‘त्यांना’ उमगलेला भारत
“मला, भारतात राहायला सुरक्षित वाटत नाही, कधी हा देश सोडून जावं, असं वाटतं, हमे चाहिए ‘आझादी’, देश धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे,” अशी विधाने केली की, ती ‘ब्रेकिंग न्यूज’ ठरतात. काही काळ त्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी चर्चा. मग त्यावर बहिष्काराची मोहीम. भारतीयांसाठी या गोष्टी आता काही नव्या राहिलेल्या नाहीत. दररोज नवे वाद, चर्चा, नकारात्मकता आणि त्यावरून येणार्या बातम्या, पुन्हा चर्चा आणि पुन्हा तेच, असे चक्र फिरतच असते. पण, थोडं थांबू, जग आपल्याबद्दल काय म्हणतंय तेही ऐकूयात...
..