सेवा परमो धर्म:

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

dinkar patil_1  


जनतेच्या सेवेसाठी भारतात दोन वर्ग हे कायम कार्यरत असतात. एक म्हणजे लोकप्रतिनिधी आणि दुसरे म्हणजे शासकीय सेवक. याचीच प्रचिती या काळात आली. स्वतः कोरोनाबाधित होऊनदेखील अविरत सेवाकार्य सुरू ठेवून नागरिकांना मदत करणारे सेवक म्हणून नगरसेवक दिनकर धर्माजी पाटील यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे आहे.

 

दिनकर धर्माजी पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : नगरसेवक, नाशिक
मनपा प्रभाग क्र. : ९
संपर्क क्र. : ९४२२२४९६५३, ९८२२२३१६५३

 
कोरोनाकाळात जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात लोकप्रतिनिधी आणि शासकीय सेवकांनी आपापल्या परीने कार्य केले. मात्र, काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागात केलेले कार्य हे नक्कीच आशादायी असेच होते. प्रत्येकाने छोट्या भागात सेवाकार्य केल्यास त्याचे स्वरूप निश्चितच मोठे होऊ शकते, हे दिनकर पाटील यांच्या कार्यातून अधोरेखित झाले. दिनकर पाटील यांनी सुमारे २५ हजार कुटुंबांना दोन वेळेस पुरेल इतक्या भाजीपाल्याचे १० दिवस वाटप केले. त्यात त्यांनी मुख्यत्वे ढोबळी मिरची, कांदा, लसूण, बटाटे, कोबी आदी भाजीपाल्याचेही वाटप नागरिकांना केले. तसेच, १२ हजार कुटुंबांना त्यांनी मसाल्याचे पदार्थ, साखर, डाळ, पीठ, तांदूळ, साबण आदी वाणसामानाचेही वाटप केले. नागरिकांच्या आरोग्यरक्षणार्थ त्यांनी दोन हजार कुटुंबांना ‘आर्सेनिक गोळ्यां’चेही वाटप केले. तसेच, स्वतःच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाच प्रभागांत सहा महिने अविरत सॅनिटायझरची फवारणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या पोलिसांनाही पाटील यांनी या काळात मदतीचा हात देऊ केला. सातपूर व गंगापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी वर्गासाठी त्यांनी आपली दोन चारचाकी वाहने चालकासह देऊ केली होती. कोरोना महामारीच्या जनजागृतीसाठी आजही त्यांचे वाहन प्रभागात फिरत आहे.
 
 

 

‘सेवा हाच धर्म’ मानून, सुमारे ५० हजारांच्या पुढे नागरिकांना पाटील यांनी या काळात मदत केली. प्रभागातील आणि संपर्कात येणार्‍या प्रत्येक गरजवंतास पाटील यांनी या काळात मदत केली. गंगापूरगाव, आनंदवल्ली शिवार, सोमेश्वर कॉलनी, कामगारनगर, ध्रुवनगर, शिवाजीनगर, हनुमाननगर, श्रमिकनगर, धर्माजी कॉलनी, अशोकनगर, राधाकृष्णनगर, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, महदेववाडी, प्रबुद्धनगर, सातपूरगाव, सिरीन मेडोज, रामेश्वरनगर, सावरकरनगर, संत कबीरनगर सेवावस्ती आदी भागात त्यांनी मदतकार्य केले. सेवेचा धर्म निभावत असताना पाटील यांना दत्तू बंडाळे, सुनील कलाल, अनपड ताई, दशरथ गुरगुडे, बबन पाटील, सोन्या चौधरी, बाळा खाकाळे आदी कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभली. तसेच, पाटील यांचे पुत्र अमोल दिनकर पाटील यांच्या ‘युवा ऊर्जा फाऊंडेशनया संस्थेनेदेखील या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सेवेचा परीघ सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी पाटील यांचा याकामी जवळपास ४० लाख रुपयांच्या आसपास निधी खर्ची झाला.

 
 

‘लॉकडाऊन’ काळात रेशन कार्डधारक व रेशन कार्ड नसणारे यांनादेखील धान्यवाटपाची मोठी समस्या येत होती. ज्यांना रेशन कार्ड आहे, त्यांच्या धान्य वितरणातील समस्या पाटील यांनी पाठपुरावा करून मार्गी लावल्या, तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, अशा नागरिकांना त्यांनी स्वतः मदत केली. तसेच, अन्नधान्य पुरवठाकामी अनेक अडचणींचा सामना पाटील यांना या काळात करावा लागला. विविध व्यापारीवर्गाशी चर्चा करून त्यांनी या आव्हानाचा सामना केला.

 
 

कोरोनाकाळात नागरिकांचे जीवनमान सुखावह असावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारने उत्तम काम केले, असे पाटील आवर्जून नमूद करतात. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य हे निश्चितच प्रेरणादायी असल्याचे ते सांगतात. मात्र, स्थानिक प्रशासनातील काही अधिकार्यांनी केवळ कागदी घोडे नाचविले असल्याचे स्पष्ट मतदेखील ते मांडतात. लोकांचे काम व्हावे यासाठी बराच पत्रव्यवहार करावा लागला असल्याचे पाटील सांगतात. सेवेचा हा रथ कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय हाकणे केवळ दुरापास्त होते. याकामी पाटील यांना पत्नी व माजी नगरसेविका लताबाई पाटील, मुलगा अमोल, कैलास, मुलगी ज्योती यश कटाळे, जावई यश पांडुरंग कटाळे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यातच दिनकर पाटील व त्यांचे पुत्र अमोल यांना कोरोनाची लागण झाली. त्यातही या पितापुत्राने देशसेवेसाठी मदतकार्याचा ओघ अविरत सुरू ठेवला होता.

 



dinkar patil_1  

कोरोना ही एक महामारी असली तरी या महामारीने आपल्याला अनेक गोष्टी शिकविल्या आहेत. माणसाने समाजात माणूस म्हणून जीवनमान व्यतीत करावे. प्रत्येक नागरिकाने एकमेकांना सहकार्य करावे. माणुसकी जपली जाणे यापुढील काळात नक्कीच आवश्यक आहे. केवळ तोंडदेखले कौतुक हे आवश्यक नसून, कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी एकजूट नक्कीच आवश्यक आहे.
 
 

 

रेशनची समस्या दूर करण्याकामी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, त्यांनी नागरिकांचा आत्मविश्वास आपल्या कार्यातून वृद्धिंगत केला. अविरत लढा दिला. पक्षपातळीवर त्यांच्या कार्याचा आदर्श हाच पाटील यांच्यासाठी पथदर्शक ठरला. कोरोना संकट अजून टळले नसून, परिसराची स्वच्छता राखण्याचे कार्य पाटील हे यापुढील काळातही सुरू ठेवणार आहेत. तसेच, नागरिकांच्या आरोग्यसंवर्धनासाठी सुरू असलेल्या आणि प्रभाग ९ मध्ये सर्वात जास्त झालेल्या ‘रॅपिड टेस्ट’ यापुढील काळातदेखील अविरत सुरू राहणार असल्याचे पाटील आवर्जून नमूद करतात. हातचा रोजगार गेल्याने आणि सामाजिक संकट मोठे असल्याने अनेक परप्रांतीय नागरिक हे उपाशीपोटी होते. त्यांची ही अवस्था पाहून पाटील यांचे सहृदयी मन हेलावले होते. आपल्या संकटकाळात पाटील यांच्या रूपाने आपल्या मागे भक्कम आधार आहे, हे पाहून लोकांना आधार मिळत होता. त्यामुळे त्यांचा या मदतकार्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

 
 

‘सेवा हाच परम धर्म’ आहे. नागरिकांच्या सेवेसाठी नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे. संकटकाळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे, हेच आपले परम कर्तव्य आहे. हाच स्वभाव पाटील यांचा असल्याचे दिसून येते. त्यामुळे नाशिक शहरात भरीव आणि भरघोस मदतीचे कार्य त्यांनी या काळात केले. इतकेच नाही, तर मागील सुमारे ४० वर्षांपासून पाटील हे जनता दरबाराचे सातत्याने आयोजन करत असून, त्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ते दूर करत आहेत. कोरोनाकाळातही पाटील यांचा हा जनता दरबार सुरक्षेचे सर्व नियम पाळून सुरू होता, हे विशेष. स्वतःचा वैकुंठ रथ, रुग्णवाहिका या पाटील यांनी नागरिकांच्या सेवार्थ खुल्या करून दिल्या आहेत. स्वतःची चारचाकी देऊन, जनजागृतीसाठी मासिक काही हजार खर्च करून तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देण्याचे कार्य करत सेवाकार्याचे महत्त्व पाटील यांनी आपल्या कार्याने उभे केले आहे, असे म्हटले तर निश्चितच वावगे ठरणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@