यवतमाळ

यवतमाळ येथे ‘महा मतदार जागृती’ रथाला जिल्हाधिका-यांनी दाखवला झेंडा

आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन व अमरावती येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात ‘महा मतदार जागृती’ रथ फिरविण्यात येणार आहे. ..

बचतगटासाठी शून्य टक्के व्याजाने कर्ज पुरवठा

बचतगटांना व्यवसाय उद्योगासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली..

बहिष्काराचे सावट दूर सारुन साहित्य संमेलन यशस्वी

समारोपप्रसंगी यवतमाळकरांवर अरुणाताईंचा कौतुकवर्षाव..

साहित्य संमेलनात ‘मराठी समीक्षेची समीक्षा’

समीक्षेच्या विविधांगी पैलूंची चर्चा करण्यासाठी ‘मराठी साहित्यातील समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते..

मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज : प्रा. क्षितीज पाटुकले

मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले. ..

साहित्य संमेलनात कृषिजागर

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ..

माध्यमांना वेगळ्या स्वायत्ततेची गरजच नाही - नितीन केळकर

‘साहित्य संमेलनातील माध्यमांची स्वायत्ता - नेमकी कोणाची?’ या विषयावरील परिसंवादात त्यांनी आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडले. विशेष म्हणजे, या परिसंवादात सहभागी इतर ज्येष्ठ पत्रकारांनी नयनतारा सहगल यांच्या ‘निमंत्रणवापसी’चे कारण पुढे करत या परिसंवादावर बहिष्कार टाकला. पण, नितीन केळकर यांनी मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित राहून आपली रोखठोक भूमिका मांडणेच पसंत केले...

थोर साहित्यिकांना चित्ररुपी मानवंदना

यवतमाळच्या स्कूल आफ स्कोलर्सचे रविंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सोबतच्या चित्रकारांनी. क्षीरसागर स्वत: कलाध्यापक असून त्यांच्यासोबत इतरही काही चित्रकारांनी मिळून साहित्यिकांना आपल्या चित्रांच्या माध्यमातून मानवंदना अर्पण केली..

साहित्य संमेलनात पुस्तक विक्री जोरात

यंदाच्या साहित्य संमेलनात जवळपास १७५-२०० पुस्तकांचे स्टॉल असून सगळे स्टॉल पुस्तक प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. समेलनात पुस्तकांना मिळणारा वाचकांचा एकूण प्रतिसादाविषयी आम्ही काही स्टॉलधारकांशी सवांद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

यवतमाळमध्ये शुक्रवार, दि. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ९१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील महिला करणार आहे...

जिल्ह्यातील रद्द झालेल्या सिंचन विहिरी होणार पूर्ण

यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १६ हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते. यापैकी आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत. ..

मुले पळविणा-या टोळीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

कायदा हातात घेवून कोणालाही मारहाण केल्यास अशा वेळी खूनाचा गुन्हा नोंद होवून आयुष्यभर जेलमध्ये घालवण्याची वेळ येऊ शकते. ..

यवतमाळमधील भीषण अपघातामध्ये १० जण ठार

पहाटेच्या अंधारमध्ये वाहन चालक अंदाज न आल्यामुळे दोन्ही वाहने अत्यंत वेगाने एकमेकांना समोरासमोर येऊन धडकली. यामुळे दोन्ही गाड्यांचे अक्षरशः चक्काचूर झाला...

यंदा जिल्ह्यात दोन हजार एकरवर रेशीम लागवडीचे नियोजन

रेशीम लागवडीकरीता जिल्ह्यातील १ हजार ६०० शेतक-यांनी पुढाकार घेतला असून यापैकी १ हजार २५० शेतक-यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती येरावार यांनी यावेळी दिली. ..

बचत गटामुळे महिलांनी साधली आर्थिक प्रगती : केंद्रीय मंत्री अहीर

आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधीकाळी पुरुष प्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे. ..

पिक कर्जापासून एकही जण वंचित राहू नये

यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी २ हजार ७८ कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ..

रोज अर्धा किलो माती खाऊनही तंदुरुस्त!

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जिवांचे मिश्रण असते. माती हे मिश्रण पृथ्वीवरच्या जीवनास साह्यभूत ठरत असते. माती सर्व सजिवांच्या वाढीचे मुख्य माध्यम आहे. वनस्पतींची वाढ या मातीच्या आधाराने होत असते. परंतु, वणी येथील एका व्यक्तीने या मातीलाच आपल्या आरोग्याची किल्ली बनवली आहे...

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये स्वातंत्र, समता व बंधुत्वाची भावना पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे...

जमीन अधिग्रहणातून मिळालेला मोबदला शेतीमध्येच गुंतवा

आपल्या हक्काची जमीन ही शेतकऱ्याला आपल्या आई प्रमाणेच असते. ..

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४ कोटीं रुपयांचा निधी वितरीत

गेल्या महिन्यात १२ आणि १३ तारखेला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपीटमुळे जिल्ह्यात एकूण ११ हजार ९० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. ..

यशस्वी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांची : पालकमंत्री मदन येरावार

शिक्षण हा तर राष्ट्राचा आत्माच आहे. शिक्षक हा नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल, तो गुरगुरतो, असे सांगितले आहे...

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळाशी सामना करू

वॉटर कप स्पर्धेच्या प्रशिक्षणासाठी यवतमाळ तालुक्यातील ९ गावातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे. ..

विषमुक्त शेतीसाठी ‘दत्त’मार्ग

तालुका संघचालक दत्तात्रय तुकाराम बनगिनवार यांची मांडवा येथे २५ एकर शेती आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे पारंपारिक शेतीवरील प्रबोधनाने प्रभावित होऊन ते सेंद्रीय शेतीकडे वळले. पहिल्याच प्रयत्नात त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक फायदा झाला. यामुळे उत्साहित झालेले बनगिनवार शेतीवर नवनवीन प्रयोग करून पीक घेत आहेत. ..

लेखकांच्या लेखणीत राष्ट्रनिर्मितीचे सामर्थ्य : नितीन गडकरी

वाणी येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते...

केंद्रात आणि राज्यात जनतेचे सरकार : मदन येरावार

शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ..

गोवंश तस्करी करणाऱ्या 'त्या' तिघांना न्यायालयीन कोठडी

गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रकमध्ये निर्दयपणे जनावरे कोंबून त्यांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना यवतमाळ जिल्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा पूर्ण तपास झाल्यानंतर या आरोपींना पुढील शिक्षा सुनावली जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे...

नव्या नियोजन समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

नियोजन समिती ही जिल्ह्याचा मुख्य गाभा आहे, त्यामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये सुसंगत आणि कामाची तत्परता असे अत्यंत गरजेची आहे, असे येरावार यांनी यावेळी म्हटले...

यवतमाळकरांना दुष्काळाची झळ बसणार नाही

यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यवतमाळमध्ये पाण्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. परंतु शासने आणलेल्या अमृत योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यवतमाळमधील नागरिकांना दुष्काळाची झळ बसणार नाही' असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे. ..

६८ वर्षीय बनारसीबाईंची रक्तदानाची पंचाहत्तरी

महिला रक्तदानात मागे आहेत. त्याला कारणेही अनेक आहेत. मात्र बनारसीबाई ‘बी निगेटिव्ह’ या दुर्मिळ गटाच्या रक्तदात्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे ७५ वेळा रक्तदान करणे अत्यंत मोलाचे मानले जायला हवे. ..

राज्य पोलीस दलाच्या स्थापनादिनानिमित्त जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापनदिनानिमित्त यवतमाळ पोलिसांकडून जिल्ह्यात 'वर्धापनदिन साप्ताह' या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ..

पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यातील १३,३३४ शेतकर्‍यांचे कर्ज माफ

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पुसद विभागातील १३,३३४ शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ८३ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला. हा निधी संबंधित सोसायट्यांमार्फत शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात वळता करण्यात आला आहे...

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍याची आत्महत्या

तालुक्यातील मोख येथील शेतकर्‍याने शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार, १० डिसेंबरला दुपारी घडली. ..

कुलवृक्ष म्हणून पूजलेला निघाला ‘कल्पवृक्ष!’

आज झाडे लावा अन् जगवा असे सांगितले जात आहे. तुम्ही झाडांवर प्रेम करा ते तुम्हाला जीवन देतात, असेही सांगितले जाते. पुसद तालुक्यातील शिंदे कुटुंबाच्या शेतात गेल्या तीनेक पिढ्यांपासून असलेल्या अनाम वृक्षाची ते ‘कुलवृक्ष’ म्हणून पूजा करत आले आणि नेमका तोच वृक्ष रक्तचंदनाचा निघाला... त्याची किंमत गेलाबाजार एक कोटीच्या घरांत आहे!..

'कर्जमाफी' झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागणार - अजित पवार

'मुख्यमंत्री म्हणतात ६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र एकाही शेतकऱ्यांच्या तोंडून कर्जमाफी मिळाल्याचे ऐकवत नाही. सरकार मात्र आम्ही कर्जमाफी दिली आहे, अशी ठाम घोषणा करत आहे. त्यामुळे कर्जमाफीचे पैसे गेले कुठे हा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्यासाठी म्हणून हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे' असे पवार यांनी यावेळी सांगितले...

एक टक्का देखील कर्जमाफी झालेले नाही - सुप्रिया सुळे

'राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळीकडे कर्जमाफी केल्याचे सांगत आहेत. परंतु राज्यातील एक टक्के शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी झालेले नाही...

राज्याचे कृषी खाते झोपले आहे. - धनंजय मुंडेंचा ‘हल्लाबोल’

बोंडअळीच्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषी खाते झोपले आहे. बोंडअळीच्या संकटासंदर्भात सरकारला कळवूनही दखल घेतली नाही...

नव्या मतदारांसाठी 'मिलेनियम वोटर' उपक्रम

प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची जन्मतारखी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यातच एखाद्या विशिष्ट दिवशी कोणाचा जन्म झाला असेल तर तो दिवस त्यांच्यासाठी अविस्मरणीय आणि निरंतर लोकांच्या लक्षात राहणारा असतो. ..

सरकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे हेच मुख्य ध्येय

तकऱ्यांना धडक मनरेगाच्या विहिरींचा लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे. शेतीचा खर्च कमी करून जास्त उत्पादन येण्यासाठी सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, धडक सिंचन, कृषी पंप वीज जोडणी अशा अनेक योजना आणलेल्या आहेत. ..

राज्यात पुन्हा सुरू होणार टंकलेखन संस्था

महाराष्ट्रातील हजारो टंकलेखन संस्था शासनाच्या नव्या निर्णयामुळे बंद पडल्या होत्या. केवळ संगणकावरच टायपिंग शिकविले जावे, अशी अट घालून या संस्था बंद करण्याचे फर्मान राज्य शासनाने जारी केले होते. ..

किल्ला म्हणजे दुर्ग, आईच्या पायी स्वर्ग

मोफत म्हणजे फ्री, झाड म्हणजे ट्री तीनला इंग्रजीत म्हणतात थ्री...विद्यार्थ्यांच्या सहज तोंडी बसतील अन् शब्दांच्या करामतींनी त्यांचे ज्ञानरंजनही होईल, अशा चारोळ्या शिक्षक महादेव निमकर यांनी सुरू केल्या अन् बघता बघता ते विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत झाले! ‘चारोळीतून गुणवत्तेकडे’ उपक्रमाला शिक्षण आयुक्त विपीन शर्मा यांनीही भेट दिली. विद्यार्थ्यांची अशी गर्दी तर नेहमीच उसळलेली असते...

अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांचे अन्न कमी केले

राज्यात लाखो आदिवासी, गरीब, कोलाम, पारधी, दलित, अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना उपरोक्त योजनेतून कमी करून त्यांना अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केल्यामुळे याचा फटका वयोवृद्ध, निराधार, अपंग, विधवा या सर्वांना बसला आहे. कुपोषणग्रस्त भागात याची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे...

यवतमाळ जिल्ह्यात जनधनचे ५.३६ लाख बचत खाते

जिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत आतापर्यंत ५ लाख ३६ हजार ४९३ नागरिकांचे बचत खाते काढण्यात आले आहेत. तर प्रधानमंत्री जीवनज्योती व जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत ५८ खातेदारांना १ कोटी १६ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. ..

कृषी अधिकार्‍याला शिवसैनिकांनी कपाशी बोंडाची दिली चव

आर्णी तालुक्यातील शेतकरी बोंडअळीमुळे अडचणीत आला आहे. असे असतानाही तालुका कृषी विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन असल्याने शिवसेनेने काल तालुका कृषी कार्यालय गाठून कृषी अधिकार्‍याला कपाशीच्या बोंडाची चव घेण्यास भाग पाडले...

यवतमाळ जिल्ह्यात २८ हजार कामे पूर्ण, १९३ कोटी रुपये मजूरी वितरित

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत नरेगा अंतर्गत २८ हजार कामे पूर्ण करण्यात आली असून यात मजूरी म्हणून स्थानिक मजुरांना आतापर्यंत १९३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे...

कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण

कापूस बियाणे अधिनियमातील तरतुदीनुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांकडून नमुना ‘जी’नुसार अर्ज भरून घेऊन त्यांच्या शेतीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश राठोड यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले...

यवतमाळ जिनिंगची बेभाव विक्री

यवतमाळ सहकारी जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीची २४ कोटी रुपये बाजारभाव असलेल्या या जमिनीची सरकारी किंमतही १३ कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. तरीही ही जागा ७ कोटीत विकण्याचा जिल्हा बँकेचा मनसुबा प्रसार माध्यमांमुळे उघड झाला. ..

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर करणार

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर करण्यासाठी विद्युत मंडळाला मेडा मधून २ कोटी रुपये तर जिल्हा नियोजनमधून १ कोटी रुपये देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरी ५० टक्के कमी पाउस झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजना १०० टक्के सुरळीत करून ..

विविध उपक्रमातून उभ्या राहिल्या 'डिजिटल शाळा'

विशेष म्हणजे या सर्व शाळांमधील डिजिटल वर्गांच्या निर्मितीसाठी अनेक प्रकल्पांमधून प्रयत्न करण्यात आले आहेत. ..

जिल्हातील अधिकाधिक भूमी सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न करा

जिल्ह्यात ९ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र विविध पिकांच्या लागवडीखाली आहे. सिंचनामुळे या क्षेत्राचा मुलभुत विकास होणार आहे. ..

सहकाराच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक - येरावार

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार केला आहे. सर्वसामान्य शेतक-यांचा जवळचा संबंध सहकार क्षेत्रासोबत येत असतो. जिल्ह्यात शेतक-यांची संख्या जवळपास ४ लाख ६० हजार ऐवढी आहे. ..

सोयाबीन लिलाव बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचा दोन रस्ता रोको

गेल्या गुरुवारी बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी रात्री उशिरा लिलावाला सुरुवात केली होती. यामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी वर्ग चांगलाच नाराज झाला होता...

कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे जिल्हाधिका-याचे आदेश

जिल्ह्यामध्ये झालेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांची यंदा झालेली लागवड लक्षात घेऊन देशपांडे यांनी काही महत्त्वाच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. ..

जिल्हातील वाघाची दहशत संपणार कधी ?

गेल्या वर्षभरात जिल्ह्यामध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये सहा ते सात शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे...

विषबाधेमुळे विदर्भात आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांचा मृत्यू

विषबाधेमुळेआतापर्यंत यवतमाळमधील २०, नागपूरमधील ७, अकोल्यात ६ तर अमरावतीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून २५० ते ३०० शेतकरी अजूनही विषबाधेने ग्रस्त आहेत...

दारव्हा पाणी पुरवठा योजनेचे काम जलदगतीने करा

दारव्हा तालुक्यात पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या असून त्यासाठी निधीसुध्दा आला आहे. ..

जिल्ह्यातील दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांवर मुंबईत होणार उपचार

दुर्धर आजार असणा-या रुग्णांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यात येईल. या संपूर्ण उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत्‍ करण्यात येणार आहे, ..

विकासादरम्यान शेतकऱ्यांवर अन्याय अमान्य - संजय राठोड

जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वे आवश्यक आहे. येथील शेतकरीसुध्दा रेल्वेच्या भुसंपादनासाठी आपली शेतजमीन देत आहे...

कृषी विभागाच्या कार्यालयात मनसेची गुंडगिरी

मनसे कार्यकर्त्यांनी थेट कृषी विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करत धडक मोर्चा नेला. तसेच या ठिकाणी जाऊन मनसेच्या नावाने घोषणा देत कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. ..

विषबाधेमुळे आतापर्यंत २० शेतकऱ्यांचा मृत्यू

जिल्ह्यामध्ये विषबाधेचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या विषयाची दाखल संपूर्ण राज्यभर घेतली जाऊ लागली आहे. ..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवा - पालकमंत्री मदन येरावार

रुग्णांच्या नातेवाईकांना कुठलेही औषध बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही, यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात अतिरिक्त औषधसाठा ठेवावा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे...

रुग्णालयात भर्ती असलेल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ तरतूद करा - सदाभाऊ खोत

जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-यांचा विषय अतिशय गंभीर आहे...

विषबाधेमुळे मृत झालेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून २ लाख रुपयांची मदत

गेल्या काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांच्या फवारणी वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. यामध्ये एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू देखील झाला होता. ..

फवारणी दरम्यान विषबाध होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

शेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी करत असताना कळंब येथील देविदास मडावी यांना विषबाधा झाली होती. त्यानंतर उपचार दरम्यान मडावी यांचा मृत्यू झाला. ..

विषबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - हंसराज अहिर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यासाठी प्रशासन काय उपाययोजना करता आहे, याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. ..

फवारणी दरम्यान विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ उपाय द्या - येरावार

शेतामध्ये रसायन खतांची फवारणी करत असताना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कारवाई करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवावी, असे त्यांनी म्हटले...

फवारणीसंदर्भात शेतक-यांना मिळणार फिल्डवर मार्गदर्शन

किटकनाशक फवारणी आणि त्या संबधित घ्यावयाची काळजी याबाबत कृषी विभागाने जनजागृती अभियान राबवणे गरजेचे असल्याचे देशमुख यांनी यावेळी म्हटले...

पुढील वर्षी जिल्ह्यात होणार ५९ लाख वृक्षलागवड

महावृक्ष लागवड मोहीम ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ..

वाघाच्या हल्ल्यात एक जण जखमी

काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमार आडे हे आपल्या शेता जवळील रानात आपली गुरे चरण्यासाठी गेले होते...

कुमारी मातांच्या पुनर्वसनाची गरज - जिल्हाधिकारी देशमुख

उच्च न्यायालयाने कुमारी मतांचा प्रश्नासंबंधी गांभीर्याने विचार करण्याचे आदेश दिल्यानंतर काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ..

'महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा' - महसूल मंत्री राठोड

समाजातील शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनता यांचा दररोज थेट संबंध या विभागाशी येतो...