प्राणायाम भाग-५
पहिल्या लेखात आपण बघितले की, प्राणायाम ( Pranayama Part-5 ) करून शरीर व मन शुद्ध होते. ते कसे, तर नाडी शुद्धी करून. नाडी म्हणजे काय, तर प्राणवाहक मार्ग-स्रोत. ज्यामधून प्राणशक्तीचे वहन सतत होत राहते. ते थांबले की मुंग्या येणे, हातापायांची जळजळ होणे, चक्कर येणे. पॅरालिसीस-लकवा इत्यादी विकार उद्भवू शकतात. ते वहन का बिघडते, तर त्याला मुख्य कारण नाडी अशुद्ध होणे, बुजणे, अवघडणे वगैरे. हे का होते, तर त्याचे कारण चुकीचा आहार, विषम आहार. आहाराचे परिणाम मनावर होतात. त्यामुळे कुंठीत प्रभाव निर्माण होऊन नाडीबद्ध होते.