वर्धा

वर्धा येथील लष्करी शस्त्रागारात स्फोट

वर्धामधील पुलगाव येथे असलेल्या लष्कराच्या शस्त्रागारात आज सकाळी भीषण स्फोट झाला. ..

२० हजार गावांना पिण्याचे शुद्ध पाणी देणार

राष्ट्रीय व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून राज्यातील २० हजार गावांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली...

श्याम गुरुजींचा श्वानाश्रम

माणसं माणसांशी माणसांसारखी वागत नाहीत. कुत्र्यासारख्या त्याच्या सहजीवक प्राण्याशी त्याने माणुसकीने वागणे ही तर फार दूरची बाब आहे. माणसं आपल्या जन्मदात्यांना म्हातारे झाल्यावर वृद्धाश्रमांत टाकतात, अशा हवेत एक माणूस आहे तो भटक्या कुत्र्यांसाठी ‘श्वानाश्रम’ चालवितो...

हिंगणघाटची एक समिधा यज्ञकुंडात विसावली!

नेहमीप्रमाणे ‘त्या’ दिवसाचाही सूर्य आपल्या रोजच्याच पूर्ण तेजाने, आपल्या सोनेरी आभेने नभोमंडळाला आपल्या कवेत घेण्यासाठी निघाला. सारी सृष्टी प्रकाशमान करणार्‍या त्या तेजालाही कल्पना नसावी, याच मातीची, वाट चुकलेली काही माथेफिरू पिलावळ एका उमलत्या जीवनात कायमचा अंधार करून एका कुटुंबाचा आधारवडच हिरावून घेणार आहे म्हणून! सकाळच्या त्या रम्य वेळी क्रूरकर्मा नक्षलवाद्याच्या एका गोळीने घात केला अन्‌ उमलते पुष्प भारतमातेच्या चरणी समर्पित झाले...

एकटीला आधार, एक सवाष्ण पुढाकार

हॉटेल स्टेडियम’मध्ये फक्त विधवा भगिनींनाच नोकरी संचालिका श्यामल वनकर यांच्या तळमळीतून साकारली योजन स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वयंभू नसेल तर तिचे जगणे हे सत्त्वपरीक्षाच असते... हा विचार एका स्त्रीनेच केला अन्‌ गरजू विधवा भगिनींनाच आपल्या हॉटेलमध्ये नोकरी देण्याचा सवाष्ण निर्णय घेतला! श्यामल अमोल वनकर यांनी पतीच्या पािंठब्याने वर्ध्यातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ‘हॉटेल स्टेडियम’ सुरू केले. या हॉटेलमध्ये फक्त आणि फक्त विधवा आणि गरजू महिलांनाच त्या नोकरी देतात...

बाजार समित्यांनी शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात - सुभाष देशमुख

महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी सहकार क्षेत्र सक्षम करणे आवश्यक आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या सहकार क्षेत्राचे महत्वाचे अंग असून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा गाभा आहेत. ..

‘मोठेपणाचा मार्ग हा मृत्यूच्या मैदानातून जातो’ - विष्णू सवरा

आयुष्यात खूप पैसा, प्रतिष्ठा आणि नाव कमवायचे असेल तर आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. ..

नाना करतात कोड असणार्‍यांना बेदाग!

नाना ढोमणे हे ७ ते ८ वर्षांपासून हिंगणघाट येथील न्यू म्युनिसिपल हायस्कूल सिंधी कॉलनी जवळ दर महिन्याच्या पहिल्या रविवारी व दुसर्‍या दिवशी सोमवारी नागपूर येथील गणेशनगर वनिता महिला महाविद्यालयाच्या मागे असलेल्या हनुमान मंदिरांत रुग्णांची तपासणी करतात. ..

हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा बनावी -केशरी नाथ त्रिपाठी

देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे. ..

दीडशे वर्षे जुन्या कारागृहातील छताला टेकूचा आधार

आरती चौकानजिक असलेले कारागृह ब्रिटिश कालीन असून, १४८ वर्षे जुने कारागृह आता जिर्णावस्थेत आले असून, बंदीवानांच्या मुलाखत कक्षाच्या स्लॅबला चक्क तडे गेले आहेत. त्याची दुरुस्ती करण्याऐवजी गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून लोखंडी पाईपचा टेकू त्या स्लॅबला लावण्यात आला आहे. दुर्दैवाने एखाद्याचा धक्का जरी या टेकूला लागला तर मुलाखतीची ती दहा मिनिटे कर्दनकाळ ठरू शकतात. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे लक्षात येते. ..

दिशा नसल्याने विदर्भाची झाली दशा : डॉ. खांदेवाले

विदर्भातील वैभवाच्या कथा इतिहासात प्रसिद्ध आहेत. हे वैभव विदर्भाने पुन्हा कधी अनुभवले नाही. कारण गुलामगिरीत झालेली दशा स्वातंत्र्यानंतर तशीच कायम राहिली आणि राजकीय उदासीनतेमुळे दिशा देण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. याचा परिणाम आज विदर्भातील जनता भोगत आहे. विदर्भ वेगळा होईपर्यंत ही समृद्धी परत येणार नाही, असे मत महाराष्ट्रातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी येथे व्यक्त केले...

सामान्यांना दिसते काठी, तो साकारतो त्याचा घोडा!

पुलगावनजीक देवळी तालुक्यांतील विरुळ (आकाजी) येथील रमेश अंड्रस्करने साकार केलेला लाकडांच्या बल्ल्यांचा हत्ती हे गावच्या जत्रेचे नुसते आकर्षणच नाही तर ती परंपरा आहे. ..

आगामी निवडणूक एकत्र लढण्याची दिल्ली तील काँग्रेस नेतृत्वाची इच्छा

खा. शरद पवार यांचा विदर्भातील दौर्‍याच्या समारोपप्रसंगी काल कार्यकर्ता मेळाव्यानंतर सेवाग्राम मार्गावरील बापुराव देशमुख सहकारी सूतगिरणीच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राकाँचे नेते अनिल देशमुख, माजी आ. सुरेश देशमुख, हिंगणघाट कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती...

तीन वर्षांत भारताची कृषी क्षेत्रात पिछेहाट : शरद पवार

सरकार कृषीक्षेत्राबाबत अजिबात गंभीर नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला...

जलयुक्तची कामे वेळेत पूर्ण न करणारे काळ्या यादीत

२०१७-१८ मधून प्रस्तावित आराखड्यातील कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिले.कामे वेळेत पूर्ण न करणारे काळ्या यादीत टाकले जातील, असे ते म्हणाले. विकास भवन येथे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांचा जलयुक्त शिवार अभियानाचा तीन वर्षातील कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, आमदार समीर कुणावार, रोहयो व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्तअनुपकुमार, रोहयो उपायुक्तपराग सोमण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, ..

सेवाग्राम विकास आराखड्याची अंमलबजावणी ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार - सुधीर मुनगंटीवार

वर्धा येथील सेवाग्राम परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी २६६ कोटी रुपयांच्या सेवाग्राम विकास आराखड्यास शिखर समितीने मान्यता दिली असून या आराखड्याची अंमलबजावणी ऑक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले...

गांधी जयंतीला सेवाग्राममध्ये वर्धा जिल्हयाचा कायापालट करणारा ‘संकल्प से सिद्धी महामेळावा’

रोजगार, आरोग्य, स्वच्छता, शिक्षणयुक्त जिल्हा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीला संपूर्ण जिल्हयाचा कायापालट करण्याचा संकल्प करणारा एक भव्य कार्यक्रम वर्धा येथे होणार आहे...

वर्धा येथील सेवाग्राम आश्रमासाठी २६६.५३ कोटीचा आराखडा

वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ ऑक्‍टोंबर २०१६ रोजी २६६.५३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यताही दिली होती. आता या आराखडयातील कामांचे भूमीपूजन होणार आहे...

आष्‍टीच्‍या स्‍वातंत्र्य लढयाचा इतिहास तरुण पिढीने देशपातळीवर न्यावा

महात्‍मा गांधी यांनी इंग्रजांना भारतातून जाण्‍यासाठी ‘चले जाँव’चा नारा दिला. त्‍याची बैठक वर्धा येथे झाली होती. याच आंदोलनात आष्‍टी येथील स्‍वातंत्र्य सैनिकांनी प्राणाची बाजी लावून पोलीस चौकीवर कब्‍जा केला...

उज्वल भविष्यासाठी लोकराज्य मासिकाचे वाचन करावे- एल.एम. डूरे

शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्‍य मासिक माणसाचे जीवन संपन्‍न करण्‍याचे काम करीत आहे. यासाठी प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी लोकराज्‍य मासिकाचे वाचन करुन स्‍वतःचे भविष्‍य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी एल.एम. डूरे यांनी उर्दू लोकराज्‍य मेळाव्‍याच्‍या उद्घाटन प्रसंगी केले...

‘शेतकऱ्यांसाठी उभे राहणार रुरल मॉल’

वर्षभर शेतकरी शेतात राबराब राबून जेव्हा शेतमाल विक्रीसाठी बाजारात आणतो त्यावेळीच नेमके शेतमालाचे भाव पडलेले असतात. व्यापाऱ्यांच्या एकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. ..

तलाव तेथे मासोळी अभियानातून अर्थ उत्पन्नात वाढ करा-अनुप कुमार

पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत. या तलावांचा पाहिजे त्या प्रमाणात आजपर्यंत उपयोग करण्यात आला नाही. पूर्व विदर्भातील जवळपास 4 लक्ष 70 हजार लोकांची उपजीविका मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. ..

वर्धा जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

जलयुक्त शिवार, शेततळे, कृषीपंपांना वीजजोडणी, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीककर्ज आणि विशेष प्रकल्पांचा आढावा या बैठकीतून फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला...

अखेर वर्धा जिल्यातील कॅटरीना वाघिणीच्या पिल्लांचा सुगावा लागला

वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध बोर अभयारण्यातील कॅटरीना वाघिणीचे तीन छावे वर्धा वनविभागाने शोधून काढले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या अभयारण्यात कॅटरीना नावाच्या वाघिणीने छाव्यांना जन्म दिल्याची माहिती वर्धा वन विभागाला मिळाली होती. मात्र या वाघिणीने किती छाव्यांना जन्म दिला आणि ते कुठे आहेत याची नोंद वनविभागाकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे छाव्यांना शोधण्याची मोहीम वर्धा वनविभागाकडून करण्यात आली होती...