दायित्व

'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' (नियोजित समिती) आयोजित प्रशिक्षण वर्ग

'स्वच्छ भारत अभियान'अंतर्गत सर्वेक्षण २०१९ सुरू झाले आहे. यानिमित्ताने मुंबईतील वस्ती सामुदायिक शौचालयांच्या सर्व कम्युनिटी बेस ऑग्नायझेशनचे प्रशिक्षण होणे गरजेचे वाटल्याने 'मुंबई सीबीओ कोअर कमिटी' यांच्यावतीने मुंबईच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या सीबीओंचे दोन दिवसीय प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन, या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याचा हा आढावा..

समाजसुखासाठी लेखन करणारे...

अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साहित्य विश्वातील मान्यताप्राप्त 'स्नेहांजली पुरस्कार' मराठी सारस्वतातील एका लेखक व लेखिकेस प्रदान केला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे १८वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक व समीक्षक अनिल बळेल यांना देण्यात येणार आहे. मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे-३० येथे आयोजित सोहळ्यात बळेल यांना सन्मानित करण्यात येईल. त्या निमित्ताने सुप्रसिद्ध ..

‘माकडीचा माळ’ पुन्हा माणुसकीच्या प्रवाहात

अण्णा भाऊ साठे मानव विकास सेवा संघ..

ओंजळ फाऊंडेशन : आधार मैत्रीचा

‘ओंजळ भासते छोटी, पण असते खूप मोठी’ हे वाक्य आपण खूप वेळा ऐकले असेल. मात्र, या वाक्यातील भावार्थ आपल्याला आयुष्यातील एका पायरीवर नक्कीच उमगतो. मात्र, ही ओंजळ जर माणुसकीची असेल, तर त्याचा गंध काही औरच असतो. अशीच माणुसकीने भरलेली ‘ओंजळ’ अरविंद बिरमोळे यांनी डोंबिवलीकरांना व आजूबाजूच्या परिसराला दिली...

पूरग्रस्त भागात पसरली 'हॅप्पीवाली फिलिंग'

अगदी बरोबर वाचलतं. मुंबईतील 'हॅप्पीवाली फिलिंग' नावाचा १४ जणांचा समूह पूरग्रस्त भागात मदत करणे, हे आपले कर्तव्य समजून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, मिरज या भागात जीवनावश्यक वस्तूंच्या ७५० पाकिटांचे वाटप करत शुक्रवार ते रविवार दिवसभर घरोघरी किटरुपी 'हॅप्पीवाली फिलिंग' पसरवत होता...

आयुष्याचे सार्थक

आयुष्याचे सार्थक कशात आहे? नुसते दिर्घायुषी जगण्यात आहे का? तर तसे नाही. आपले आयुष्य दिर्घ नव्हे तर कसे जगलो याला महत्व आहे. आयुष्याच्या संध्याकाळीही समाजभान जपत समाजासाठी कार्य करत राहणे यापेक्षा आयुष्याचे सार्थक काय हे सांगणारी सार्थक संस्था. ..

टँकरमुक्त मराठावाडा ते जलयुक्त मराठावाडा

दीपक मोरताळे, रा. स्व. संघ ग्रामविकास विभाग प्रमुख, नांदेड विभाग, बाबुरावजी केंद्रे, उदय संगारेड्डीकर यांनी ‘टँकरमुक्त मराठवाडा ते जलयुक्त मराठवाडा’ ही संकल्पना राबवण्यासाठी नियोजन केले. रा. स्व. संघाच्या विचारांनी आणि सहकार्याने ती संकल्पना यशस्वीही झाली. या नियोजित जलसंवर्धन कामाचे यश म्हणजे या कामातून १५० कोटी लिटर जलसंवर्धन होणार आहे. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने या सर्व कामांना आर्थिक सहकार्य केले. त्यातूनच टँकरमुक्त ते जलयुक्त मराठवाड्याचे स्वप्न साकारले जाणार आहे...