अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणीत वाढ! आर्थिक गुन्हे शाखेकडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी

    28-May-2025
Total Views |
 
Dino Morea
 
मुंबई : मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांची सलग तिसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत आहे. दिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला.
 
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवार, दि. २६ मे रोजी अभिनेता दिनो मोरिया याची चौकशी केली. यावेळी जवळपास ८ तास त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर मंगळवार, २७ मे रोजीदेखील तो चौकशीसाठी हजर झाला होता. आता सलग तिसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? -  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
 
मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात आतापर्यंत १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम याचे अभिनेता दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचे आढळल्याने त्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. तसेच या तिघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यादृष्टीने त्यांची चौकशी सुरु आहे.
.