नाशिक

एटीएसची कारवाई : ‘आयएसआय’ला गोपनीय माहिती देणारा अटकेत

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ला भारतीय बनावटीच्या विमानांची माहिती पुरवणाऱ्याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. ..

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी आक्रमक

कांदा आवाराच्या प्रवेश द्वारासमोर अर्धातास शेतकऱ्यांचा रास्ता रोको..

गिधाडांसाठी नाशिकमध्ये साकारणार रेस्टॉरंट

नाशिक जवळील दरी ग्रामपंचायतीने ‘ऑऊट ऑफ द बॉक्स’ विचार करत गिधाड या पक्ष्यासाठी रेस्टॉरंट साकारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे...

काळ आला, पण ‘वेळ’ आली नाही!

३८ मृतदेह अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत; अमरधाममधील गॅस शवदाहिनी बंद!..

सत्तेची हवा ठाकरे सरकारच्या डोक्यात गेली आहे : अतुल भातखळकर

धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अमानुष मारहाणीचा केला तीव्र शब्दांत निषेध!..

जिल्हाधिकाऱ्यांची बंदी झुगारून गोदातीरावर गंगा आरती

भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी प्रशासनाला दिले खुले आव्हान ..

रामकुंडावर महाआरती करण्यास मनाई ; पोलीसांकडून नोटीस

रामकुंडामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा देत मध्यरात्रीच नाशिक पोलिसांनी शहरातील सर्व साधू, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावली आहे...

सेवा ही यज्ञ कुंड समिधा सम हम जले

जीवनाचे सत्य म्हणजे मृत्यू. मरणपश्चात प्रवास सुखकर व्हावा अशी सगळ्यांचीच मनीषा असते. मात्र, कोरोना विषाणूच्या लागणमुळे मृत्यू आल्यास अंतिम समयी ही मनीषा पूर्ण होताना सध्या दिसत नाही. असे असली तरी, कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा अंतिम प्रवास सुखकर करण्यासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती अमोल कार्य करत आहे...

लॉकडाऊनमध्ये बळीराजा संकटात

लासलगावमध्ये बाजारपेठ बंद झाल्याने शेती उत्पादनावर परिणाम ..

नाशिककरांनो वेळीच सावध व्हा !

... जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे पण दुसरीकडे दिलासादायक बाबही घडली आहे. ४२० प्रलंबित अहवालापैकी तब्बल ३८० अहवाल निगेटिव्ह आले असल्याने तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आकडा ५५९ चा आकडा गाठला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे. ..

कोरोनायोद्धा अभियंता संग्राम लिमये

कोरोनायोद्धा अभियंता संग्राम लिमये..

कामगारांना घेऊन नाशिकमधून दुसरी रेल्वे उत्तरप्रदेशकडे रवाना

कामगारांनी दिल्या ‘जय महाराष्ट्रा’च्या घोषणा..

कोटाहून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी धुळ्याहून एसटी रवाना!

७० बससह १४० चालक सज्ज! ..

मालेगावकरांना दिलासा, ४३९ कोरोना अहवाल निगेटिव्ह

राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मालेगावकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आळी आहे. रविवारी तीन करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्याच्या घटनेने थोडाफार दिलासा मिळाला असताना आता सोमवारी शहरातील तब्बल ४३९ रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने मालेगावावकरांना दिलासा मिळाला आहे...

समृद्धी महामार्गाने घेतली गती

कामगारांच्या सुरक्षेची काळजी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित वावर आवश्यक आहे . त्यामुळेच ही कामे सुरू करण्यापूर्वी ग्रामस्थाना विश्वासात घेण्यात आले आहे . आसपासच्या गावातील लोकांनाच या कामावर रोजगार देण्यात आला आहे . त्यांना कामाच्या ठिकाणी घेऊन येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना घरी सोडण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे . ..

'झुलवा' कादंबरीकार उत्तम बंडू तुपे कालवश

ज्येष्ठ साहित्यिक "झुलवा" कादंबरी चे साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे वयाच्या ८९ वर्षी अल्पशा आजाराने रविवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. दि २२ एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते...

मालेगावात जमावाचे दुष्कृत्य : पोलिसांवर हल्याचा प्रयत्न

पोलिसांवर अंदाजे १०० जणांच्या जमावाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडियो समोर आला आहे. बुधवारी लॉकडाऊन दरम्यान बुधवारी सकाळी पोलिसांनी एका युवकाला हटकले. त्याला काठी मारून परत पाठवल्याने संतप्त झालेल्या जमावाकडून मालेगाव शहरातील अय्युबी चौकात पोलिस केंद्रावर तोडफोड झाली. यावेळी अतिशय जलदगतीने तेथे राज्य राखीव दलाचे जवान दाखल झाले आणि परिस्थितीती नियंत्रणाखाली आली. मात्र, लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच पोलीस बंदोबस्त तोडल्या प्रकरणी कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. ..

नाशिकमध्ये आलेला 'तो' गूढ आवाज कशाचा...?

नाशिकमध्ये बुधवारी सकाळी अचानकपणे आलेल्या या गूढ आवाजाचे रहस्य काय यावरून वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात होते. लॉकडाऊनच्या काळात सर्वकाही ठप्प असताना शांत शहरात या आवाजाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान शहरासह लगतच्या परिसरात अचानक एक मोठा आवाज झाला होता. सुरवातीला भूकंपा सारखा आवाज झाल्याने सर्वच शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. काहींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्टही टाकल्या. त्यामुळे प्रत्येक जण तर्कवितर्क लावत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले होते...

नगरमध्ये २४ परदेशी तबलीगींना अटक

तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर करत असल्याचे उघड..

कोरोना नव्हे 'एनआरसी' सर्वेक्षणासाठी आल्याची अफवा उठवत डॉक्टरांना मारहाण

आपल्या जीवावर बेतून जिथे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी गल्लोगल्ली जाऊन कोरोना चाचणीचे सर्वेक्षण करत आहेत, तिथेच काही कट्टरपंथी आणि समाजकंटकांनी त्यांच्यावर एनआरसी सर्वेक्षण करत असल्याचा आरोप लावत मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला आहे...

कोरोनाच्या संकटात पाणीटंचाई : अंकाई गावात माणुसकीच्या झऱ्याचे दर्शन...

शेतकरी शरद सोनवणे यांनी दिले बिनशर्त गावाला पाणी..

नाशिक - कोरोनाबाधितांची संख्या ४६ वर

नाशिक शहरात बुधवारी एका २४ वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले तर मालेगावमध्ये प्राप्त झालेल्या नमुन्यांमध्ये चार नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात सायंकाळी ७ वाजेपर्यंत एकूण ४६ कोरोना संसर्गित असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे...

कोरोनाच्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या

मालेगावमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर कोरोना झाल्याच्या भीतीने ३१ वर्षीय तरुणाने पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना..

परदेशी तब्लिगीच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्ती ताब्यात

नगर जिल्ह्यातील सात गावांच्या अत्यावश्यक सेवाही बंद..

नेपाळमधील १४ तब्लीगींना मशिदीत लपवले ; नगरमध्ये गुन्हा दाखल

नेपाळमधील १४ तब्लीगीना मशिदीत लपवले ; नगरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल..

तबलिग-ए-जमात : जळगावातील १३ जणांचा दिल्ली कार्यक्रमात सह्भाग

तबलिग-ए-जमात : जळगावातील १३ जणांचा दिल्ली कार्यक्रमात सह्भाग..

'तबलिगी-ए-जमात' प्रकरण : नाशिकचे ३२ जण सहभागी

नाशिक : दिल्लीमधील निजामुद्दीन भागात झालेल्या सोहळ्यातही नाशिकमधील काही नागरिकांचा सहभाग उघडकीस आला होता. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३२ व्यक्तींची प्रशासनाने खात्री पटविली आहे . शहरासह जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या चार पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने शोध मोहीम राबवून त्यापैकी २४ नागरिकांना शोधण्यात आले आहे. ..

निजामुद्दीन येथील कार्यक्रमात नाशिकचेही नागरिक सहभागी,शोधमोहीम सुरु

सहभागी नागरिकांनी स्वतःहून पुढे यावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन..

मरकझ कार्यक्रमातील ‘ते’ लोक नाशिकमध्ये क्वारंटाइन

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी दिली माहिती..

कठीण समय येता, संघ कामास येतो...

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू झाली. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या सीमेवर आडगाव ट्रक टर्मिनल आणि विल्होळी ट्रक टर्मिनल, पुणे ट्रक टर्मिनल येथे साधारण ५५० ट्रक हे चालक आणि साहाय्यक यांच्यासोबत अडकलेले आहेत. ..

श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समितीचे सेवाभावी कार्य

श्री गुरुजी रुग्णालय संचालित सेवा संकल्प समिती मार्फत सध्या करोणा विषाणूचा वाढता प्रभाव व संचारबंदी मुळे प्राथमिक आरोग्य सुविधा देण्याकरीता २२ आरोग्य रक्षकांना पुढील औषधी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यातून सेवा संकल्प समिती सेवाभावी कार्य करत असल्याची प्रतिक्रिया समाजमनात उमटत आहे. ..

खळबळजनक! नगरमध्ये मशिदींत कोरोनाग्रस्त विदेशी नागरिकांचे वास्तव्य

नगर जिल्ह्यातील मशिदीत पुन्हा एकदा विदेशी नागरिक सापडल्याने खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी जामखेड शहरातील काझी मशिदीत दहा विदेशी नागरिक नमाज पठण करताना आढळले होते व त्यापैकी दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे दोन्ही नागरिक फ्रान्स आणि आयव्हरी कोस्टचे रहिवासी होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ व १३ अशा ३१ जणांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे...

पुणे विद्यापिठाच्या सर्व परीक्षा स्थगित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ एप्रिलनंतर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती सर्व संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळ विभागातर्फे सांगण्यात आले आहे...

सहकार विभागाच्या सुनावण्याना अनिश्चित काळासाठी स्थगिती

कोरोनामुळे राज्यासह देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, ती उठेपर्यंत व शासनाचे पुढील आदेश प्राप्त होइपर्यंत सर्व प्रकारच्या सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत...

नाशिकमध्ये ‘महाकवच’ची निर्मिती

कॉन्टॅक ट्रेसिंग व क्वारंटाइन ट्रॅकिंग शक्य ..

बाहेर फिरणाऱ्यांची 'बाईक' होणार जप्त

देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. तरीही नाशिक शहरात संचारबंदी व जमावबंदीचे उल्लंघन करून वाहनांवरून भटकंती करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे . त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी विनाकारण शहरात भटकंती करताना वाहनचालक दिसताच त्याचे वाहन तीन महिने जप्त करून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्याचे आदेश दिले आहेत...

नाशिकमध्ये आढळला पहिला कोरोना रुग्ण

लासलगाव येथील तीस वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात आलेल्या या युवकाचे घशाच्या स्त्रावाचे रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, लासलगाव येथील 30 वर्षीय युवकाला गुरुवारी सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने खासगी क्लिनिककडे गेला होता..

कोरोनामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात

कोरोनामुळे विक्रीअभावी साडेपाच महिने उलटूनही शेतात असलेल्या द्राक्षेबागा वाचवा अशी आर्त हाक येथील बाळासाहेब आवारे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शेतीविषयक प्रश्नांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासनही दिले...

नाशिकमध्ये लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद

आज गुढीपाडवा सण असूनही शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला...

सॅनिटायझरमध्ये आढळला केस

चुंचाळे शिवारातील लस देण्याचे प्रकरण ताजे असतानाच परिसरातील एका मेडिकलवर विकल्या जाणाऱ्या सॅनिटायझरमध्ये केस आढळल्याने परिसरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत . विशेष म्हणजे प्रभागातील नगरसेवक राकेश दोंदे हे सॅनिटायझर खरेदीला गेले असता त्यांनाच सदर केस असलेली बाटली मिळून आली . याबाबत सविस्तर वृत्त असे की नगरसेवक दोंदे हे अंबड लिंकरोडवरील एका मेडिकलमध्ये सनिटायझर व मास्क घेण्यासाठी गेले होते . यावेळी त्यांनी ९० रुपये देऊन सॅनिटायझर व १५० रुपये देऊन मास्क खरेदी केले. ..

नाशिकमध्ये झाकीर हुसेन हॉस्पिटल कोरोनांसाठी राखीव

जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या उपचारासाठी नाशिक मनपाचे जाकीर हुसेन हॉस्पिटल पूर्णत: राखीव ठेवण्यात येत असुन यात केवळ कोरोना बाधीतांना सेवा सुश्रृषा देण्यात येतील. तसेच खबरदारीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून नाशिक जिल्ह्याच्या सर्व सिमा 25 मार्च 2020 च्या सकाळपासून सिल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यांनी पत्रकारांना दिली. ..

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज

कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याचा सामना करताना शासन-प्रशासन, जिल्ह्यातील सर्वच नागरीक अत्यंत वेगवान आणि कळीच्या कालखंडातून जात आहेत, अशा परिस्थितीत आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना शासन शिस्त म्हणून तर करतच आहोत, त्याचबरोबर स्वयंस्फुर्तीने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जनसहभाग कसा वाढेल यावर प्रशासकीय पातळींवर प्रयत्न करायला हवेत, कोरानाचा लढा अधिक परिणामकार करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज आहेतच. परंतु येणाऱ्या काळात अधिक सचोटीने काम करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी ..

संचारबंदी : नाशिकमध्ये पेट्रोल पंपांवर निर्बंध!

प्रत्येकी मिळणार फक्त एवढंच इंधन... ..

‘जनता कर्फ्यु’ : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची मोबाईल आढावा बैठक

सकाळपासूनच ओसरलेले रस्ते, माणसांनी भरलेली घरे, पार्किंगला लागलेली वाहने, निर्मनुष्य झालेली गर्दीची ठिकाणे अगदी शहर,गाव,चौकाचौकात बंद असलेली दुकाने, मॉल्स या सर्वांच नेहमीच्या वर्दळीतलं शहर,गाव आज शांततेला कवटाळून ‘जनता कर्फ्यू’त कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी झालं होतं. ज्यांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्याला आजपर्यंत ‘कोरोना’मुक्त राहता आले ते जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि त्यांच्या उपविभागीय, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनीही आजच्या ‘जनता कर्फ्यु’त घरी राहून सहभाग घेतला, त्याचबरोबर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी ..

किती आहे 'स्मार्ट' कामांची उपयुक्तता?

नाशिक शहराचा 'स्मार्ट सिटी' परियोजनेत समावेश करण्यात आला. तेव्हा पौराणिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे नाशिक शहर हे आधुनिकतेची कास धरत अधिक 'स्मार्ट' होण्यास मदत होईल, हीच अपेक्षा नाशिककर नागरिकांची होती. पण, अपेक्षेनुसार नाशिक शहराला 'स्मार्ट' बनविताना गोदावरी नदीचा विचार होणे आवश्यक आहे...

आपण कोण आहोत, याची जाणीव संविधानामुळे होत असते : रमेश पतंगे

मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या भोसला सैनिकी महाविद्यालयातर्फे नुकतेच डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे आयोजिलेल्या भारतीय संविधान अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते आणि संविधान अभ्यासक रमेश पतंगे म्हणाले की, “व्यास, वाल्मिकी आणि आंबेडकर यांच्या त्रिसूत्रीतून देश घडला आहे. आम्ही भारताचे लोक देशाची सार्वभौम प्रजा आहे. संविधान साक्षरतेची गरज आहे. त्याविषयी जागरूकता होण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण कोण आहोत, याची जाणीव संविधानामुळे होत असते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नाशिक ..

धक्कादायक ! पहिल्याच दिवशी 'लीक' झाला दहावीचा पेपर

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर फुटला मराठीचा पेपर..

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन

६६पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक म्हणून कार्यरत..

विकासाचा हा कसला मार्ग ?

मेट्रो प्रकल्प देशासाठी आदर्श ठरल्याने तिचा गौरव केंद्र सरकारनेदेखील करत याबाबत कौतुक केले. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतरण होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे साहजिकच नाशिकचे पालकत्वदेखील मंत्रिमंडळातील बहुबली (बाहुबली) नेत्यांकडे गेले. त्यांना असलेला सर्वंकष असा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव याचा फायदा नाशिककर नागरिकांना होईल, अशी आस होती. मात्र, चौकशीचा धाक असणारी व्यवस्था बदलण्यासाठी तोडफोड करून नवनिर्मिती करण्याकडे असलेला त्यांचा कल असे निर्णय समोर येऊ लागल्याने ..

नाशिकमधील अपघातात २५ ठार ; पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

मंगळवारी नाशिकमधील देवळा येथे बस आणि रिक्षाची धडक होऊन भीषण अपघात झाला..

स्वा. सावरकर केवळ चळवळ नसून एक विचार : अनिता करंजकर

स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात भगूरवासी सावरकर बंधूंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांना नेहमीच उपेक्षित ठेवले गेले. स्वा. सावरकर ही केवळ चळवळ नसून हा एक विचार आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी पुढे काम करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (सावरकर वाडा) भगूर येथे भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले...

"छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपलेच पाहिजे !"

"महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांचे अनमोल देणे लाभले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सह्याद्रीच्या कुशीतील दोनशे गड दोन महिन्यांत सर करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा जाज्वल्य इतिहास आहे. प्रत्येकाने या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे पावित्र्य जपावे. पर्यटनाची आवड निर्माण करणारा ट्रेकॅम्प संस्थेचा उपक्रम देशात मार्गदर्शक ठरेल," असे मत बेल्जिअमचे गिर्यारोहक पीटर व्हॅन गिट यांनी केले आहे...

हिंदुत्व आणि वनवासी यांची वेगळी जोडणी करून रावणाला महत्त्व देण्याचा प्रकार अनाठायी : खा. डॉ. भारती पवार

खा. डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन; जनजाती चेतना परिषद प्रसंगी व्यक्त केले मत..

धुळ्यामध्ये 'कमळ' फुलले ; ३१ जागा जिंकून भाजपची सत्ता

महाविकास आघाडीला धोबीपछाड देत धुळ्यात निर्विवाद वर्चस्व..

जळगावात फुलले 'कमळ' ; खडसे- महाजन रणनीती यशस्वी

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने लावला महाविकास आघाडीला सुरुंग..

भाजपच्या मंडल अध्यक्षपदी पंचाक्षरी, काकड बिनविरोध

भारतीय जनता पक्षाचे नाशिक महानगर मंडलाचा विस्तार झाला असून शहर जिल्ह्यात पूर्वी सहा मंडले होती. त्यामध्ये विस्तार होऊन नवीन रचनेत १० मंडले गठीत झाली आहेत. या आधी पाच मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दि. ३० डिसेंबर, २०१९ रोजी सायं. ७ वाजता पंचवटीतील गोपाल मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत पंचवटी मंडल व नव्याने स्थापित झालेल्या तपोवन मंडलांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली...

आता नाशिकची मिसळ सर्वात भारी... महाराष्ट्र पर्यटनने केले कौतुक

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ट्विट करत नाशिकच्या मिसळचे केले कौतुक..

नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक

वेगळ्या पद्धतीने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध..

"प्रत्येक भारतीय नागरिकाने नागरिकाने अंतर्गत आव्हाने सक्षमपणे हाताळायला हवेत"

प्रत्येक भारतीय नागरिकाने नागरिकाने अंतर्गत आव्हाने सक्षमपणे हाताळायला हवेत असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले त्या सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्यूकेशन सोसायटीतर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमाले प्रसंगी पूर्वांचल राज्ये सुरक्षा सद्यस्थिती, आव्हाने आणि मार्ग या विषयावर बोलत होते. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक धर्मवीर डॉक्टर बा. शि. मुंजे यांच्या १४७व्या जयंती निमित्ताने तीन दिवसीय व्याख्यानमाला नाशिक येथील गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ..

देशादेशांतील परस्पर संबंध टिकवण्यासाठी अध्यात्मशक्ती महत्त्वाची : कॅ. अलोक बन्सल

"भारतीय अध्यात्मशक्ती देशादेशांमधील परस्परसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते," असे प्रतिपादन कॅ. अलोक बन्सल यांनी केले त्या 'सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी'तर्फे आयोजित धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेप्रसंगी 'भारतासमोरील बदलती भौगोलिक आणि राजकीय आव्हाने' या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ.श्रीपाद नरवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य उन्मेष कुलकर्णी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय ..

मूलभूत सुविधा पुरविण्यावर प्रथम लक्ष केंद्रित करावे : महापौर सतीश कुलकर्णी

शहरातील विविध समस्यांबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांशी केली चर्चा..

राष्ट्रहित जोपासणारा ‘महाराष्ट्र वीज कामगार महासंघ’

कामगार चळवळ, कामगार लढा, कामगार संप, कामगारांच्या समस्या आदी अनेक परवलीचे शब्द वृत्तपत्रातून, मोर्चाच्या घोषणांतून आपल्या कानावार पडत असतात. कामगारांचे हित जोपासताना राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे संघटन म्हणून भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणारे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ आपले कार्य तन्मयतेने करत आहे. याचबाबत महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे जाणून घेतलेले कार्य आणि भूमिका.....

नाशिकचा गड राखण्यास गिरीश महाजनांनी कशी वठविली संकटमोचकाची भूमिका? वाचा सविस्तर

नाशिकचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी या निवडणुकीत संकटमोचकाची भूमिका बजाविली. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपचे १० नगरसेवक फोडल्याचे समजते. त्यामुळे भाजपची सत्ता धोक्यात आली होती.परंतु महाजन ऐनवेळी पुन्हा भाजपचे संकटंमोचक ठरले. त्यांनी काँग्रेस आणि मनसेला हाताशी धरून त्यांनी भाजपची सत्ता राखल्याचे चित्र निवडणुकीवेळी सभागृहात दिसून आले...

शिवसेनेला रोखण्यासाठी राज ठाकरे सरसावले

नाशिकमध्ये भाजपला 'मनसे' पाठींबा..

नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदी सतीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड..

नाशिकचा महापौरपदासाठी चुरस

महापौरपदासाठी ११, तर उपमहापौरपदासाठी १० अर्ज दाखल..

सरसंघचालकांनी घेतली ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षितांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी गुरुवारी वनवासी कल्याण आश्रमाच्या येथील प्रांत कार्यालयास भेट देऊन कल्याण आश्रमाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब दीक्षित यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ९२ वर्षीय बाळासाहेब दीक्षित हे संघाचे ज्येष्ठ प्रचारक असून प्रकृती अस्वास्थ्यामुळे याच कार्यालयात त्यांचा निवास आहे...

आरबीएल बँकेतील ग्राहकांना लाखोंचा गंडा

बँकेचे क्रेडिट कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोन आला आणि थोड्याच वेळात बँकेतून पैसे झाले गायब..

झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन हे शूरत्वाच्या शब्दांत बांधता येत नाही : प्रकाश पाठक

“मातृशक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. झाशीच्या राणीच्या शौर्याचे वर्णन हे शूरत्वाच्या शब्दांनी बांधता येत नाही,” असे सांगत चतुरस्त्र वक्ता प्रकाश पाठक यांनी यावेळी राणी लक्ष्मीबाई यांचे लढाईतील प्रसंग स्पष्ट केले...

नाशिक महापौरपदासाठी उद्या अर्ज दाखल होणार

महापौरपदासाठी बुधवारी (दि. २०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ते चार नगरसेवकांची नावे अंतिमत: चर्चेत आहेत तर शिवसेनेत देखील दोन नावांवर अंतिम चर्चा सुरू आहे. ..

सीपीआयएमचा धोका वेळीच ओळखणे आवश्यक : कॅ. स्मिता गायकवाड

'भारतीय विचार मंच'तर्फे आयोजित कार्यक्रमात केले प्रतिपादन ..

मुरलीधर देशपांडे यांचे निधन

रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे कार्यकर्ते योगेश देशपांडे व महारांगोली कार्यकर्ते निलेश देशपांडे यांचे वडिल तसेच, शंकराचार्य न्यासचे विश्वस्त अवधूत देशपांडे यांचे सासरे मुरलीधर देशपांडे यांचे शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी रात्री १०:०० वाजता वयाच्या ७५ व्या वर्षी दुःखद निधन झाले...

बाळासाहेब सानपांनी 'घड्याळ' सोडून बांधले 'शिवबंधन'

भाजपचे माजी आमदार, शहराध्यक्ष तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट कापल्यानंतर थेट भाजपला आव्हान देत पूर्व विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी करत निवडणूक लढवणारे बाळासाहेब सानप यांनी पुन्हा राजकीय घूमजाव केले आहे. निवडणूक निकालानंतर अवघ्या तीन दिवसांतच सानप यांनी मनगटाचे ‘घड्याळ’ उतरवून थेट मातोश्रीवर जाऊन मनगटावर शिवबंधन बांधले..

मतदान केले नाही तर हा फोटो नक्की पाहा !

दिव्यांग शेतकऱ्याने केले पायाने मतदान..

बंडोबा थंड होईनात : शिवसेनेच्या ३५० पदाधिकाऱ्यांसह ३६ नगरसेवकांचा राजीनामा

जागावाटापाच्या तिढ्यामुळे नाशिक येथे शिवसेनेतील नाराज ३६ नगरसेवक आणि ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेनेसमोर बंडखोरी थोपवण्याचे आवाहन असताना उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का नाशिकमधून बसला आहे. लोकसभा निवडणूकीतून शिवसेना उमेदवार हेमंत गोडसे यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळाले होते. मात्र, ही जागा भाजपला सोडल्याचा मोठा फटका शिवसेनेला आता बसला आहे...

आज योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार!

सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाशिक येथे येत असून ते भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जनसभेस संबोधित करणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय प्रचारात यंदा योगी आदित्यनाथ यांची तोफ धडाडणार आहे. ही सभा सोमवारी दुपारी ४ वाजता उत्तमराव पाटील स्टेडियम, पवननगर, सिडको येथे आयोजित करण्यात आली आहे...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पराजयाच्या मानसिकतेत : मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याच्या नेर भागात आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते...

पूर्ववैमनस्यातून अंदाधुंद गोळीबार: भाजप नगरसेवकासह चार जणांचा मृत्यू

भाजप नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरात घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात रवींद्र खरात यांच्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना भुसावळमध्ये घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असून हत्याकांडातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले...

नगर-दौंड मार्गावर अपघातात चार ठार

नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरानजीक ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले आहेत. हे सर्वजण श्रीगोंद्याहून नगरला जात होते. गुरुवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. नगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कार यांच्यात जोरदार धडक झाली. ..

"मी आज धन्य झालो" शिवछत्रपतींच्या वंशजांनी माझ्या मस्तकावर छत्र ठेवले : पंतप्रधान

"मी आज धन्य झालो" शिवछत्रपतींच्या वंशजांनी माझ्या मस्तकावर छत्र ठेवले : पंतप्रधान..

महाजनादेश यात्रेचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

शहरातून निघाली बाईक रॅली; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ..

पवारांच्या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर ?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शरद पवारांच्याच बैठकीमध्ये गैरहजेरीमुळे चर्चेला उधाण..

गांधी यांच्यासाठी भगवद्गीता ही मातृसम : रमेश पतंगे

'सावाना'तर्फे आयोजित म. गांधी विचारमालेप्रसंगी व्यक्त केले मत..

धुळे एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट ; १३ जणांचा मृत्यू तर ४३ जखमी

धुळे, एमआयडीसी, वाघाडी, शिरपूर, केमिकल कंपनी, Dhule, MIDC, Vaghdi, Shirpur, Chemical Company..

पुलांच्या पुनर्बांधणीसाठी २०० कोटींचा प्रस्ताव

महापालिका जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनास प्रस्ताव सादर करणार..

श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरीसाठी तिनशे ज्यादा बस

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी पर्वत फेरी होणार आहे. ..

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना साई संस्थानकडून १० कोटींची मदत

साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी माहिती दिली..

कांदा उत्पादकांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान

कांदा उत्पादक शेतकर्‍यांना राज्य सरकारने बुधवारी दिलासा देणारा निर्णय घेतला. कांदा उत्पादक शेतकर्‍यांना ३१ ऑगस्टपूर्वी दुसर्‍या टप्प्याचे अनुदान देण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी ही माहिती दिली...

पाऊस कविता कार्यक्रम

'संस्कार भारती साहित्य कट्ट्या'चा उपक्रम..

गोदामाईने धारण केले रौद्ररूप

नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार ; अवघे शहर जलमय..

मॉब लिंचिंगशी विहिंप सहमत नाही; देशात कायद्याचेच राज्य

विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांचे प्रतिपादन, विहिंपची प्रांत बैठक जळगावात सुरु असून 'जळगाव तरुण भारत'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते...

पेपर तपासणीत घोळ; पुनर्तपासणीनंतर १३७१ विद्यार्थी पास

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रातही असाच घोळ झाला होता. प्रथम तपासणीत १० पेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थीदेखील पेपर पुनर्तपासणी झाल्यावर उत्तीर्ण झाले होते...

वाढदिवसाचा खर्च दुष्काळग्रस्तांना; काकासाहेब खाडे यांचा स्तुत्य उपक्रम

अनावश्यक खर्च टाळून सामाजिक काम करणाऱ्या 'नाथ प्रतिष्ठान'कडे दीड लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या निमित्ताने काकासाहेबांनी राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी भेट..

नाशिकमध्ये दरोडा : मुत्थुट फायनान्सच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

भरदिवसा झालेल्या या दरोड्यामुळे नाशिककरांमध्ये भितिचे वातावरण पसरले आहे..

हॉलिडे एक्स्प्रेसचे चाक तुटले ; रेल्वे विस्कळीत

बरेली-मुंबई एक्सप्रेस मुंबईला येत असताना नांदगाव रेल्वे स्थानकाजवळ गाडीच्या गार्डच्या पुढील बी 15 या बोगीच्या ब्रेक व्हिलचे तुकडे पडले...

स्वा. सावरकर हे खर्‍या अर्थाने द्रष्टे नेते : डॉ. सच्चिदानंद शेवडे

दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये केले प्रतिपादन..

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ : पवारांनी कायम ठेवली कमळाची परंपरा

२०१४ च्या निवडणुकीत तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढलेल्या डॉ. भारती पवार यांना यांना २ लाख, ९५ हजार, १६५ मते मिळाली होती..

डॉ. सुजय विखेंनी केला शरद पवारांचा पराभव

अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी विजय मिळवत इतिहास घडविला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला..

नाशिक लोकसभा मतदारसंघ : शिवसेनेने गड राखला!

नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रामुख्याने युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे आणि वंचित आघाडीचे पवन पवार यांच्यात लढत होती...

पश्चिम बंगालमध्येही फडकला भगवा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मतदानाची मोठी चर्चा झाली. तृणमूल काँग्रेस व ममता बॅनर्जींच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक टप्प्यात केलेल्या हिंसाचारामुळे अवघ्या देशाचे लक्ष बंगालकडे लागले होते. ..