मुंबईतील बांगलादेशींना हद्दपार करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

घुसखोरांसाठी शोधमोहीम हाती

    21-Dec-2024
Total Views | 62
 
cm devendra fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) मुंबईत अवैधरित्या रहाणार्‍या बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे काम चालू करण्यात आले आहे. बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार (डी-पोर्ट) करणार, ही सरकारची भूमिका असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी दिली.
 
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांसह अन्य मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो अभियनामध्ये सहभागी असलेल्या १८० संघटनांतील काही संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २०१०, वर्ष २०११, वर्ष २०१३ आणि वर्ष २०१४ मध्ये या संघटना अर्बन नक्षलवादी असल्याची माहिती केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही.’’
 
धार्मिक स्थळांच्या नियंत्रणाबाबतचा कायदा सर्वांना समान असावा. केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. त्याविषयी सरकारची भूमिका काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, मुळात मंदीर आणि अन्य धार्मिक स्थळांवर नियंत्रणासंदर्भात वेगवेगळे कायदे आहेत. मुस्लिमांकरिता वक्फ आहे. काही ठिकाणी ट्रस्ट आहेत, काही ठिकाणी कायदे केलेले आहेत. त्यामुळे आपण त्याच पद्धतीने सध्या चाललो आहोत. विधानसभा अध्यक्षांनी यानिमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे. त्याचा कायदेशीर अभ्यास करावा लागेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
खातेवाटप कधी?
 
मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन जवळपास आठवडा उलटला तरी खातेवाटप जाहीर झालेले नाही. खातेवाटप नेमक्या कोणत्या कारणांमुळे रखडले आहे, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मंत्र्यांचे खातेवाटप लवकरच होईल. ते दि. २१ डिसेंबरच्या रात्री किंवा दि. २२ डिसेंबर या दिवशी सकाळीही होऊ शकते’’, असे सूचक विधान त्यांनी केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिवस कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

भारतीय जनता पक्षातर्फे "जागतिक योग दिवस" कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121