अमरावती

युतीला घाबरून विरोधकांनी पळ काढला : मुख्यमंत्री

काहींनी घाबरून आधीच माघार घेतल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला. मोदी लाट पाहून आता कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही..

तहानेच्या वाटेवर उभा असतो पाणीदार माणूस

तहानेच्या वाटेवर उभा असतो पाणीदार माणूस..

अमरावतीतील रेल्वे वॅगन ‍दुरुस्ती वर्कशॉप सुरू करण्याच्या कार्याला गती

अमरावतीमधील बडनेरा येथे प्रस्तावित असलेल्या रेल्वे वॅगन दुरुस्ती वर्कशॉप सुरू करण्याच्या कार्याला गती मिळणार असल्याची माहिती अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिली...

मराठा समाजाच्या स्थितीबाबत मागासवर्ग आयोग घेणार सुनावणी

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सुनावणी पार पडणार आहे. ..

गाडगेबाबांच्या वेशात विदर्भभर प्रबोधन करणारा हनुमंत

राष्ट्रीय स्तरावर व्यसनमुक्तीवर कीर्तन व प्रबोधनातून समाजजागृती करणारा वर्तमान काळातील गाडगेबाबा म्हणजे धामणगांव शहरातील हनुमंत ठाकरे...

फुलांनी फुलविली भविष्याची वाट...

फुलांनी इतके फुलावे, इतके फुलावे की देठाचेही फुल व्हावे... अशी लोककवी मनमोहन नातू यांच्या कवितेची ओळ आहे. एका कास्तकार पुत्राने एलएलबीचे शिक्षण घेत असताना बाकायदा शेतीत लक्ष घातले अन्‌ फुलांची शेती करत रोजचे 10 हजार या प्रमाणे महिन्याला किमान 3 लाख रुपयांची कमाई सुरू केली. त्याचे आयुष्य आता देठासह फुलून आले आहे. एकतर उच्चशिक्षण घेणारी शेतकर्‍यांची मुलं शेती-मातीत लक्ष घालतच नाहीत. उलट शेती विकून नोकरी विकत घेण्याकडेच त्यांचा कल असतो. फुलांची शेती फुलवून भविष्याची वाट फुलांफुलांची सुगंधी करून टाकणार्‍या ..

‘पॅकेज’वाल्या नोकर्‍या सोडून ते ‘जमीन’दोस्त झाले

शेतकर्‍यांची पोरं शिकतात आणि नोकरीसाठी जमिनी विकतात, हे आजचे वास्तव आहे, मात्र अमरावती शहरांत राहणार्‍या माथने बंधूंनी उच्चशिक्षणानंतर गवसलेल्या ‘पॅकेज’वाल्या नोकर्‍या सोडून बहाद्दरपूरला जमीन विकत घेतली आणि त्यात अत्याधुनिक पद्धतीने शेती करून यशाची पहिली पायरी गाठली आहे. जमिनीशी त्यांनी केलेली दोस्ती आता फळली आहे... ..

आ. कडूंना देऊ त्याच भाषेत उत्तर, मनसे जिल्हा प्रमुखांचा इशारा

18 हेक्टर जमीन हडपण्याचा आ. बच्चू कडू यांचा मनसुबा आहे. मनसेने त्यात लक्ष घातल्यामुळेच आ. कडू संतापले असून त्यांनी आपल्या सहकार्‍यांमार्फत हाणामारीचे प्रकार सुरू केले आहे...

विदर्भाच्या लाडक्या ‘शकुंतले’चा लवकरच होणार कायापालट!

१९१६ मध्ये क्लिक निक्सन अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीने यवतमाळ ते मूर्तिजापूर-अचलपूर व पुलगाव ते आर्वी या नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आधी सुलोचना आणि नंतर शकुंतला या नावाने ओळखळी जाणारी ही गाडी १९१६ पासून पुढे जवळपास ७० वर्षे वाफेच्या इंजिनवर चालत होती. ११० किलोमीटर अंतर कापायला शकुंतलेला तब्बल ११ तास लागत होते. नंतर ती डिझेल इंजिनवर धावू लागली. आता तिला याच प्रवासाला सहा तास लागतात. ..

विदर्भातील शिक्षकांसाठी होणार ‘शिक्षणाची वारी’

यंदा शिक्षणाची वारी १४, १५ व १६ डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार आहे. या वारीमध्ये विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी होणार आहेत...

प्रवास... एका चोरीला गेलेल्या पर्सच्या तपासाचा

काचीगुडा-यशवंतपुरम रेल्वे क्र. १७६०३ ने एस-९ बोगीमध्ये प्रवासात झोपल्या असताना रात्री ३ वाजता जेव्हा जाग आली तेव्हा पर्स चोरीला गेली असल्याचे सुमंगला श्रीराव यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी आपल्या सोबत प्रवास करीत असलेल्या सहकार्‍यांना सांगितली व त्यांनी सदर चोरीची ऑनलाईन रेल्वे पोलिसांत तक्रार दिली...

पश्चिम विदर्भातील सिंचनक्षेत्रात होणार वाढ

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदीजोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाद्वारे तयार करण्यात येत आहे...

विषबाधेमुळेच यवतमाळच्या शेतकऱ्यांचे मृत्यू

यवतमाळ येथील २४ पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा व्हिसेरा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी कीटकनाशक फवारणीतील विषबाधेनेच त्यांचे मृत्यू झाले आहेत, असे अमरावतीच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ. विजय ठाकरे यांनी तभाशी बोलताना सांगितले. विषबाधेचे प्रकरण म्हणूनच याकडे पाहिले जाईल...

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम लवकर सुरु करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ..

अवैध्यरित्या वाळू उपसा करणाऱ्यांकडून १२ लाखांचा दंड वसूल

अरुण बिजवे आणि धनराज खंडेलवाल असे या दोन्ही आरोपींची नावे असून अवैध्यरित्या वाळू उपसा करणे आणि साठवून ठेवणे यासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ..

विकास प्रस्तावांमध्ये जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यांचा देखील विचार व्हावा - डॉ. कपील चांद्रायण

जिल्ह्यांचा विकास करताना त्यांच्याती वैशिष्ट्यांचा देखील विचार केल्यास तो अधिक लाभदायी ठरू शकतो. ..

अमरावती होतंय फुटबॉलमय

फिका या संघटनेनी १७ वर्षाखाली फुटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा भारतात करण्याचे ठरवले आहे..

पालकमंत्र्यांनी केली पिक कर्जमाफी अर्जांची पाहणी

राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक शेतकरी या योजनेतून सुटता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. ..

आदिवासी महिलांना घरबसल्या मिळणार रोजगार

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणा-या ११८ गावांमधील आदिवासी महिलांना घरबसल्या रोजगाराचे दालन उपलब्ध करून दिले आहे. ..

मेळघाट व्याघ्र प्रकल्प एक अभिनव उपक्रम- सुधीर मुनगंटीवार

आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. ..

'हे सरकार शेतकऱ्यांचे' : पालकमंत्री पोटे

शासनाने शेतक-यांच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत...

'आजच्या स्त्रियांमध्ये देखील अहिल्यादेवीचे गुण' - सुमित्रा महाजन

राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा 'अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार' अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे, दामिनी फेम प्रतिक्षा लोणकर, पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडीत, योगपटू प्रज्ञा पाटील, उद्योजिका कल्पना दिवे यांना जाहीर झाला होता. ..

कुलगुरूंना भेट म्हणून दिली 'समस्यांची राखी'

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भोंगळ कारभार आणि घोटाळे उघड करण्यासाठी शहरातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांना समस्यांची राखी भेट देऊन आपली समस्या सांगितली. तसेच विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यापीठाच्या कारभारात पारदर्शकता आणावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी अभाविपकडून करण्यात आली आहे...

पत्रकारितेत सामाजिक बांधिलकी महत्त्वाची - आनंदराव अडसूळ

भारतीय जनसंचार संस्थे अर्थात आयआयएमसीच्या अमरावती येथील केंद्रात पत्रकारितेच्या मराठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी अडसूळ यांनी दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितांशी संपर्क साधला...

भूमिहीनांना देखील कर्जमाफी मिळावी !

कुळ कायद्याच्या तरतुदींमुळे वहितदारांच्या यादीमध्ये शेती कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाची नोंद नसते...

समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील जमीन खरेदी संपन्न

समृद्धी महामार्ग प्रकरणी आज जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा येथील आठ शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी आज करण्यात आली...

दत्तक विद्यार्थी योजनेत शासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार

गरीब मुलांना दत्तक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एक विद्यार्थ्याचे दत्तक पालकत्व घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केले. ..

'वन आणि मन' यांच्या नात्यातूनच वृक्ष लागवडीला उदंड प्रतिसाद – सुधीर मुनगंटीवार

अमरावती येथे बांबू उद्यानातील निसर्ग निर्वाचन केंद्राचा लोकार्पण सोहळा व ऑक्सिजन पार्कच्या भूमिपूजन समारंभात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते...

अमरावतीला मिळणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

अमरावतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असून लवकरच या संदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे,..

उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल - पालकमंत्री

अमरावती शहरामध्ये अनेक नागरी सुविधा अलीकडे उपलब्ध झाल्या आहेत. ..

वृक्षलागवड अभियानापूर्वी नागरिक सहभागाने विविध कार्यक्रम होणार

जुलै २०१७ मध्ये होणाऱ्या वन महोत्सव सप्ताहाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्देश ठेवून अमरावतीत उद्या दि. २८ जून २०१७ रोजी सकाळी ९ वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे...

महाराष्ट्रातील आणखीन दोन शहरांचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश

केंद्र सरकरच्या वतीने आज देशभरातील ३० नव्या शहरांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड आणि अमरावती या दोन शहरांसह देशातील इतर २८ शहरांचा स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून कायापालट करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज दिली...

मेळघाटातले ‘रंगुबेली’ हे दुर्गम गाव येणार विकासाच्या मुख्य प्रवाहात

मेळघाटातल्या घनदाट जंगलात वसलेलं ‘रंगुबेली’ हे दुर्गम गाव धारणी तालुक्यात असून आतापर्यंत तेथे विशेष कोणतेही विकासासाठीच्या योजना पोहचल्या नव्हत्या...

प्रलंबित वीज जोडण्यांचे काम तत्काळ पूर्ण करा, अन्यथा कडक कारवाईचे आदेश

जिल्ह्यातील शेतकरी, तसेच नागरिकांनी वीज जोडणीसाठी मागणी करुनही ५ हजार ६०० जोडण्या प्रलंबित आहेत. हे काम तत्काळ पूर्ण न झाल्यास जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल..

मेळघाट कुपोषण मुक्तीसाठी शासकीय विभाग एकत्र येणार

राज्यातील दुर्गम भागांमध्ये सर्वाधिक कुपोषित मुलांची संख्या मेळघाट भागात असल्याने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मान्सून पूर्व दौऱ्यासाठी मेळघाट भागाची निवड केली आहे...

स्मार्ट व्हिलेज हरिसालमध्ये पवनऊर्जा निर्मिती केंद्र

डिजीटल ग्राम हरिसाल येथे वीजेच्या पुरेशी उपलब्धतेसाठी पवनऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्यासह इतर सर्व सेवा सक्षम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज हरिसाल येथे दिले. ..

मेळघाटात सेवा न केलेल्या शिक्षकांना प्राधान्याने त्या क्षेत्रात पाठवावे - डॉ. रणजीत पाटील

ज्या शिक्षकांनी आपल्या सेवेत अद्यापपर्यंत मेळघाटात सेवा दिलेली नाही, त्यांची यादी करुन त्यांना मेळघाट क्षेत्रात बदली द्यावी. याविषयीच्या तरतुदींचा अभ्यास करुन हे काम तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी काल अमरावती येथे दिले...

शेती सुधारणा क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर - निती आयोग

शेतकऱ्यांच्या हितासाठी शेती सुधारणेचा कार्यक्रम निती आयोगाने गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केला. त्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा, जमीन भाडेपट्टी सुधारणा, खाजगी जमिनींवर वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमांचा समावेश होता...

आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख याबाबी विचारात घेऊन क्रीडा धोरण २०१२ तयार करण्यात आले आहे...

पाण्याच्या पुनर्भरणासह जमिनीची सुपिकता वाढेल

गाळयुक्त शिवार योजनेमुळे तलावाची साठवण क्षमता वाढून जमिनीच्या सुपिकतेत भर पडेल. त्यामुळे या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज वरुळ तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान दिले...

वॉटर कप स्पर्धेमुळे वरुड तालुक्यातील डार्कझोन कमी होईल - प्रवीण पोटे-पाटील

जलसंधारणाची अनेक कामे मार्गी लागण्यासाठी विविध संस्था पुढाकार घेत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभाग वाढल्यास अनेक उपक्रम उभे राहून पाण्याची पातळी वाढेल व वरुड तालुक्यातील डार्कझोन कमी होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी व्यक्त केला...

सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा नागरिकांनी केला उघड

अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मौजे वडाळगव्हाण येथील शेतकरी महिलेचे नुकसान झाले आहे...

धरणातील गाळ शेतकऱ्यांच्या शिवारात वापरता येणार

जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यासाठी जिल्ह्याच्या जलसंपदा, प्रांतअधिकारी, तहसीलदार आणि कृषी या यंत्रणाची बैठक आज नियोजन भवन येथे पार पडली. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बंगार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली...

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात

स्वच्छ भारत - सुंदर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून या स्वप्नपूर्तीसाठी अखंडपणे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय सफाई आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड यांनी दिले...

अमरावतीत सर्वाधिक तूर खरेदी बाकी - मुख्यमंत्री

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक तूर खरेदी बाकी असल्याने दोन पाळ्यांमध्ये तूर खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकी वेळी दिले आहेत. त्यासाठी अमरावतीत खरेदी केंद्र वाढवली आहेत, तसेच ग्रेडेशन करणा-या अधिका-यांना प्रशिक्षित करून आवश्यक मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची काळजी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे...

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती तीव्र बनत आहे. यावर उपाययोजना करण्याचा राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यामध्ये धरणांमधील गाळ कमी करून तो शेतामध्ये वापरण्यासाठी नवी योजना राज्य शासन राबवणार आहे. ..

अमरावती बाजारात कच-याच्या ढिगा-यात वासराचे शव

अमरावतीच्या इतवारा बाजारात कच-यामध्ये गाईचे वासरू चार दिवसापासून मृतावस्थेत पडले आहे. सोबतच डुक्करही मृतावस्थेत दिसत आहे. तब्बल चार दिवस अमरावती महानगर पालिकेतर्फे याठिकाणी कचरा उचलला गेलेला नाही. अशी माहिती समोर आली आहे. ..

अमरावतीत वन्यजीवांसाठी तरुणांचा पुढाकार

अमरावती तालुक्यात आज पर्यावरणप्रेमींनी भवानी तलाव पात्राची स्वच्छता करण्यासाठी श्रमदान शिबिर आयोजित केले होते. ..

अमरावती जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारला

अमरावतीचा जिल्हाधिकारी म्हणून मेळघाटातील कुपोषणाच्या समस्या संबंधित इतर बाबींचा प्राधान्याने विचार करणार आहे. अमरावती हे विभागीय ठिकाण असून येथील प्रशासनाला मोठी परंपरा आहे. अशा जिल्ह्यात काम करायला मिळणे हे मी भाग्याचे मानतो, असेही बांगर म्हणाले. ..