
नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात भारताची आघाडी
भारतीय संस्कृतीत निसर्गाला सर्वोच्च स्थान आहे. ही श्रद्धा शतकानुशतके आपल्या जीवनशैलीचा एक भाग आहे. हे पाहता, गेल्या ११ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या प्राचीन ज्ञानाचे रूपांतर मजबूत आणि व्यावहारिक कृतीत झाले आहे. भारताची स्पष्ट धोरणे, सार्वजनिक सहभाग, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वततेसाठी योगदान हे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर ऊर्जा आघाडी आणखी बळकट करतात.