संसदेचे हिवाळी अधिवेशन, रविवारी सर्वपक्षीय बैठक

    19-Nov-2024
Total Views | 45
Winter Session

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या ( Winter Session ) पूर्वसंध्येस २४ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. अधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी त्याची माहिती दिली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान सभागृहाच्या (जुने संसद भवन) सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार वक्फ दुरुस्ती विधेयक मांडून ते मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या वक्फ दुरुस्ती विधेयक सभागृहाच्या संयुक्त समितीकडे आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी सरकार आणि विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पक्षातर्फे जागतिक योग दिवस कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

भारतीय जनता पक्षातर्फे "जागतिक योग दिवस" कल्याण पश्चिमध्ये उत्साहात साजरा माजी आमदार नरेंद्र पवार 30 हून अधिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी

निरोगी शरीर आणि स्वस्थ मनाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून देणाऱ्या योग म्हणजेच योगाभ्यासानिमित्त संपूर्ण जगभरात 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे निमित्त साधून भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पाचही मंडलांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या या मंडलांमध्ये झालेल्या 30 हून अधिक कार्यक्रमांमध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121