मरी आई माता पावली ! बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणचा बुक्कीत टेंगुळ विजय
06-Oct-2024
Total Views |
मुंबई : बिग बॉस मराठीच्या ५ व्या सीझनचा निकाल ६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला आहे. या ग्रँड फिनालेमध्ये खेडेगावातील नावारूपाला आलेला रिल्सस्टार सूरज चव्हाणला विजयी घोषित केले आहे. तर गायक अभिजीत सावंतला उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे. सूरच्या विजयामागे आई मरी माता होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
बिग बॉस मराठी सीझन ५ व्याचा विनर ट्रॉफीवर सूरजने आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या आठवड्यापासून त्याचे वागणे, बोलणे या सगळ्याचीच चर्चा होती. बिग बॉसच्या या सीझनमध्ये सूरचा प्रामाणिक खेळ दिसला होता. यावेळी बिग बॉसने सूरज चव्हाणचे अनेकदा कौतुकही केले होते. त्याने या घरातील अनेक टास्क हे आपल्या दमावर जिंकले होते. तो जसा आहे तसाच या बिगबॉसच्या घरात होता. त्याच्या साध्यापणाला आणि भोळ्यापणाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.