मुंबई : (Dr. Ravin Thatte) नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA), मुंबई येथे पेज टू स्टेज साहित्य मालिकेअंतर्गत बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, गोडरेज डान्स अकॅडमीमध्ये डॉ. रविन थत्ते यांचा संवाद आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमातून प्रेक्षकांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजविचारवंत डॉ. थत्ते (Dr. Ravin Thatte) यांचे जीवनानुभव जाणून घेण्याची संधी मिळाली. या संवाद सत्रासाठी डॉ. संजय ओक, डॉ. अमित मायदेव, डॉ. निखिल दातार ज्येष्ठ पत्रकार व संपादक कुमार केतकर आदी मान्यवर उपस्थित होते.(Dr. Ravin Thatte)
डॉ. थत्ते (Dr. Ravin Thatte) हे I Became a Hindu, The World Called Being Human, From the Knowledge of Worldly Life to True Science यांसारख्या पुस्तकांचे लेखक आहेत, तसेच त्यांनी ज्ञानेश्वरीचे इंग्रजी भाषांतर करून तात्त्विक विचारांना सुलभ केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रावीण्यासोबतच त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक उद्यानांचे संरक्षण यासारख्या सामाजिक उपक्रमांतही सातत्याने योगदान दिले आहे.या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या प्रेक्षकांनी संवादाचा मनापासून आनंद घेतला. पेज टू स्टेज मालिका क्युरेटर डॉ. सुजाता जाधव यांनी विविध विषयांना एकत्र गुंफून सत्राला समृद्ध स्वरूप दिले, तर NCPA चे श्रीहर्ष फेणे आणि सिद्धार्थ देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.(Dr. Ravin Thatte)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.