राजकीय पटलावर उदयास आलेल्या काही व्यक्ती, त्यांच्या विचारसरणी आणि धोरणांमुळे व्यापक चर्चेचा विषय बनतात. झोहरान ममदानी हे असेच एक नाव. त्यांचे विचार आणि जाहीर विधाने केवळ एका विशिष्ट शहरापुरती मर्यादित नसून त्यांचे जागतिक परिणाम होऊ शकतात. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. अमेरिकेत सध्या दोन विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. एक म्हणजे ट्रम्प यांचे धरसोड वृत्तीचे धोरण आणि न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत जिंकलेला डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार झोहरान ममदानी!
Read More
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो दि. 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे. मात्र, मंगळवार, दि. 27 मे रोजीपासून मान्सूनच्या प्रवासाची वेग कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
अंधेरी चिमटपाडा परिसरातील Inconica हॉटेलपासून अंधेरी-कुर्ला मार्गापर्यंतच्या रस्त्याचे नामकरण परमवीर चक्र विजेता सरदार जोगिंदर सिंह मार्ग असे करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने याठिकाणी नामफलकही बसवले होते. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामादरम्यान नामफलक हटवण्यात आला व नंतर तो दीर्घकाळ लावण्यात आलेला नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी के/पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली. शुक्ला यांनी तत्काळ दखल घेत अवघ्या ४८ तासांत सदर मार
मागील तीन आठवड्यापासून जगाचे लक्ष हे दक्षिण आशियाकडे वळले होते. आतापर्यंत रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धामुळे, युरोप आणि पश्चिम आशियातील अनेक नवे भूराजनैतिक समीकरण निर्माण केले आहेत. हे दोन्ही संघर्ष आता अंतिम टप्प्यात असताना, दक्षिण आशियात दोन आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रांमध्ये युद्धाची सुरुवात होण्याच्या मार्गावर होती. काश्मीरमधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिकांवर ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ‘द रेसिस्टन्स फोर्स’च्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्
भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री हे ऊर्जा अर्थात शक्तीचे प्रतीक आहे, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनीही कायमच रणांगण नुसते गाजवलेच नाही, तर आपल्या अचाट पराक्रमाने शत्रूलाही तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले आहे. काळ कितीही बदलला तरी भारतातील स्त्रियांमधील पराक्रम आजही आहे तसाच आहे. आज भारतीय सैन्यदलात मोठ्या संघर्षाने स्वत:चे स्थान निर्माण करणारी प्रत्येक स्त्री हाच पराक्रमाचा वारसा जपताना दिसते. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह हे त्या स्त्री शक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे. स्त्रियांच्या संघर्षाचा
( MEIL wins 700 megawat nuclear reactor project ) NPCIL ने कर्नाटकमधील कैगा येथे दोन ७०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्या उभारण्याचे काम (कैगा युनिट्स ५ आणि ६) MEIL या भारतीय खाजगी कंपनीला दिले आहे. हे एकूण ₹ १२,८०० कोटींचे काम आहे.
( Two MMRDA projects win prestigious awards ) ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए)च्या दोन प्रकल्पांना नवी दिल्लीत पार पडलेल्या ‘बिल्ड इंडिया इन्फ्रा अॅवॉर्ड्स २०२५ ’मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान केले.
Mumbai Winter मुंबई आणि ठाणे शहरात शनिवारी धुक्यांची झालर पसरली होती. येत्या २४ डिसेंबर २०२४ पर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई आणि ठाणे येथे काही अंशी थंडीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. तर कोकण आणि मुंबईमध्ये १ ते २ अंशाने तापमान खालावेल. यामुळे मुंबई, कोकणासह इतर उर्वरित महाराष्ट्रात थंडीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
नागपूरच्या अधिवेशनाकडे अनेकजण सहल म्हणून पाहतात. यंदाचे वर्ष त्याला अपवाद. पत्रकारांपासून सरकारी अधिकारी आणि चोपदारांपासून शिपायांपर्यंत सगळ्यांसाठीच गेले आठ दिवस धावपळीचे ठरले. 33 वर्षांनंतर नागपुरात झालेला मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, दुसर्या दिवसापासून न थांबता सुरू झालेले सभागृहाचे काम, खातेवाटपाचे गुर्हाळ आणि बीड-परभणीसारख्या घटनांचे पडसाद, अशा अनेक घटनांमुळे हिवाळी अधिवेशन गाजले. 237 हून अधिक आमदारांची फौज पाठिशी असलेल्या बलशाली सत्ताधार्यांसमोर विरोधकांनी अक्षरशः शरणागती पत्कारली. विधिमंडळ सभागृहात
नवी दिल्ली : दि. २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २०२४, शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले. या अधिवेशनात २६ दिवसांत लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या.
(Maharashtra Assembly) गेल्या सहा दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. दि. १६ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दि. २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
(CM Devendra Fadnavis) मुंबईत अवैधरित्या रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार (डी-पोर्ट) करणार, ही सरकारची भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी दिली.
(CM Devendra Fadnavis) "आमचे हे सरकार 'कंटिन्यूएशन' सरकार आहे. ज्या योजना सूरू केल्या, त्या पूर्णत्वास नेणारच. पलिकडच्या बाजूला असताना जे बोलत होतो, ते सर्व प्रत्यक्षात आणणार. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणातील मागास भागासह उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास साधत महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणार. अडीच वर्षं तुमचे सरकार होते, २०-२० खेळावी लागेल, याची कल्पना होती. त्यामुळे आम्ही जोरदार बॅटींग केली आणि विश्वचषकच जिंकला", असा टोला फडणवीस यांनी विरोधी पक्षांना लगावला.
नागपूर : तब्बल ६० वर्षे देशात आणि राज्यात सत्ता उपभोगणार्या काँग्रेसचा यंदाच्या विधानसभा ( Vidhansabha ) निवडणुकीत मतदारांनी सुपडा साफ केला. तरीही सत्तापदे उपभोगण्याची त्यांची मनीषा कमी होताना दिसत नाही. विधानसभेच्या गटनेतेपदावरून या पक्षात प्रचंड धुसफूस सुरू असून, हिवाळी अधिवेशन सुरू झाले तरी अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे विशेष अधिवेशनाप्रमाणे या अधिवेशनातही काँग्रेस गटनेत्याची खुर्ची रिकामीच राहणार की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवार, १७ डिसेंबर रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav ) यांनी अभिनंदन प्रस्तावाला विरोध करत असताना राज्यपालांचा अवमान केला. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत मंत्री अतुल सावे यांनी मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी विधानभवन येथील दालनात चर्चा केली. यावेळी भोई समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळावा अशीही मागणी करण्यात आली.
(Ustad Zakir Hussain) उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाने तबल्यापासून ताल वेगळा झाल्याची क्षती आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमवार, १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानभवन परिसरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाडा : हिवाळी अधिवेशना दरम्यान केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची खा. डॉ. हेमंत सवरा यांनी भेट घेऊन पालघर जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ ( Jal Jivan ) योजनेला पुरेसा निधी मिळावा. तसेच जिल्ह्यातील उर्वरित अनेक गावांचा या योजनेत समावेश करण्यात यावा. यासंदर्भात निवेदन देऊन मागणी केली आहे.
Mumbai Weatherसुरू असून मुंबईमध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. रविवारपासून किमान तापमानात घट झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सोमवारी प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली नोंदवण्यात आले असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर सांताक्रूझ येथे हिवाळी मोसमात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
देशात पसरलेली उष्णतेची लाट जाऊन आल्हाददायक अशी गुलाबी थंडी पसरली आहे. याच थंडीत देशभरात मॅरेथॉनचे आयोजन विविध ठिकाणी केले जात आहे. तसेच देशातील अन्य खेळातील क्रीडापटू देखील त्यांच्या विजयाने भारतीयांच्या थंडीचा आनंद द्विगुणित करत आहेत. क्रीडाक्षेत्रातील अशा विविध आनंददायी घटनांचा घेतलेला आढावा...
नाशिक : हिवाळा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यवर्धक मानला जातो. या दिवसात भूकेच्या प्रमाणात वाढ होत असल्याने रोजच्या आहारात वाढ होते. तसेच, तंदुरुस्त राहण्यासाठी हिवाळा ऋतू सर्वोत्तम मानला जातो. थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी डिंक आणि मेथीचे लाडू सेवन केले जाते. हे लाडू तयार करताना यामध्ये सुकामेवा ( Dried Fruits ) टाकला जातो. हे लाडू बनविण्याच्या तयारीला घरोघरी वेग येण्यास सुरुवात झाली आहे. थंडीत शक्तीदायक ठरणारे लाडू तयार करण्यासाठी सुकामेव्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे सुकामेव्याचे दरह
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी २ डिसेंबर रोजी संसद भवनच्या परिसराकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्यांतर्गत लाभ आणि नुकसानभरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतला आहे.
हिवाळी सरली की गुलाबी थंडी सूर्याला धुक्याच्या मुलायम आवरणात हळूवार कुशीत घेते. सकाळी उठायचे म्हटले तरी शरीर परवानगी देत नाही की मनाला थंडीची चढलेली झिंगही उतरता उतरत नाही. पण, गुलाबी थंडीच्या कोमलपणाला भुलून न जाता, त्वचेची विशेष काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा थंडीच्या काळात कोमेजणार्या त्वचेची योग्य निगा कशी राखायची, ते आज जाणून घेऊ.
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनात सरकार काही प्रलंबित विधेयके मंजूर करण्याची तयारी करत आहे, तर काही नवीन विधेयकेही अजेंड्यावर आहेत.
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session ) पूर्वसंध्येस २४ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे त्यांच्याविरोधात एकतर्फी प्रचार चालविणारे भारतीय माध्यमांतील काही पत्रकारही तोंडघशी पडले आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध केवळ ट्रम्प यांनीच केला होता, ही गोष्ट हॅरिसप्रेमी पत्रकार सोयीस्करपणे विसरतात. तसेच ट्रम्प आणि पुतीन यांचे मोदी यांच्याशी मित्रत्त्वाचे संबंध आहेत. रशिया आणि अमेरिका या दोन महाशक्तींचे प्रमुख हे भारताचे मित्र असल्याची दुर्मिळ घटना आता घडली असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या भूमिकेला मोठा आधार आणि शक्ती प्राप्त झाली आ
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
काय स्वप्न होते? हरियाणामध्ये जिंकलो की तो दिवस ‘जिलेबी दिवस’ म्हणून साजरा करणार! हरियाणामध्ये जिलेबीने धोका दिला. ‘बिग बॉस’मध्ये सुरज म्हणतो ना, ‘गुलीगत धोका’. अगदी तसाच धोका हरियाणावाल्यांनी दिला. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ‘लाडकी बहीण योजने’बद्दल काहीतरी खोटे पसरवले पाहिजे. काम न करता सहानुभूती मिळवायला पाहिजे.
Bigg Boss Winner Suraj Chavan बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या ग्रँड फिनालेमध्ये खेडेगावातील असलेला रिल्सस्टार सूरज चव्हाणला विजयी घोषित केले आहे. तर गायक अभिजीत सावंतला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. सूरच्या विजयामागे आई मरी माता होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेल्यावरील विंडफॉल करात मोठी कपात केली आहे. कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ४,६०० रुपये प्रति टनावरून २,१०० रुपये प्रतिटन केला आहे.
आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड शेअर्स मोठी वाढ दिसून आली आहे. या शेअरमधील ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे.
२० जूनपासून Dindigul Farm Product व Winny Immigration and Education Services Pvt Ltd या दोन कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. जाणून घेऊयात आयपीओबद्दल माहिती....
सरकारने पेट्रोलियम व कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर (Windfall Tax) मध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे. सरकारने शुक्रवारी या संदर्भात आपले निवेदन स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की करात कपात करत ५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
श्रीलंका सरकारने अखेर अदानी समुहाला पवन ऊर्जा प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. आता अदानी समूह श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तयारी सुरू करत असल्याची माहिती मिळाली आहे.मन्नार व पूनेरीन या श्रीलंकेतील ठिकाणी हा प्रकल्प होणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी श्रीलंका सरकारने निगोसिऐशन समितीदेखील तयार केली होती.
अरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य घोटाळ्या प्रकरणी दि. २१ मार्च रोजी रात्री २ तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षाने आक्रमक भुमिका घेतली. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. त्यात ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील वाहत्या गंगेत हात धुऊन घेत,सरकारवर हल्लाबोल केला. पण आता राऊतांवरच अशाच एका घोटाळ्याशी संबधी आरोप होऊ लागलेत. त्यानुसार, महाराष्ट्रातील काही प्रमुख घोटाळ्यांवर पुन्हा चर्चा होऊ लागली. त्यात दिल्ली मद्य घोटाळ्यासारखाचं एक घोटाळा महाराष्ट्र
लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मद्य ही ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि तेच खऱ्या आनंदाचे स्रोत असल्याचे म्हटले आहे. ख्रिश्चनांचे धार्मिक शहर असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी हे वक्तव्य केले आहे. याआधीही त्यांनी मद्यपानाच्या समर्थनार्थ अनेक विधाने केली आहेत.
अयोध्येतील राम मंदिर कर्तव्य धर्म रामाचे मंदिर आहे. या कर्तव्य धर्माचे पालन करण्याचा कालखंड आता सुरू झाला आहे. मानवी जीवन हे अनेकांगी असतं. मनुष्य हा सृष्टीतील एकाकी प्राणी नाही. सर्व प्राणी वनस्पती, विश्वातील सर्व मानव त्यांचे उपासना पंथ ही सर्व सृष्टी निर्मात्याची विविध रुपे आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाप्रति आपले कर्तव्य आहे. रामचरित्र हे कर्तव्य धर्म शिकवणारे चरित्र आहे. त्याचे स्मरण आपल्याला नित्य ठेवावे लागेल.
मागच्या एका दशकात ‘स्किल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांसारख्या सरकारी योजनांमुळे देशात एक ‘स्टार्टअप क्रांती’ झाली. त्यात नुकताच दि. १६ जानेवारी रोजी ‘स्टार्टअप दिन’ साजरा करण्यात आला. या दिनाचे निमित्त साधून ‘डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटरनल ट्रेड’ (डीपीआयआयटी)ने स्टार्टअप्सवर एक अहवाल प्रकाशित केला. त्याचेच या लेखात केलेले आकलन...
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
एकही बेकायदेशीर काम केलं असेल तर मी कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देतो, असे म्हणत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर मंत्री लोढांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
भाजप आमदार अमित साटम यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी ड्रग्ज, गांजा, एमडी, ललित पाटील, दिशा सालियान हे सगळे मुद्दे उपस्थित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अंतिम आठवडा प्रस्ताव अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी विधानसभेत वर्धा जिल्ह्यातील लव्ह जिहाद प्रकरणाला वाचा फोडली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नसून मुलीच्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर कारवाई करण्याची मागणीही राज्य सरकारकडे केली.
यशोमतीताई आपण मंत्री असताना आपण काय केलं? असा सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी केला काँग्रेस आमदार यशोमती ठाकुर यांना केला आहे. बुधवारी सभागृहात अंगणवाडी सेविकांच्या वेतवाढीबद्दल बोलत असताना गिरीष महाजन आणि यशोमती ठाकुर यांच्यात खडाजंगी झाली.
आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व तर चमकलं पण मराठा पर्व मात्र आपण अंधारातच ठेवलं, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान अंतिम आठवडा प्रस्तावावर भाष्य कराताना त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
बुधवारी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना चांगलेच घेरले. जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नांच्या मुद्यावर ते बोलत होते.
महायुती सरकारच्या काळात ड्रग्स प्रकरणी २४ हजारांहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. बुधवारी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
गेल्या १४ दिवसांपासून नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, २६ फेब्रुवारी पासून मुंबईत होणार आहे.
पॉस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारने विशेष सरकारी वकिलाची लवकर नेमणूक करणे आवश्यक आहे. न्याय प्रक्रियेमध्ये विशेष सरकारी वकिलामार्फत आपण हस्तक्षेप करायला हवा असे निर्देश विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. मंगळवारी विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या.