मुंबई : (Bandra Skywalk Inauguration) वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे न्यायालय, वांद्रे - कुर्ला संकुल, म्हाडा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ये - जा करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी निर्मित नवीन स्काय वॉकचे लोकार्पण करण्यात आले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार,दि. २६ जानेवारी रोजी हे लोकार्पण करण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत हा स्काय वॉक उभारण्यात आला आहे.(Bandra Skywalk Inauguration)
या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त (पायाभूत सुविधा) गिरीश निकम तसेच एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे आदी मान्यवर उपस्थित होते.(Bandra Skywalk Inauguration)
यानिमित्ताने संबोधित करताना पालकमंत्री शेलार म्हणाले की, मुंबई उपनगरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम, सुरक्षित आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने वांद्रे (पूर्व) येथील वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) ते पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Bandra Skywalk Inauguration) कलानगर जंक्शन दरम्यान उभारण्यात आलेली ही नवीन मार्गिका नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाशी थेट जोडणी असल्यामुळे तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Bandra Skywalk Inauguration)
मार्गिकेविषयी
वांद्रे रेल्वे स्थानक (पूर्व) पासून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील (Bandra Skywalk Inauguration) कलानगर जंक्शन पर्यंतची नवीन आकाश मार्गिका एकूण ६८० मीटर लांबीची व सरासरी ५.४० मीटर रूंदीची आहे. पादचाऱ्यांच्या विविध ठिकाणांहून सहज प्रवेशासाठी ४ जिने आहेत. सुलभ मार्गक्रमण करण्यासाठी २ स्वयंचलित सरकत्या जिन्यांची जोड आहे. सुरक्षितता आणि निगराणीसाठी १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.(Bandra Skywalk Inauguration)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.