बनावट 'को- विन' अ‍ॅपपासून रहा सावध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |

fake cowin app_1 &nb


अन्यथा होईल मोठे नुकसान; सरकारचा अलर्ट!




नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकांना 'को- विन' अ‍ॅपच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी इतर कोणतेही बनावट मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करु नये आणि तुमची वैयक्तिक माहिती कुठेच शेअर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारकडून याबाबत एक ट्वीट करण्यात आले आहे. नागरिकांनी संपूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय 'को- विन' अ‍ॅपच्या बाबतीत कोणतेही काम न करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे की, "ट्वीटनुसार गुगल प्ले स्टोअरवर 'को- विन' अ‍ॅपच्या नावाशी मिळते जुळते अनेक अ‍ॅप उपलब्ध झाले आहेत. ह्या फसव्या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाऊ शकते. काही अ‍ॅप असे देखील आहेत, जे १० हजारपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड देखील केले आहे. परंतु यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.




कोविडविषयी माहिती मिळवण्याचे सरकारचे अधिकृत संकेतस्थळ असणाऱ्या नावाप्रमाणेच असणारे 'को- विन' नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबतीत सावधगिरी बाळगण्याची विनंतीवजा सूचना करणारे ट्वीट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटरवरून करण्यात आले आहे. सरकारच्या माहितीनुसार, १३ जानेवारीपासून देशभरात कोव्हिड १९च्या लसीकरणास सुरुवात होऊ शकते.


दरम्यान या लसीकरणाबाबत सर्व माहिती 'को- विन' अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येईल. या अ‍ॅपच्या माध्यमातून कोरोना व्हॅक्सिनसाठी फ्री रजिस्ट्रेशन करू शकता. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर पूर्णपणे फ्री असेल आणि युजर्स अत्यंत सोप्या पद्धतीने हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात. अजुनपर्यंत गुगल प्ले स्टोअर किंवा अन्य कोणत्या प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले नाही आहे. 'को- विन'अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. यानंतर आवश्यक माहिती टाकून तुमचं नाव रजिस्टर करता येईल. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे ओळखपत्र द्यावे लागेल.


@@AUTHORINFO_V1@@