'मद्य ही ईश्वराने दिलेली देणगी..' ख्रिश्चनांच्या सर्वात मोठ्या धर्मगुरूंचा संदेश!

    27-Jan-2024
Total Views |
Pope Francis

नवी दिल्ली : ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी मद्य ही ईश्वराने दिलेली देणगी आहे आणि तेच खऱ्या आनंदाचे स्रोत असल्याचे म्हटले आहे. ख्रिश्चनांचे धार्मिक शहर असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी हे वक्तव्य केले आहे. याआधीही त्यांनी मद्यपानाच्या समर्थनार्थ अनेक विधाने केली आहेत.

पोप फ्रान्सिस यांनी हे विधान एका समारंभात केले ज्यामध्ये इटलीतील अनेक वाइन उत्पादक उपस्थित होते. इटालियन शहर वेरोनाचे बिशप डोमेनिको पोम्पिली यांनी हा समारंभ आयोजित केला होता. दरवर्षी एप्रिलमध्ये व्हेरोना येथील वाईन स्पर्धेपूर्वी हा महोत्सव आयोजित केला जातो.

या सभेत पोप फ्रान्सिस म्हणाले, “पोप मद्याच्या नशेत बोलत असल्याचा भास होईल. वाईन, जमीन, कृषी कौशल्ये आणि व्यावसायिक कौशल्य या देवाने दिलेल्या देणग्या आहेत. निर्मात्याने ते आम्हाला दिले आहे कारण आम्ही त्यांना संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणाने आमच्या आनंदाचा खरा स्रोत बनवतो.”

पोप फ्रान्सिस यांनी वाइन निर्मात्यांना त्याच्याशी संबंधित नैतिक जबाबदारी पार पाडण्यास आणि मद्यपानाच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन देण्यास सांगितले. आणखी एक ख्रिश्चन धर्मगुरू, डोमेनिको पोम्पेली, कार्यक्रमाचे आयोजक सेंट पॉल म्हणाले की,वाइनचा ग्लास संयमात वापरल्यास प्रोत्साहन आहे.

पोप फ्रान्सिस यांनी यापूर्वीही मद्याचे समर्थन केले आहे. २०१६ मध्येही त्यांनी मद्याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते. त्यांनी मद्याला लग्न समारंभाचा महत्त्वाचा भाग म्हटले. ते म्हणाले होते, "नवविवाहित जोडप्याच्या लग्नात मद्य नसेल , तर त्यांना लाज वाटते, जणू चहा पिऊन लग्नाचा सोहळा पार पडला."

इटली हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वाइन उत्पादक देश आहे. गेल्या काही वर्षांपासून युरोपातील मद्यांच्या बॉटलवर आरोग्याच्या समस्यांबाबत इशारा देण्याची मागणी युरोपीय संघाकडून करण्यात येत आहे. मात्र, इटलीतील वाईन उत्पादकांनी याला विरोध केला आहे. या वाईन उत्पादकांनी पोप फ्रान्सिस यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121