नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासांत ३१,४४३ नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या गेल्या ११८ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. देशभरात आतापर्यंत एकूण ३,००,६३,७२० कोटी पेक्षा अधिक जण बरे झाले असून गेल्या २४ तासांत ४९,००७ जण रोगमुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९७.२८% झाला आहे.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ४३,१३१, गेल्या १०९ दिवसांतील ही सर्वात कमी संख्या असून उपचाराधीन रुग्णसंख्या एकूण रुग्णांच्या १.४०% आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ५% पेक्षा कमी असून, सध्या तो २.२८ % इतका आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर १.८१% असून सलग २२ दिवसांपासून हा दर ३%हून कमी देशात कोविड चाचण्यांची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे. आतापर्यंत एकूण ४३.४० कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रातर्फे राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना ३९.४६ कोटींपेक्षा अधिक (३९,४६,९४,०२०) लसींच्या मात्रा पुरविण्यात आल्या आहेत आणि पुढील १२ लाख मात्रांचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून आतापर्यंत एकूण ३७,५५,३८,३९० मात्र वापरल्या गेल्या आहेत. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप १.९१ कोटींहून अधिक (१,९१,५५,६३०) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.