पुणे

अजित पवार म्हणतात राज्य सरकार देणार मोठे आर्थिक पॅकेज

पीसीएनटीडी'तर्फे औंध ते काळेवाडी साई चौक येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे त्यांचे हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते...

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पुर्नरावृत्ती टळली

महाराष्ट्रात औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पुर्नरावृत्ती होताहोता टळली आहे. पुण्यातील उरुली कांचन रेल्वे स्थानकानजीक रुळावर चालणाऱ्या मजूरांचा प्राण मोटरमनच्या सतर्कतेने वाचला, एक मोठा अनर्थ टळला आहे. राज्यातील मजूरांचा प्रश्न अजूनही तसाच आहे, बऱ्याच मजूरांची आपल्या घराकडे जाण्याची पायपीट तशीच सुरू आहे. औरंगाबाद येथे रेल्वे रूळावर झोपलेल्या मजूरांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने तब्बल १६ मजूरांचा मृत्यू झाला होता. ..

अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला महत्व देण्याची गरज : डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनारुपी महामारीला हरवण्यासाठी देवदूत म्हणून दिवसरात्र युद्ध लढणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्राला आता गांभीर्यपणाने घेणे गरजेचे असून केंद्र-राज्य आणि स्थानिक प्रशासन पातळीवरही विशेष महत्व घेणे गरजेचे आहे, असे मत 'इंडियन मेडिकल असोसिएशन'चे (आयएमए) महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. बुधवार, दि. २२ एप्रिल रोजी 'आयएमए'तर्फे पाळण्यात येणाऱ्या देशव्यापी 'व्हाईट अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर त्यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधला...

रा.स्व.संघातर्फे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी अन्नदान

लॉकडाऊनमुळे येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या आणि देहविक्री व्यवसायात ओढल्या गेलेल्या महिलांची, त्या वस्तीतील अन्य वृद्ध महिलांची उपासमार होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे त्यांना मदतीचा हात पुढे करून त्यांच्या जेवणाची चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे...

एका तबलिगीमुळे ४० डॉक्टर, नर्स क्वारंटाईन

दिल्लीतील निझामुद्दीन मकरज येथून परतलेल्या एका रुग्णामुळे ४० डॉक्टरांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जमातच्या कार्यक्रमात गेल्याचे त्याने व कुटूंबियाने लपवल्याने ४० जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. या तबलिघीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपण दिल्लीतील कार्यक्रमाहून आलो असल्याची माहिती लपवली. त्याची शस्त्रक्रिया आणि शुश्रूशा करणाऱ्या सर्वांचाच जीव त्याने धोक्यात घातला आहे...

चांगली बातमी ! पिंपरीमध्ये ५ तर नगरमध्ये एकाची कोरोनावर मात

पिंपरी-चिंचवडमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण नाही तर नगरमध्येही ३ पैकी १ रुग्ण घरी..

विमानात प्रवासी शिंकला म्हणून पायलटने घेतली कॉकपीटमधून उडी

कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरलेली असताना आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी उघड झाली. पुण्यातील एअर एशिया विमानाच्या पायलटने प्रवासी शिंकला म्हणून पायलटने कॉकपीटमधून थेट खाली उडी घेतली. हा प्रकार विमान उड्डाणासाठी तयार होत असताना घडला. संकटकाळी अशाप्रकारे विमानातून बाहेर उडी घेतली जाते. पहिल्या रांगेतील प्रवासी शिंकल्याने विमानात प्रचंड घबराट पसरली...

पुण्यात आणखी एक रुग्ण : राज्यात रुग्णाची संख्या ४२वर

हॉटेल्स, दुकाने बंद केल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट..

कोरोना इम्पॅक्ट ! पुण्यामध्ये हॉटेल्स दुकाने बंद

पुण्यामध्ये दुकाने, हॉटेल्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद..

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचा झेंडा

महाविकास आघाडीच्या पराभव करू स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे हेमंत रासने यांची निवड..

हडसर किल्ल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू ; शिवजयंतीनिमित्त आली होती किल्ल्यावर

मुंबईतील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता...

पुणे मेट्रोचा इतका कि.मीचा मार्ग मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार : प्रकाश जावडेकर

पुणे मेट्रोच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या १२ कि.मी. लांबीचा मार्ग मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणार..

मनसे मोर्चाला पुणे पोलिसांचा नकार ; मुंबईच्या मोर्चाकडे लक्ष

रविवारी, ९ तारखेला बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोर्चा काढण्यात येणार..

सेवा घेणारा उद्या करणारा व्हावा : सुहासराव हिरेमठ

समाजातील पीडित, वंचितांसाठी सेवाकार्य चालवली पाहिजेत ..

'जाणते राजा' फक्त शिवाजी महाराजच ; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला...

महाशिव आघाडीतून 'शिव'शब्द का काढला? असा खडा सवाल महाविकास आघाडीला केला..

पुण्यात पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला आग

पुण्यातील बाणेर परिसरात पॅनकार्ड क्लबच्या या आलिशान इमारतीला सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याने या भागात एकच खळबळ उडाली. दुपारी दीड वाजता पॅनकार्ड क्लब डोमला आग लागली. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्याने अग्निशमन दलाला याबद्दल माहिती देण्यात आली. सध्या पॅनकार्ड क्लब प्रकरण न्यायालयीन वादामुळए बंद आहे. आगीने अल्पावधीतच संपूर्ण डोम गिळंकृत केल्याने आगीचे रूप गंभीर झाले आहे. पुणे अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही...

संग्राम थोपटेंच्या १९ समर्थकांवर गुन्हे दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती...

उद्धव साहेब, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमची फसवणूक करतायत : चंद्रकांतदादा पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस फसवत आहे असा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केला..

पुणेकरांना सूर्यग्रहण दिसलेच नाही!

ढगाळ वातावरणामुळे पुणेकरांची निराशा..

यंदा ६३वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात !

पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार ६३वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा..

बायको कपडे धुवायला लावते म्हणून नवऱ्याने घेतला गळफास

पुण्यातील मगरपट्टा सिटीतील घटना..

पुण्यात कार अपघातात एक ठार

पुणे द्रुतगतिमार्गावर ओझर्डे गावच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने ट्रकला मागून जोरात धडक दिली. car accident in Pune News ..

राजकीय मतभेद विसरून मुख्यमंत्र्यांनी केले पंतप्रधानांचे स्वागत

पोलिस महासंचालकांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी रात्री पुण्यात दाखल झाले..

पुण्यात शिवशाही दरीत कोसळली ; २ जणांचा मृत्यू

पुण्याहून सांगलीकडे जाणारी शिवशाही बस कात्रज घाटात ५० फूट दरीत कोसळली..

महा MTB परिवारातील पत्रकार प्रथमेश नारविलकर यांचे निधन

पुण्यातील पत्रकार प्रथमेश नारविलकर ( वय - ३३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री ९:३० वाजता निधन झाले. ..

गौतम नवलखा यांना सुनावणीसाठी नियमित हजर राहावे लागणार

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात नियमित हजर राहण्याचे निर्देश राज्य सरकारतर्फे देण्यात यावेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. सरकारी पक्षाने तसा रितसर अर्ज दाखल करण्यासही न्यायालयाने सांगितले. दरम्यान, आज दुपारी या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. ..

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू पृथ्वीराज सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे ज्येष्ठ सदस्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच वीराग्रणी नारायणराव सावरकर यांचे नातू पृथ्वीराज विक्रमराव सावरकर यांचे कोथरूड, पुणे येथे निधन झाले. ते साठ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई स्वामिनी, भाऊ रणजीत तसेच पत्नी, मुलगी असा परिवार आहे. गेले काही महिने कर्करोगाने आजारी होते...

छत्रपती शिवरायांचा 'इतिहास' सहावीच्या पुस्तकात

'इतिहास' पुसण्याची टीका अभ्यासपूर्ण नाही ! : महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे ठळक शब्दात स्पष्टीकरण..

चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केला कोथरुडचा 'संकल्पनामा'

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा संकल्पनामा म्हणजे माझी सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा संकल्पनामा चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रसिद्ध केला. ..

पुणेकरांपुढे रंगली भाजप-काँग्रेस प्रवक्त्यांची 'गरमागरम' चर्चा

सा. 'विवेक'च्या विशेष कार्यक्रमात आ. अनंत गाडगीळ, केशव उपाध्येंचा सहभाग..

पुण्यात पूरग्रस्तांना स्वयंसेवकांतर्फे मदतीचा हात

रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीने उभारले मदत कार्य..

पुण्यात पावसाचे तांडव ; पुण्यात मुसळधार पावसामुळे ११ जणांचा मृत्यू

पुण्यात ढगफुटी झाल्याने शेकडो वाहने गेली वाहून..

पुण्यात 'येवले चहा'वर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

'अमृततुल्य चहा', अशी ओळख असणाऱ्या येवले अमृततुल्य चहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. येवले अमृततुल्य चहाच्या नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्याने चहा पावडर, चहाच्या मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आरोग्यास अपायकारक असलेला ‘मेलानाईट’ पदार्थ वापरल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते...

'बीबीएन पीसीएमसी'तर्फे संजीव पेंढरकर यांचा सत्कार

'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रुप' हा ब्राह्मण समाजातील उद्योजकांसाठी कार्यरत आहे. 'बीबीएन' हे एक 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क' असून ब्राह्मण उद्योजकांच्या संस्थांना यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्य करते. 'बीबीएन'ला ब्राह्मण व्यावसायिक समुदायामध्ये एक मानाचे स्थान आहे. ..

एलआयसीमध्ये मेगाभरती : जाणून घ्या... कसा कराल अर्ज ?

भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) 'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. देशभरात 'एलआयसी'च्या विविध कार्यालयांत सुमारे आठ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. मुख्य म्हणजे एलआयसीमध्ये अशाप्रकारे २४ वर्षांनंतर भरती करण्यात येत आहे...

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लांबला मान्सूनचा परतीचा प्रवास

सलग बरसणार्‍या पावसाने आता मात्र काहीशी विश्रांती घेतली पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा असली तरी यंदा पावसाचे अजून समाधान झालेले नाही. महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यात पाऊस सक्रिय होणार आहे. मुख्यत: १८ सप्टेंबरनंतर राज्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, या हंगामातील हा शेवटचा मोठा पाऊस असेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुमप कश्यपी यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुढील आठवड्यातही राज्यातील जनतेला मुसळधार पावसाचा अनुभव मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात ..

आरे ही वनजमीन नाही ! आदित्य ठाकरेंशी स्वत: चर्चा करेन - मुख्यमंत्री

आरे ही वनजमीन नाही ! आदित्य ठाकरेंशी स्वत: चर्चा करेन - मुख्यमंत्री..

बँक ऑफ महाराष्ट्रची चर्चा परिषद उत्साहात

विचार आणि चर्चा योजनेचा हा पहिलाच प्रसंग होता ज्यात शाखांना त्यांच्या कार्यक्षमतेचा स्वत:च आढावा घेण्यास, बँकिंग क्षेत्रासमोरच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास आणि भविष्यातील रणनीती दर्शविण्यास सांगण्यात आले..

'डीएसके'चे दुसरे बंधू पोलिसांच्या ताब्यात

डी. एस. कुलकर्णी यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांचा अमेरिकेला पलायन करण्याचा होता बेत..

लवासामुळे निसर्गाची हानी : संभाजी भिडे

टीका करत पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहनही केले..

अण्णा भाऊंचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक - डॉ. अरुणा ढेरे

पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घ्यावी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. त्या लोकमान्य टिळक स्मृतिश..

लायकी नसलेले लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतात : विक्रम गोखले

स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले असे व्यक्ती आहेत. ज्यांना हिंदूत्व समजले. मात्र, त्यांचे नाव घेण्याची लायकी नसलेले लोकही त्यांच्यावर टीका करत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी व्यक्त केले. कारगील विजय दिवसाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते...

पुणे-सातारा अपघात ; ३ तरुणांचा मृत्यू

अपघातामध्ये एकाच परिसरातील ८ तरुणांचा समावेश..

कबीर कलामंचाच्या कार्यक्रमामुळेच माझ्या मुलाने सोडलं घर !

कबीर कला मंच, संतोष शेलार, नक्षलवाद, पुणे, सचिन माळी, शीतल साठे, Kabir kala manch, Santosh Shelar, Naxalism, Pune, Sachin Mali, Sheetal Sathe,..

पुण्यातील ‘तो’ बेपत्ता तरूण बनलाय नक्षलवादी !

‘शहरी नक्षलवादा’चे भयाण वास्तव पुन्हा एकदा उघड - कबीर कला मंचाशी संबंध असल्याची पोलिसांची माहिती..

इथेनॉल निर्मितीसाठीचे परवान्यांसाठी एक खिडकी योजना : मुख्यमंत्री

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या परवान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार एक खिडकी योजना तयार करणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विशेष मंत्री गटाची स्थापना करून एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करत ती सेवा हमी योजनेत अंतर्भूत करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली...

नीरव मोदीला डीआरटीचा दणका; पीएनबीला व्याजासहित ७३०० कोटी रुपये देण्याचे आदेश

जाब नॅशनल बँकेला व्याजासहित ७३०० कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश कर्ज वसुली व्यायाधीकणाचे पीठासीन अधिकारी दीपक ठक्कर यांनी नीरव मोदीला दिला आहेत...

कोंढवा दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत

महाराष्ट्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना २५ हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. तसेच बिहार सरकारकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे...

कोंढवा दुर्घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

कोंढवा दुर्घटनेची गंभीर दाखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत...

पुण्यात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू

घटनास्थळी अग्निशमन दलाचे आणि एनडीआरएफ दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे...

पालखी सोहळ्यात 'वारी नारीशक्ती'चा चित्ररथ

महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणाची ही वारी आहे. वारीमध्ये प्रत्येक महिलेला सन्मान मिळतो, वारी समानतेचे प्रतीक असल्यानेच 'वारी नारीशक्ती' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. ..

'गोव्याचे सावरकर' मोहन रानडे यांचे दीर्घ आजाराने निधन

पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. गोवा मुक्तिसंग्रमातील आझाद गोमंतक दलाचे नेते व संघाचे स्वयंसेवक अशी त्यांची ओळख होती..

दहावी बारावीच्या पुरवणी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून घेण्यात येणार असल्याची माहीती राज्य शिक्षण विभागामार्फत देण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे...

राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी

पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ, विचारवंत आणि सांस्कृतिक नेते म्हणून प्रसिध्द आहेत. राष्ट्रीय किंवा राजभाषा म्हणून मान्यता नसलेल्या ४० भाषांना त्यांनी नवी ओळख मिळवून दिली..

पुणे 'विहिंप'ची शोभायात्रा वादाच्या भोवऱ्यात

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी २ जून रोजी घेण्यात आलेली 'दुर्गा वाहिनी' या शौर्य प्रशिक्षण वर्गाची शोभायात्रा वादाच्या भोवऱ्यात सापडली..

विहिंपचे व्यकंटेश आबदेव यांचे दुःखद निधन

मागील ३० वर्षांपासून विश्व हिंदू परिषदेचे ते पूर्ण वेळ काम पाहत होते त्यांचा अंत्यविधी उद्या, मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार..

'स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव' पुस्तकाचे प्रकाशन

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र' आयोजित पुस्तक प्रकाशन व विशेष सन्मान कार्यक्रम संपन्न झाला...

पुणे लोकसभा मतदारसंघ : पुणेकरांचा कौल बापटांनाच!

२०१४ मध्ये भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचा तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव करत काँग्रेसचा हा एकेकाळचा बालेकिल्ला आपल्या खिशात टाकला...

सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला

अखेर आजच्या निकालानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. दोन वेळेस खासदार असलेल्या व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार..

Live Update: पवार घराण्याला मोठा धक्का, पार्थ पवार मोठ्या पराभवाच्या दिशेने

पुणे जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेला संमिश्र यश मिळताना दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट, मावळमधून श्रीरंग बारणे व शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे...

पुण्यात पुन्हा आगडोंब ; जीवितहानी नाही

पुण्यातील शनिवार पेठेमध्ये एका इमारतीत गुरुवारी लागली आग..

पुण्यात दुकानाला आग : पाच मृत्युमुखी

पुण्यात देवाची ऊरळी येथील राजयोग साडी सेंटर दुकानाला लागलेल्या आगीत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आता कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. गुरुवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुकानाला आग लागली...

समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांना मारहाण

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे झेंडेवाडी येथे गोरक्षकांनी केला हल्ला..

समता परिषदेला ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज पुरस्कार

डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे (फर्ग्युसन महाविद्यालय) यांच्यावतीने ४० वर्षे सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल ‘छत्रपती राजर्षि शाहू महाराज पुरस्कार २०१८,’ समता परिषद, मुंबई या संस्थेला डॉ. नेहरू उमराणी (प्र. कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे) आणि डॉ. शरद कुंटे (अध्यक्ष परिषद व नियामक मंडळ डे. ए. सोसायटी, पुणे) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना समता परिषदचे अध्यक्ष माजी मंत्री, आ. विजय (भाई) गिरकर (मुख्य प्रतोद, विधान परिषद) आणि सर्व कार्यकर्ते तसेच मार्गदर्शक ..

मावळ व शिरूरमध्ये तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान

मावळ आणि शिरूर मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत असून सकाळी सात वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मावळमध्ये ४०.३० टक्के तर शिरूरमध्ये ४०.३५ टक्के मतदान झाले..

अजित दादांची दादागिरी; शिवतारेंना दिले आव्हान

“बारामतीत येऊन पवारांवर टीका करणारे विजय शिवतारे २०१९ ला आमदार कसे होतात तेच मी बघतो,” अशी दादागिरीची भाषा अजित पवारांनी रविवारी बारामतीत वापरली...

आता टीसींना मिळणार बारकोड ओळखपत्र

तोतया टीसींवर आळा घालण्यासाठी रेल्वेची शक्कल..

'अमृताचा अथांग सागर’ ग्रंथाचे रा.स्व. संघाचे सरकार्यवाह भैय्याजींच्या हस्ते प्रकाशन

"टेंबेस्वामीच्या जीवन व वाङ्मयाचे दर्शन घडवणारा ’अमृताचा अथांग सागर’ हा ग्रंथ जे वाचतील, समजून घेतील आणि आचरणात आणतील, त्यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे ’शुभंकर दीप’ ठरेल," असे उद्गार सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी 'अमृताचा अथांग सागर’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी काढले...

‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थेच्या परीसवेधचे प्रकाशन

सा. ‘विवेक’ आणि ‘हिंदुस्थान प्रकाशन संस्थे’तर्फे रवींद्र तथा राजाभाऊ मुळे लिखित ’परीसवेध’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. ७ एप्रिल रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा, पुणे येथे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आले...

सर्वोकृष्ट विद्यापीठात पुणे विद्यापीठ 'टॉप १०'मध्ये

सर्वोत्कृष्ट दहा विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या एकाच विद्यापीठाला स्थान मिळाले असून मुंबई विद्यापीठाला ८१ वे स्थान मिळाले आहे...