यज्ञ मदतीचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

niranjan davkhare_1 
 
 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपत्तीच्या काळात केलेले कार्य ध्यानात घेत मदतकार्याचा आराखडा तयार केला. आ. निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आ. संजय केळकर यांच्यासह ठाण्यातील २४ नगरसेवक, ११ मंडल अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते मदतीच्या यज्ञात सहभागी झाले. त्याविषयी...

अ‍ॅड. निरंजन वसंत डावखरे
राजकीय पक्ष : भाजप
पद : आमदार, ठाणे जिल्हाध्यक्ष, भाजप
कार्यक्षेत्र : कोकण

 
भाजप कार्यकर्त्यांबरोबरच विविध सामाजिक व सेवाभावी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या साह्याने अथकपणे कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे आणि ‘कोरोना’वर विजय मिळेपर्यंत ती सुरूच राहील. या युद्धात सहभागी झालेले सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता, हितचिंतक, सामाजिक संस्था आणि समर्थन देणाऱ्या नागरिकांच्या पाठिंब्यामुळेच आजही आम्ही सामान्यांच्या हाकेला धावून जात असल्याचे निरंजन डावखरे सांगतात.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर ‘लॉकडाऊन’च्या पहिल्या दिवसापासून भाजपचा शहराच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्ता कर्तव्याच्या भावनेने कार्यरत झाला. त्याआधी राज्य सरकारच्या तीन दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मधून गरजूंना साह्य करण्यात आले होते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या पहिल्या टप्प्यात हातावर पोट असलेले रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मजूर आदींसारखे गरीब व गरजू नागरिक, एकटे राहणारे वृद्ध, अभ्यासानिमित्ताने एकटे राहणारे विद्यार्थी आदींबरोबरच अडकलेले बाहेरगावचे नागरिक यांच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यास प्राधान्य दिले.
 
शहरातील सहा ‘कम्युनिटी किचन’मध्ये शिजवून तयार केलेल्या अन्नाची पॅकेट्स वाटपास सुरुवात झाली. एकही व्यक्ती वंचित राहू नये, हा उद्देश ठेवून भाजपचे नगरसेवक व प्रत्येक मंडल अध्यक्ष यांनी आपल्या भागातील गरजूंची यादी तयार केली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविली. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन वा दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. त्यांना अन्न, आवश्यक साहित्य आणि जेनरिक औषधेही पुरविली गेली.
 
गरजू कुटुंबांची गरज लक्षात घेऊन, भाजपने रेशन किट तयार केले. त्यात पाच किलो तांदूळ, दोन किलो डाळ आदी साहित्याचा समावेश करून ते हजारो कुटुंबांपर्यंत पोहोचविले. शहरात भाजीपाल्याचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यावेळी आ. संजय केळकर व नगरसेवकांच्या पुढाकाराने शेकडो सोसायट्यांमध्ये फूड ट्रक पाठविण्यात आले. तेथे माफक दराने रहिवाशांना भाजीपाला उपलब्ध करून दिला.
 
 

niranjan davkhare 1_1&nbs 
 

 
"समाजाची गरज व आपले समाजाप्रति कर्तव्य मानून आम्ही मदतकार्य सुरूच ठेवणार आहोत. भविष्यातील आव्हाने पेलण्यासही भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे. कोरोनाविरोधातील युद्धात सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते व ज्ञात-अज्ञात घटकांच्या साह्याच्या बळावर ही झुंज आपल्या सर्वांना कोरोनावर विजय मिळेपर्यंत सुरूच राहील." 

 
  
‘कोरोना’पासून नागरिकांचे संरक्षण करीत असतानाच, अत्यावश्यक सेवेत कार्यरत पोलीस, वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा विचारात घेऊन, त्यांना मास्क, सॅनिटायझर आदींचे वाटप केले गेले. डॉक्टरांना पीपीई किट दिले गेले. बंदोबस्तावरील पोलिसांना सकाळ-सायंकाळी अन्न पाकिटेही पुरविली गेली. रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदानासाठी इच्छुक नागरिकांची यादी, गरजू पत्रकारांना धान्य किट, ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा, प्रमुख रस्त्यांवर फवारणी, पॅरामेडिकल सेवेसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात आले.
 
या मदतकार्यात शहरातील अनेक दानशूर नागरिक, सामाजिक संस्थांकडून सहकार्य मिळाले. त्यांच्याबरोबरच सर्व हितचिंतकांचे पत्र पाठवून आभार व्यक्त करण्यात आले. ‘पीएम केअर्स’ फंडात मदतीसाठी आवाहन केल्यावर त्याला कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘भाजप आपदा कोष’मध्येही पक्षाच्या नगरसेवकांनी मदत केली.
 
या काळात ‘सोशल डिस्टन्सिंग’चे भान राखून प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्याबरोबरच कुटुंबीयांनाही धोका उद्भवणार नाही, याची काळजी घेतली, याबद्दल समाधान वाटत असल्याचे निरंजन डावखरे सांगतात. ‘कोरोना’च्या चाचणीसाठी शहरात चार हजार ५०० रुपये आकारले जात होते. भाजपच्या पुढाकाराने व वैद्य लॅबच्या सहकार्याने ‘कमळ कवच’ ही नावीन्यपूर्ण योजना राबवून अवघ्या तीन हजार रुपयांत चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा आतापर्यंत शेकडो नागरिकांना फायदा झाला. शहरातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नव्हती. त्याबाबत तत्कालीन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे डॅशबोर्ड सुरू करण्याची मागणी केली. त्याला यश येऊन डॅशबोर्ड सुरू करण्यात आला. कोरोना रुग्णांचे मृतदेह ठेवण्यासाठी पारदर्शक बॅगची मागणीही मंजूर झाली. महापालिकेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ठाणे शहरात ‘फिव्हर क्लिनिक’च्या माध्यमातून हजारो नागरिकांची तपासणी करण्यात आली.
 
ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये जादा दरआकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. संजय केळकर, महापालिकेतील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांच्यासमवेत आयुक्त सिंघल यांची भेट घेऊन दरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली. त्याचबरोबर महापालिकेतील सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होत आमदार केळकरांसमवेत कोरोना नियंत्रणाबाबत सूचना केल्या. कोरोना रुग्णाचे निधन झाल्यानंतर बॉडी बॅगमध्ये पार्थिव दिले जात असे. मात्र, या बॉडी बॅग पारदर्शक नसल्यामुळे मृतांच्या आप्तेष्टांना मृताचा चेहराही पाहता येत नव्हता. त्यातून ठाण्यात मृत व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या कुटुंबाला दिल्यानंतर अंत्यसंस्कारही आटोपल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर चेहरा दिसेल अशा पारदर्शक बॉडी बॅगचा पाठपुरावा करण्यात आला. महापालिका प्रशासनाने ही मागणी मान्य केली.
 
राज्य सरकारकडून ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना न करता सतत अनास्था दाखविण्यात येत आहे. झोपलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आणि लोकांच्या वेदना सरकारला समजून देण्यासाठी भाजपच्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. त्याला सामान्य नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
- दीपक शेलार
@@AUTHORINFO_V1@@