ठाणे

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे रुग्णालय पालिकेने तात्काळ ताब्यात घ्यावे!

मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची मागणी..

कल्याण-डोंबिवलीतील कम्युनिटी किचन बंद

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रूग्णांची वाढ होत असतानाच परराज्यातील मजूर आपल्या गावाकडे रवाना झाल्याने महापालिकेने कम्युनिटी किचन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असले तरी महाराष्ट्रातील मजुरांचे काय असा प्रश्न झोपडपट्ट्यांमधून विचारला जात आहे. ..

महापालिकेकडून मास्क, सॅनिटायझर, पीपीई खरेदीचे काम डॉक्टरांच्याच माथी!

भाजपा नगरसेवक मनोहर डुंबरे यांचा आरोप..

ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५०नजीक

लोकमान्‍य आणि वागळे प्रभाग समितीत बुधवारी एकूण २२ रूग्‍ण आढळले तर दिवभरात शहरात ४७ रूग्‍ण आढळले. ठाणे शहरात कोरोनाग्रस्‍तांचा एकुण आकडा आता ८४३ इतका झाला. तर तीन रूग्‍ण मृत्‍युमुखी पडले अूसन आठ रूग्‍ण बरे होईन घरी परतले...

७५२ ठाणेकर कोरोनाच्या विळख्यात

शहरातील कोरोनाग्रस्‍तांचा आकडा सोमवारी चाळीसने वाढला. शहरातील करोनाग्रस्‍तांचा आकडा साडेसातशे पार करत ७५२ इतका झाला आहे. आज दिवसभरात तीन रूग्‍णांचा मृत्‍यु झाला. शहरात आत्‍तापर्यंत २२४ रूग्‍ण बरे होऊन परतले असुन ४९९ रूग्‍ण संख्‍या उपचार घेत आहेत. तर २९ जणांचा आजपर्यंत दुर्देवी मृत्‍यु झाला आहे...

बंद घराचे विजबिल ८ हजार ७३० रुपये ! महावितरणकडून ग्राहक वेठीस

महावितरणतर्फे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना स्वतःच्या विजमीटरचे रीडींग करून पाठवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच ज्यांना ही गोष्ट शक्य नाही त्यांना सरासरी बिल पाठवण्यात येत आहे. डोंबिवलीतील खोणी गावातील एका सोसायटीत मात्र, बंद घरांचेही अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार केली आहे. ..

कल्याण डोंबिवली बाहेरील 'नो एन्ट्री'ला स्थगिती

केडीएमसीत राहणाऱ्या मुंबईतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्याबाबतच्या निर्णयाला महापालिकेनी स्थगिती दिली असून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यास वेळ लागत असल्याने तोडगा निघेपर्यंत निर्णय स्थगित केल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे...

भाजपतर्फे कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात `कमळ कवच'!

तीन हजार रुपयांत चाचणी होणार ..

मुंबईत कामावर जाणाऱ्यांना कल्याण डोंबिवलीत 'नो एन्ट्री'

८ मे पासून हा निर्णय लागू होणार ..

मजूरांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत घेतला निरोप

केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे रात्री १ वाजता १ हजार १०४ मजुरांना घेऊन रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हाप्रशासनाने निरोप दिला. ..

ठाण्‍यातील तरूणाई कोरोनाच्या विळख्‍यात

चाळीशीच्या आतील रूग्‍णांची संख्‍या सर्वांधिक..

फडणवीसांविरोधात अश्लाघ्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांना अटक करा !

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात समाजमाध्यमांवर अश्लाध्य पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी पनवेल भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे. शुक्रवारी पनवेल पोलीसांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे...

हा मराठी उद्योजक राज्याला देणार १५ लाख गोळ्या मोफत

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर (कोविड-19) काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्यांचा उपयोग होत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता एका मराठी उद्योजकांने पुढे येत सरकारला १५ लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील सुमंत पिळगावकर, यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे..

गर्भवतीची फरफट; रुग्णवाहिकेतच बेशुद्ध अवस्थेत दिला बाळाला जन्म

अगदी चार दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवतीला घरातच बाळत व्हावे लागल्याची घटना ताजी असताना दुस-या एका महिलेवर रुग्णवाहीकेमध्ये बाळाला जन्म देण्याची वेळ आल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. उल्हासनगरत शासकीय रुग्णालयात डॉक्टरांचा गर्भवती महिलांच्या जिवाशी चाललेला खेळ थांबणार की नाही, असा गंभिर सवाल रुग्णालय प्रशासनाला विचारला जात आहे...

घर चले हम ! जेवण, राहण्याची सोय नसल्याने मजूर निघाले गावाला

लॉकडाऊनमुळे राहण्याची सोय नाही, सरकारने जेवणाची व्यवस्था केली मात्र, गर्दीमुळे पोटभर जेवण मिळण्याची शाश्वती नाही. ..

कल्याण डोंबिवलीत एकूण १३७ रुग्ण

आजच्या नवीन ८ रूग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण संख्या १३७ झाली असून या रुग्णांपैकी ३ मृत तर ४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्ण उपचार घेत आहेत. आत्‍तापर्यंत ४९९८ रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन केलेले असून ९६ रुग्‍ण इस्‍टीटयुशनल क्‍वारंटाईनमध्‍ये आहेत. ..

जितेंद्र आव्हाड ठाण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल

ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आव्हाड रुग्णालयात..

राबोडी, मुंब्रा कौसाने उडवली ठाणेकरांची झोप

मुंब्रा कौसा भागाने करोना ग्रस्‍ताचा आकडा वाढवण्‍याचे प्रमाण रविवारीही कायम होते, शनिवारी ८ तर आज ७ करोनाग्रस्‍त या भागातुन आढळले तर राबोडी भागात ५ रूग्‍णांची टेस्‍ट पॉझीटिव्‍ह आली हे ५ जण पालिकेच्‍या कॉरंटाईन सेंटरमध्‍ये दाखल होते त्‍यांचे चाचणी अहवाल यायचे होते आज ते आल्‍यानंतर राबोडी, वृंदावन परिसरात भितीचे वातावरण पसरले. आज शहरात एकुण १९ रूग्‍ण आढळले त्‍यामुळे शहरातील करोनाग्रस्‍तांचा आकडा १४९ वर पोहचला आहे...

जाणून घ्या ! कम्युनिटी किचन म्हणजे काय ?

अंबरनाथला कम्युनिटी किचनला सुरुवात अंबरनाथ : कोरोनामुळे अनेकजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशपातळीवरील असो किंवा स्थानिक पातळीवर सर्वच जण कोरोनाशी लढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अशातच अनेक ठिकाणी कम्युनिटी किचनची सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, कम्युनिटी किचन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबद्दल जाणून घेऊयात. ..

विरारमधून ५० लाखांचे बोगस ‘एन९५’ जप्त!

बोगस मास्क साठेबाजी प्रकरणी तिघांना अटक..

डोंबिवलीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

डोंबिवली पश्चिमेला आज कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला असून महापालिका क्षेत्रातील आणि निळजे आरोग्य केंद्रातील रुग्ण धरून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ५६ झाला आहे. त्यापैकी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली कोरोना अपडेट्स ..

मनसे आमदार राजू पाटील यांनी स्वतःचे रुग्णालय दिले पालिकेच्या ताब्यात

कल्याण ग्रामीण मतदार संघाचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी डोंबिवलीतील १५ ते २० व्हेटंटीलेटर असलेले १०० बेडचे सर्व सुविधा युक्त असे आर. आर. रुग्णालय कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताब्यात दिले आहे. मनसे आमदार राजू पाटील ह्यांना २४ मार्चला पालिका आयुक्तांनी सूचना केली होती की, कोरोना रुग्णांसाठी शहरातील एखादे खाजगी हॉस्पिटल पूर्णत: COVID19 साठी घ्यावे, जेणेकरुन डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना चांगली सुविधा मिळेल, ..

आव्हाड 'होम क्वारंटाईन'; कोरोनाबाधित पोलीसाशी संपर्क

  ठाणे : कोरोना पॉझिटीव्ह पोलीसाच्या संपर्कात आल्यामुळे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच आव्हाड यांच्या संपर्कात आलेल्या इतर काही जणांनाही होम क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याचे समजते. मुंब्रा येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.जितेंद्र आव्हाड हे त्याच्या संपर्कात आलेले असल्यानं त्यांनीही 'होम क्वारंटाइन'चा निर्णय घेतला. काही पत्रकारही या पोलीस कर्मचाऱ्याच्या ..

डोंबिवलीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण

कल्याण : कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या डोंबिवलीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज आणखी एका तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. आज सापडलेला रुग्ण डोंबिवली पूर्वेतील असून तो १९ वर्षांचा आहे. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या आता ५१ झाली असून त्यापैकी ११ जणांना डिस्चार्ज मिळाला असल्याची माहितीही महापालिकेने दिली आहे. तर ३७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ..

‘भटकंती कट्टा’ही झाला डिजिटल!

यंदाच्या भटकंती कट्ट्याचे ऑनलाइन आयोजन! ..

'लॉकडाऊन'मध्ये पत्रीपुलाच्या कामाला सुरवात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व जनजीवन ठप्प झाले असतांनाच कल्याणकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या पत्रीपुलाचे काम मात्र सुरु झाल्याने कल्याणकरांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण शासकीय, निमशासकीय यंत्रणा, खासगी, सामाजिक संस्था या कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. तर या लॉकडाऊनचा परिणाम अनेक महत्वाच्या विकासकामांवरही होताना दिसत आहे. त्यातही विशेष करून ..

डोंबिवलीत पाच वर्षाच्या मुलाला कोरोना

डोंबिवलीमध्ये ५ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी कल्याण डोंबिवलीत नवे ६ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ झाली आहे. ज्यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. आज आढळलेल्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि १ रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे...

सोशल डिस्टंसिंग पाळण्यात ऑर्किड-गोल्डन ड्रीमचा आदर्श !

राज्य सरकारतर्फे 'लॉकडाऊन' घोषित केल्यानंतर अनेक ठिकाणी या सूचनांना केराची टोपली दाखवण्याचे काम सुरू आहे. मात्र, डों..

गृहनिर्माणमंत्री आव्हाडांना तत्काळ बडतर्फे करा : देवेंद्र फडणवीस

शासनकर्तेच मारहाण करीत असतील, तर कायद्याचे राज्यच अस्तित्वात राहणार नाही." ..

मारहाण प्रकरण : आव्हाडांना माधव भंडारी यांचे थेट प्रश्न

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन ठाण्यातील एका तरूणाला मारहाण झाली असून या प्रकाराचा पक्ष निषेध करत असल्याची भूमीका भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्पष्ट केली. तसेच या प्रकरणाची रितसर चौकशी व्हावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ..

आव्हाडांच्या उपस्थितीत मारहाण : चौकशी करा!

ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. ..

आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झालेल्या करमुसे यांचा लढण्याचा निर्धार

ही लढाई व्यक्ती स्वातंत्र्याची : अनंत करमुसे 'मला मरण पत्कारावे लागले तरी मी मरायला तयार आहे', पण व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्याविरोधात निकराने लढण्याच निर्धार अनंत करमुसे यांनी केला आहे. मंगळवार दि. ७ रोजी मध्यरात्री १२ वाजता पोलीस ठाण्यात चल, असे सांगून करमुसे यांना पोलीस राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले. बंगल्यावर २५ जणांच्या गटाने करमुसे यांना पोलीसांसमोर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ही लढाई केवळ माझी नाही तर व्यक्तीस्वातंत्र्य ..

ठाण्यात लॉकडाऊनचे नियम कडक!

भाजीपाला दुकानं बंद मात्र ठाणे महानगरपालिकेच्या योजनेनुसार इथे मिळणार किराणा, भाजीपाला आणि औषधांची घरपोच डिलीव्हरी..

रा.स्व.संघातर्फे किन्नरांसाठी मदतीचा हात

ठाण्यातील वस्त्यांमध्ये केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ..

पोलिसांचा नवा युक्तिवाद ! तुमच्या भावाला, पतीला बाहेर पडू देऊ नका

लॉकडाऊननतंर लोकांनी बाहेर पडू नये म्हणून पोलीस करत आहेत महिलांना आवाहन..

उल्हासनगरमध्ये दुबईहून परतलेल्या महिलेला कोरोनाची लागण

उल्हासनगरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४७ झाली आहे. दोन्ही कोरोना रुग्णांना विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. उल्हासनगरच्या एका ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला दुबईतून प्रवास करून आली होती...

कोरोनाची दहशत : ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकांना डोंबिलीकरांनी रोखले

डोंबिवलीत एक व्यक्ती ऑस्ट्रेलियातून आल्यावर आपल्या राहत्या घरी आले होते. मात्र त्या इमारीतीतील रहिवाश्यांनी त्यांना राहण्यास नकार दिला. डोंबिवली रामनगर पोलिसांनी यात मध्यस्थी घेत ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. ..

पान गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना हजार रुपये दंड

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्य़ा असताना आता पालिकांनीही विशेष दक्षता घेण्याची सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील सर्व पानपट्ट्या त्वरित बंद करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाऊ शकतो. दक्षतेमुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही आता कठोर कारवाई केली जाणार आहे. पान, तंबाखु, गुटखा खाऊन भींती रंगवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पालिका हा निर्णय घेऊ शकते. मुंबई महापालिकेने पान खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करत दंडाची रक्कम पाच पटींनी वाढवली आहे. आता ..

कोकणावर अन्याय करू नका !

’निसर्गसंपदेने समृद्ध असलेल्या कोकणावर अन्याय करू नका,” असे प्रतिपादन आ. प्रशांत ठाकूर यांनी शनिवार, दि. १४ मार्च रोजी विधानसभेत केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आ. प्रशांत ठाकूर यांनी कोकणाची बाजू समर्थपणे मांडत कोणत्याही परिस्थितीत कोकणावर अन्याय होऊ नये, यासाठी आपली भूमिका मांडत कोकणाला अधिक समृद्ध करण्याची मागणी सभागृहात केली...

कल्याण डोंबिवली पालिकेतील १८ गावांची स्वतंत्र नगरपरीषद

कित्येक वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेची मागणी स्थानिकांकडून होत होती. अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषदेची घोषणा विधानसभेत केली. उर्वरित ९ गावे हि शहरीकरण झालेली असल्याने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतच राहणार आहेत. ..

धुळवड खेळण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू

कल्याण तालुक्यातील-मुरबाड रोडवरील रायता पुलानजीक धुळवडीचा रंग काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पत्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून कल्याण तालुका पोलीस घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करीत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ..

विदेशात वापरलेल्या ‘त्या’ कोरोना मास्क विक्रीच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश !

कोरोना, भिवंडी, कोरोना मास्क, Corona, Bhiwandi, Thane, Corona mask..

एकासोबत निवडणुका आणि दुसर्‍यासोबत सत्ता : राज ठाकरे

"सध्याचे राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असे म्हणावे लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसर्‍यासोबत सत्ता स्थापन करायची. तर सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाने विरोधी पक्षात बसायचे, हे दुर्देवी आहे," असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर रविवारी नाव न घेता घणाघाती हल्ला चढविला. ..

महाविकास आघाडीचे आव्हान नाही : भाजप नेते नरेंद्र पवार यांची स्पष्टोक्ती

सर्वसामान्यांसाठी झटणारा नेता म्हणून भाजप नेते नरेंद्र पवार यांची सर्वत्र ओळख आहे. कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार म्हणून नरेंद्र पवार यांनी २०१४ ते २०१९ या काळात उत्तम काम केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती धर्मानुसार कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेला सोडल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी या मतदारसंघात ४४ हजारांपेक्षा जास्त मते घेतली. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विविध कार्यक्रमांच्या व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चांगले काम केले आहे. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षवाढीचे कामही ..

डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक

नागरिकांनी घाबरू नये; 'कामा' संघटनेचे आवाहन..

कल्याण-कसारा मार्गिका वर्षअखेरपर्यंत होणार पूर्ण

मध्य रेल्वेवरील कल्याण-कसारा स्थानकादरम्यान तिसरे आणि चौथ्या मार्गिकेचे काम सुरू आहे. परंतु, भूसंपादनातील अडचणीमुळे हे काम चार वर्षापासून रखडले आहे. आता तिसऱ्या मार्गीकेचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आले असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे...

दुग्धाभिषेकावेळी जमा केलेले दूध मिळणार मुक्या जनावरांना

सांस्कृतिक डोंबिवली शहरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. ते दूध वाया जाऊ नये, याकरिता डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील शिवमंदिरात जाऊन 'पॉज प्लान्ट अॅंण्ड अॅयनिमल वेल्फेअर' सोसायटी या संस्थेच्यावतीने दूध जमा करण्याचे काम केले जाते...

डोंबिवलीतील आगीत दीड लाख लीटर पाण्याचा वापर

डोंबिवली आग - डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीत ‘मेट्रोपोलिटीन’ कंपनीला मंगळवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी दीड लाख लीटर पाणी वापरण्यात गेले...

'शिवाजीचे उदात्तीकरण' पुस्तकावर बंदी घालावी : निरंजन डावखरे

समाजमाध्यमांवर पुस्तकातील उतारे पाठविणाऱ्यांवरही कारवाईचा आग्रह..

वालधुनी नदीच्या पात्रात नारंगी रंगाचा तवंग

अंबरनाथ एमआयडीसीत असलेल्या रासायनिक कंपन्यांच्या पाण्याने वालधुनी नदीच्या पात्रात निर्माण झालेल्या 'नारंगी तवंगाने' खळबळ पसरवली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोणती कारवाई करते याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे...

'जेएनयु'तील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे रा. स्व. संघ कार्यक्रमांबद्दल प्रश्न विचारतात !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर प्रश्न विचारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी टीकास्त्र सोडले आहे...

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्याआधी शिवसेना नगरसेवकांची राजीनाम्याचा इशारा

ठाण्यात खेळाच्या मैदानाचे आरक्षण हटवून त्यांवर सायन्स पार्क उभारले जाणार असल्यामुळे नगरसेवक नाराज..

स्टेरॉईडच्या अतिवापरामुळे तरुणाचा मृत्यू

नावेदची बॉडीबिल्डर होण्याची इच्छा अपूर्णच..

ज्ञानपेटी देई ज्ञानाचे दान!

कल्याण येथील युथ ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला जातो. गणपती आणि देवीच्या सणासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडळात ज्ञानपेटी लावून पुस्तके गोळा करण्याचा एक प्रयत्न केला जातो. मुंबई, ठाणे, नाशिकमधील युथ मेंबर्सच्या मदतीने १००० हून अधिक पुस्तके या माध्यमातून गोळा करण्यात आली आहेत...

बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट

स्फोटात १ कामगार ठार तर ३ जखमी..

डोंबिवलीत बनतोय प्लास्टीकचा रस्ता

कडोंमपा क्षेत्रात खड्ड्यांच्या समस्येबाबत होणार्‍या तक्रारीवर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कडोंमपाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान, महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एमआयडीसीमधील डीएनसी बँक ते आईस फॅक्टरी रस्त्याचा शुभारंभ केला...

सत्ताधाऱ्यांची दादागिरी ! काँग्रेस नगरसेवकाची महिला पत्रकारांशी गैरवर्तवणूक

आधी नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मालिकांची मारहाण आता ठाणे नगरसेवकाचा प्रताप..

"हुजरे आणि मुजरे करण्याची संस्कृती शिवसेनेची"

: नवी मुंबई महापालिकेतील राजकारण तापले आहे. "मातोश्रीवर जाऊन हुजरे आणि मुजरे करण्याची संस्कृती आमच्याकडे नसून ती शिवसेनेची आहे शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचा ढोंगीपणा आणि दुसर्‍यांना दुषणे देण्याचे उद्योग बंद करावेत," असा सज्जड इशारा नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला. 'लोकनेते गणेश नाईक यांच्याकडे सर्वांना प्रेमाची, सन्मानाची आणि आपुलकीचीच वागणूक मिळत असते. हे सर्वज्ञात आहे,' असेही सुरज पाटील म्हणाले...

बांबूपासून निर्मित वस्तूंनाच सर्वाधिक पसंती!

मुरबाडच्या म्हसा यात्रेत ठरताहेत आकर्षणाचे प्रमुख केंद्र..

सरकारने नुसत्या घोषणा करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीत पाहावे : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खासदार नारायण राणेंचा सल्ला..

'सीएए' हा देश सुरक्षेचा कायदा : सुनील देवधर

पूर्वेतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या २३व्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेच्या दत्तनगर येथील संस्थेच्या शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम पार पडला. या व्याख्यानमालेचे हे पहिले पुष्प देवधर यांनी गुंफले...

मुंब्य्रात १३ गोदामांना आग ; गोदामे जाळून खाक

अचानक लागलेल्या या आगीमध्ये लाखोंचे नुकसान, मात्र जीवितहानी नाही..

वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो : कवी अशोक बागवे

कवी समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात.त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात. त्या वेदनेच्या मुळाशी कवितेचा जन्म होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी ‘छंद आनंद’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाप्रसंगी केले...

स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी पुस्तकात आक्षेपार्ह्य मजकूर प्रसिद्ध करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेसचा शनिवारी सर्व स्तरांतून जाहीर निषेध करण्यात आला. सावरकर यांचा अपमान केल्याप्रकरणी सावरकरप्रेमींनी याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यांवरतरून निदर्शने केली. वसई येथे भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत काँग्रेसच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली, तर पनवेलमध्येही नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत काँग्रेसचा जाहीर निषेध नोंदवला...

कल्याण-डोंबिवलीकरांचा रेल्वेप्रवास खडतरच

नव्या वर्षाच्या सुरुवातीला लोकल फेऱ्यांची भेट देणाऱ्या मध्य रेल्वेचा पहिल्याच आठवड्यात खोळंबा झाला आहे. आंबिवली स्थानकाजवळ लेव्हल क्रॉसिंग करताना एका डंपरने रेल्वे फाटकाला धडक दिल्याने ओव्हरहेड वायरचा तुटल्याने विद्युतपुरवठा खंडीत झाला. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शुक्रवारी पहाटेपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती...

'मेगाब्लॉक'मुळे डोंबिवली-दिवा प्रवाशांचे 'मेगाहाल'

कल्याण- डोंबिवलीमध्ये चालू असलेल्या गार्डरच्या कामामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली..

'सीएए' समर्थनाचे पाऊल पडते पुढे...

'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे समर्थन करणाऱ्यांची संख्या वाढली..

डोंबिवलीत नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ रॅली

डोंबिवली आणि ठाणे लगतच्या परिसरात ठिकठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देण्यात आला. यात मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबद्दल माहिती देणारे चित्रफलक, परिपत्रक यावेळी नागरिकांना देण्यात आली. अनेकांना विद्यार्थ्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे नेमके काय?, याबद्दल माहिती देण्यात आली...

उपेक्षितांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारे बाबूभाई परमार...

सरकारी नोकरी, संसार सांभाळून एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू, निराधार, अपंग, विधवा, वृद्ध, विद्यार्थी यांना गेल्या पंधरा वर्षांपासून अविरतपणे मदत करणारे उल्हासनगरमधील बाबूभाई परमार. बाबूभाई यांनी पंधरा वर्षांपूर्वी 'बाबा रामदेव' नावाची सामाजिक संस्था उल्हासनगरमध्ये स्थापन केली होती. पूर्वी यात बाबूभाई एकटेच काम करायचे, मात्र आज या संस्थेत तीन हजार स्वयंसेवक कार्यरत आहेत...

‘भटकंती कट्टा ठाणे’चे चौथे पर्व एका जग फिरणाऱ्या भटक्यासोबत!

जग फिरलेला हा भटकंतीप्रेमी या वेळी आपल्या कट्ट्याला त्यांचे अनुभव सांगणार आहे...