी पारोळा नगरपरिषदचे मुख्याधिकारी सचिन माने यांना निवेदन देण्यात आले...

खडगावला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची सांगता

येथील ग्रामस्थांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह साजरा करण्यात येतो. याप्रसंगी गावात दरवर्षी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. अध्यात्म, समाजप्रबोधन आणि एकोपा या उद्देशाने सुरू केलेल्या ग्रामोत्सवाचे हे आठवे वर्ष होते...

नवापूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

श्री सुरूपसिंग हिर्‍या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली...

रनाळेत कूपनलिकेद्वारे विहिरीत पाणीसाठा

तालुक्यातील रनाळे ग्रामपंचायतीतर्फे संभाव्य पाणीटंचाईववर मात करण्यासाठी कूपनलिकेद्वारे विहिरीत पाणी सोडून गावकर्‍यांची पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे...

जी.टी.पाटील महाविद्यालयात ‘दृष्टी’ अंतर्गत जागतिक कौशल्यावर कार्यशाळा उत्साहात

येथील जी. टी. पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे तीनदिवसीय जागतिक कौशल्य या विषयावर 21-23 जानेवारी दरम्यान आयोजन लँग्वेज लॅबमध्ये करण्यात आले होते...

कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

शिवसेना महानगरतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेत पुरुषांच्या क्रीडा रसिक संघाने अंतिम सामन्यात महर्षी फाउंडेशनचा 35-25 अशा फरकाने पराभव केला तर महिलांच्या स्पर्धेत स्वामी स्पोर्ट्स संघाने जय मातृभूमी संघाचा पराभव केला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले...

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना..

भुसावळ शहराच्या विकास आराखड्याचे सर्वेक्षण

भुसावळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने 17 ते 23 जानेवारीदरम्यान डॉ. प्रताप रावल, नियोजनतज्ज्ञ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या पथकाने शहराचे सर्वेक्षण केले...

डॉ. आचार्य ‘अविनाशी’ सेवा पुरस्कारांची घोषणा

केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. अविनाश आचार्य यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या ‘अविनाशीसेवा’ पुरस्कारासाठी यावर्षी संस्थात्मक गटातून औरंगाबाद येथील ‘साकार’ या संस्थेची तर व्यक्तिगत गटातून गेवराई, जि.बीड येथील सहारा अनाथालयाचे संतोष गर्जे यांची निवड करण्यात करण्यात आली...

दिलेली आश्वासने पुर्ण करत असल्याचे भासवण्याचा सत्ताधार्‍यांचा प्रयत्न - अजित पवार

लवकरच आचारसंहिता लागणार आहे. पाच राज्यात झालेला पराभव पाहून सत्ताधार्‍यांनी दिलेली आश्वासने पुर्ण केली जात आहेत असे भासवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांनी राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत केले...

निर्मला सीतारमन यांची सैन्य भरती संदर्भात मोठी घोषणा

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी घोषणा केली की, लष्करी सेवेमधे वर्गीकृत करण्यात येईल आणि लष्कराच्या एकूण संख्ये पैकी 20 टक्के महिलांचा समावेश असेल...

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी आणि ४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने मेलबर्न वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे...

शहर विकास आराखड्यासाठी पुणे अभियांत्रिकीच्या विद्यार्थी पथकाची भुसावळ भेट

भुसावळ शहराचा विकास आराखड्यासाठी आ. संजय सावकारे यांच्या शिफारशी अन् पाठपुराव्याने पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नगरनियोजन(एम टाउन प्लॅनिंग)विभागाच्या पहिल्या वर्षाच्या ३१ विद्यार्थ्यांचे पथक शहराच्या आठवडाभराच्या भेटीवर आजपासून आले आहे...

पालच्या सरपंचपतीची दबंगगिरी

रावेर तालुक्यातील पाल येथील ग्रामस्थांनी २६ जानेवारीची ग्रामसभा सार्वजनिक ठिकाणी घ्या. अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आणि ग्रामसेवकाला देण्यासाठी गेले...

पाचोर्‍याला सचखंड, चाळीसगावला महानगरीला थांबा

चाळीसगाव व पाचोरा येथील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. खासदार ऐ. टी. नाना पाटील यांच्या प्रयत्नांतून पाचोर्‍याला सचखंड तर चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर महानगरी थांबा देण्यात रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे...

जलगांव 'व्यावसायिक क्रिकेट लीग' शुभारंभ

सागर पार्कवर दररोज मैदानात खेळायच्या निमित्ताने जमणार्‍या उच्चशिक्षित विविध व्यावसायिक व समविचारी मित्रांनी ‘चला खेळूया स्वास्थ्यासाठी’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेल्या ‘सागर पार्क क्रिकेट क्लब’ तर्फे प्रोफेशनल क्रिकेट लीगचा शुभारंभ मंगळवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर करण्यात आला. यानिमित्ताने दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यापैकी काही सामने झाले. ..

भुसावळ शहराची विकासाकडे वाटचाल

भुसावळ शहराची विकासाकडे वाटचाल होत असून १७ जानेवारी पासून शहरात होणार्‍या सर्व्हेक्षणानंतर नवीन विकास आराखडा समोर येणार आहे. राज्यात कदाचित भुसावळ हे पहिलेच शहर असू शकेल ज्याचा विकास आराखडा मास्टर प्लान होत आहे...

माथेफिरूने दुचाक्या जाळल्या

हरात सध्या मोथेफिरुनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच विनाकारण शहरातील वेगवेगळ्या भागातील घरासमोरील लावण्यात आलेेले वाहने जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच गुरुवारीच्या मध्यरात्रीनंतर माथेफिरुने हनुमान नगर, रामेश्वर कॉलनीतील दोन दुचाकी जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ..

खेलो इंडिया योजना

देशात खेळांना प्रोत्साहन मिळावे आणि खेळातील नवीन टॅलेंट उजेडात यावे, यासाठी सरकारने सप्टेंबर 2015 मध्ये ‘खेलो इंडिया’ योजनेचा शुभारंभ केला. पूर्वीच्या राजीव गांधी खेळ योजना, शहरी खेळ संरचना योजना व प्रतिभा शोध योजना या तिन्ही योजना एकत्रित करून ही नवी योजना सादर केली गेली आहे...

स्वच्छ महाराष्ट्र अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वर्षापुर्वी 2014 मध्ये ’स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा केली. देशभरात नागरीकांना निरोगी जीवन मिळण्यासाठी व प्रदुषणमुक्त पर्यावरण राखण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली. आपले घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल व गाव स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ होईल व पर्यायाने देश स्वच्छ होईल व भारत स्वच्छ राहिला तर देशवासी नागरीक निरोगी आयुष्य जगू शकतिल अशी दूरदृष्टी या अभियानामागे होती. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडवण्यासाठी त्यांच्या 150 व्या जयंतीपर्यंत म्हणजेच ..

शस्त्रप्रदर्शनातून रिव्हॉल्व्हर लंपास, घटनेने खळबळ

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे शुक्रवारी काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शनातून एक रिव्हॉल्व्हर लंपास करण्यात आल्याचा प्रकार सायंकाळी घडला...

सौभाग्य योजना (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना)

स्वातंत्र्योत्तर काळात देशात वीज जोडणी संथ गतीने झाली. परंतु गेल्या दोन दशकात देशात वीज जोडणीचा वेग बर्‍यापैकी वाढला होता...

नाशिक विभागात लाचखोरीत जळगाव जिल्हा अव्वल

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोकडून वर्ष 2018 मध्ये केलेल्या कारवाई अग्रस्थानी जळगाव जिल्हा असून सर्वात शेवटी नंदूरबार जिल्हा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी 5 ने लाचखोरांची संख्या घटली आहे...

सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार

जळगाव येथील सत्ताधारी पक्षाचे माजी नगरसेवक संतोष मोतिराम पाटील (वय ५१) हे सकाळी शेतात जात असताना मागून येणार्‍या दुचाकीवरील अज्ञात दोघांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी सकाळी १०.४५ दरम्यान घडली. या गोळीबारात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सहयोग क्रिटीकल्समध्ये उपचार सुरु आहे...

गेल्या चार वर्षात सरकारची प्रत्येक आघाडीवर प्रगतीच

गेल्या चार वर्षात सरकारची प्रत्येक आघाडीवर प्रगतीच ..

वैचारिक भूक शमविण्याचे ‘तरुण भारत’चे व्रत अबाधित

देशात अनेक वृत्तपत्रे आहेत. त्यात काही प्रादेशिक तर काही स्थानिकही आहेत. वृत्तपत्रे प्रकाशित होतात मात्र वाचकांची खर्‍या अर्थाने वैचारिक भूक भागविण्याचे काम ‘तरुण भारत’ करीत आहे...

महावितरण आपली चूक मान्य करत नाही -प्रताप होगाडे

महावितरण आपली चूक मान्य करत नाही, चोरी आणि भ्रष्टाचार थांबविण्यात ते अपयशी ठरले असून त्याचा भुर्दंड व्यावसायिकांना पडत आहे असे प्रतिपादन महाराष्ट् वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी जळगाव येथे उद्योजकांच्या बैठकीत केले. ..

बोदवडला ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात विविध उपक्रम

येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. ..

मराठा समाजाच्या मेळाव्यात 350 युवक-युवतींनी दिला परिचय

शहरात रविवारी झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक विवाहेच्छूकांनी परिचय करुन दिला. परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

माळी समाजाच्या मेळाव्यात 389 जणांनी दिला परिचय

सर्वत्र विवाहविषयक निर्णय घेतांना वधू परिवाराकडून नोकरदार वर मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र समाजात शिक्षणाची पत जरी सुधारली असली तरी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे नोकरीचा अट्टहास न करता शेतकर्‍यांच्या मुलांचाही विचार करावा, असा सल्ला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी दिला...

आदिवासी कोळी समाजाच्या मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी दिला परिचय

येथील श्री माता मनुदेवी संस्था संचालित आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर, पालक परिचय मेळाव्यात 128 विवाहेच्छूकांनी आपला परिचय करुन दिला...

न्यायालयात वकिलांना फार मोठी भूमिका बजावावी लागते

न्यायालयात पती-पत्नीच्या वादात युक्तिवाद करताना वकिलांना दोन्ही बाजूने फार मोठी भूमिका बजावावी लागते. न्यायालयात आज अनेक प्रकरणे प्रलंबित असून न्यायाधीश कमी आहेत,..