आला हिवाळा आरोग्य सांभाळा

    02-Dec-2024
Total Views | 42
Winter Season
 
हिवाळी सरली की गुलाबी थंडी सूर्याला धुक्याच्या मुलायम आवरणात हळूवार कुशीत घेते. सकाळी उठायचे म्हटले तरी शरीर परवानगी देत नाही की मनाला थंडीची चढलेली झिंगही उतरता उतरत नाही. पण, गुलाबी थंडीच्या कोमलपणाला भुलून न जाता, त्वचेची विशेष काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा थंडीच्या काळात कोमेजणार्‍या त्वचेची योग्य निगा कशी राखायची, ते आज जाणून घेऊ.
 
 
हिवाळी सरली की गुलाबी थंडी सूर्याला धुक्याच्या मुलायम आवरणात हळूवार कुशीत घेते. सकाळी उठायचे म्हटले तरी शरीर परवानगी देत नाही की मनाला थंडीची चढलेली झिंगही उतरता उतरत नाही. पण, गुलाबी थंडीच्या कोमलपणाला भुलून न जाता, त्वचेची विशेष काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे. तेव्हा थंडीच्या काळात कोमेजणार्‍या त्वचेची योग्य निगा कशी राखायची, ते आज जाणून घेऊ.
 
मॉश्च्यूरायसिंग क्रीमचा वापर
 
थंडीमध्ये त्वचेचा बाह्य थर अधिकच कोरडा पडतो. मग त्वचा शुष्क असो वा तेलकट. मॉश्च्यूरायसिंग क्रीम वापरणे हा त्यावरील सर्वात साधा व उत्तम उपाय. फक्त चेहराच नाही, तर हातापायांवरही क्रीम लावणे थंडीच्या दिवसांत गरजेचे आहे. तेलयुक्त, त्वचेला सूट होईल, असे मॉश्च्यूरायसिंग क्रीम किंवा लोशन वापरणे उत्तम. रोज रात्री झोपताना तेल मसाज केल्यास क्लिझिंग मिल्कने चेहरा स्वच्छ धुतल्यास त्वचा शुष्क पडत नाही.
 
सनस्क्रीन लोशन विसरू नका
 
कुडकुडणार्‍या थंडीत सूर्याची किरणे अंगावर झेलायला सर्वांनाच आवडतात. पण, त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे सनस्क्रीन क्रीमचा वापर फक्त उन्हाळ्यातच होतो, असे नाही. घरातून बाहेर पडायच्या 15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जेणेकरून ते त्वचेमध्ये शोषले जाईल.
 
कोमट पाण्याने अंघोळ करा
 
हिवाळ्यात थंडावा दूर करण्यासाठी गरमागरम पाण्याने अंघोळ केली जाते. पण, ते चुकीचे आहे. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर, जरी तात्पुरते ऊबदार वाटत असले, तरी काही वेळानंतर त्वचा आणखीन कोरडी पडते. म्हणूनच अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात तेलाचे थेंब टाकावे, जेणेकरून त्वचा शुष्क पडणार नाही.
 
साबण टाळा
 
ज्यांची त्वचा शुष्क आहे, त्यांनी साबणाचा वापर टाळावा किंवा मॉश्च्यूरायसिंग साबणांचा वापर करावा. साबणामुळे त्वचा अधिक कोरडी पडते. तेव्हा टॉमेटोचे ज्यूस हाताला लावावे, लिंबू किंवा हळदयुक्त साबणाचा किंवा नैसर्गिक द्रव्ययुक्त क्रीमचा वापर करावा. त्यामुळे त्वचा मुलायम होते व कोरडीही पडत नाही. थंडीमध्ये त्वचा स्क्रब करणेही फायद्याचे ठरू शकते. स्क्रॅबिंगमुळे त्वचेला तजेला तर येतोच, पण त्याचबरोबरीने त्वचेची छिद्रही मोकळी होतात.
 
केसांची काळजी
 
केसांचीही हिवाळ्यात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कोरडे केस असल्यास हेअर ड्रायरचा वापर करणे टाळावे. अंघोळ करताना एकदम कडक पाणी अंगावर व केसांवर घेणे टाळावे, कारण त्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते व केसही खराब होतात. टॉवेलनेच केस पुसावेत आणि केसांना तेल लावून मॉलिश करावे.
 
ओठांची, तळव्यांची घ्या विशेष काळजी
 
थंडी सुरू झाली की सर्वप्रथम त्याची जाणीव होते ती ओठांना. ओठांमध्ये ओलेपणा साठवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे ओठ कोरडे पडतात, फुटतात, कधीकधी रक्तही येते. तशीच स्थिती असते तळपायांची. तळपायांना भेगा पडतात, इन्फेक्शनही होऊ शकते. अंघोळीच्या आधी कोमट पाण्यात गुलाबपाण्याचे काही थेंब टाकावे व पाय अर्धा तास पाण्यात बुडवून ठेवावे. तसेच, लिंबाच्या ज्यूसमध्ये साखर टाकून त्वचेवर घासल्यास, त्वचेचा शुष्कपणाही कमी होण्यास मदत होते. व्हॅसलिन किंवा तत्सम लीपक्रीम किंवा लीपबामचा वापर करणे उत्तम.
 
ऊबदार कपडे वापरा
 
थंडी आली की स्वेटर, स्वेटशर्ट व इतर ऊबदार, लोकरीचे कपडे कपाटातून डोके वर काढतात. नेहमीच्या कपड्यांच्या वर जर हे कपडे घालणे शक्य नसेल, तर शर्टाच्या आत ते जरूर घालावे. ग्लोव्ज, मोज्यांचाही वापर करावा. थंडीमध्ये ओले कपडे, ओले मोजे घालणे टाळावे.
 
जास्त पाणी प्या
 
उन्हाळ्याप्रमाणे थंडीमध्येही शरीर डीहायड्रेट होऊ शकते. अर्थात, शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे पाण्याचे अधिकाधिक सेवन करणे त्वचेला तुकतुकीत ठेवण्यासाठीही फायदेशीर ठरते. आपण हर्बल चहाचाही शरीर थंड ठेवण्यासाठी वापर करू शकतो.
अग्रलेख
जरुर वाचा
पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121