सुलेमान, अफगान आणि जिब्रानला सुरक्षादलांनी ठोकले; ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी

    29-Jul-2025   
Total Views | 41

नवी दिल्ली :  सुरक्षा दलांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये पहलगाम हल्ला करणारे सुलेमान, अफगान आणि जिब्रान हे तिन्ही दहशतवाद्यांना ठोकण्यात आले आहे, असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.

‘ऑपेरशन सिंदूर’वरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी झाल्याची माहिती देशास दिली. ते म्हणाले, भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू – काश्मीर पोलिसांनी ‘ऑपरेशन महादेव’ राबवून पहलगाम हल्ला घडविणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार केकेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड कमांडर सुलेमान उर्फ फैसल, लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड दहशतवादी अफगाण आणि लष्कर-ए-तोयबाचाच आणखी एक धोकादायक दहशतवादी जिब्रान याचा समावेश होता. हे तिघेही दहशतवादी बैसरन खोऱ्यात नागरिकांच्या हत्येत सहभागी होते. सुरक्षा दलांनी केलेल्या कठोर परिश्रमानंतर त्यांना ठार करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात ‘ऑपरेशन महादेव’ची सविस्तर माहिती दिली. ते म्हणावे, पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने सुरक्षादलांची उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांना कोणत्याहील परिस्थितीत दहशतवाद्यांना पाकमध्ये परत जाता येऊ नये, आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, भारतीय लष्कर, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनएआयए), सीआरपीएफ आणि जम्मू – काश्मीर पोलिसांनी आपल्या कारवाईस सुरुवात केली होती. त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोद्वारे (आयबी) २२ मे रोजी दाचिगाम क्षेत्रात दहशतवादी लपल्याचे समजले. या माहितीची खात्री करण्यासाठी २२ मे ते २२ जुलै या कालावधीत दहशतवाद्यांकडे असलेल्या चिनी बनावटीच्या उपकरणांचे सिग्नल्स टिपण्यासाठी सुरक्षा दलांचे जवान कार्यरत होते. अखेर २२ जुलै रोजी हे तेच दहशतवादी असल्याची खात्री झाली आणि त्यानंतर सुरक्षादलांनी ‘ऑपरेशन महादेव’ राबवून त्यांचा खात्मा केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली.

अशी केली दहशतवाद्यांची खात्री

दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी बहुस्तरीय रचनेचा वापर केल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना एनआयएने अटक केली आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांना दाखवून त्यांच्याकडून ओळख पटवून घेण्यात आली. मात्र, केवळ एवढ्यावरच थांबण्याचा निर्णय घेतला नाही. घटनास्थळावरी काडतुसांची चंदीगढ येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली होती. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेली एक अमेरिकन आणि दोन एके ४७ रायफलसोबत हा अहवाल पडताळून पाहण्यात आला. त्यासाठी या रायफल प्रयोगशाळेत चालवून पाहण्यात आल्या. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर २८ जुलै रोजी मारले गेलेले दहशतवादी हे पहलगाम हल्ला घडविणारेच होते, असे सिद्ध झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

दहशतवाद्यांचा धर्म पाहून दु:खी होऊ नका – अखिलेश यादव यांना टोला

मला अपेक्षा होती की जेव्हा विरोधी पक्ष दहशतवाद्यांना मारल्याची बातमी ऐकेल तेव्हा विरोधी पक्षात आनंदाची लाट येईल, पण त्यांचे चेहरे दुःखाने भरलेले होते. दहशतवादी मारले गेल्याने त्यांना आनंदही नाही. असे म्हणत शाह यांनी सपा खासदार अखिलेश यादव यांना सांगितले- अखिलेशजी, दहशतवाद्यांचा धर्म पाहून दुःखी होऊ नका.

जम्मू – काश्मीरची स्थिती कलम ३७० काढल्यावर सुधारलीच

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले- २००४-१४ या काळात सोनिया गांधी – मनमोहन सिंग सरकार होते. तर २०१४ नंचर मोदी सरकार आहे. तुलना केल्यास मोदी सरकारच्या काळात दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्के घट तर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात १२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारास १० हजार लोक सहभागी होत असता, आता मात्र तसे होत नाही. फुटीरतावादी नेते आणि फुटीरतावादी संघटनांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून बंद आणि दगडफेक बंद झाली आहे. त्यामुळे कलम ३७० काढल्यानंतर जम्मू – काश्मीरमधील स्थिती सुधारली असल्याचे स्पष्ट आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

बीडीडीचा ‘तो’ कार्यक्रम अन् मोतीलाल नगरच्या आशा पल्लवित! ५५६ कुटुंबांना वेळेत घराच्या किल्ल्या मिळाल्याने जनमताचा रेटा पुनर्विकासाकडे

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वरळीच्या बीडीडी चाळीतील ५५६ कुटुंबांना त्यांच्या नव्या घराच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. ही घटना मुंबईच्या अनेक प्रलंबित पुनर्विकास प्रकल्पांच्या आणि तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवित करणारी ठरली असून गोरेगावातील मोतीलाल नगरसारख्या वसाहतींत जनमताचा रेटा आता मोठ्या प्रमाणात म्हाडाच्या, पर्यायाने पुनर्विकासाच्या बाजूने झुकताना दिसत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121