कच्च्या तेलावरील विंडफॉल करात मोठी कपात ' इतक्या ' किंमतीने घसरण

५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर

    15-Jun-2024
Total Views |

Windfall Tax
 
मुंबई: सरकारने पेट्रोलियम व कच्च्या तेलाच्या उत्पादनावरील विंडफॉल कर (Windfall Tax) मध्ये मोठ्या प्रमाणात घट केली आहे. सरकारने शुक्रवारी या संदर्भात आपले निवेदन स्पष्ट केले आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की करात कपात करत ५२०० प्रति मेट्रिक टनावरून किंमत कमी करत ३१५० रुपयांवर कमी करण्यात आली आहे.
 
जुलै २०२२ पासून भारताने कच्च्या तेलाच्या उत्पादनास सुरुवात केली आहे. गॅसोलिन, विमान इंधन, डिझेल यांच्या उत्पादनात वाढ केली आहे. देशांतर्गत उत्पादन केल्यामुळे यांचा प्रभाव थेट किंमतीत पडतो. तेलाच्या अनिश्चित वाढ व घसरण पाहता अनेकदा तेल कंपन्या मोठ्या संख्येने अनैसर्गिक नफा कमवतात. या नफ्यावर सरकार लगाम लावत यांच्याकडून विंडफॉल कर आकारते. नेहमीच्या कच्च्या तेलाच्या किंमतीची पाहणी होत सरकार वेळोवेळी करात बदल करत असते.