गरिबांना मोफत सेवा देणारा देवदूत!

१५०० हून अधिक रुग्णांना दिले जीवनदान

    19-Jan-2022
Total Views |

Dr Prakash Rane
मुंबई : भांडुपच्या तुलशेत पाड्यापासून ते कोकण नगर आणि ‘एलबीएस’ मार्गावरील स्टेट बँकेपर्यंत ‘कोविड’च्या लाटांमध्ये सातत्याने गरीब रुग्णांची सेवा करत असताना भांडुपच्या डॉ. प्रकाश राणे यांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. ‘यशवंत हेल्थकेअर’ आणि ‘आयुष्मान नर्सिंग होम’चे मालक आणि मुख्य प्रवर्तक डॉ. प्रकाश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक डॉक्टर, नर्सेस, पॅथोलॉजी तंत्रज्ञ ‘कोविड’ आणि ‘नॉन कोविड’ रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहेत. हे करत असताना कधीही पैशांची अपेक्षा न करता समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांची सेवा करणे, हा डॉ. प्रकाश राणे यांचा मुख्य उद्देश असतो. आलेल्या प्रत्येक रुग्णांना आपुलकीने वागविणे, त्याचा आजार समजावून घेऊन सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे निदान करणे आणि आजार समूळ नष्ट करणे हा एकमेव उद्देश असलेले डॉ. प्रकाश राणे गेले दोन वर्षे सातत्याने रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या ‘यशवंत हेल्थकेअर’ या पॅथोलॉजीमध्ये प्रत्येक आजारावरील सर्वोत्तमचाचण्या केल्या जातात. तिथेदेखील गोरगरीब रुग्णांना मोफत तपासले जाते.
 
 
‘आयसीसीयु’, ‘व्हेंटिलेटर्स’, ऑक्सिजन इत्यादी सर्व सोयींनी परिपूर्ण असे ‘यशवंत हेल्थकेअर’ यांचे ‘आयुष्मान हॉस्पिटल’ हे भांडुप-मुलुंड मधील रुग्णांसाठी भविष्यात एक संजीवनी ठरणार आहे. अतिशय वाजवी दरातील उपचार, ‘सस्पेक्टेड कोविड’ आणि ‘पोस्ट कोविड’ आणि त्यातून उद्भवणाऱ्या अनेक गंभीर आजारांवर तसेच कोणतीही सर्जरी करण्यास सुसज्ज असे ‘ऑपरेशन थिएटर’ आणि सर्वच ‘कोविड’-‘नॉन कोविड’ आजरांवर परिपूर्ण ‘ट्रीटमेंट’ मिळण्याचे हमखास ठिकाण म्हणून भांडुपमधील डॉ. प्रकाश राणे आणि सहकाऱ्यांचे ‘आयुष्मान हॉस्पिटल’ भविष्यात नावारूपाला येणार यात शंकाच नाही, डॉ. प्रकाश राणे यांच्यासोबत कार्यरत असलेले डॉ. प्रसाद पडवळ यांचे ही योगदान ‘कोविड’च्या काळामध्ये फार मोठे आहे. फुप्फुसांवरील व्याधींवर डॉ. पडवळ तज्ज्ञ असून गेले दोन वर्षे सातत्याने ‘कोविड’ रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना सातत्याने मदत करणारे डॉ. शिवम सिंग आणि संजीव सिंग यांचे रुग्णसेवेसाठी असलेले योगदान संपूर्ण ईशान्य मुंबई जिल्ह्याने ‘कोविड’च्या लाटामंध्ये पाहिले आहे. औषधाचा तुटवडा पडून नये म्हणून कार्यरत असलेले शिवमंगल पांडे यांचा सातत्याने औषध उपलब्धतेसाठी फार मोठा हातभार लागत असल्याचे डॉ. प्रकाश राणे सांगतात.
 
 
आरोग्यसेवेमध्ये १५०० हून अधिक ‘कोविड’ रुग्णांना डॉ. प्रकाश राणे आणि सहकाऱ्यांनी जीवनदान दिले असून अनेक रुग्ण आज ही त्यांच्या प्रतिकृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या वडिल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांनी ‘यशवंत हेल्थकेअर’ची स्थापना केली. संपूर्ण कुटुंबाकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळत असल्याने रुग्णांची सेवा करणे शक्य होते, असे डॉ. प्रकाश राणे सांगतात. इतके सर्व असूनदेखील डॉ. प्रकाश राणे हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले आहेत. १५०० हून अधिक रुग्णांना ‘आयुष्मान भव’ करणाऱ्या या सर्वच डॉक्टर मंडळींना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमचा सलाम !
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121