एरव्ही आपण असे वाचतो की, कामवासना आटोक्यात ठेवावी, त्यात वाहत जाऊ नये आणि इथे तर रेतस वेगाचे धारण केल्याने शारीरिक-मानसिक त्रास होतात आणि आवेगाचे धारण करू नये, असे म्हटले आहे. यातील कुठले बरोबर, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
रोग मुख्यतः दोन प्रकारचे असतात. संसर्गजन्य म्हणजेच (जे एका रुग्णापासून इतरांना बाधित करू शकते.) यामध्ये दुषित अन्न, पाणी, हवा इत्यादीशी थेट संपर्क किंवा या दुषित घटकांशी ज्या व्यक्तींचा संपर्क आला आहे. (मग त्यांना स्वतःला रोग झाला असो किंवा नाही) अशांशी संपर्क येऊन जे रोग ग्रस्त होतात, ते म्हणजे संसर्गजन्य रोग. जर प्रतिकारशक्ती चांगली असली, तर संसर्गजन्य व्याधि चटकन जडत नाहीत आणि झाल्यावरही त्याची प्रखरता, तीव्रता सौम्य स्वरुपाची असते. दुषित घटकांशी संपर्क आल्याने ती व्यक्ती ‘कॅरिअर’ म्हणजे केवळ ते दुषित घटक वाहणारा वाहक राहते आणि व्याधि झालीच तर सौम्य प्रमाणात होतो.
दुसरा रोग समूह म्हणजे असंसर्गजन्य रोग यामध्ये चुकीचे राहणीमान (आहार-विहार-आचार-विचार इ.) शारीरिक कष्ट करण्याची अनिच्छा, व्यसनाधीनता, परिसरातील प्रतिकूल बदल, पर्यावरणाचा होणारा परिणाम आणि अनुवंशिक कारणांमुळे असंसर्गजन्य रोग उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने येणारे व्याधि म्हणजे कळसह (उच्च रक्तदाब) रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे स्थौल्य व अतिरिक्त वजनवृद्धि रक्तातील कोलेस्ट्रोल व अन्य घटकांची वाढ इ. सर्व असंसर्गजन्य रोगांमधील आहेत.
असंसर्गजन्य रोग होण्यामागील सगळ्यांत मोठे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. यामध्ये चुकीचे दिनक्रमाचे वेळापत्रक (उशिरा उठणे, न्याहारी न करणे, मिळेल ते जमेल तेव्हा हवे तेवढे खाणे, व्यायाम करण्यास हलगर्जीपणा करणे, अतिरिक्त भावनिक-मानसिक ताण, नकारात्मक विचार सतत करणे, रात्री-अपरात्री व्यायाम-व्यसने, जागरण इ. इ.) यामध्ये शारीरिक आवेगांचे अनावश्यक असताना धारण करणे, थांबविणे, शरीरातच थोपवून ठेवणे हेदेखील समाविष्ट असतात. मागील दहा लेखांमधून विविध अधारणीय वेगांबद्दल आपण वाचलेत, अशाच अजून वेगाबद्दल ’झहूीळलरश्र णीसश’ बद्दल जाणून घेऊया.
याला ‘रेतस वेगावरोध’ किंवा ‘वेगतिधारण’ असे म्हणतात. ‘रेतस’ म्हणजे शुक्र किंवा कामवासना. एरव्ही आपण असे वाचतो की, कामवासना आटोक्यात ठेवावी, त्यात वाहत जाऊ नये आणि इथे तर रेतस वेगाचे धारण केल्याने शारीरिक-मानसिक त्रास होतात आणि आवेगाचे धारण करू नये, असे म्हटले आहे. यातील कुठले बरोबर, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
वयात येताना स्त्री व पुरुष दोघांमध्ये काही बदल होत असतात. हे बदल शारीरिक तर असतातच, त्याचबरोबर विचारांमध्ये प्रगल्भता, स्वत्वाची जाणीव, भावनिक स्वातंत्र्य व स्वतःबद्दल तसेच इतरांबद्दल मते आणि भान आपसूक निर्माण होते. आकर्षण हे विरुद्ध लिंगांच्या (बहुतांशी वेळेस) व्यक्तीबद्दल जागृत होते. थोडे प्रौढ झाल्यावर, स्वावलंबी झाल्यावर, जबाबदारी कळू लागल्यावर या आकर्षणाचे पुढे शारीरिक-भावनिक संबंध निर्माण होण्याकडे कल असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटणे, आवडणे ही प्रक्रिया खूप नैसर्गिक आहे. पौगंडावस्थेत ही भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये अंकुरित होते. पण, त्याचे पुढे कसे करायचे, यावर त्या व्यक्तीचा समजूतदारपणा, जबाबदारपणा यावरच अवलंबून आहे. कामवासना उद्युक्त होईल, असे वाचन/चित्र/चित्रपट/व्यसने करणे, हे चुकीचे आहे. शरीरात जेव्हा हा आवेग निर्माण होतो, तेव्हा त्याचे शरीरातून निष्क्रमण होणे गरजेचे आहे. पण, कामासक्त जीवन असू नये. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘त्या’ एका विषयावरच चिंतन-मनन-आचरण असू नये. अधारणीय शारीरिक वेगामधील जो रेतस आहे, तो म्हणजे उत्पन्न झालेल्या वेगाचे-आवेगाचे धारण करू नये, असा अर्थ होतो. कामासक्त जीवन व्यतीत करा, असा विषय, अर्थ होत नाही.
शुक्रस्खलन होण्यापूर्वी शरीरात शुक्राच्या निष्क्रमणाची प्रक्रिया सुरू झालेली असते. कामवासना उत्पन्न करण्यासाठी आधी भावना उत्पन्न होणे महत्त्वाचे असते. एखादी गोष्ट-व्यक्ती इ. आवडणे, त्याबद्दल आकर्षित होणे, त्याबद्दल विचार-कल्पना करणे ही आधी सुरू झालेली प्रक्रिया असते. त्याचे अंतिम स्वरूप म्हणजे उत्पन्न होणे. ही प्रक्रिया वारंवार होऊ नये, हे अगदी बरोबर आहे. दिवसरात्र याच विषयाच्या आधीन राहू नये, हेदेखील बरोबर आहे. मनाला, विचारांना या कामोसक्त वातावरणातून बाहेर काढणे, हेदेखील गरजेचे आहे. पण, जेव्हा संपूर्ण प्रक्रिया झाली असून फक्त बाकी असेल, तेव्हा त्याचा वेग थांबवू नये, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. जे वेग उत्पन्न झाले आहेत (सा शारीरिक वेग) त्यांचे शरीरातून निष्क्रमण होणे गरजेचे आहे. हे शरीरातील टाकाऊ घटक, अनावश्यक घटक, अतिरिक्त घटक आहेत आणि त्यांना शरीरात थांबवून ठेवल्याने आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. वेगांचे निष्क्रमण वेळोवेळी होणे महत्त्वाचे आहे.
रेतस या वेगाचे धारण जर केले, तर त्या वेगाला दाबून ठेवण्याचा शरीर व मनावर परिणाम होतो आणि मनोकायिक (झीूलहेीेारींळल ऊळीेीवशीी) आजार उत्पन्न होऊ शकतात. शरीरातील दोषांची स्थिती व गती यांमध्ये विषमावस्था उत्पन्न होते. शरीरातील कुठल्याही गतीला-हालचालीला वात महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे. त्या गतीला अडविले तर वाताची गती बिघडून विविध त्रास उत्पन्न होऊ शकतात. शुक्र वेगाचे धारण केल्याने शुक्रनिर्मितीच्या अवयवांमध्ये जडपणा जाणवून वेदना उत्पन्न होऊ शकतात. वेदना तीव्र स्वरूपाची असू शकते. असे वारंवार केल्याने वाताची प्राकृतिक गती बदलून वात सर्व शरीरात त्रास उत्पन्न करू शकतो. जसे-अंगदुखी (अंग-अवयवांमध्ये मोडल्यावत, तुटल्यावत वेदना होणे) छातीतही अस्वस्थता जाणविणे. त्याचबरोबर मूत्रप्रवृत्तीमध्ये बाधा उत्पन्न होऊ शकते (जर्लीीीींलींळेप). शुक्र वेग धारणामुळे मनावरही परिणाम होतो. एकाग्रता व आकलन क्षमतेमध्ये फरक-कमतरता जाणवते. मानसिक-भावनिक व बौद्धिक कार्यामध्येदेखील बिघाड होतो. वारंवार गुह्यांग प्रदेशी वेदना (झरळप ळप ींहश ीलीेींरश्र ीशसळेप) झाल्यास ताप येणे, वीर्याचे स्खलन नकळत होणे, गुह्यांग प्रदेशी सूज येणे आणि पुढे जाऊ शुक्राश्मरी (डशाळपरश्र लरश्रर्लीश्रळ)देखील तयार होऊ शकतात. वाताच्या नैसर्गिक गती व दिशा बिघडल्याने शरीरात वात वाढतो. त्याचा ताण आतड्यांवर-मूत्राशयावर-पोटावर येतो. पोटातील स्नायूंवर अतिरिक्त ताण वारंवार येऊ लागला, तर हार्नियादेखील होऊ शकतो. वारंवार शुक्र वेग धारण केल्याने षंढत्वदेखील येऊ शकते.
पण, हे सगळे टाळता येऊ शकते. मन व विचार सतत कामासक्त विषयांमध्ये रमवू नयेत. सात्विक आचरणाने खूप फायदा होतो. वेळीच शुक्र वेग धारणाची सवय सोडल्यास कुठलीही कायमस्वरुपी दुखापत शरीर-मन-उभयांवर होत नाही. वातशमनासाठीचे जे उपक्रम व चिकित्सा आयुर्वेदाने सांगितली आहे, त्यांचा अवलंब करावा. अभ्यंग (अंगाला तेल लावणे), अवगाह (ढणइ इअढक) बस्ती (पंचकर्मातील एक कर्म) इ. चिकित्सा पद्धती अवलंबावी. पण, केवळ तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालील चिकित्सा करून घ्यावी.
- वैद्य किर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)