मुंबई : (P.L. Deshpande Maharashtra Kala Academy) सांस्कृतिक कार्य विभाग पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या (P.L. Deshpande Maharashtra Kala Academy) माध्यमातून महाराष्ट्र राज्य उत्सव अंतर्गत विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी ते २३ जानेवारी या तीन दिवसांमध्ये रोज सायंकाळी ६ वाजता विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात हे व्याख्यान पार पडणार आहे. गुरुवार, २२ जानेवारी रोजी ज्येष्ठ संगणक तज्ञ, विचारवंत, लेखक अच्युत गोडबोले एआय तंत्रज्ञान आणि कलाविश्व या विषयावर व्याख्यान देणार आहेत.(P.L. Deshpande Maharashtra Kala Academy) शुक्रवार, २३ जानेवारी रोजी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यांच्या युनेस्को मानांकनाचा रोमांचक प्रवास प्रेक्षकांना उलगडून सांगणार आहेत. शनिवार, २४ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी अभिजात मराठी भाषा : इतिहास, वर्तमान व भविष्य या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करतील. सदर व्याख्यानमाला निशुल्क असून, प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(P.L. Deshpande Maharashtra Kala Academy)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.