विदर्भाच्या प्रश्नांवरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी जयंत पाटलांना घेरलं!

    20-Dec-2023
Total Views | 55

Pawar-Fadanvis-Patil


नागपूर :
बुधवारी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना चांगलेच घेरले. जयंत पाटलांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नांच्या मुद्यावर ते बोलत होते.
 
विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली नाही त्यामुळे एवढं लिमिटेड न राहता एक महिना अधिवेशन घ्यावं असे आम्ही म्हटले होते असे जयंत पाटील म्हणाले. यावर बोलण्यासाठी अजित पवार उठू लागल्यावर आधी कोणी बोलायचं हे बसून ठरवा, असे जयंत पाटील म्हणाले. त्यानंतर "बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं अंडरस्टँडींग खुप चांगलं आहे. कसं कुणी बोलायचं ते आम्हाला कळतं," असे उत्तर अजित पवारांनी दिले.
 
पुढे ते म्हणाले की, "काल कामकाज सल्लागार समितीमध्ये वेळ कमी होता. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला. त्यावेळी विरोधी पक्षाला कळलं होतं की, अधिवेशन संपणार आहे. त्यांनी अध्यक्षांना सांगायला हवं होतं की, आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. इकडे वेगळं बोलायचं आणि बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा," असा टोलाही त्यांनी लगावला.
 
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "म्हातारी मेल्याचं दु:ख आहेच पण म्हातारी मेल्याच्या दु:खापेक्षा काळ सोकावतो याचं दु:ख अधिक आहे. विरोधी पक्षाला विदर्भातच येऊन विदर्भाचा विसरच पडावा याचं दु:ख अधिक आहे. पण काही हरकत नाही आम्ही विदर्भाला विसरणार नाही," असे ते म्हणाले.



अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिवस कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

भारतीय जनता पक्षातर्फे "जागतिक योग दिवस" कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121