नवी दिल्ली : (Amit Shah Hits Out At P Chidambaram) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत "पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचा काय पुरावा आहे?" असा वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सुरु असलेल्या चर्चेदरम्यान तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
पाकिस्तानला वाचवून तुम्हाला काय मिळेल?
"पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे ऐकून विरोधकांना आनंद होईल अशी मला अपेक्षा होती. पण विरोधी पक्षांचे चेहरे फिके पडले. आनंदाऐवजी निराशा दिसून आली. हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? काल तुम्ही विचारत होता की दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा काय पुरावा आहे. जबाबदारी आमची आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मला विचारायचे आहे की तुम्ही सरकारमध्ये असताना जबाबदारी का घेतली नाही. काल देशाचे माजी गृहमंत्री चिदंबरम म्हणाले की दहशतवादी पाकिस्तानातून आले याचा पुरावा काय आहे, संसदेत चर्चा होणार असताना तुम्ही हे कधी उपस्थित केले. चिदंबरमसाहेब तुम्हाला काय म्हणायचे आहे, पाकिस्तानला वाचवून तुम्हाला काय मिळेल?," असाही सवाल अमित शाह यांनी केला.
Union Home Minister Amit Shah tears into P. Chidambaram’s shocking statement:
“Yesterday, former Home Minister Chidambaram raised a question about the proof of the terrorists coming from Pakistan… Whom does he want to save? What will he gain by defending Pakistan?
भारत दहशतवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांना सहन करणार नाही.
अमित शाह म्हणाले, "जेव्हा संसद दहशतवादावर चर्चा करण्यासाठी तयार होती, तेव्हा चिदंबरम उभे राहिले - भारतासाठी नाही तर पाकिस्तानसाठी. आमच्याकडे पुरावे आहेत, दोन दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील मतदार ओळखपत्र मिळाली आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तानात बनवलेल्या चॉकलेट जप्त करण्यात आली तरीही, तरीही माजी गृहमंत्र्यांनी विचारले की, ते पाकिस्तानचे होते याचा पुरावा काय आहे? हे लज्जास्पद आहे. भारत दहशतवाद्यांविषयी सहानुभूती बाळगणाऱ्यांना सहन करणार नाही.
काय म्हणाले होते पी. चिदंबरम?
द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत पी. चिदंबरम यांनी काही प्रश्न उपस्थित करतेवेळी म्हटले की, "दहशतवादी हल्ल्यानंतर एनआयएने केलेल्या कामाचा खुलासा करण्यास सरकार तयार नाही. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख एनआयएने पटवली आहे का? ओळख पटवली असेल तर ते कुठून आले होते? पाकिस्तानातूनच आले कशावरून? भारतातच तयार झालेले दहशतवादी नसतील हे कशावरुन? दहशतवादी पाकिस्तानातून आले होते याचा पुरावा काय?" असे प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केले आहेत.
अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
सत्तेत असताना दहशतवादी हल्ल्यांना लष्करी बळाचा वापर करून प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरल्याबद्दल शाह यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारांवर टीका केली. ते म्हणाले, "२००५ ते २०११ या काळात २७ दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळी काँग्रेस सरकारने काय केलं? त्यांनी फक्त पाकिस्तानला कागदपत्रे पाठवली"
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\