भारताची अभिमानास्पद कामगिरी
नवी दिल्ली : भारताच्या देशव्यापी लसीकरण अभियानाने काल 32.36 कोटींचा टप्पा पार केला. आज सकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध अहवालानुसार 43,21,898 सत्रांमध्ये, एकूण 32,36,63,297 लसी देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेने आतापर्यंत 32,33,27,328 लसीकरण केले आहे. तुलनेने भारताने आता अमेरिकेला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे लसीकरण 8 डिसेंबर रोजी सुरू झाले होते. भारतात लसीकरणाला सुरुवात 16 जानेवारी रोजी झाली. तसेच एकूण लसीकरण आकडेवारीबाबत इटली, जर्मनी, फ्रांस, युकेला देखील मागे टाकून भारत अव्वल आहे.
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला भारतात 21 जून 2021रोजी सुरुवात झाली आहे.
ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 17,21,268 लसी देण्यात आल्या.