भंडारा दुर्घटना : जळीत रुग्णालयाचे फोटो पाहून थरकाप उडेल
भंडारा जिल्हा रुग्णालयात १० निष्पाप बाळांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. त्या घटनास्थळाचा दुसरा दिवस हा तणावाचा आहे. रुग्णालयात मंत्री, बडे नेते भेट देत आहेत. अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत आहेत. अग्निरोधक यंत्रणा, अग्निसुरक्षा यांचा आढावा घेत आहेत. मात्र, ज्या कोवळ्या जीवांनी या अग्नितांडवात आपले प्राण गमावले, ते ठिकाण, तो वॉर्ड दुसऱ्या दिवशीही अत्यंत भयाण दिसत आहे...