Iran protest: इराणमधील आंदोलनात सोळा हजार जणांचा मृत्यू!

    20-Jan-2026
Total Views |



Iran protest 
मुंबई : (Iran protest) इराणमधील आंदोलनामध्ये जवळपास 16 हजार 500 नागरिकांचा मृत्यु झाला असून, अंदाजे तीन लाख तीस हजारच्या आसपास नागरिक जखमी झाल्याचे एका अहवालामध्ये म्हटले आहे. इराणमध्ये सध्या खोमेनी राजवटीविरोधात जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारले असून, खोमेनी सरकारने आंदोलनकर्त्यांवर कडक कारवाई केली आहे. (Iran protest)
 
इराणमधील खोमेनी राजवटीच्या हुकुमशाही विरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली असून, या आंदोलनामध्ये जवळपास 16 हजार 500 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला असून, स्थानिक डॉक्टरांच्या सहाय्याने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. इराणमधील आंदोलनात जवळपास तीन लाख तीस हजार नागरिक जखमी झाल्याचेही म्हटले गेले आहे. या आंदोलनात मृत्यु झालेल्यांपैकी सर्वाधिक आंदोलनकर्ते 30वर्षांच्या खालील असल्याचेही म्हटले आहे. इराण प्रशासनाने केलेल्या लष्करी कारवाईमुळे अनेक आंदोलनकर्त्यांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला आहे. तसेच, या कारवाईमध्ये जवळपास 700 ते 1000 आंदोलनकर्त्यांना डोळा गमवावा लागल्याचे देखील समोर आले आहे. तेहरानमधील एका रुग्णालयात जवळपास सात हजारच्या आसपास डोळ्यांना दुखापत झाल्याची प्रकरणे नोंदवली आहे. तसेच रक्ताच्या कमतरतेमुळेही अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Iran protest)
 
 
इराणमधील या नरसंहाराबद्द्ल इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खोमेनी यांनी, या आंदोलनात अनेक नागरिकांचा मृत्यु झाल्याची प्रथमच कबुली दिली. मात्र, त्याचवेळी खामेनी यांनी या नरसंहारासाठी अमेरिकेला जबाबदार धरताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथवणीखोर भाषणांमुळे आंदोलनकर्त्यांना बख मिळाल्याचे अरोपही केले. तसेच, खामेनी यांनी ट्रम्प यांना इराणचे गुन्हेगार तर आंदोलनकर्त्यांना अमेरिकेचे पायलट सैनिक म्हणून देखील संबोधले. इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून, इराणमध्ये कारवाईदरम्यान इंटरनेट बंद केल्याने इराणचा जगाशी संपर्क तुटला आहे. (Iran protest)
 
इराणमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी ‌‘ऑपरेशन सुरक्षा‌’
 
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना इराण सोडण्याचे आवहन भारतीय उच्चायुक्तालयाने केले असून, भारत सरकारने हवाई दलाच्या माध्यमातून इराणमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन सुरक्षा राबवण्यात येत आहे. ऑपरेशन सुरक्षाच्या माध्यमातून 220 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले असून, बाकीच्यानाही लवकरच परत आणण्यात येणार आहे. यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक विशेष कंट्रोल रुमची स्थापना केली आहे. (Iran protest)