लष्कराचे हातफ बांधण्याची काँग्रेसची जुनीच खोड! - तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरही चीनयुद्धात नेहरूंनी टाळला वायुदलाचा वापर

    29-Jul-2025
Total Views |

मुंबई, संसदेत सोमवार आणि मंगळवारी झालेल्या ऑपरेशन सिंदूरफवरील वादळी चर्चेमध्ये मोदी सरकारने भारतीय वैमानिकांचे हात बांधल्याचा आरोप लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. पाकिस्तानमध्ये जाऊनही त्यांच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याची परवानगी सरकारने दिली नाही, असेही राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान म्हटले. मात्र, लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य न देण्याच्या जुन्याच परंपरेचा राहुल गांधी यांना विसर पडलेला दिसतो.

वास्तविक, १९६२च्या भारत-चीन युद्धामध्ये वायुदलाचा वापर करण्याबाबत अनेक लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञांनी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सूचित केले होते. मात्र, वायुदलाच्या वापराला नेहरुंनी परवानगी दिली नाही. मे १९६० मध्ये नेहरु सरकारने सैन्याला हिमालयातील भारतीय लष्कराच्या छावणीजवळ धावपट्टीसाठी जागा शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, ऑक्टोबर १९६० मध्ये ङ्गलाईन ऑफ कंट्रोलफच्या जवळपास लढाऊ विमानांची उड्डाणे थांबवण्याच्या सूचनाही नेहरू सरकारनेच केल्या. लढाऊ विमानांच्या उड्डाणावर असलेली ही बंदी युद्धाच्या काही काळ आधी १९६१ मध्ये उठवण्यात आली होती. तसेच, चीनबरोबर केलेल्या ङ्गपंचशील कराराफलाही त्यांच्या सरकारमधील मंत्री आणि अधिकार्यांचा विरोध होता. मात्र, या विरोधाकडे दुर्लक्ष करून नेहरू यांनी चीनबरोबर पंचशील करारफ केला होता. त्यामुळे सातत्याने चीनविषयी ममत्त्व भाव बाळगल्यानेच देशाचे मोठे नुकसान नेहरू सरकारच्या काळात झाल्याचे कित्येक अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

शत्रूला कमी लेखण्याची नेहरुंकडून चूक

- चीनच्या नव्या धोक्याबाबत सरदार पटेलांनी सजग करूनही नेहरुंचे दुर्लक्ष

- लष्करप्रमुख करिअप्पांनी चीन भारतावर हल्ला करु शकतो, या वर्तविलेल्या शक्यतेकडेही डोळेझाक करुन, उलट हल्ला कोण करणार, हे सांगणे लष्करप्रमुखांचे काम नाही,फ असे सुनावत नेहरुंकडून करिअप्पांचा अपमान

- गुण आणि कौशल्य यांना बगल देऊन निष्ठावंतांना प्रशासनातील मोठी पदे नेहरुंकडून बहाल

नेहरुंची लपवाछपवी

ऑपरेशन सिंदूरफवरील चर्चेदरम्यान बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नेहरुंचे एक वाक्य उद्धृत केले. खर्गे म्हणाले की, ङ्गङ्घचीनच्या युद्धानंतर १९६२ साली विशेष अधिवेशन घेऊन जनतेपासून काहीही लपविता कामा नये, असे नेहरु म्हणाले होते.फफ पण, वास्तवात चीन युद्धाशी संबंधित कित्येक पैलू कालांतराने समोर आले. अमेरिकेने भारताला युद्धात लढाऊ विमानांची मदत करावी, म्हणून नेहरुंनी राष्ट्राध्यक्ष केनेडी यांना पत्र लिहिल्याचा दावाही माजी सीआयए अधिकार्याने एका पुस्तकात केला होता. तसेच भारत-चीन युद्धावेळी, भारतीय बाजूचे नुकसान हे तुलनेने कमी झाल्याचे दावेदेखील त्यावेळी करण्यात आले. चीन युद्धातील अपयशांची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेला हेंडरसन ब्रूस-भगत अहवालफही सुरक्षेच्या कारणास्तव सार्वजनिक करण्यात आला नाही. पण, टीकाकारांच्या मते, हा अहवाल चीन युद्धात भारताच्या कामगिरीबद्दल, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाच्या भूमिकेवरही प्रश्चचिन्ह उपस्थित करणारा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.