"दहशतवाद्यांचा धर्म बघून दुःखी होऊ नका"; गृहमंत्र्यांनी अखिलेश यादवांना सुनावलं!

    29-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (Amit Shah to Akhilesh Yadav) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाषण करतेवेळी सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या ऑपरेशन महादेवसंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. तसेच त्यात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांचा नावांसह उल्लेख करत ते पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी असल्याचे सभागृहात स्पष्ट केले. चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि गृहमंत्र्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.


दहशतवाद्यांचा धर्म बघून दुःखी होऊ नका

ऑपरेशन सिंदूर राबवून मोदींनी दहशतवाद्यांच्या आकांचा बदला घेतला आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचाही खात्मा केला आहे." यावेळी वारंवार अडवत असलेल्या अखिलेश यादवांनी केलेल्या टिप्पणीवर प्रश्नार्थक स्वरात अमित शाहनी विचारलं की, "पाकिस्तानशी तुमचे बोलणं होतं का?" यानंतर सभागृहात झालेल्या गोंधळात गृहमंत्री म्हणाले, "मी तुम्हाला नाव, ठिकाण, मिनिट आणि सेकंदही सांगेन. जेव्हा ही माहिती सभागृहात दिली जाईल तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आनंदाची लाट येईल अशी मला अपेक्षा होती. पण विरोधी पक्षांचे चेहरे फिके पडले. आनंदाऐवजी निराशा दिसून आली. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? दहशतवादी मारले गेलेत तुम्हाला त्याचाही आनंद नाही का? अखिलेश जी... बसा, माझं पूर्ण उत्तर ऐकून घ्या. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. दहशतवाद्यांच्या धर्म बघून दुःखी होऊ नका."

गृहमंत्र्यांनी पुढे म्हटले की, विरोधकांचा दृष्टिकोन दुर्दैवी आहे. जेव्हा देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत यशस्वी होतो तेव्हा राजकीय मतभेदांपेक्षा वर जाऊन एकता दाखवली पाहिजे. ते उपहासात्मकपणे म्हणाले, "जेव्हा दहशतवादी मारले जातात तेव्हा काही लोकांचे चेहरे का खिन्न होतात? तुम्हालाही हे आवडत नाही का?"




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\