मुंबई : भारतात गेल्या २४ तासांत ४०,००० पेक्षा(३९,७५६) कमी दैनंदिन नव्या रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. सलग आठ दिवस ५०,००० पेक्षा कमी दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. देशात उपचाराधीन रुग्णसंख्येतही सतत घसरण होत आहे. देशातील एकूण उपचाराधीन रुग्णसंख्या आज ४,८२,०७१ इतकी आहे.
गेल्या २४ तासांत एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येत ३,२७९ ची घट नोंदली गेली आणि देशातील एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्ण केवळ १.५८ % इतके आहेत. भारताच्या एकूण लसीकरणाने काल ३५ .२८ कोटींचा महत्वपूर्ण टप्पा गाठला. आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण ४६,३४,९८६ सत्रांद्वारे ३५,२८,९२,०४६ लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत लसींच्या १४,८१,५८३ मात्रा देण्यात आल्या.
त्या पुढील प्रमाणे: कोविड १९ लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा २१ जून २०२१ पासून सुरू झाला. केंद्र सरकार देशभरात कोविड-१९ लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे. कोविड -१९ संसर्गातून मोठ्या संख्येने लोक बरे होत आहेत. भारतातील बरे झालेल्यांची दैनंदिन संख्या सलग ५३ व्या दिवशी नवीन रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत ४२,३५२ रुग्ण बरे झाले आहेत. दैनंदिन नवीन रुग्णांच्या तुलनेत गेल्या २४ तासांत २,००० (२,५५६) पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. महामारीच्या सुरुवातीपासून संसर्ग झालेल्या लोकांपैकी २,९७,००,४३० रुग्ण कोविड -१९ संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत, ४२,३५२ रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण बरे होण्याचा दर ९७.११% आहे, जो सतत वाढता कल दर्शवत आहे. संपूर्ण देशभरात चाचणी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या २४ तासांत देशातील एकूण १५,२२,५०४ चाचण्या घेण्यात आल्या. एकत्रितरित्या, भारताने आतापर्यंत ४१.९७ कोटी (४१,९७,७७,४५७) पेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. देशभरात एकीकडे चाचणी क्षमता वाढवण्यात आली आहे, तर साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दरातनिरंतर घट दिसून येत आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर सध्या २.४०% वर आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हीटीदर आज २.६१% आहे. सलग २८ व्या दिवशी दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर ५% पेक्षा कमी राहिला आहे.