केंद्राकडून विंडफॉल कर दरात मोठी कपात, जाणून घ्या विंडफॉल कर म्हणजे काय?
17-Aug-2024
Total Views | 40
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेल्यावरील विंडफॉल करात मोठी कपात केली आहे. कच्च्या तेलावरील विंडफॉल कर ४,६०० रुपये प्रति टनावरून २,१०० रुपये प्रतिटन केला आहे. यानिर्णयामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विंडफॉल कर कपातीचा निर्णय शनिवारपासून लागू करण्यात आला आहे.
विंडफॉल कर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्काच्या स्वरूपात आकारला जातो. डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनांच्या निर्यातीवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क 'शून्य' वर कायम ठेवण्यात आला आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, दि. १७ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. आता पेट्रोलियम पदार्थांवरील विंडफॉल कर कमी करून २१०० रुपये प्रति टन केला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने दि. ०१ जुलै २०२२ रोजी पहिल्यांदा विंडफॉल प्रॉफिट टॅक्स लादला होता. यामुळे ऊर्जा कंपन्यांच्या असाधारण नफ्यावर कर लावणाऱ्या देशांपैकी एक म्हणून देश गणला जाऊ लागला. मागील दोन आठवड्यांतील सरासरी तेलाच्या किमतींवर आधारित दर पंधरवड्याने नव्याने ठरविला जातो.
विंडफॉल कर नेमका काय असतो
सरकारी महसूल वाढविण्याकरिता विंडफॉल कर अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच, विंडफॉल करामुळे सरकारी इतर क्षेत्रांमध्ये महसूल वाढवू शकतो. वस्तूंच्या किमती कमी होतात आणि देशात मर्यादित पुरवठा असलेल्या वस्तूंच्या किमतीत घट होऊ शकते. विशेष म्हणजे विंडफॉल टॅक्समुळे इंधन आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत.