शिवसेना आमदार अपात्रता निकाल: कायद्याला धरुन निकाल दिला जाईल; राहूल नार्वेकर यांचे आश्वासन

    10-Jan-2024
Total Views | 41
narvekar shinde thakrey 
 
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राहूल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना आजच्या निकालात सर्वांना न्याय मिळेल अस म्हटल आहे.
 
"निकाल निश्चितपणे न्यायाला धरुन असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी जे निकष ठरवले आहेत त्यानुसारच निकाल दिला जाईल. संविधानाचे सर्व निकष पाळले जातील. संविधानाच्या १० व्या परिशिष्टाचा विचार केला जोईल व या निर्णयात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत असे आश्वासन देतो" अस राहूल नार्वेकरांनी म्हटल आहे.
 
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर हिवाळी अधिवेशनावेळी मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते. राहूल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला संध्याकाळी चार वाजता यावर निकालाचे वाचन करणार आहेत. या निकालावर शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाते राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121