माणसं

‘पद्मश्री’ श्रीकांत किदंबी

भारतीय बॅडमिंटनपटू श्रीकांत किदंबी याची नुकतीच ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यानिमित्ताने त्याच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा मागोवा.....

एक होते ‘सुरमा भोपाली’

आपल्या विनोदी अभिनय शैलीने ‘शोले’ चित्रपटातील ‘सुरमा भोपाली’ ही व्यक्तिरेखा गाजवणारे अभिनेते जगदीप यांनी ८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतला. प्रेक्षकांना खळखळवून हसायला लावणार्‍या या कलाकाराच्या आठवणींना दिलेला हा उजाळा... ..

स्वरकोकिळा ‘कौशिकी’

भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक तरुण, उमदा आवाज म्हणजे कौशिकी चक्रवर्ती. त्यांच्या सुरेल कारकिर्दीवर प्रकाश टाकणारा हा लेख.....

‘कार्यकर्ता’ ते ‘भाजयुमो प्रदेश अध्यक्ष’

एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणारे विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

‘उद्योगपूर्ण गावा’साठी...

‘अजिंक्य उद्योग समूह’ आणि लोकसहभागातून तुळजापूर व उस्मानाबाद येथे ‘उद्योगपूर्ण गाव’ संकल्पना राबवणारे राम जवान यांच्या जीवनाचा घेतलेला हा आढावा.....

मालवणी रंगभूमीचा राजा

मालवणी रंगभूमी गाजविणारे अभिनेते लीलाधर कांबळी यांच्या निधनाने रंगभूमीच्या या विशाल कालखंडाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख.....

धनुर्धारी सातारकर प्रवीण जाधव

खाशाबा जाधव आणि ललिता बाबर यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्‍या तिसर्‍या सातारकर आणि तिरंदाजीमध्ये निपुण असलेल्या प्रवीण जाधवची प्रेरणादायी गोष्ट.....

पन्नासच्या दशकाचा ‘सुपरस्टार’!

मनोरंजन विश्वात अनेक जण महानायक अमिताभ बच्चन यांच्या नृत्यशैलीचे चाहते आहेत. मात्र, स्वतः बिग बी यांना पन्नासच्या दशकातील ‘या’ सुपरस्टारच्या नृत्याने भुरळ घातली होती. ते म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते ‘भगवान दादा.’..

तार्‍यांना नृत्यदिशा दाखविणार्‍या ‘सरोज’

‘एक...दों...तीन...’ म्हणत सगळ्या बॉलिवूड कलाकारांना आपल्या तालावर नाचायला लावणार्‍या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख.....

प्रशासनातील समाजशील चेहरा

“मी अधिकारी आहे, पण मी समाजाचा सेवक आहे,” असे म्हणत समाज आणि देशहित कसे साध्य होईल, यासाठी जीवाचे रान करणारे प्रशासकीय अधिकारी धनंजय सावळकर... ..

कलोपासक ‘पद्मश्री’ अम्मा

केरळमधील लोप पावत चालेल्या ‘नोक्कु विद्या पावकाली’या लोककलेचे संवर्धन करत वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणार्‍या केरळच्या ‘पद्मश्री’ मुझक्कल पंकजाक्षी अम्मा यांच्याविषयी.....

माणुसकीसाठी धावणारी कविता...

कोरोनाच्या संकटकाळामध्ये नाशिकमधील मजुरांच्या मदतीला धावून जाणार्‍या भारताच्या धावपटू ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊत-तुंगार यांची यशोगाथा.....

उद्धव ठाकरेंना आता ‘संजया’ची साथ!

राज्यावरील ‘कोरोना’ संकटाचा सामना करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता प्रशासकीय अधिकारी संजय कुमार यांची साथ मिळणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले संजय कुमार यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

गगनभरारी घेणारी अंतरा मेहता

फायटर पायलट होण्यासाठी त्यांनी हैदराबादच्या डुंडीगल इथल्या एअर फोर्स अकादमीत प्रवेश मिळवला. इथे त्यांनी ’पिलेटस पीसी-७’, दुसर्‍या टप्प्यात ’किरण एमके-१’ हे लढाऊ विमान उडवले. नुकत्याच झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांच्यासह १२३ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण झाले. आता त्यांना बिदर आणि कलाईकोंडा इथे ’हॉक्स’ या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशातील दहा महिला फायटर पायलटमध्ये अंतराचा समावेश झाला आहे. नागपूर संरक्षणच्या जनसंपर्क अधिकार्‍यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली...

तत्त्वनिष्ठ समाजभान ते साहित्यसेवा

मानवी मन ज्ञान प्राप्तीने संवेदनशील व प्रगल्भ होते या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या साधनामार्गाला अनुसरून साहित्य क्षेत्रात कार्यरत असणार्‍या डॉ रमा दत्तात्रय गर्गे. ..

विजयन : भारतीय फुटबॉलचे ‘अनसंग हिरो’

भारतामध्ये फुटबॉलचा पाया भक्कम करणारे आणि नि:स्वार्थपणे फुटबॉलसाठी काम करणारे माजी फुटबॉलपटू आय. एम. विजयन यांच्याबद्दल जाणून घेऊया.....

सुशांत : द अनटोल्ड स्टोरी

“तो” चित्रपटसृष्टीत आला. ‘कंपूशाही’ला फाट्यावर मारून त्याने स्वतःला सिद्धही केलं आणि तो निघूनही गेला. अशाच प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून ‘एक्झिट’ घेतलेल्या सुशांत सिंह राजपूतविषयी.....

वन विभागाची ‘कौशल्या’

वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्‍हास करणार्‍या आरोपींच्या बेधडकपणे मुसक्या आवळणारी वन विभागाची ‘कौशल्या’ म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या हनुमंत भोसले.....

परदेशातील एक स्वदेशी खेळाडू!

रॉबिन सिंगचा जन्म वेस्ट इंडिजमध्ये झाला. मात्र, या खेळाडूने क्रिकेटमध्ये करिअर घडविले ते भारतीय खेळाडू म्हणून. परदेशातील एक स्वदेशी खेळाडू म्हणून ओळख असलेल्या या खेळाडूवषयी.....

चांद-तार्‍यांपलीकडे माणूस होताना...

‘भारतीयत्व के अभिमान मे संविधान के सन्मान मे’ असा संकल्प घेऊन आणि धर्मांधतेपेक्षा मानवतेच्या विचारसरणीने स्वत:ची, समाजाची देशाची प्रगती करा, असा संदेश देणार्‍या डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांच्याविषयी.....

भारतीय रत्न मीराबाई चानू

‘पद्मश्री’ आणि ‘अर्जुन पुरस्कारा’ने गौरवलेल्या साइखोम मीराबाई चानू हिच्या नावाची आता ‘अर्जुन पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात आली आहे. तेव्हा, जाणून घेऊया तिचा सुवर्णप्रवास.....

‘बॉयकॉट चायना’चा नारा देणारे सोनम वांगचुक!

आमीर खानच्या ’थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले सोनम वांगचुक त्यांच्या ‘बॉयकॉट चायना’ घोषणेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्याविषयी.....

नृत्याचा 'नटराज'

कथ्थकच्या बनारस घराण्यामधील पूज्य नाव म्हणजे नटराज पं. गोपीकृष्ण. कथ्थक नृत्यशैलीत महत्त्वाचे बदल घडवून आणणार्‍या पं. गोपीकृष्ण यांच्याविषयी.....

कर्तबगार उन्मुक्त चंद

२०१२साली भारताला ‘अंडर-१९’ क्रिकेट स्पर्धेचा विश्वचषक जिंकून देणारा तत्कालीन कर्णधार उन्मुक्त चंद यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख... ..

किसी का दर्द हो सके तो लो उधार...

आयुष्यात सुख येते येते म्हणता दु:ख पदरी पडते. पण, त्या दु:खावर मात करत कुटुंब आणि समाजासाठी काम करणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे साहित्यिक, समाजसेविका, उद्योजिका आणि डॉक्टर शुभा लोंढे.....

समृद्ध मनाच्या आमदार...

आज आठवणींच्या काठाकाठांनी चालताना कधी भेट झालीशी वाटते. आठवणी उतरतात मनात अलगद जसे डोंगरावर ढग, ढग पांगतात. वार्‍यासोबत आठवणी मात्र मनासोबत. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मातोश्री आणि भाजप कार्यकर्त्या, माजी आमदार चंद्रकांता गोयल यांच्या निधनाची बातमी समजली. चंद्रकांता गोयल यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

कलासाधक स्वाती

आपल्या कलेच्या माध्यमातून इतरांच्या जीवनात आपल्या कुंचल्यातून हास्य फुलविणार्‍या स्वाती पसारीच्या कलाप्रवासाबाबत.....

टेबल टेनिस सुवर्णस्टार मनिका बत्रा

‘खेलरत्न’ या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारासाठी टेबल टेनिस सुवर्णस्टार मनिका बत्राची शिफारस करण्यात आली. तेव्हा, जाणून घेऊया तिचा हा रंजक प्रवास... ..

मोती पिकवणारी मयुरी!

शेतकरी म्हटले की डोळ्यासमोर येतात ती अन्नधान्याची शेतं... मात्र, शेतीच्या या व्याख्येला छेद देत बुलढाण्याच्या मयुरी खैरे-आंबटकरने अनोखी ‘मोत्यांची शेती’ पिकवायला सुरु केली आहे. ..

'राईड गर्ल’ विशाखा

बाईक रायडिंग, बाईक स्टंट हे सगळे पुरुषी खेळ, ते महिलांच्या कुवतीबाहेरचेच, हा पूर्वग्रह मोडीत काढत वार्‍याच्या वेगावर बाईकसवारी करणार्‍या साहसी विशाखा फुलसुंगे हिच्याविषयी.....

रोडपती ते करोडपती...

एकेकाळी दोन वेळच्या जेवणासाठी इतरांपुढे हात पसरावे लागणार्‍या आणि आज उद्योजक म्हणून उद्योगभरारी घेतलेल्या रेणुका आराध्य यांच्या यशस्वी जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख... ..

समाजहितासाठी सावित्रीचं वाण

सावित्रीबाई साठे या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या सूनबाई... त्यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे ‘मातृशक्ती रमाई पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. त्यांची जीवनकहाणी.....

सर्वोत्तम सुनील छेत्री

भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेला एक सर्वोत्तम खेळाडू म्हणजे सुनील छेत्री...त्याच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश....

आठवणीतले ‘चंद्रा’

संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा-पटकथा लेखक अशा बहुविध भूमिका समर्थपणे पेलणार्‍या एन. चंद्रा यांच्या कारकिर्दीचा लेखातून घेतलेला हा आढावा.....

‘पॅराऑलिम्पिक’ पदकविजेती पलक

शारीरिक अपंगत्वातून खचून न जाता आपल्या जीवनात जीवापाड मेहनत आणि संघर्ष करत अवघ्या १२व्या वर्षी ‘पॅराऑलिम्पिक’ स्पर्धेचे तिकीट मिळविणार्‍या पलक कोहलीच्या आयुष्याविषयी.....

न्याय-हक्क लढ्यासाठी समर्थ प्रेरणा

कर्जत परिसरातील वनवासी बांधव, तसेच इतरही शोषित आणि अन्यायग्रस्त समाजघटकांसाठी प्रशासकीय स्तरावर आणि स्थानिक स्तरावरही कार्य करणारे यशवंत पवार यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा.....

ऑलिम्पियन बलबीर सिंग सिनिअर

ज्येष्ठ हॉकीपटू आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तीनवेळा सुवर्णपदक जिंकणारे बलबीर सिंग सिनिअर यांच्या जीवन संघर्षाबद्दल.....

नाट्याभिनयाचा 'साक्षी'दार प्रवास

हौशी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा करत राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील भूमिका गाजविणार्‍या साक्षी रवींद्र व्यवहारे यांच्याबद्दल.....

प्रेक्षकांना भावणारा ‘खलनायक’

शाळेत असताना त्यांना चित्रपट पाहणे प्रचंड आवडायचे. परंतु, पुरेसे पैसे नसल्याने ते चोरून चित्रपटगृहात जाऊन बसायचे. एकदा ते पकडले गेले आणि तिथल्या तिकीट तपासनिसाने त्यांना चापट मारली. पुढे जाऊन त्यांनी ते चित्रपटगृहच विकत घेतले! ते म्हणजे चित्रपटसृष्टीतले लाडके खलनायक ‘प्रेमनाथ!’..

परिवर्तनकारी नृत्यांगना

कथ्थकच्या मूळ मुद्रांना आणि हालचालींना हात न लावता, कुमुदिनी लाखिया यांनी त्यामध्ये अनेक बदल केले. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी केलेले हे बदल कथ्थक नर्तकांनी स्वीकारले. त्यांनी नुकतीच वयाची नव्वदी गाठली...त्यांच्याविषयी.....

कर्तबगार श्रेयस अय्यर

भारतीय संघाची मधली फळी मजबूत करून संघाला संकटसमयी तारणार्‍या मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी सांगणारा हा लेख.....

देशविकासासाठी ग्रामविकास...

ग्रामविकास साधताना गावातले पर्यावरण आणि पारंपरिक सकारात्मक संस्कृती संपवायची नाही. देश, मानवविकासासाठी ग्रामविकास करायचा आहे, अशा विचारांनी काम करणारे संतोष गायकवाड.....

‘चटनी चाची’

‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेशी तंतोतंत जुळणारी आणि इतर महिलांसाठी आदर्श ठरलेली ‘चटनी चाची’ या ब्रॅण्डच्या शिल्पकार अनिंदिता सेंगर यांच्याविषयी... ..

जागतिक वैद्यकशास्त्रात भारताचा आश्वासक चेहरा

डॉ. सौम्या स्वामीनाथन या जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘डेप्युटी जनरल’ म्हणून नियुक्त होणार्‍या पहिल्या भारतीय. त्यानिमित्ताने या प्रख्यात वैद्यकीय संशोधक आणि आरोग्य धोरणतज्ज्ञ डॉ. स्वामीनाथन यांच्याविषयी जाणून घेऊया.....

‘कोटी’बहाद्दर कलाकार!

उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या आणि आपल्या दर्जेदार मुद्राभिनयाने ‘चंदू पारखी’ या हरहुन्नरी कलाकाराने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह नाटक आणि छोटा पडदादेखील चांगलाच गाजवला... ..

‘दीप’स्तंभ

आजघडीला एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून प्रसिद्ध असल्या तरी येथपर्यंत पोहोचण्यात दीपा मलिक यांनी आपल्या जीवनात जीवापाड मेहनत केली आहे. त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

सत्कर्माची जेथे प्रचिती...

प्रतिकूल परिस्थितीमध्येही सकारात्मक विचार जागृत ठेवणारे आणि त्याद्वारे आयुष्याचे संचित जपणारे, समाजासाठी कार्य करणारे एन. एम. म्हणजेच नथुराम अनंत कदम.....

‘खो-खो’चा सांख्यिकीकार

‘खो-खो’ खेळासाठी आयुष्य वेचलेले ज्येष्ठ सांख्यिकी (statistics) तज्ज्ञ आणि यशस्वी खो-खो प्रशिक्षक रमेश वरळीकर यांना नुकतीच देवाज्ञा झाली. जाणून घेऊया त्यांच्या खेळाडू ते सांख्यिकीकार प्रवासाबद्दल.....

सामान्यांतला असामान्य ‘अजिंक्य’

मुंबईसह देशाची शान असलेला अजिंक्य रहाणे इंग्रजी शिकवणार्‍या एका जागतिक कंपनीचा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसिडर’ झाला आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.....

मराठमोळा ‘ऑस्कर’प्रवास...

चित्रपट जगतात सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ऑस्कर’ पुरस्कारावर ‘पहिली भारतीय महिला ऑस्कर विजेती’ म्हणून आपले नाव कोरणार्‍या भानू अथैय्या यांच्या कलाप्रवासाचा लेखाद्वारे घेतलेला हा आढावा... ..

असा खेळाडू होणे नाही!

फुटबॉलच्या खेळामध्ये भारतीय संघाचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांच्या आयुष्याची गौरवगाथा सांगणारा हा लेख.....

एक समाज, समरस समाज

‘सामाजिक समरसता’ हाच भारतीय परंपरांचा आधार आहे. ‘समरसता’ ही भारतीयत्वाचा आत्मा आहे, तो आत्मा समाजात जपण्यासाठी देवजी रावत काम करतात, त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.....

‘मिरॅकल मॉम’

महिला सशक्तीकरणात दिलेल्या उत्तुंग योगदानाबद्दल १०४ वर्षीय धावपटू मन कौर यांना २०१९चा ‘नारी शक्ती सन्मान’ देण्यात आला आहे. त्यांच्या कार्यावर धावती नजर.....

महाराष्ट्राचा ‘बॅट मॅन’

वटवाघूळ म्हटले की, आजही आपल्यासमोर एका विचित्र प्राण्याचा चेहरा उभा राहतो. त्याविषयीच्या अनेक गैरसमजुतींना चेव फुटतो. मात्र, या वटवाघळांना आपलेसे करुन त्यांच्यावर संशोधन करणार्‍या महेश गायकवाड यांच्याविषयी.....

‘लढवय्या’ ऋषी कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीत नामवंत अभिनेते ऋषी कपूर यांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ५० वर्षं गाजवली. कपूर घराण्याचा वारसा जपतानाच त्यांनी आपली स्वत:ची ओळखही निर्माण केली. त्यांच्या प्रवासाचा हा मागोवा... ..

‘पद्मश्री साहेबजादा’

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्याने या क्षेत्रात येण्याचं त्याने धाडस केलं. अगदी बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत त्याने आपल्या अभिनयाची छाप उमटवली. असा हा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याच्या निधनाने अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे... ..

‘विकेटकीपर’ ते ‘टीम सिलेक्टर’!

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदावरून एम. एस के. प्रसाद नुकतेच पायउतार झाले. एक सर्वसामान्य खेळाडू ते वरिष्ठ पदाधिकारी असा प्रवास करणार्‍या एम. एस. के. प्रसाद यांच्या आयुष्याविषयी... ..

ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू...

देश, समाजासाठी जगायचे आहे, संघर्ष असो, समन्वय असो की सेवा असो, काम करायचे आहे ते देशासाठीच! असे मानणार्‍या आणि जगणार्‍या गायत्री गोहाँई यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा.....

शांतिदूत

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे विचार नव्या पिढीला समजेल आणि रुजेल अशा पद्धतीने मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालत जगभ्रमंती करणार्‍या शांतिदूत नितीन सोनवणे या तरुणाबद्दल.. ..

जगत्जेता भाईचुंग भुतिया

पेले, मॅरेडोना, मेस्सी, रोनाल्डो या जगातील महान फुटबॉलपटूंच्या यादीत समाविष्ट असलेला भारतीय फुटबॉलपटू भाईचुंग भुतिया. जाणून घेऊया त्याचा हा अविस्मरणीय प्रवास.....

रुपेरी पडद्यावरची ‘खाष्ट सासू’

दूरदर्शनवर रामायण सुरू झालं आणि ‘मंथरा’ साकारणार्‍या, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेल्या अभिनेत्री ललिता पवार पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या निमित्ताने त्यांच्या कलाप्रवासावर टाकलेला कटाक्ष... ..

‘स्पिनर’ ते ‘टीम सिलेक्टर’

सुनील जोशी यांची भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. एक सर्वसामान्य खेळाडू ते वरिष्ठ पदाधिकारी असा प्रवास करणार्‍या सुनील जोशी यांच्या आयुष्याविषयी.....

प्रामाणिक कष्ट हाच यशाचा मूलमंत्र

कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सच्च्या मेहनतीने केले की ते निश्चितच यशस्वी होते. पण, कामाप्रती श्रद्धा असणे महत्त्वाचे, असे मानणारे एक उद्योजक म्हणजे एकनाथ दुधे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा.....

‘मिस इंग्लंड’ बनली ‘आरोग्यदूत’

२०१९चा ‘मिस इंग्लंड’ किताब जिंकणारी इंग्लंडस्थित भारतीय वंशाच्या भाषा मुखर्जी या तरुणीने इंग्लंडमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया तिच्या कार्याबद्दल ..

माणुसकी जपणारा गंभीर

भारतीय क्रिकेटपटूसोबतच एक माणुसकी जपणारा नेता म्हणून ओळख निर्माण करून कोरोनाच्या वादळात गोरगरिबांसाठी झटणार्‍या खासदार गौतम गंभीर याच्याविषयी.....

समाजभान जपणारी गुणी अभिनेत्री

आपल्या धारधार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक मालिकेत ‘राणू अक्का’चे पात्र अजरामर करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्या कलाप्रवासाचा घेतलेला हा आढावा.....

‘द्रविड’ची उणीव भरून काढणारा ‘राहुल’

आजघडीला लोकेश राहुलचे नाव ‘द्रविड’सारखा खेळाडू म्हणून घेतले जाते. मात्र, इथवर पोहोचण्यासाठी त्याने संघर्ष केला असून त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख.....

बाबासाहेबांनी दिलेला वसा...

विदर्भातील सामाजिक कार्यात, साहित्यवर्तुळात समर्थपणे ठसा उमटवणार्‍या माया दामोदर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजाने कृतीत अंगीकारावे, यासाठी त्या कार्य करतात. त्यांच्या जीवनाचा हा मागोवा.....

‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चा संशोधक

भारतीय रसायनशास्त्राचे जनक आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी उपचार म्हणून संपूर्ण जगाचे भारताकडे लक्ष वेधायला भाग पाडणारे औषध ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चे निर्माते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्याविषयी.....

सेवाभावी अभिनेत्री!

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. याकाळात अनेक कलाकार पुढे येऊन वेगवेगळ्या स्तरावर मदतीचा हात देत आहेत. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री नर्स बनून मुंबईतील एका रुग्णालयात रुग्णसेवा करत आहे. ..