आरोग्य

संवेदनशीलता भाग-५

दुर्धर आजारात जिथे इतर पद्धती थकतात तेथे होमियोपॅथीक उपचार पद्धती फार उपयुक्त ठरते...

आकार घेई तिरस्कार हा...

अलीकडेच हैदराबादला घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये आपण जवळजवळ पूर्ण देशात सगळ्यांच्या मनात पुरेपूर ठासून भरलेली तिरस्काराची भावना पाहिली. त्याच भावनेतून पोलिसांकडून मारल्या गेलेल्या आरोपींच्या मृत्यूनंतर आनंदाचा व्यापक जल्लोषही पाहिला. सामाजिक भावनेतून तिरस्काराचा हा जल्लोष पाहावयास गेले तर तो तसा योग्य आहे का नाही, हा प्रश्न पुन्हा भावनिक पातळीवर उभा राहतोच. पण, त्या जल्लोषात ‘तिरस्कारा’चा आणि ‘घृणे’चा नकारात्मक आविष्कार आहे, हे निश्चित...

पोस्ट-टर्म प्रेग्नन्सी कारणे आणि धोके

गर्भावस्थेचे ९ महिने (४२ आठवडे) पूर्ण झाल्यानंतरही लांबलेली गर्भावस्था किंवा प्रसुतीच्या अंदाजित तारखेला १४ दिवस उलटून जाणे अशी ‘पोस्ट-टर्म प्रेग्नन्सी’ची व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे होणार्‍या मातेने गर्भावस्थेचे ३७ आठवडे पूर्ण केल्यास आम्ही त्याला ‘टर्म प्रेग्नन्सी’ किंवा ‘पूर्ण दिवसांची गर्भावस्था’ असे म्हणतो. तेव्हा, यामागची कारणे, उद्भवणार्‍या समस्या आणि या समस्येचे निदान याविषयी आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया.....

सुप्रजा भाग २२

बाळाच्या वाढीमध्ये त्याच्या आहाराप्रमाणे ३ टप्पे आयुर्वेदात सांगितले आहेत. क्षीराद, क्षीरान्नाद आणि अन्नाद. आजच्या लेखात सविस्तर माहिती घेऊया यापैकी क्षीराद आणि क्षीरादान्न या दोन टप्प्यांबद्दल.....

संवेदनशीलता : भाग ३

‘संवेदनशीलता’ हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे. शरीराचे सर्व कार्य या गुणधर्मानुसार चालत असते. शरीराच्या सर्व नियमित क्रिया जसे पचनक्रिया, वाढ होणे चयापचय इ. तसेच जंतुसंसर्ग आजार होणे इ. शरीराच्या सर्व प्रतिक्रिया हा माणसाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला भाग असतो...

अपराध माझा असा काय झाला?

अपराधी भावनेने पछाडलेली व्यक्ती आपण केलेली चूक सुधारण्यासाठी विधायक मार्गाची कास धरते. वाल्याचा वाल्मिकी होण्याची प्रेरणा या भावनेच्या अनुभवातूनच लोकांना मिळते. अपराधीपणाच्या भावनेत आपल्या स्वतःपेक्षा आपण केलेल्या कृतीबद्दलचा आक्षेप व्यक्तीला असतो. त्यामुळेच या कृतीला आपण कशा पद्धतीने सुधारले पाहिजे, यावर व्यक्तींचा भर जास्त असतो...

सुप्रजा भाग - २१

स्तन्यपानाचे तान्हुल्याच्या वाढीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा स्तन्यनिर्मिती होत नसल्यास त्यावरील उपाययोजना आणि मातेचा आहार याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया.....

संवेदनशीलता भाग-२

'संवेदनशीलता' जशी प्राण्यांमध्ये वा वनस्पतींमध्ये दिसून येते, तशीच ती मनुष्यांमध्येही फार प्रभावीपणे दिसून येते. या संवेदनशीलतेचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, वातावरणात होणार्‍या बदलांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, तसेच विविध ऋतू व विविध प्रदेशांमधील वातावरण, हवामान व तापमान यांचा माणसावर व त्याच्या राहणीमान व सवयींवर होणारा परिणाम. उदा. एखादा माणूस तापमानातील कठोर बदलांना व्यवस्थित तोंड देतो. दुसरा माणूस त्याच तापमानात आजारी पडतो...

‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ समजून घेताना...

‘इंटरमिटन्ट फास्टिंग’ (IF) म्हणजे खाणे आणि उपवास यांचा समावेश असलेले आहाराचे वेळापत्रक. याला ’इंटरमिटन्ट कॅलरी रिस्ट्रिक्शन’ असेही म्हणता येईल. ..

आव्हानांना आवतण

आपण आयुष्यातील आव्हानांकडे पाहताना अनेक गोष्टी घडत असतात. कितीतरी मर्यादांची जाणीव आपल्याला होत असते. कितीतरी अशा गोष्टी जगात आहेत की, ज्या खरेतर आपली ताकद असतात. पण, तरीही त्याचा अनुभव आपल्याला आव्हानात्मक परिस्थितीतच येतो. आपण रोजच्या जीवनात एक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या पाहिली आहे...

संवेदनशीलता भाग-१

पृथ्वीच्या काही विशिष्ट भागामध्ये सतत वातावरण बदलत असते. उत्तर व दक्षिण ध्रुवांवर तर सदैव खडतर बदल होत असतात व तापमान हे न्यूनतम असते, अशा वातावरणात जर टिकून राहायचे असेल तर वातावरणातील बदलांशी सकारात्मकरीत्या जुळवून घेणे अतिशय महत्त्वाचे असते...

अस्तित्व आव्हानांचे...

आयुष्य हे तसे पाहिले तर अनेक आव्हानांनी भरलेले आहे. ही आव्हाने केवळ शारीरिक नाही, तर ती बौद्धिक आहेत, नात्यांमधील आहेत, पुढारीपणाची आहेत व आध्यात्मिकसुद्धा आहेत. अशा प्रकारची आव्हाने जी आपली रस्सीखेच करतात, आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला त्याग, निष्ठा व कर्तृत्वतत्परतेची परीक्षा घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी आव्हाने आपल्या 'कम्फर्ट झोन'ला 'बाय बाय' करायला शिकवतात. आयुष्य सदैव सुखासीन नसते, पण आपल्याला तरीही जगायला शिकविते...

झोपू आनंदे!

झोप ही गोष्ट खाणे आणि श्वास घेणे या दोहोंइतकीच महत्त्वाची आहे आणि अपुर्‍या झोपेमुळे लठ्ठपणापासून ते कमकुवत रोगप्रतिकारशक्तीपर्यंत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत असल्याचे संशोधनांतून वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अपुर्‍या किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या झोपेच्या कार्यक्षमतेची हानी, अतिताण, चिंता आणि नैराश्य यांच्याबरोबर खूप गहिरे नाते असल्याचे आढळून येते. तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुमच्या मेंदूचे व शरीराचे काम सुरळीतपणे चालू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनमानाचा दर्जा लक्षणीयरित्या खालावतो. ..

आजाराचे विश्लेषण भाग-७

आजाराच्या लक्षणांचे विश्लेषण व वर्गीकरण करताना डॉ. हॅनेमान व डॉ. केंट यांच्या पद्धतीने ते कसे करतात, हे आपण बघितले. आजच्या भागात आपण डॉ. बोनिंगहुसेन यांची पद्धत पाहणार आहोत. डॉ. बोनिंगहुसेन हे डॉ. हॅनेमान यांच्या अत्यंत जवळचे व अत्यंत हुशार अभ्यासू व संशोधक वृत्तीचे चिकित्सक होते. त्यांनी अनेक रुग्णांच्या लक्षणांचा अभ्यास करून मग एक विशिष्ट अशी विश्लेषण पद्धत शोधून काढली. त्यांच्या पद्धतीनुसार त्यांनी सात मुद्द्यांवर भर दिला...

सुप्रजा भाग-२०

स्तन्यातील दोषानुसार 'दुष्टी'ची लक्षणे, चिन्हे मागील लेखात बघितली. त्यावरील चिकित्सा आणि आहारीय उपाय आज जाणून घेऊया...

सुप्रजा भाग १९

शुद्ध, चांगल्या प्रतीचे स्तन्य कसे ओळखावे, पाण्यात घातल्यास त्याची परीक्षा कशी करावी, याबद्दल आपण वाचले.आज 'स्तन्यदुष्टी'बद्दल जाणून घेऊयात आणि त्यावरील उपायही बघूयात...

आजाराचे विश्लेषण भाग-६

डॉ. जे. टी. केंट यांनी लक्षणांचे वर्गीकरण लक्षणांच्या महत्त्वानुसार व त्यांच्या तीव्रतेनुसार केले. हे वर्गीकरण करत असताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण निरीक्षणेसुद्धा नोंदवून ठेवली. ही निरीक्षणेसुद्धा त्यांनी अनेक रुग्णांच्या लक्षणांच्या अभ्यासातून आलेल्या अनुमानावरून काढली जातात...

मनी नको हे वैफल्याचे शल्य...

जेव्हा तुम्ही तुमच्या परिस्थितीबद्दल नाराज आहात, पण तरीही तुम्हाला तुमचे इप्सित साध्य करायचे आहे, तेव्हाच तुम्ही तुमची पूर्ण ताकद पणाला लावता आणि नक्की काय हरवले आहे वा नक्की काय शोधले पाहिजे, याचा विचार करता. त्यातूनच समस्येची उकल होण्यास सुरुवात होते...

आरोग्यदायी आपट्याची पाने

आज विजयादशमी. या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पण, या आपट्याच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व फार कमीजणांना ठाऊक आहे. तेव्हा, आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही आपट्याची पाने किती गुणकारी आहेत, याची माहिती करुन घेऊया...

आजाराचे विश्लेषण भाग- ५

आजाराच्या लक्षणांचे विश्लेषण करत असताना विशेष लक्षणांचे वर्गीकरण झाले की मग मात्र सामान्य व अवयवांच्या विशेष लक्षणांचे वर्गीकरण करण्यात येते...

विफलतेकडून सफलतेकडे...

विफलतेचे धारदार शस्त्र बोथट करायचा प्रगल्भ मार्ग म्हणजे भावनेच्या हिंदोळ्यावर त्याची धाट न वाढविता शांतपणे आपल्या मनाच्या खिडकीतून विफलता कशी बाहेर जाते, याची समंजसपणे वाट पाहणे. यामुळे आपले मन आपल्या हाताबाहेर जाणार नाही. आपला समतोल ढळणार नाही. विफलता अनुभवायला येत आहे, पण मन मात्र स्थिरावले आहे. यामुळे स्वत:बद्दल अनुकंपा वाटेल. आपण स्वत:बद्दल कठोर न होता थोडे करुणेने पाहूया...

आजाराचे विश्लेषण भाग-४

शारीरिक व मानसिक विशेष लक्षणे ही रुग्णाचे औषध शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरतात. या विशेष लक्षणांमुळेच मग रुग्णाचे वैयक्तिकीकरण करता येते. या लक्षणांमुळे आजाराच्या पद्धतीचा अंदाज येतो. या लक्षणांमुळे रोगाचे निदान करणे सोपे जाते...

सुसंवादाच्या वाटा...

आज आपल्याला काय हवं आहे? की, मी म्हणेन तेच खरे. माझाच आवाज ऐकायला पाहिजे. दुसर्‍यांच्या आवाजाला महत्त्वच द्यायचे नाही, असे ठरवले तर माणसाने माणसांबरोबर राहण्याचा इरादाच ठेवू नये. ..

सुप्रजा

स्तन्य निर्मित होण्यासाठी मातेचा 'विशिष्ट' आहार असणे महत्त्वाचा आहे. आहाराचा काही अंश मातेच्या पोषणासाठी वापरला जातो आणि काही अंश स्तन्यासाठी गर्भिणी अवस्थेत आहाराची मात्रा अधिक असते. तसेच प्रसुतीपश्चातही अधिक पौष्टिक आहाराची मातेला गरज असते...

दातृत्व : एक नि:स्वार्थी भावना

आपण अनेक वेळा आपत्कालीन प्रसंगात काय पाहतो? अनेक संस्थांचे लोक आपापल्या संस्थांचे टीशर्ट छापून, बॅनर्स लावून काम करत असतात. ते तात्त्विकदृष्ट्या चूक आहे, असे म्हणता येत नाही. पण, आजकाल ते फोटो घ्यायचे वा सेल्फी घेत बसायचे आणि सोशल मीडियावर ते फोटो टाकायचे. कधीकधी केवळ फोटो घ्यायचे इथपर्यंतच या अरिष्टात काम करून मग निघून जायचे, असा अनेकांचा प्रयत्न असतो. किती केविलवाणा प्रयत्न आहे हा! माणुसकीचे प्रदर्शन करत वर दातृत्वाचा बोभाटा करत काम करणार्‍या या व्यक्तींच्या दातृत्वाला 'दातृत्व' म्हणावे का विकृती ..

आजाराचे विश्लेषण भाग-३

डॉ. सॅम्युएल हॅनेमान यांनी सर्वप्रथम रुग्णाच्या लक्षणांच्या वर्गीकरणाची पद्धत वापरली. परंतु, या पद्धतीला काही मर्यादा होत्या व ही पद्धत थोडीशी किचकट व मेहनतीची होती. ..

पावसाळ्यातील श्वसनाचे आजार आणि ‘होम नेब्युलायझेशन’

पावसाळा त्याच्या अंतीम टप्प्यात असला तरी सध्या सर्वत्र सर्दी-खोकल्याने डोके वर काढलेले दिसते. विशेषत्वाने लहान मुले, शाळकरी मुलांमध्ये सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढलेले आहे. अशावेळी डॉक्टरांच्या उपचारांबरोबरच ‘नेब्युलायझर’चा प्रयोगही फायदेशीर ठरु शकतो. तेव्हा, नेमका कोणी आणि कसा या नेब्युलायझर्सचा वापर करावा, त्याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख... ..

सुप्रजा भाग-१८

पावडरचे दूध पिण्यास कष्ट लागत नाही. तसेच त्या कृत्रिम दुधामुळे बरेचदा मलबद्धता होणे, पोट फुगणे, पोटदुखी इ. तक्रारी उद्भवतात. कृत्रिम (पावडरचे) दूध करणे सोपे आहे. त्याने बाळ गुटगुटीतही बहुतांशी वेळेस होते. पण, हा फोकसेपणा आहे. आरोग्यदायी असेलच असे नाही...

आजाराचे विश्लेषण भाग-२

आजाराचे विश्लेषण भाग-२..

स्वाईन फ्लू : लक्षणे, उपचार आणि सावधनता

'एच१-एन १' या नावानेही ओळखला जाणारा 'स्वाईन फ्लू' म्हणजे अनेक प्रकारच्या 'स्वाईन इन्फ्लुएन्झा' विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गातून होणारा आजार. या आजाराची लक्षणे, उपचार पद्धतींविषयी आज जाणून घेऊया.....

आठवणींच्या हिंदोळ्यात मनाचे सिंहावलोकन

'मनाच्या खोल डोहात एकदा डोकावून तरी पाहा...' बरेचदा ऐकलेले, प्रयोग करुन पाहिलेले हे वाक्य. पण, कित्येकदा मनाची ही खोली गवसतच नाही. डोळे मिटले की फक्त काळाकुट्ट अंधारच विश्व व्यापून टाकतो. नकोशा वाटणाऱ्या आठवणी, भूतकाळच मनात रुंजी घालतो. परंतु, तरीही आयुष्यात एखादी वाट शोधायची असेल, तर आठवणीच्या हिंदोळ्यात उतरुन मनाचे सिंहावलोकन हे करावेच लागेल. तर आणि केवळ तरच आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यातील काही गणितांची नक्की उकल होईल...

आजाराचे विश्लेषण भाग-१

होमियोपॅथीमध्ये 'केस टेकिंग'ची महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे या 'केस टेकिंग'नंतर रुग्णाच्या आजाराची, त्या आजाराच्या गाभ्याची व निदानाची जी माहिती मिळते, त्या माहितीच्या आधारे रोगाचे केलेले विश्लेषण (Analysis of the Case) डॉ. हॅनेमान यांनी 'ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन' या ग्रंथात रोगाच्या विश्लेषणाविषयी १५३व्या परिच्छेदात मार्गदर्शन केले आहे. हा परिच्छेद फार महत्त्वपूर्ण आहे...

होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २८

पदार्थाचा सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणू (Atom) जर आपण अणूचे निरीक्षण केले असता असे दिसते की, अणूमध्ये 'गाभा' किंवा 'Nuclear' ज्याला 'केंद्रक' असेही म्हणतात. ते स्थिर असते व त्याच्या आत प्रोटॉन व न्युट्रॉन असतात व हे केंद्रक पॉझिटीव्ह भारीत असते व त्यांच्या आजूबाजूला एका ठराविक परिघात इलेक्ट्रॉन परिक्रमा करत असतात...

मान्सूनमध्ये घ्या त्वचेची काळजी

मान्सून हा तसा गुंतागुंतीचा मोसम. या दिवसांत हवा कोरडीही असते आणि दमटही. वातावरण ढगाळ असले तरीही सूर्याची हानिकारक UV-A आणि B किरणे त्वचेवर आघात करतच असतात. या मोसमात घाम तसेच सर्वसाधारण तेलकटपणाही वाढतो. म्हणूनच मान्सूनशी संबंधित त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी त्वचेच्या देखभालीसाठी सांगितलेली नित्यकर्मे करणे चांगले. हा विषय थोड्या अधिक तपशीलाने समजून घेऊया...

सुप्रजा भाग-१६

बाळ जन्मल्यावर त्याच्या शारीरिक विकासामध्ये काही विशिष्ट टप्पे आहेत. जसे मान सावरणे, पालथे पडणे, पोटावर सरकण्याचा प्रयत्न करणे, रांगणे, बसणे इत्यादी. या सगळ्या हालचालींसाठी स्नायूंची वाढ होणे महत्त्वाचे आहे. मांसपेशी जशा बलवान होतील, त्यांची क्षमता वाढेल, बाळ तशा वरील हालचाली करू शकते...

भारतीय आरोग्य व्यवस्था आणि मिश्रपॅथी सावत्र होमियोपॅथी भाग-२

मिश्रचिकित्सा पद्धतीचा योग्य वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने उशिरा जरी घेतला असला तरी तो सामाजिक हिताचा आहे. परंतु, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या भरतीपासून होमिओपॅथी डॉक्टरांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे...

होमियोपॅथीक तपासणी केस टेकिंग - भाग २७

रुग्णाच्या रोगाचा 'गाभा' जाणून घेत असताना, त्या आजाराची प्रदर्शित होण्याची प्रवृत्ती जाणून घेण्याचा मुख्य प्रयत्न असतो. जसा शारीरिक बांधा हासुद्धा माणसाची प्रकृती दर्शवत असतो, तसेच अजून काही महत्त्वाचे घटकही असतात...

मनचक्षूंच्या चष्म्यातून...

ऐहिक जगात जीवन जगताना आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी असतात. वर्षानुवर्षे त्या जशा या जगात स्थिर असतात, तशाच त्या नव्या नवलाईने घडतही असतात. या नव्या-जुन्या गोष्टींप्रमाणेच अनेक घटना-प्रसंगही असतात. या गोष्टीत शहरं व शहरातील राहणीमान असतं. या गोष्टी गावाकडच्या नैसर्गिक जीवनाचा अशा रोजच्या जगण्याशी व माणसाच्या ‘असण्याशी’ जोडलेल्या असतात, त्या कधी श्रीमंती थाटाच्या, आर्थिक भरभराटीच्या असतात, कधी त्या झोपडपट्टीच्या स्वरूपात, गरिबीच्या अंधाराच्या असतात, कधी बजबजाटाच्या असतात, तर त्यात कधी स्मशान शांतता असते...