संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले

    21-Dec-2024
Total Views | 42
Parlaiment

नवी दिल्ली : दि. २५ नोव्हेंबर रोजी सुरू झालेले संसदेचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session ) २०२४, शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले. या अधिवेशनात २६ दिवसांत लोकसभेच्या २० आणि राज्यसभेच्या १९ बैठका झाल्या.

अधिवेशनादरम्यान, लोकसभेत पाच विधेयके सादर करण्यात आली आणि लोकसभेने चार विधेयके आणि राज्यसभेने तीन विधेयके मंजूर केली. अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांनी ‘भारतीय वायुयान विद्या, २०२४’ हे एक विधेयक मंजूर केले. ‘विमान कायदा १९३४’मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमुळे निर्माण झालेल्या अस्पष्टतेचे निराकरण करण्यासाठी हे विधेयक ‘विमान कायदा’ पुन्हा लागू करण्याचा प्रयत्न करते.
 
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या दृष्टिकोनातून लोकसभा आणि राज्य-केंद्रशासित प्रदेश विधानसभांच्या एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या यंत्रणेला प्रभावी करण्यासाठी संविधान (१२०वी) ‘सुधारणा विधेयक, २०२४’ आणि ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयक, २०२४’ ही दोन महत्त्वाची विधेयके दि. १७ डिसेंबर रोजी लोकसभेत सादर करण्यात आली आणि दि. २० डिसेंबर रोजी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आली.

आपल्या देशाने दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त एक ऐतिहासिक टप्पा साजरा केला. प्रस्तावना, तुमचे संविधान जाणून घ्या, संविधानाची निर्मिती आणि त्या दिवशी त्याचा गौरव साजरा करणे या चार विषयांखाली वर्षभर चालणार्‍या उत्सवांची सुरुवात करण्यात आली. यानिमित्त दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृहांचे संसद सदस्य आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भारताच्या राष्ट्रपतींनी ‘भारताच्या संविधानाची निर्मिती आणि त्याचा गौरवशाली प्रवास’ आणि ‘भारताच्या संविधानाची निर्मिती : एक झलक’ या दोन पुस्तकांचे स्मारक नाणे आणि तिकिटाचे प्रकाशन केले.

संविधान स्वीकारण्याच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर साजरा करण्याच्या निमित्ताने दि. १३ डिसेंबर आणि दि. १४ डिसेंबर रोजी लोकसभेत आणि दि. १६ डिसेंबर आणि दि. १७ डिसेंबर रोजी राज्यसभेत ‘भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली. लोकसभेत १५ तास, ४३ मिनिटे चर्चा झाली, ज्यामध्ये ६२ सदस्यांनी भाग घेतला आणि पंतप्रधानांनी त्याला उत्तरे दिली. राज्यसभेत, एकूण १७ तास, ४१ मिनिटे चर्चेत सभागृहात चर्चा झाली, ज्यामध्ये ८० सदस्यांनी भाग घेतला आणि गृहमंत्र्यांनी त्याला उत्तरे दिली.

सीडीएस जनरल रावत यांचा अपघात ‘मानवी चूक’

‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टरचा दि. ८ डिसेंबर २०२१ रोजी कुन्नूर, तामिळनाडूजवळ अपघात झाला. या भीषण अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत हुतात्मा झाले होते. अपघाताच्या तीन वर्षांनंतर जारी करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या अहवालात अपघाताचे कारण ‘मानवी चूक’ असल्याचे म्हटले आहे. या भीषण अपघातात जनरल रावत यांच्याशिवाय त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि सशस्त्र दलाचे अनेक जवानही हुतात्मा झाले होते.

१९८४ सालच्या दंगलींची आठवण

ओडिशातील भाजपच्या महिला खा. अपराजिता सारंगी यांनी काँग्रेस खा. प्रियांका गांधी-वाड्रा यांना एक बॅग दिली. अपराजिता सारंगी म्हणाल्या की, “प्रियांका गांधी संसदेत नवीन बॅग आणत आहेत, म्हणून मी त्यांना एक बॅग भेट देण्याचा विचार केला. त्यानुसार एक बॅग भेट दिली, ज्यावर ‘१९८४’ लिहिले आहे. रक्ताचे थेंबदेखील आहेत. जे ‘१९८४’च्या दंगलीची आठवण करून देतात.”

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121