मुंबई: श्रीलंका सरकारने अखेर अदानी समुहाला पवन ऊर्जा प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. आता अदानी समूह श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तयारी सुरू करत असल्याची माहिती मिळाली आहे.मन्नार व पूनेरीन या श्रीलंकेतील ठिकाणी हा प्रकल्प होणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी श्रीलंका सरकारने निगोसिऐशन समितीदेखील तयार केली होती.
सरकारने या प्रकल्पाला मंजूरी दिल्यावर आता प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी श्रीलंका सरकार व अदानी ग्रीन एनर्जी यांच्यात हा Purchase Power Agreement (PPA) झालेले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ४४२ दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प श्रीलंकेत सुरू करण्यासाठी कंपनीला परवानगी मिळाली होती. हा प्रकल्प ४८४ गिगावॉट क्षमतेचा असणार आहे.
पीपीए करार २० वर्षासाठी करण्यात आलेले आहे. या बातमीनंतर अदानी समुहाच्या सममाग०.२५ टक्क्यांनी वाढ झाली होती.या व्यतिरिक्त अदानी पोर्टसला इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने ५५३ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज कंटेनर टर्मिनल बांधण्यासाठी दिले होते.